मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या २४

संकेत कोश - संख्या २४

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


चौवीस अक्षरी मंत्र व त्याच्या देवता -

ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।

घियो यो नः प्रचोदयात् ‌‍ ॥ ( गायत्री मंत्र )

देवता - १ अग्नि , २ वायु , ३ सूर्य , ४ आकाश , ५ यम , ६ वरुण , ७ बृहस्पति , ८ पर्जन्य , ९ इंद्र , १० गंधर्व , ११ पूषा , १२ मित्र , १३ त्वष्टा , १४ वसु , १५ मरुद्रण , १६ सोम , १७ अंगिरा , १८ विश्वेदेव , १९ अश्विनीकुमार , २० प्रजापति , २१ संपूर्ण देवता , २२ रुद्र , २३ ब्रह्मा आणि २४ श्रीविष्णु गायत्री मंत्र हा चोवीस अक्षरांचा आहे . प्रत्येक अक्षराची एक देवता अशा या चोवीस देवता मानल्या आहेत . ( देवी . भाग . स्कंध १२ - १ )

चोवीस अणु - मनुष्य बीजच्या लहानांत लहान पेशीमध्यें एकंदर चोवीस जीवाणु असतात . परिपूर्ण - वर्धित जीवाणूपासून स्त्री निर्माण होते . तर खुरटलेल्या अंशात्मक तुकडयापासून पुरुष निर्माण होतो असें आधुनिक जीवन वा अनुवंशशास्त्र सांगतें , ( वनिता सारस्वत )

चोवीस अवतार - १ मस्स्य , कूर्म वराह , इत्यादि दहा अवतार ( दशावतार पाहा ) ११ नारायण , १२ शौनक , १३ नारद , १४ स्वायंभू , १५ कपिल , १६ दत्तात्रेय , १७ ऋषभदेव , १८ हंस , १९ हयग्रीव , २० पृथुराजा , २१ ध्रुअव , २२ धन्वंतरि , २३ मोहिनी व २४ व्यास , असे अनेक कारणास्तव विष्णूनें घेतलेले १४ अवतार ( यांना लीलावतार म्हणतात ) मिळून चोवीस . ( भाग . स्कं . १ अ . २ )

चौवीस एकादशा - प्रत्येक मासांत दोन एकदशा असतात . एक शुद्ध पक्षांत आणि एक कृष्ण पक्षांत . त्यांचीं नांवें मासपरत्वें -

कामदा शु . मोहिनी शु .

वरुथिनी कृ . चैत्र अपराजिता कृ . वैशाख

निर्जला शु . शयनी शु .

योगिनी कृ . ज्येष्ठ कामिका कृ . आषाढ

पुत्रदा शू . परिवर्तिनी शु

अजा कृ . श्रावण इंदिरा कृ . भाद्रपद

पाशांकुशा शु . प्रवोधिनी शु .

रमा कृ . आश्चिन उत्पत्ति कृ . कार्तिक

मोक्षदा शु . पुत्रदा शु .

सफला कृ मार्गशीर्ष षटॅ‌तिला कृ . पौष

जया शु . आमलकी शु .

विजया कृ . माघ पापमोचनी कृ . फाल्गुन

अधिक महिना आल्यास दोन एकादशा अधिक येतात त्या - ( १ ) कमला अधिक शु . ( २ ) कमला अधिक कृ . ( धर्मासेंधु . )

चोवीस गुण ( न्यायशास्त्र )- १ रुप , २ रस , ३ गंध , ३ स्पर्श , ५ संख्या , ६ परिमाण , ७ पृथक्‌‍त्व , ८ संयोग , ९ विभाग , १० परत्व ,

११ अपरत्व , १२ गुरुत्व , १३ द्रवत्व , १४ स्नेह , १५ शब्द , १६ बुद्धि , १७ सुख , १८ दुःख , १९ इच्छा , २० दोष २१ प्रयत्न , २२ धर्म २३ अधर्म व २४ संस्कार , असे चोवीस गुन न्यायशास्त्रांत मनलें आहेत . ( न्यायदर्शन )

चोवीस गुरु ( अवधूताचे )- अवधूतानें एकंदर चोवीस गुरु केले होते , अशी भागवतांत कथा आहे . ते गुरु व त्यापासून घेतलेले गुण अनुक्रमें - १ पृथ्वी - क्षमावृत्ति व परोपकारित्व , २ वायु - निर्लेपता , ३ आकाश - सर्वत्र ब्यापून असंग राहणें , ४ उदक - स्वच्छता आणि पवित्रता , ५ अग्नि - तेजस्विता , उपयोग करून घेणारा भेटेल त्याप्रमाणें होणें , ६ चंद्रमा - आत्मा अविनाशी आहे , विकार देहाला असतात , ७ सूर्य - भेदाभेदशुन्यत्व , ८ कपोत - अति आसक्ति नाशास कारण होते , १३ हत्ती - विषयाला लंपट झालें असतां नाश होतो , १४ मधुपा

( मधुमक्षिका ) उपभोग न घेतां केलेला संचय नष्ट होतो , १५ हरिण - नादमोहित झालें असतां नाश होतो , १६ मीन - रसना ताब्यांत ठेवतां आली नाहीं तर मरण ओढवतें , १७ पिंगला ( वेश्या )- पक्षी - प्रियवस्तूचा त्याग , १९ बाल - चिंताशून्यता , २० कुमारी - एकाकी असणें , २१ शुरकृत - चित्ताचीं एकाग्रता , २२ सर्प - संगरहित , एकटयानें संचार करणें योग्य , २३ ऊर्णनामि ( कोळी )- एकाकी - ईश्वर जगत् ‌ कसें निर्माण करतो व कसा संहार होतो हें ज्ञान आणि २४ सुपेशकृत ( मिंगुरटी )- ध्यानसामर्थ्य . ( भागवत स्कंध ११ अ . ६ - २४ )

चोवीस तीर्थंकर ( जैन धर्म )- १ ऋषम ( आदिनाथ ), २ अजितनाथ , ३ संभवनाथ , ४ अभिनंदननाथ , ५ सुमतिनाथ , ६ पद्मप्रम , ७ सुपार्श्वनाथ , ८ चंद्रप्रम , ९ पुष्पदंत , १० शीतलनाथ , ११ श्रेयांसनाथ , १२ वासुपूज्य , १३ विमलनाथ , १४ अनंतनाथ , १५ धर्मनाथ , १६ शांतिनाथ , १७ कुंथुनाथ , १८ अरनाथ , १९ मलिनाथ , २० मुनिसुव्रत , २१ नमिनाथ , २२ नेमिनाथ , २३ पार्श्वनाथ आणि २४ महावीर अथवा वर्धमान , असे चोवीस तीर्थकर होऊन गेले , असें जैन धर्मांत मानलें आहे . ( म . ज्ञा . को . )

चोवीस धमन्या - मानव शरिरांत रस वाहणार्‍या धमनी म्हणजे नाडया चोवीस आहेत . ( सुश्रुत शारीर )

चोवीस नांवें ( श्रोविष्णूचीं )- १ केशव , २ नारायन , ३ माधव , ४ गोविंद , ५ विष्णुअ , ६ मधुसूदन , ७ त्रिविक्रम , ८ वामन , ९ श्रीधर , १० ह्रषिकेश , ११ पद्मनाम , १२ दामोदर , १३ संकर्षण , १४ वासुदेव , १५ प्रद्युम्न , १६ अनिरुद्ध , १७ पुरुषोत्तम , १८ अधोक्षज , १९ नारसिंह , २० अच्युत , २१ जनार्दन , २२ उपेंद्र , २३ हरि आणि २४ श्रीकृष्ण , हीं संध्यावंदनाच्या वेळीं घेतलीं जातात तीं चोवीस नांवें .

चोवीस नांवें गायत्रीचीं - १ गणेश गायत्री , २ विष्णु गायत्री , गायत्री , ३ लक्ष्मी गायत्री , ४ हंस गायत्री , ५ दत्त गायत्री , ६ देवी गायत्री , ७ शंख गायत्री , ८ राम गायत्री , ९ लक्ष्मण गायत्री , १० हनुमंत गायत्री , ११ कृष्ण गायत्री , १२ परशुराम गायत्री , १३ रुद्र गायत्री , १४ गुरुड गायत्री , १५ नाग गायत्री , १६ नरसिंह गायत्रीम १७ गुरु गायत्री , १८ चंद्र गायत्री , १९ सूर्य गायत्री , २० गंगा गायत्री २१ गोप गायत्री , २२ ब्राह्मण गायत्री , २३ क्षत्रिय गायत्री आणि २४ वैश्य गायत्री .

चोवीस प्रकार शौर्याचे - १ शब्दशौर्य , २ प्रतापशौर्य , ३ दानशौर्य , ४ स्थानशौर्थ , ५ उदयशौर्य , ६ तेजशौर्य , ७ संग्रामशौर्य , ८ प्रतिपत्तिशौर्य , ९ जयशौर्य , १० मानशौर्य , ११ ज्ञानशौर्य , १२ साहसशौर्य , १३ शरणागतशौर्य , १४ प्रमोदशौर्य , १५ उद्यमशौर्य , १६ अर्थशौर्य , १७ आचारशौर्य , १८ बलशौर्य , १९ कीर्तिशौर्य , २० धर्मशौर्य , २१ रक्षणशौर्य , २२ गुणशौर्य , २३ परिबोधशौर्य , आणि २४ प्रबोधशौर्य ,

( वस्तुरत्न कोश )

चोवीस प्रकार सोमाचे ( सोमवल्ली )- १ अंशुमान ‌ , २ मुंजवान ‌, ३ चंद्रमा , ४ रजतप्रभा , ५ दूर्वासोम , ६ कनीयान् ‌, ७ श्वेताक्ष , ८ कनकप्रभा , ९ प्रतापवान ‌‍ १० तालवृत , ११ करवीर , १२ अंशवान , १३ स्वयंप्रभ , १४ महासोम , १५ गुरुडाह्रत , १६ गायत्र , १७ त्रैष्टुम , १८ पांक्त , १९ जागत , २० शाकर , २१ अग्निष्टोम , २२ रैवत , २३ त्रिपदागायत्री व २४ उडुपति . ( सुश्रुत - चिकित्सा - अ . २९ )

चोवीस प्रमुख मुद्रा कथकली नृत्याच्या - मुद्रा म्हणजे विशिष्ट आशयाचा आविष्कार करण्यासाठीं दोन्ही वा एका ह्स्ताच्या अंगलईनें विशिष्ट प्रकारचे गुंफण किंवा रचना म्हणजे मुद्रा , त्या अशाः - १ हस्तपताक २ कटक , ३ मुष्टि , ४ कर्तरीमुख , ५ शुकतुण्ड , ६ कपित्थक , ७ हंस , ८ शिखर ९ हंसास्य , १० अंजलि , ११ अर्धचन्द्र , १२ मुकुर , १३ भ्रमर , १४ सूचिकामुख , १५ पल्लव , १६ त्रिपताका १७ मृगशीर्ष , १८ आह्रय , १९ सर्पशिर , २० वर्धमानक , २१ अराल , २२ ऊर्णनाम , २३ मुकुल व २४ कटकामुख .

अराल ऊर्णनामश्च मुकुलः कटकामुखः ।

चतुविंशतिरित्येते करशास्त्रज्ञसंमताः ॥ ( कथकलीशास्त्र )

चोवीस बुद्ध - १ दिपंकर , २ कौंडिण्य , ३ मंगल , ४ सुमन , ५ रैवत , ६ शोमित , ७ अनोमदशीं , ८ पद्म , ९ नारद , १० पद्मोत्तर , ११ सुमेध , १२ सुज्जात , १३ प्रियदर्शी , १४ अर्थदर्शी , १५ धर्मदर्शी , १६ सिद्धार्थ , १७ तिपय , १८ पुष्प , १९ विपश्यी , २० शिखी , २१ वेस्तमू , २२ क्रकुसंध , २३ कनकमुनि आणि २४ काश्यप . असे चोवीस बुद्ध होऊन गेले . गौतमबुद्ध हे पंचविसावे बुद्ध होत . ( बुद्धवंसो )

चोवीस मावळें - जुन्नर ते चाकण १२ मावळे , १ शिवनेर , २ जुन्नर , ३ भीमनेर , ४ घोडनेर , ५ माननेर , ६ भामनेर , ७ जामनेर , ८ पिंपळनेर , ९ पारनेर , १० सिन्नेर , ११ संगमनेर व १२ अकोळनेर , पुण्यापासून शिरवळ पर्यंतची सह्माद्रीच्या पूर्व उतरणीवरील बारा खोरी - १ अंदरमावळ , २ नाणें मावळ , ३ पवनमावळ , ४ घोटणमावळ , ५ पौडखोरें , ११ शिवतरखोरें , व १२ हिरडसमावळ , एकूण चोवीस .

( म . ज्ञा . को . वि . १८ )

चोवीसभे मंत्रांचे - १ प्रशंसा , २ स्तुति , ३ आक्रोश , ४ निंदा , ५ परिदेवना , ६ अभिशाप , ७ विशाप , ८ प्रश्न , ९ प्रतिवचन , १० आशीः ११ यज्ञ , १२ आक्षेप , १३ अर्थाख्यान , १४ संकथा , १५ वियोग , १६ अभियोग , १७ कथा , १८ संख्या , १९ वरप्रदान , २० प्रतिबंध , २१ उपदेश , २२ नमस्कार , २३ स्पृहा आणि २४ विलाप . ( ब्रह्मांड . पु . अ . ३३ - ३४ )

चोवीस मुद्रा गायत्री जपाच्या - १ सुमुख , २ संपुट , ३ वितत , ४ विस्तृत , ५ द्विमुख , ६ त्रिमुख , ७ चतुर्मुख , ८ पंचमुख ९ षण्मुख ,

१० अधोमुख , ११ व्यापकांजलिक , १२ शंकर , १३ यमपाश , १४ ग्रथित , १५ उन्मुखोमुख , १६ प्रलंब , १७ मुष्टिक , १८ मत्स्य , १९ कूर्म , २० वराह , २१ सिंहाक्रांता , २२ महाक्रांता , २३ मुद्रर आणि २४ पल्लव . ( गुरुचरित्र , अ . ३६ )

चोवीस रत्नें - देव - दानवांनीं केलेल्या समुद्रमंथनापासून निघालेल्या रत्नांचीं नांवें , संख्या व व क्रम चोहींकडे सारखी नाहींत , कोठें चौदा तर कोठें चोवीस रत्नें सांगितलीं आहेत . तीं अशीं - १ हालाहल विष , २ चंद्रा , ३ सुरमि धेनु , ४ कल्पवृक्ष , ५ पारिजातक , ६ आम्र , ७ संतानक , ८ कौस्तुभ - रत्न ( चिंतामणि ), ९ उच्चैःश्रवा , १० ऐरावत - चौसष्ट हस्तींच्या कळपासह , ११ मदिरा , १२ विजया , १३ भांग , १४ लसूण , १५ गाजर , १६ धोतरा , १७ पुष्कर , १८ ब्रह्मविद्या , १९ सिद्धि , २० ऋद्धि , २१ माया , २२ लक्ष्मी , २३ धन्वंतरि आणि २४ अमृत , ( स्कंद . १ - १ - ११ )

चोवीस वादलक्षणें - १ उत्पत्ति , २ समाप्ति , ३ सत्यवाद , ४ प्रविवाद , ५ पक्ष , ६ प्रतिप , ७ प्रमाण , ८ प्रमेय , ९ प्रमेद , १० प्रश्न , ११ प्रत्युत्तर , १२ दूषण , १३ अर्थान्तर , १४ उपन्यास , १५ अनुवाद , १६ आदेश , १७ निर्वाह , १८ निर्णय , १९ निग्रहस्था , २० अर्थान्तरसमता , २१ सुस्वरत्व , २२ उच्चारण , २३ जय व २४ पराजय . ( वस्तुरत्नकोश )

चौवीस शब्दगुण - १ श्लेष , २ प्रसाद , ३ समता , ४ माधुर्य , ५ सुकुमारता , ६ अर्थव्यक्ति , ७ कांति , ८ उदारत्व , ९ उदात्तत्व , १० ओज , ११ और्जित्य , १२ प्रेयान् ‌, १३ सुशब्दता , १४ समाधि , १५ सौक्ष्म्य , १६ गांभीर्य , १७ विस्तार , १८ संक्षेप , १९ संमितत्व , २० भाविकत्व , ३१ गति , २२ रीति , २३ उक्ति आणि २४ प्रौढी . ( म . मा . शांति , ३२० तळदीप )

चौवीस शिलालेख सातवाहन कालीन व त्यांची स्थानें - ८ नासिक , ५ कान्हेरी , ३ कार्ले , २ अमरावती , २ नाणेघाट , १ मेलसा , १ मैकाडोनी , १ कृष्णा , आणि १ कोडोवाल , पहिली , वीस ( पश्चिम महाराष्ट्र ) व शेवटची चार ( आंध्र प्रदेश , ), ( प्रेरणा मासिक )

चोवीस शिवगणांचे अधिपति - १ वीरमद्र , २ नंदी , ३ महाकाल , ४ सुमद्रक , ५ विशालाक्ष , ६ बाण , ७ पिंगलाक्ष , ८ विकंपन , ९ विरूप , १० विकृति , ११ मणिमद्र , १२ बाष्वल , १३ कपिल , १४ दीर्घदंष्ट्र , १५ विकट , १६ ताम्रलोचन , १७ कालंकर , १८ बलिमद्र , १९ कालजिह्ल , २० कुटीचर , २१ बालोन्मत्त , २२ रणश्लाघी , २३ दुर्जय व २४ दुर्गम . ( शिवपुराण रुद्रसंहिता , युद्धखंड , अ . ३३ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP