मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
नवरी दमेली

लग्नाची गाणी - नवरी दमेली

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


नवरी दमेली
नये धसींचे आऊले बाई
आवली दमेली आवल्यांचे भारे
नवरी दमेली साड्यांचे भारे

नये धसींचे आऊले बाई
आवली दमेली आवल्यांचे भारे
नवरी दमेली बांगड्यांचे भारे

नये धसींचे आऊले बाई
आवली दमेली आवल्यांचे भारे
नवरी दमेली झांजरांचे भारे
(नय-खाडी, धस-किनारा, झांजर-घुंगरू लावलेले पैंजण)

नवरी वाकली
खाडी किनारीच्या आवळेबाई
आवळीबाई वाकली आवळ्यांच्या भाराते
नवरीबाई वाकली साड्यांच्या भाराने

खाडी किनारीच्या आवळेबाई
आवळीबाई वाकली आवळ्यांच्या भाराते
नवरीबाई वाकली बांगड्यांच्या भाराने

खाडी किनारीच्या आवळेबाई
आवळीबाई वाकली आवळ्यांच्या भाराते
नवरीबाई वाकली पैंजणांच्या भाराने

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP