मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ३०

संकेत कोश - संख्या ३०

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


तीस कल्प - १ श्वेत , २ नीललोहित , ३ वामदेव , ४ रथांतर , ५ रौरव , ६ देव , ७ वृहत् ‌, ८ कंदर्प , ९ सद्म , १० ईशान , ११ तम , १२ सारस्वत , १३ उदान , १४ गुरुड , १५ कौर्म , १६ नारसिंह , १७ समान , १८ आग्नेय , १९ सोम , २० मानव , २१ तत्पुरुष , २२ वैकुंठ , २३ लक्ष्मी , २४ सावित्री , २५ घोर , २६ श्चेतवाराह ( चालू ), २७ वैराज , २८ गौरी , २९ माहेश्वर आणि ३० पितृ . मानवाचीं सहस्त्रवर्षें म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस . याला कल्प म्हणतात . असे तीस कल्प आहेत . अशी जगाच्या कालमर्यादेची गणना प्राचीनांनीं केली आहे .

तीस गुणांचें शरीर - ५ ज्ञानेंद्रियें व त्यांचे ५ विषय , ११ मन , १२ बुद्धि , १३ सत्त्व , १४ अहंकार , १५ वासना , १६ अविद्या , १७ माया , १८ व्यक्ति , १९ सुख - दुःख इ - द्वंद्वें , २० काल , ५ पंचमहाभूतें , २६ अस्तित्व , २७ नास्तित्व , २८ पापपुण्य , २९ संस्कार , आणि ३० बल म्हणजे इच्छिलेली वस्तु मिळविण्याकरितां केलेली धडपड . हे तीस गुण ज्या ठिकाणीं एकत्र असतात त्यास शरीर म्हणतात . ( म . भ . शांति , अ . ३२० )

तीस ताल - १ केरवा , २ दादरा , ३ तीव्रा , ४ रूपक , ५ पस्तु , ६ धुमाळी , ७ मध्यमावती , ८ गजल , ९ ठेका , १० झपताल , ११ सूलताल , १२ रुद्रताल , १३ भानुमती , १४ चौताल , १५ एकताल , १६ खेमटा , १७ फरोदस्त , १८ अडा चौताल , १९ झूमरा , २० दीपचंद , २१ धमार , २२ सवारी , २३ गजझंपा , २४ तिलवाडा , २५ त्रिताल , २६ पंजाबी , २७ टप्प्याचा ठेका , २८ शिखर , २९ विष्णुताल आणि ३० ब्रह्मताल . असे तीस ताल प्रचारांत आहेत . ( संगीतशास्त्र ). ताल म्हणजे गीत , वाद्य आणि नृत्य यांच्या क्रियेच्या गतींचें कालदर्शक नियमित प्रमाण . ( म . श . को . )

तीस तिथी व त्या तिथींच्या देवता - १ प्रतिपदा - ब्रह्मन् ‌‍ , २ द्वितीया - त्वष्ट्रा , ३ तृतीया - विष्णु , ४ चतुर्थी - यम , ५ पंचमी - सोम , ६ षष्ठी - कुमार , ७ सप्तमी - मुनि , ८ अष्टमी - वसु , ९ नवमी - शिव , १० दशमी - धर्म , ११ एकादशी - रुद्र , १२ द्वादशी - वायु , १३ त्रयोदशी - काम , १४ चतुर्दशी - अनंत , १५ पौर्णिमा - विश्वेदेव , ३० अमावास्या - पितर , ( संस्कारविधि ) ( आ ) १ प्रतिपदा - अग्नि , २ द्वितीया - ब्रह्म , ३ तृतीया - गौरी , ४ चतुथीं - गणेश , ५ पंचमी - सर्प , ६ षष्ठी - कार्तिकेय , ७ सप्तमी - सूर्य , ८ अष्टमी - शिव , ९ नवमी - दुर्गा , १० दशमी - धर्म , ११ एकादशी - विश्वेदेव , १२ द्वादशी - विष्णु , १३ त्रयोदशी - मदन , १४ चतुर्दशी - शिव , १५ पौर्णिमा - चंद्र , ३० अमावास्या - पितर . ( सुलभ ज्योतिषशास्त्र )

तीस धर्म लक्षणें - १ सत्य , २ दया , ३ तप , ४ शुद्धता , ५ सहनशीलता , ६ ब्रह्मचर्य , ६ योग्यायोग्य विचार , ७ मनोनिग्रह , ८ बाह्मेंद्रियदमन , ९ अहिंसा , १० ब्रह्मचर्य , ११ दान , १२ उचित मंत्राचा जप , १३ सरळपणा , १४ संतोष , १५ सर्वत्र समदर्शी महात्म्यांची सेवा , १६ हळुहळु भोग निवृत्त होणें , १७ निष्फल कर्माचें अवलोकन न करणें , १८ निरर्थक भाषण न करणें , १९ आत्मचिंतन , २० प्राणिमात्रांचें ठिकाणीं समता , २१ सर्वत्र सात्मबुद्धि व देवता बुद्धि धारण करणें २२ भगवंताचे गुणगान , २३ श्रवण , २४ स्मरण , २५ सेवन २६ पूजन , २७ नमन , २८ दास्य , २९ सख्य आणि ३० आत्मनिवेदन , असा तीस लक्षणांनीं युक्त असा सर्व मानवांचा उत्कृष्ट धर्म ऋषींनीं सांगितला आहे . " त्रिंशल्लक्षणवान् ‌‍ राजन् ‌‍ सर्वात्मा येन तुष्यति " ( भाग . स्कंद ७ अ . ११ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP