TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

खंड ९ - अध्याय ३३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


अध्याय ३३
॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत सांगती महिमा अद्‍भुत । शौनक भक्तीने ऐकत । एकदंत चरित महिमान पुनीत । वर्णिंलें मागच्या अध्यायीं ॥१॥
सांप्रत महोदर चरिताचें श्रवण । केल्यानें जे लाभे शोभन । त्या पुण्यफळाचें कथन । सूत करिती शौनकासी ॥२॥
माध्यंदिन नाम महाभाग मुनि स्वधर्मरत । सर्वार्थकोविद तपयुक्त । तो शांतिप्राप्तर्थ जात । व्यासांच्याकडे एकदा ॥३॥
त्या सर्वज्ञ मुनी स नमित । नंतर विनयपुर्णं विचारित । व्यासमुने या जगांत । शांत्यर्थ काय नरें करावें ॥४॥
जो उपाय करिता होत । ब्रह्मीभूत जन भक्त । उपाय ऐसा मजप्रत । सांगावा कृपा करोनी ॥५॥
संयोग अयोगें ब्रह्मभूत । व्यास सांगती नर या जगांत । त्यायोगें शांति लाभत । ती शांति सर्वसंमत असे ॥६॥
तोच गणथाथ वर्तत । महोदरनामें ख्यात । त्यास भज तूं विधानयुक्त । तरी शांतिलाभ तुजप्रत ॥७॥
संयोग अयोग तो गणेश असत । त्यांच्यायोगें जे जन्मत । ते भोग उदरीं सामावित । म्हणोनि हा गणेश महोदर ॥८॥
ब्रह्मांत ब्रह्मसौख्य ख्यात । योगांत जें योगोद्‍भव वर्तत । तो भोग जेथ स्थित । तें हें जठर गणेशाचें ॥९॥
जगतांच्या तैसें ब्रह्ययांच्या जठरांत । असे हा गणेश स्थित । भोगभोक्ता हाच सतत । त्यास न कोणी सामावूं शके ॥१०॥
म्हणून वैदांत हा ख्यात । महोदर नामें विश्चित । एक हा त्यास तूं भजत । जरी भक्तिभावपूर्ण मतानें ॥११॥
तरीच शांति तुज लाभेल । तुझें दुःख दूर होईल । ऐसें सांगून दचन अमल । महायोगी व्यास थांबल ॥१२॥
योगींद्रसत्तमास त्या नमून । माध्यंदिन करी स्तवन । त्याची आज्ञा घेऊन । आश्रमांत आपुल्या तो परतला ॥१३॥
महोदर चरित मुद्‍गलपुराणांत । तें तो विशेषें भजत । सेव्य योगपर होऊन ध्यात । महोदरासी नित्यनेमें ॥१४॥
त्यायोगें गणाधीश प्रसन्न । संतुष्ट होऊन देत वरदान । सुशांतिप्रद योग महान । देई प्रभू तयाला ॥१५॥
त्यायोगें शांतियुक्त । नित्य गणनायकास भजत । महोदर चरित्र वाचित । नित्यनेमें आदरें ॥१६॥
महायोगी तो स्थापित । विघ्नपाची मूर्ति भावयुक्त । गणराजाचें पूजन सतत । करून पुराण वाचित दक्षा ॥१७॥
महोदराचें चरित्र वाचित । त्या गणेशाच्या पुढयांत । तेथ बेडूक एक येत । दैवयोगें पुढयांत ॥१८॥
तो तें पुराण ऐकत । त्यास अर्थ कांहीं न समजत । परी गणेस निर्माल्यांत । भयभीत बसून राहिला ॥१९॥
ऐसा बहुत काळ जात । तेव्हां तो बेडूक मृत्यु पावत । त्यास नेण्या येत । गणेशदूत आनंदानें ॥२०॥
त्यास घेऊन जात स्वानंदलोकांत । करितो मंडूला ब्रह्मभूत । एकदां ऐकतां तें फळ लाभत । महोदर चरित धन्य हें ॥२१॥
ऐसें पाठाचें महिमान । परम अद्‍भुत महान । ऐसें नाना जन उद्धरून । गेले या महोदरचरित्र योगे ॥२२॥
तो योगें भोग भोगून । अंतीं ब्रह्ममय अमृत होऊन । करिती स्वानंदलोकीं गमन । महोदर चरित खंड प्रभावें ॥२३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थंशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे महोदरचरितमाहात्म्यवर्णनं नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:16.0070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

aaqueous solution

  • जलीय द्रावण 
RANDOM WORD

Did you know?

Every hindu follows different traditions, can you explain how?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.