मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ७७ वा

काशीखंड - अध्याय ७७ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ अगस्ति वदे जी षडानना ॥ शिव कथा निधाना चिया अंजना ॥ कीं द्वादश भुजा अष्ट दशलो चना ॥ तूंचि होसी स्वामी ॥१॥
नाना पुराणें पृथ्वी मंडळी ॥ विस्तारिलेम तूं जीवन त्यांचे मुळीं ॥ जनोपकारा फळलीं अवकाळीं ॥ शिव नामा मृतें ॥२॥
जी मज तुमचा दीर्घ उपकारू ॥ शांत करितां माझा वियोग अंगारू ॥ ससार सागरीं बुडतां तारूं ॥ प्राप्त केलें तुम्ही ॥३॥
ऐसा तूं शिव भवानींचा नंदनू ॥ तूं चतुर्वाचा वेदांचा मूळदानू ॥ मज प्राप्त केला पूर्ण प्रसाद भानू ॥ तुझिये इच्छें तुवां ॥४॥
मी एक अनाथ जी कृपानिधी ॥ मज क्षमा कीजे मंद बुद्धी ॥ काशीखंड निरूपिलें हे सिद्धी ॥ साध्य जाहाला मज ॥५॥
आतां प्रश्न असे जी सर्वोत्तमा ॥ मी प्रश्नितां भय भीत तुम्हां ॥ जरी मज प्राप्त असेल तुमची क्षमा ॥ मनो भावें ॥६॥
समर्थाचें भाग्य अपारिक ॥ त्याची विवंचना केवी रंक ॥ जरी तो संतोषोनि तुळी मस्तक ॥ तरी भक्ति घडे ॥७॥
जरी माझा भाव असेल तेसा ॥ जन्मांतरी पूजिलें असेल विश्वेशा ॥ तरी तूं सर्वथा देवा धीशा ॥ क्षमा करीं मज ॥८॥
तरी काशी मध्यें लिंग ईश्वरू ॥ जो त्रैलोक्याचें मूळबीजे तरू ॥ तें भवानी प्रति कर्पूर गौरू ॥ कैसा अनुवादला होता ॥९॥
आतां सावधान श्रोतोत्तमा ॥ अनुपम ईश्वराचा महिमा ॥ श्रवण पठनें तत्काळ दोष तमा ॥ वेगळे होइजे ॥१०॥
स्वामी म्हणे गा कुंभोद्भवा ॥ कवण प्रमाण करी त्या महा देवा ॥ हेंचि प्रश्नीत होती अयोनि संभवा ॥ कर्पूर गौरासी ॥११॥
तेचि कथा जे पूर्वा पारीं ॥ उमेसी अनुवा दले होते त्रिपुरारी ॥ मी ते निरू पितों गा तपे श्वरी ॥ महा ऋषि अगस्ती ॥१२॥
ईश्वराचे पश्चिम भागीं जें स्वरूप ॥ असे मोक्ष लक्ष्मी विलास मंडप ॥ त्या मंडपी ठाकला गणाधिप ॥ महा देव ॥१३॥
शिवें पाचारिले देव ऋषी ॥ यक्ष राक्षस सहपरि वारेंसीं ॥ शेष नाग नरमान वांसी ॥ परिवारिलें शिवें ॥१४॥
वैकुंठवासी सिंधु नंदिनी ॥ ते हरिरूपिं कैसी  शोभली कामिनी ॥ कीं ते जैसी मिरवे जंबु नंदिनी ॥ कोमलांगी ॥१५॥
ऐसीं तीं कमळजा नारायण ॥ ह्रदयीं विश्वं भराचें स्मरण ॥ ऐसा तो हरि सेवा सावधान ॥ शिवाच्या भक्तीसी उभा असे ॥१६॥
अणिक सावित्री विधीची शक्ती ॥ ते लोहित वर्ण दिसे दीप्ती ॥ जैसी वसिष्ठा जवळी अरुंधती ॥ मिरवतसे गुणतत्त्वें ॥१७॥
ऐसा तो सावित्री सहित विधी ॥ सृष्टिकर्म कल्पीतसे आदी ॥ शिव गायत्री जपे पाणि बद्धी ॥ उभा शिव दक्षिणांगीं ॥१८॥
आणिक त्रयशक्ति हुताशन ॥ जो गार्हपत्य शिवाचा भाललोचन ॥ तो शिवाची भक्ति साधून ॥ उभा अग्नि दिशीं ॥१९॥
आणिक दश प्रियांसी धर्मराज ॥ भक्तीं तोष विली वृष भध्वज ॥ तो सर्वज्ञ सवितात्मज ॥ उभा दक्षिण भागी ॥२०॥
जो पूर्व जन्मी पिंगाक्ष राजा ॥ त्यासी दोन सुंदरी दक्षात्मजा ॥ सवें यक्षराक्ष सांचिया फौजा ॥ निऋति दिशीं   ॥२१॥
त्रयं सुंदरीसी कर्दम सुत ॥ तो वरुण नामा महा शिव भक्त ॥ शिवाचे पश्चिमदिशीं महा दूभुत ॥ उभा शिव सेवेसी ॥२२॥
त्रय सुंदरीचा प्रतिमावर ॥ जो कश्यप दितींचा कुमर ॥ जो दशायुध भक्तीसी समीर ॥ उभा वायव्य भागीं ॥२३॥
सत्ता विसां सुंदरीचा अधिपती ॥ तो अत्रिसुत पद्मिनीचा पती ॥ शीत करनामें दिव्य दीप्ती ॥ उभा उत्तर भागी ॥२४॥
वामांगीं प्रिया असे दाक्षा यणी ॥ जे एका दश रुद्र उभे ईशानीं ॥ संतुष्ट करा वया शूलपाणी ॥ तेही भक्त्यर्थ पैं ॥२५॥
शिवाचे सर्व गण असती साउभे ॥ त्यां मध्य़ें श्रेष्ठ जो परा क्रमें ॥ तो शिखि ऋषीचा बाळ उत्तम ॥ नंदिकेश्वर नामा ॥२६॥
ऐसे आपुल्या प्रिया भृत्येंसी ॥ प्रमथ उभे शंकरा पासीं ॥ मग शिव म्हणे सर्व देवांसी ॥ परिसा जी उत्तर ॥ माझें ॥२७॥
माझिया पादुका सप्तपाताळीं ॥ तेथें मी ध्यानस्थ होतों कोणे काळीं ॥ मग म्यां लिंग स्थापिलें त्या विपुल स्थळीं ॥ त्या नाम हाटकेश्वर ॥२८॥
त्या लिंगा पासाव अंकुर ॥ उद्बवला महा साक्षात्कार ॥ तो सप्तपाताळांचा छिद्रकर ॥ भेदिता जाहाला ॥२९॥
तें लिंग पृथ्वीचें मूळ जीवन ॥ आपणचि स्थावर जाहाला पंचानन ॥ त्याचे कंठीं असे शेष भूषण ॥ तेणें धरिली पृथ्वी ॥३०॥
तेचि लिंग उद्भवलें स्वयंभ ॥ कीं तें मस्तकीं धरा वया नभ ॥ एकवीस स्वर्गांचा पूर्ण स्तंभ ॥ विश्वनाथ हा ॥३१॥
शिव म्हणे गा हरि विरिंची ॥ ही काशी रचिली म्यां नेणों कैंची ॥ मग या विश्वनाथ लिंगाची ॥ कवण जाणे हेतु स्थिती ॥३२॥
तें लिंग म्यां होतें पूजिलें ॥ आपुल्या स्वहस्तेंचि स्थापिलें ॥ माझिये इच्छे स्तव प्रकटलें ॥ मृत्यु मंडपी ॥३३॥
तरी या लिंगाचा पूर्ण महिमा ॥ मजही अगम्य रे पुरुषोत्तमा ॥ हे पंचक्रोशी माझी निजधामा ॥ तुझी जन्म भूमि हरी ॥३४॥
अव्हेरीना आपुलें गृह भुवन ॥ मनीं कल्पिजे काशी भुवन ॥ तरी सत्यचि घडे कपिलादान ॥ सत्पात्रीं द्वयद शक ॥३५॥
काशी गमन कल्पोनि चित्तीं ॥ सप्तपदें क्रमी जो वसुमती ॥ तरी शत एक जन्मांचीं दहती ॥ महा किल्बिषें ॥३६॥
जयासी घडे काशीचें दर्शन ॥ आणि स्वर्ग सरितेचें आचमन ॥ त्यासी घडलें अमृत पान ॥ शिव सभे कैलासीं ॥३७॥
जयासी घडे काशीचा पूर्ण वास ॥ तो साक्षात गा उमा महेश ॥ वैकुंठवासी जो ह्रषीकेश ॥ नमस्कार करी तया ॥३८॥
वाराण सीमध्यें पंचत्व घडे ॥ तैं आमुचें ब्रह्मद्वार उघडे ॥ तेणें यमपंथीं घातले गडे ॥ मातृ पितृ द्वयपक्षीं ॥३९॥
शंकर वदे सर्व ब्रह्मीं ॥ तुम्ही संशयो अव्हेरा सर्वही ॥ अनुचित जरी नामाल कांहीं ॥ तरी घडेल महा दोष ॥४०॥
अखंड बिल्वपत्रीं विश्वनाथ ॥ पूजी रंक अथवा समर्थ ॥ त्यासी निर्वाणपदाचा पंथ ॥ तत्काळ मुक्त ॥४१॥
हिरण्य पुष्पें शुद्ध कमळें ॥ विश्वनाथी समर्पितां गंगा जळें ॥ तत्काळ प्राप्त होती फळें ॥ जी मनेच्छा ॥४२॥
शिव म्हणे ब्रह्मया पुरुषोत्तमा ॥ तरी या लिंगाचा जो पूर्ण महिमा ॥ तो पृथक्‍  पृथक्‍ मेघश्यामा ॥ न सांगवे मज ॥४३॥
हें लिंग दुर्लभ गीर्वाणां ॥ हें लिंग दुस्तर तारण त्रिभुवना ॥ दुर्लभ यज्ञ राक्षस गंधर्व गणां ॥ महा शास्त्र हें ॥४४॥
जया नैवेद्याची सितें विभागें ॥ तितुकींचि होती कल्पयुगें ॥ कैला सींही शिव लिंगें ॥ पूजिलीं तेणें पैं ॥४५॥
या लिंगाचा सर्व शास्त्राधिकारू ॥ हें लिंग भूक्ति मुक्तींचा पूर्ण गुरू ॥ या चिया नामें महा दोषां कुरू ॥ परा भवती पैं ॥४६॥
न्यायिक द्र्व्याचीं महा मिष्टान्नें ॥ विश्वनाथीं समर्पी जो शुद्ध मनें ॥ महा विष्णूसी निवे दिलें पंचाननें ॥ परियेसीं तें सामर्थ्य ॥४७॥
या लिंया जवळी करी महारुद्र ॥ त्या चिया सामर्थ्या न तुळे समुद्र ॥ शतपद्में अनुष्ठानें केलीं तो चंद्र ॥ न्य़ून दिसे शत गुणें ॥४८॥
या लिंगा जवळी करी जो अश्चमेध ॥ दिव्यांबरीं वेष्टी शिव प्रासाद ॥ तरी त्या सामर्थ्याचा गर्भ भेद ॥ परिसा सर्वही ॥४९॥
मग कल्पी तसे महा चोज ॥ या पंचक्रोशीचे भूमिरज ॥ तितुकीं युगें कैलासीं पूर्वज ॥ भोगिती सुख ॥५०॥
या विश्वंभराचा प्रासाद मौळीं ॥ दिव्यांबरें झाडिजे रज धूळी ॥ तो छत्रपति मही मंडळी ॥ त्रिजन्म पर्यंत पैं ॥५१॥
तीं शिवाचीं कळसाग्रें मनोहर ॥ रज प्रक्षाळिजे गंगानीर ॥ गोदंड अथवा मौळि भार ॥ स्पर्शों नये ॥५२॥
तरी त्या समर्थाची नीती ॥ पुण्य लक्षितां हरि विधि चळती ॥ जरी लक्षवे तो पशुपती ॥ तरीचि गम्य तयांसी ॥५३॥
येर्‍हवीं महा कल्पाचे संख्या पर्य़ंत ॥ तें सामर्थ्यं नेणे लक्ष्मीकांत ॥ जो विश्वनाथ विश्वभरित ॥ तोचि जाणे पैं ॥५४॥
नाना रंग मेळवूनि बहु युक्तीं ॥ पौळीं प्रासादीं जो चित्रितो भिंतो ॥ जो शतयुगें ॥ वज्र हस्ती ॥ होय सुरनरीचा ॥५५॥
पुनरपि मागुता काशी निवासी ॥ त्यासी प्राप्त होय वाराणसी ॥ मृत्यु अंतीं कैला सनिवासी ॥ मुक्ति उत्पत्ती विरहित ॥५६॥
मृगांकमौळी वदे गा विधि हरी ॥ हीं पंचभूतें उत्पत्ति करी ॥ तीं वर्तत असती ब्रह्मांड भरी ॥ तीं या लिंगाचे शक्तीं ॥५७॥
लिंगें असती त्रैलोक्य भरी ॥ स्वर्ग मृत्यु पाताळ विवरीं ॥ परी जें सामर्ध्य विश्वेश्वरीं ॥ तें नाहीं कवण्याही लिंगा ॥५८॥
आणिक वदताहे त्रिपुरारी ॥ हें त्रैलोक्य लिंगा आधारीं ॥ हें लिंग भरलें त्रैलोक्य भरी ॥ तें सांगों तुज ॥५९॥
ब्रह्मांड न माये त्रैलोक्यासी ॥ येथें ईश्वर पंचमहाहा भूतेसीं ॥ तो स्वहस्तें करी पंच क्रोशी ॥ मूळ जीवन तयाचें ॥६०॥
तरी हीं पंचही द्दश्य सगुणें ॥ एक एकाहूनि होती विस्तीर्णें ॥ पृथ्वी भूत नव्यायशीं कोटि योजनें ॥ निर्मिली असे ॥६१॥
पंच अर्बुद साठ कोटी जाणा ॥ इतुकें निर्मिलें असे जीवना ॥ ज्यावरी पृथ्वी तारूं सगुणा ॥ तें पृथ्वी रहित ॥६२॥
परिघ करावया क्षिति मंडळ ॥ वरुण वृष्टी करी तेजाळ ॥ मग प्रवाहती सकळ ॥ तेणें भरितें समुद्र ॥६३॥
अदभुत वरूणाची बळ शक्ती ॥ केवीं पां सप्त सागर ॥ तुळती ॥ परिघ करा वया अवघी क्षिती ॥ अल्प जळ समुद्राचे ॥६४॥
छप्पन्न अर्बुद संख्या सहज ॥ हें भूत निर्मिलें असे तेज ॥ हें भक्षीत प्रळयींचें अंबु सहज ॥ मग समुद्रा तो किती ॥६५॥
साठ अर्बुदें निर्बुदें पंचें ॥ इतुकें प्रमाण असे वायुचें ॥ हा महातेज भक्षी प्रळयींचें ॥ महा द्‍भुत पवन ॥६६॥
त्रेपना निर्बुदें संख्या आकाशाची ॥ ऐसीं दीर्घ स्थूळें पंच भूतांचीं ॥ शिव म्हणे गा हरि विर्रिंची ॥ ऐसें हें ब्रह्मांड ॥६७॥
व्योमगर्मीं एकवीस स्वर्ग मंडळें ॥ पृथ्वी गर्भीं सप्त पाताळें ॥ तरी हें स्वहस्तें महा शाक्तिबळे ॥ तया विश्वरूपा चिया पैं ॥६८॥
ऐसा हा ब्रह्मांड्द्रुम समूळ ॥ पंचक्रोशी तया वृक्षाचें फळ ॥ त्या मध्यें पूर्व बीज तें केवळ ॥ विश्वेश्वर बोलिजे ॥६९॥
त्या बीजा मध्यें पूर्णांकुर ॥ तोचि क्षर अक्षर विश्वंभर ॥ अरे हें ब्रह्मांड तोचि शंकर ॥ परिसें विधि हरी ॥७०॥
त्या विश्वेश्वराचें जें स्थूळ ॥ तें हें ब्रह्मांड बोलिजे सकळ ॥ सोम सूर्य तारा ग्रह मंडळ ॥ कंठी असे तयाचे ॥७१॥
कटिसूत्रा पासाव सप्त पाताळें ॥ तीं या लिंगाची बोलिजे पादतळें ॥ मुकुट एकवीस स्वर्ग मंडळें ॥ सप्त समुद्र कुक्षीं ॥७२॥
पाणिपा दादिक जे अष्त नळ ॥ तेचि अष्ट कुलाचळ ॥ त्यांसी नाडी वेष्टि लिया सकळ ॥ त्या गंगा दिसरिता ॥७३॥
रोमाग्र अठरा भार वनस्पती ॥ क्षितिगर्भीं कूर्म त्याचिया अस्थी ॥ ब्रह्मा विष्णु रुद्र त्रिमूर्ती ॥ या लिंगाचे चक्षू ॥७४॥
दक्षिण चक्षु तो चतुरानन ॥ हरि बोलिजे वामलोचन ॥ मग तृतीय नेत्र तो तमो गुण ॥ रुद्र बोलिजे ॥७५॥
आणि चतुर्दिशा चार कोन ॥ ते या लिंगाचे जाणावे श्रवण ॥ पश्चिम पृष्ठीं वर्ततें वदन ॥ या लिंगाचें पैं ॥७६॥
तरी एवढें स्थूळ गा पुरुषोत्तमा ॥ आतां हें लिंग शिवाचा आत्मा ॥ हें मी पूजित होतों याचा महिमा ॥ अगम्य मज ॥७७॥
या लिंगाचें घडे पूजन ॥ तरी सर्वही लिंगें पूजिलीं तेणें ॥ पूर्वजांसी घडे अमृत पान ॥ शिव सभेसी कैलासीं ॥७८॥
जया जन्मांतरीं घडे वाराणसी ॥ सर्वही तीर्थें जाहालीं तयासी ॥ जेणें नमस्कारिलें विश्वनाथासी ॥ तेणें वंदिलीं सर्वही लिंगें ॥७९॥
पाताळ पुटींचीं लिंगें तीर्थें ॥ जीं साक्षाधिकें महा समर्थें ॥ त्यांचीं कोटि दर्शनें व्यर्थें ॥ विश्वनाथाच्या एका दर्शनें ॥८०॥
जीं जीं लिंगें मृत्यु मंडळीं ॥ महा साक्षात्कार या भूतळीं ॥ सूर्य याग कीजे त्यां जवळी ॥ शत सहस्त्र पृथक्‍ ॥८१॥
तरी कुलित्थ धान्याचा नैवेद्य ॥ तो शिवासी अर्पिजे सप्रेमानंद ॥ मुखीं उच्चारीं जो शिव शिव शब्द ॥ त्रयवेळां पैं ॥८२॥
हें सामर्थ्य अधिक लक्ष गुणें ॥ यासी न तुळती पृथ्वी दानें ॥ आकाश पर्यंत वेदि हिरण्यें ॥ तीं न्यूनचि बोलिजे ॥८३॥
जो विश्वनाथाचा नित्य उपासनी ॥ त्यासी नमस्कार करितो वज्र पाणी ॥ दिक्पती आणि ब्रह्मा चक्र पाणी ॥ तोही आदिकरूनी ॥८४॥
शंकर वदे विधि हरींसी ॥ मी सहसा नसें कैलासीं ॥ परी प्रकट वाराणसीं ॥ सर्व काळ असें ॥८५॥
अनंत रूपें माझीं अन्यत्र स्थळीं ॥ मी भरलों असें ब्रह्मांड मंडळीं ॥ परी मी अद्दश्य काशी स्थळीं ॥ सर्वथा नसें पैं ॥८६॥
जैसें पृथ्वी वेगळें बीज असतां ॥ आणि अंबूमाजी मिश्रित न होतां ॥ तोंवरी अंकुर वृद्धीची वार्ता ॥ न देखिजे चक्षीं ॥८७॥
कीं जैसें आत्म्या विण अचेत प्रेत ॥ कीं महा दानें पात्रा विरहित ॥ तैसा अन्यत्र स्थळीं मी किंचित ॥ असें नसें ॥८८॥
तरी हें माझें आनंदवन ॥ त्रैलोक्य प्रसिद्ध काशी भुवन ॥ हें मूळत्रयीं अविनाश म्हणोन ॥ प्रकट असें तेथें मी ॥८९॥
ऐसें हें लिंग महत्त्वाचें ॥ मज स्मरण नाहीं पूजितों कैंचें ॥ ऐशीं सहस्त्र वरुषें या लिंगाचें ॥ जाहालें नाहीं दर्शन ॥९०॥
म्यां केलें अपार युगेंवरी ॥ तें पुण्य फळ आलें पूर्वापारीं ॥ तरीचि हें गा लिंग विधि हरी ॥ देखिलें आम्हीं ॥९१॥
हें लिंग चतुर्वेदांचा मूळकंद ॥ अठठया यशीं सहस्त्र मुनींचा आनंद ॥ सनका दिकांचा ब्रह्मकंद ॥ हा आनंद विश्वाचा ॥९२॥
आणिक वदताहे विश्वनाथ ॥ म्हणे हरि हें लिंग अति समर्थ ॥ याजवळी दिक्पती भक्त्यर्थ ॥ त्रिकाल असती ॥९३॥
कश्य पसुत जो सहस्त्रनयन ॥ अमरावतीचा अधीश शचीरमण ॥ तो भक्त्यर्थ जवळी भृत्य पण ॥ जाणावीतसे ॥९४॥
कल्पवृक्षाचीं कमळें सुंदर ॥ सुगंध सुपर्ण अंबुज अष्टदळाकार ॥ त्या गर्मीं उद्भवलें दिव्यांबर ॥ सोम सूर्यदीप्ति जैसी ॥९५॥
ऐसीं जीं दिव्यांबरें शुद्ध ॥ कल्पवृक्षचि उद्भवले अगाध ॥ तें अमूल्य चर्चित सुगंध ॥ घेतलें सहस्त्र पाणीं ॥९६॥
आणिक विश्वेश्वराचीं जीं आभरणें ॥ कोटि सूर्या चिया तेजें पूर्ण ॥ तीं शक्रें जवळी घेऊन ॥ उभा लिंगा जवळी ॥९७॥
सुगंघ द्र्व्यें शुद्ध अवदा नादिकें ॥ सहस्त्र ज्योती यागा दिकें ॥ ऐसें तेजाधिकें पावकें ॥ नित्य अर्चिये या लिंगीं ॥९८॥
सूर्याचा कुमर जो यम ॥ तो या लिंगीं नित्य उभा धर्म ॥ सर्वही शिवाज्ञें वर्ते नेम ॥ सत्यार्थ शब्दें ॥९९॥
भस्मधारी आयनें सुंदरें ॥ गजचर्म दिव्य व्याघ्रांबरें ॥ तीं घेऊनि जवळी असती निशाचरें ॥ या लिंगा जवळी नैऋत पैं ॥१००॥
दिव्य गोदंडाचें राजमान ॥ जैसें दिव्य द्रुमलता प्रमाण ॥ तें या लिंगासी वारीत वरुण ॥ पृष्ठीसीं उभा ॥१०१॥
भेरी मृदंगांचे ध्वाने अपार ॥ शंखतूर्यें दिव्य नादस्वर ॥ ते या लिंगा जाणवीत समीर ॥ अति मान्य पैं ॥१०२॥
आणिक सह्स्त्र योजनें विस्तीर्ण ॥ दिव्य छत्र पताका शुभ्रवर्ण ॥ दिव्य मणी जडिले संपूर्ण ॥ नक्षत्रादिकें ॥१०३॥
ऐसें जें छत्र ब्रन्ध शशी ॥ उंच एक ताळ मिरवे आकाशीं ॥ वर्तुळा कार तयासी ॥ सोम सूर्य मंडळें ॥१०४॥
षोडाशादिक जे पूजा युक्तीं ॥ सिद्धि साधनें नव विधा भक्ती ॥ ते या लिंगापें जाण विताती नीती ॥ ईशानरुद्र जे ॥१०५॥
ऐसे दिक्पती तेथें भृत्युपणें ॥ या लिंगा जवळी सेवा साधारणें ॥ कुबेर नवनिधि पूर्णपणें ॥ रक्षित भांडार ॥१०६॥
छप्पन्न विनायक तेथें त्रिकाळीं ॥ नृत्य करिती या लिंगा जवळीं ॥ नंदी भृंगी चंद्र सूर्य बद्धांजळी ॥ उभे असती सन्मुख ॥१०७॥
अठ्ठयायशीं सह्स्त्र महा मुनी ॥ ते प्रवर्तले असती हवनीं ॥ पृथ्वी परिघ व्हावी म्हणोनी ॥ पुण्य वृद्धी करोनी ॥१०८॥
या लिंगाच्या दक्षिण भागीं विरिंचि उत्तम ॥ स्मरतसे सृष्टीकार्याचा आगम ॥ या लिंगाच्या वाम भागीं पुरुषोत्तम ॥ भक्त्यर्थ उभा ॥१०९॥
या लिंगाचे चतुर्वेद सगुणें ॥ कथिताती शास्त्रें पुराणें ॥ नीति मार्ग व्हावया कारणें ॥ त्रैलोक्य वृद्धी ॥११०॥
जो या लिंगाचा वाचा उद्धार ॥ तो चतुर्वे दांचा बीजां कुर ॥ हेंचि बीज उत्तम ॐ कार ॥ जें मूळ वेदाचें ॥१११॥
ज्या चतुर्द शविद्या सालं कृती ॥ पुढें ओळंगे ते सरस्वती ॥ आणिक परिसें गा लक्ष्मी पती ॥ प्रत्युत्तर माझें ॥११२॥
नमस्कार करावया विश्वेश्वर ॥ पंचशत आले मत्स्या वतार ॥ अष्टोत्तर शतें असती निर्घार ॥ कूर्मरूपें तुझीं हरी ॥११३॥
आणिक परियेसीं गा साक्षेपें ॥ त्रिशतें असती वराहरूपें ॥ आणिक उग्र नर सिंह प्रतापें ॥ सप्तशतें आले तेथें ॥११४॥
पंचशत आले वामन ॥ या लिंगासी करा वया ॥ अभिवंदन ॥ परशु राम षट्‍शतें पूर्ण ॥ सप्तशतें राम ॥११५॥
तितुकेचि कृष्ण जन्मले ॥ एकवीस शतें बौद्ध जाहाले ॥ विश्वनाथ हरि विरिंचींसी बोले ॥ ते मज नमस्कारिती ॥११६॥
आणि कलंकी अवतार श्रीपती ॥ तेही आले अपरि मिती ॥ विश्वनाथ वदे हरि विरिंचीं प्रती ॥ म्हणे मज न सांगवे ॥११७॥
तितुकेही आले काशी मार्गें ॥ त्यांहीं आपुलालीं स्थापिलीं लिंगें ॥ यक्ष राक्षस नर मानव नागें ॥ स्थापिलीं सर्वत्रीं ॥११८॥
सप्तपाताळ पुटींचे फणिवर ॥ मृत्यु मंडळीचे मानवी महेंद्र ॥ स्वर्गींचे देवगण सुरेंद्र ॥ तितुके आले या काशी स्थळीं ॥११९॥
जितुके आले वाराणसी ॥ अद्यापि अगस्ति गा ह्रषी केशी ॥ आतां मी असेन त्या लिंगा पाशीं । असंख्य प्रळयीं ॥१२०॥
महा गंगा त्रिभुवनीं चिया ॥ नर्मदा कावेरी कालिं दिया ॥ भोगा वती मंदाकिनिया ॥ भागीरथी पुण्य जीवना ॥१२१॥
किरणा धूतपापा सुभद्रिका ॥ सरस्वती वरुणा सुचक्षुका ॥ नलिनी पावनी या त्रैलोक्या ॥ महा उद्धारणा पैं ॥१२२॥
ऐशा गंगा त्रैलोक्य उद्धरणीं ॥ समस्त वसती काशी भुवनीं ॥ सप्तसमुद्र आनंद काननीं ॥ अद्यापि वसती हो ॥१२३॥
ऐसीं सर्वही लिंगें सर्वही तीर्थें ॥ जीं त्रिलोकीं महा समर्थें ॥ तितुकींही सेवा साधनार्थें ॥ विश्वनाथ लिंगा चिया ॥१२४॥
मग सर्व देव दिक्पती ॥ यक्ष राक्षस सुरपती ॥ ब्रह्मा विष्णु सर्वही देखती ॥ विश्वनाथ लिंग ॥१२५॥
मग शिव म्हणे गा लक्ष्मीपती ॥ आतां या अध्यायाची सांगों फल श्रुती ॥ स्वामी म्हणे गा ऋषी अगस्ती ॥ परियेसीं आतां ॥१२६॥
हा अध्याय जया श्रवण पठण ॥ तया विश्वनाथाचें जाहालें दर्शन ॥ पूर्व जांसी जाहालें अमृत पान ॥ शिव सभेसी कैलासीं ॥१२७॥
तेणें दिधले सहस्त्र तुरंग ॥ शत एक केले सोमयाग ॥ तेणें स्थापिलें जी महा लिंग ॥ काशी मध्यें प्रसिद्ध ॥१२८॥
शत एक द्विज व्रत बंधनें ॥ सहस्त्र एक दिधली गोदानें ॥ एक भार वेंचिलीं सुवर्णें ॥ कुरुक्षेंत्रीं रवि ग्रहणीं ॥१२९॥
गोदेच्या मूळीं त्र्यंबकेश्वरीं ॥ तिथींच्या प्रदक्षिणा अष्टोत्तरी ॥ तेणें केल्या निर्धारीं ॥ यथा विधि जाण पां ॥१३०॥
सेतूबंध रामेश्वर सिंधुतीरीं ॥ तो पूजिला भागीरथीतीरीं ॥ दर्शन मल्लि कार्जुन शिखरीं ॥ जाहालें शत वेळां ॥१३१॥
पृथ्वी प्रदक्षिणेचें सामर्थ्य ॥ तेणें गृहींचि पूजिला विश्वनाथ ॥ तेणें श्रवण केले सर्व ग्रंथ ॥ अष्टादश पुराणें ॥१३२॥
गोदातीरीं सहस्त्र ब्राह्मण भोजनें ॥ यागीं हविलीं मुक्तें कीं सुवर्णें ॥ अथवा अष्टादश पुराणें ॥ परिसिलीं तेणें ॥१३३॥
स्वामी म्हणे गा ऋषि अगस्ती ॥ अपार या ग्रंथाची फल श्रुती ॥ नाना योनि मार्ग निवारती ॥ श्रवण पठनें ॥१३४॥
या अध्यायाचें सामर्थ्य अपार ॥ तुळितां थोडें सप्तसिंधुनीर ॥ राजद्वार आणि यमद्वार ॥ भया पासूनि मुक्त करी ॥१३५॥
या अध्यायाचें एवढें महिमान ॥ अल्प वृष्टि करी वरुण ॥ अमोघ जी या शास्त्राचें श्रवण ॥ कल्पांतींहीं न सरे ॥१३६॥
ब्रह्महत्येचीं महालांछनें ॥ गोत्रवध गोहननें ॥ इत्यादि महापातकलांच्छनें ॥ परा भवितीं तत्काळ ॥१३७॥
स्वामी म्हणे आतां परियेसीं एक ॥ जे कायिक वाचिक मानसिक ॥ दोष असती घडले सांसर्गिक ॥ ते निमिष मात्रें दूर होती ॥१३८॥
सर्व शास्त्र पुराणांचा अधीश ॥ आणि भुक्ति मुक्तींचा प्रकाश ॥ अध्याय श्रवण पठनें महेश ॥ जवळी उभा असे ॥१३९॥
हा अध्याय करितां श्रवण पठन ॥ तत्काळ विनाशे महा विन्घ ॥ पदो पदीं घडे गंगा स्नान ॥ एवढें सामर्थ्य पैं ॥१४०॥
वेद शास्त्रीं नाहीं ज्यासी प्रायश्चित्त ॥ यात्रा तीर्थ स्नानें नव्हे निष्कृत ॥ ह्या अध्यायाचें श्रवण घडल्या एक चित्त ॥ ते भंजती सर्व दोष ॥१४१॥
अरे हें सर्व शास्त्र महा दुर्लभ ॥ हें इच्छीतसे विधि पद्मनाम ॥ हें शास्त्र अनादि सिद्ध स्वयंभ ॥ शिव निर्मित असे ॥१४२॥
अरे हा संसारा समुद्र थोरू ॥ नर मानव न शकती उतरूं ॥ म्हणोनि हें सर्व शास्त्र तारूं ॥ निर्मिलें शिवें ॥१४३॥
विश्वनाथ नाम उच्चारितां ॥ महा दोष परा भवती न करितां चिंता ॥ वाराण सीगमन उच्चारितां ॥ तत्काळ मोक्षपद ॥१४४॥
तरी या अध्यायाचें श्रवण ॥ या दोष वृक्षीसी वेधे चंदन ॥ कीं कर्मधा तूचा परिसें सुवर्ण ॥ होऊनि ठाके ॥१४५॥
जैसी निशी विध्वंसी रविकरीं ॥ कीं वज्र घातें चूर्ण होती गिरी ॥ तैसा कर्ममा तंगासी केसरी ॥ हा अध्याय श्रवण मात्रें ॥१४६॥
स्वामी म्हणे ऋषि अगस्ती ॥ मज न सांगवे या अध्यायाची फल श्रुति ॥ मग त्या विश्वनाथीं पशु पती ॥ लय पावले शिव ॥१४७॥
हे कथा शिवासी प्रश्नी भवानी ॥ तेंचि स्वामीसी प्रश्नी अगस्ति मुनी ॥ हे कथा भवार्णव तारिणी ॥ व्यास कथी शिष्यांसी ॥१४८॥
आतां स्वामीसी प्रश्नील अगस्ती ॥ हे कथा कैसी द्दढ धरा चित्तीं ॥ शिव दास गोमा प्रार्थी श्रोतयां प्रती ॥ तें संकलित परिसा आतां ॥१४९॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे विश्वेश्वरलिंगमाहात्म्यवर्णनं नाम सप्तसप्ततितमाध्यायः ॥७७॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति सप्तसप्ततितमाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP