मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ५२

संकेत कोश - संख्या ५२

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


बावन्न अक्षरांचे चार वर्ण - १ २१ स्वर ( अ आ इत्यादि ) आणि क ख ग घ ङ ,- हे विप्रवर्ण .

१० - च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण , हे क्षत्रिय वर्ण .

१० - त थ द ध न प फ ब भ म , हे वैश्य वर्ण .

११ - य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ , हे शूद्र वर्ण .

अकवर्गोऽभवत् ‌‍ विप्रे । चटवर्गस्थक्षत्रियाः ॥

तपवर्गोऽभवत् ‌‍ वैश्ये । यशवर्गेण शूद्रजाः ॥ ( दु . श . को

बावन्न अक्षरांचे रंग - अ आदि सोळा स्वर आणि श ष ह ळ क्ष प फ ब भ म , हे गौर्वर्ण . क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न हे कृष्णवर्ण . जोड अक्षरें तितकीं मिश्र रंगांचीं

अशप गौरवर्णानि । कचटत् ‌‍ कृष्णमेव च ॥

मिश्रितः शुक्लवर्णानि । वर्णस्तुत्रिविधः स्मृतः ॥

बावन्न बिरुदें ( श्रेष्ठत्वाचें निदर्शक चिह्रें )- १ शिरताज , २ मायताजवा , ३ माहे मरातब , ४ गंड भैरी , ५ शार्दूल , ६ चवरी , ७ घंटा , ८ चंग , ९ पट्टा , १० समला , ११ गडी , १२ नागबंद , १३ रुमाल , १४ वाकी , १५ बरफ १६ रणजोड , १७ तोडा , १८ शेरा , १९ कंकण , २० तुरा , २१ कलगी , २२ मेघडंबर , २३ सूर्य , २४ पान , २५ हुमा , २६ अंकुश , २७ त्रिशूळ , २८ खांडा , २९ फरश , ३० बानामोरचेल , ३१ वल्लम , ३२ लंगर , ३३ सैली , ३४ शिंगी , ६५ नाडी , ३६ नागज्योति , ३७ मोर , ३८ मुगुट , ३९ हालरवाक , ४० लंगोट , ४१ शेंदुर , ४२ कोरडा , ४३ गुरज , ४४ शंख , ४५ चक्र , ४६ पद्म , ४७ गदा , ४८ सडका , ४९ मेख , ५० मोगरी , ५१ पंचरंगी आणि ५२ निशाण , ( विद्या , कला , शौर्य वगैरे गुणांत पूर्वकालांत श्रेष्ठत्व दर्शक चिह्रें मानिलीं होतीं . ) उष्ट्रानीं बिरिदें बांधोन । तुंबरापुढें केलें गायन । ( ए . भा . ५ - ८२ )

बावन्न मातृका - ॐ कांरापैकीं अ उ म या तीन मात्रा वरील बिंदु ही अर्धमात्रा मिळून साडे तीन मात्रा व त्यापासून पुढें बावन्न मातृका ( अक्षरें ) ॐ कार आणि स्वर व व्यंजनें मिळून ५२ मुळाक्षरें . ( १६ स्वर सोळाचे अंकीं व ३६ व्यंजनें छत्तीसचे अंकीं पहा )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP