खंड ९ - अध्याय ३७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । विघ्नराजखंडाचें करितां श्रवण । जें फल लाभलें महान । त्याची कथा पुण्यपावन । सूत सांगती शौनकासी ॥१॥
बिभीषणास लंकेचें राज्य प्राप्त होत । तो रामास पूजित । भक्तियुक्त त्यास स्तवित । तेथ प्रथम पूजन गणनाथाचें ॥२॥
करावें लागलें ऐसा विचार । त्यास जाहला सुखकर । तो परी मनांत गणेशा ध्यात । सर्वपूज्य जो ब्रह्मनायक ॥३॥
त्याचें उच्छिष्ट अन्य देव भक्षित । याचें तयास नवल वाटल । एकदां योगीश नारद तेथ येत । पूजीत त्यांस प्रणाम करून ॥४॥
ह्रदयस्थ प्रश्न त्यास विचारित । गणेशउच्छिष्ट भोक्ते अन्य देव कसे होत । अग्रपूज्य प्रभाव यास वेदसंमत । कैसा प्राप्त जाहला ॥५॥
तेव्हां नारद त्यास म्हणत । ब्रह्माकार शिवादिदेव असत । नानायोगप्रधारक ज्ञात । ब्रह्मे अन्नमुख पावक ॥६॥
ऐसें वेद सांगती सुखेक । त्यांचा स्वामी गणेश मुख्य । ब्रह्मांच्या पालनभावें जागरूक । ब्रह्मणस्पति संज्ञा त्यास ॥७॥
त्यांसी योगदानार्थ । देहधारी गजानन होत । गजाननादि चिन्हांनीं युक्त । विघ्नें सत्तात्मक ज्ञात ॥८॥
त्यांचा स्वामी तो असत । विघ्नांनी जो खेळत । विघ्नें उपस्थित करून सतत । क्रीडा करी योगरूपधर ॥९॥
म्हणून विघ्नराज शोभन । नांव त्याचें पावन । ब्रह्में विघ्नयुक्त असून । सत्यसंकल्पहीन तीं ॥१०॥
पराधीन स्वभाव असत । त्यासी जाणतो सतत । स्वकीय म्हणून सुप्रीत । जन्म तो गणेश अवतारें ॥११॥
त्या ब्रह्मांस आदरें देत । आपुला मुख्य योग शाश्वत । तेव्हां तीं विघ्नहीनत होत । वीर्ययुक्त तैसेची ॥१२॥
म्हणून हा गणेश्वर पूर्ण । सर्वांच्या पूर्णत्वें युक्त शोभन । वेदांत सर्वादित्व लाभून । ज्येष्ठराजाच्या प्रभावें ॥१३॥
ऐश्या त्या विघ्नेश्वरा सतत । शांतिदात्यास भज भक्तियुक्त । तोच विघ्नेश संशयातीत । कलांशानें विराजतो ॥१४॥
गणेशभजनानें व्यभिचार । भक्तिमार्गात कैसा होणार । समूहांचा पति हा थोर । विष्णु मुख्यक देवांचा ॥१५॥
ऐसें बोलून महायोगी स्मरण । करी गणेशाचें भजन । महाबुद्धि संत तो गात गायन । गेला स्वच्छंदें गणेशरत ॥१६॥
विघ्नराजाचा खंड वाचित । नित्य नेमें मुद्‍गल पुराणस्थ । त्यायोगें शांतियुक्त । जाहला तो बिभीषण ॥१७॥
गणेशास नित्य भजत । रामाशी ऐक्य त्याचें जाणत । एकदां तो राक्षसाधीश जात । सेतुबंधनाच्या जागीं ॥१८॥
तेथ महोदरास पूजून । विघ्नराज खंडाचें करी वाचन । एक बेडकीण जलांत बसून । खंड उत्तम तो ऐके ॥१९॥
त्यायोगें सुखयुक्त होत । तेवढयांत एक सर्प तिज पकडित । तिजला गिळून टाकित । मृत्यु ऐसा तिचा झाला ॥२०॥
मृत्यू नंतर तिजला नेत । गणेशदूत स्वानंदपुरींत । त्या बेडकीस ब्रह्मभूत । करिती मोठया आनंदानें ॥२१॥
ऐसें नकळात घडतांही श्रवन । विघ्नेश चरिताचें पावन । नाना जन फल लाभती प्रसन्न । ऐकून हा खंड सदा ॥२२॥
भोग ऐहित भोगून । अन्तीं स्वानंदलोकीं गमन । करिती त्यांचा वृत्तान्त पूर्ण । वर्णन करण्या अशक्य असे ॥२३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशस्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे विघ्नराजखंडश्रवणपठनमाहात्म्यवर्णानं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP