मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या १८

संकेत कोश - संख्या १८

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


अष्टदश शाला ( खाती - शिवकालीन )- १ गजशाला , २ धान्यसंग्रह , ३ भेरीदुंदुभी , ४ यंत्रशाला , ५ विद्यशाला , ६ पारीयशाला ७ उष्ट्रशाला , ८ शिबिरशाला , ९ खेटकशाला , १० मल्लशाला , ११ रत्नशाला , १२ पाकशाला , १३ शस्त्रशाला , १४ तांबूलशाला , १५ रथशाला , १६ जिन्नसखाना १७ लेखनशाला आणि १८ नाटकशाला ( पुण्यश्लोक शिवाजी महाराज ).

अठरा ऋत्विज मनुष्यरूपी यज्ञाचे - १ - २ दोन डोळे ३ - ४ दोन कान , ५ - ६ दोन नाकाची भोकें , ७ एक त्वगिंद्रिय , ८ - ९ दोन हात , १० - ११ दोनपाय , १२ एकमूत्रेंद्रिय , १३ एक गुद , १४ एक मुख , १५ वागिंद्रिय , १६ मन , १७ चित्त आणि १८ अहंकार , पुरुष म्हणजे मनुष्य हा एक यज्ञच आहे . " पुरुषो वाव यज्ञः " ( छांदोग्य ३ - १६ - १ )

अठरा अति पुराणें - १ कार्तव , २ ऋजु , ३ आदि , ४ मुद्रल , ५ पशुप्ति , ६ गणेश , ७ सौर , ८ परानन्द , ९ बृहद्धर्म , १८ महाभागवत , ११ देवी , १२ कल्लि , १३ भार्गव , १४ वासिष्ठ , १५ कौर्म , १६ गर्ग , १७ चण्डी व १८ लक्ष्मी .

अठरा अवतार श्रीशिवाचे - १ लकुलीश , २ कौशिक , ३ गार्ग्य , ४ मैत्र्य , ५ कौरुष , ६ ईशान , ७ पारगार्ग्य , ८ कपिलाण्ड , ९ मनुष्यक , १० अपर कुशिक , ११ अत्रि , १२ पिङ्रलाक्ष , १३ पुष्पक , १४ बृहदार्य , १५ अगस्ति , १६ सन्तान , १७ राशीकर तथा आणि १८ विद्यागुप्त ( भारतीय वास्तुशास्त्र - प्रतिमाविज्ञान )

अठरा अक्षौहिणी दळभार - ११ अक्षौहिणी कौरावपक्षीय व ७ अक्षौहिणी पांडवपक्षीय असे अठरा अक्षौहिणी सैन्य भारतीय युद्धांत होतें , एक अक्षौहिणी - २१८७० रथ , २१८७० हत्ती , १०९३५० पायदळ व ६५६१० घोडे . एकूण दोन लक्ष अठरा हजार सातशें , ( म . भा . भीष्म १६ - २५ )

अठरा आयुधें देवीचीं - १ चक्र , २ त्रिशूळ , ३ शंख , शाक्ति , ५ शतघ्नी , ६ बाण , ७ धनुष्य , ८ वज्र , ९ घण्टा , १० दण्ड , ११ कमंडलु , १२ तलवार , १३ ढाल , १४ फरश , १५ पानपात्र , १६ कमल , १७ गदा व १८ कवच . ( देवी . भाग . स्कंध ५ अ . ८ . ९ )

अठरा आयुर्वेदसंहिता - १ हारीत , २ सुश्रुत , ३ पराशर , ४ भोज , ५ भेड , ६ भृगु , ७ अग्निवेश , १४ आत्रेय , १५ अत्रि , १६ चंद्रमा , १७ शिव व १८ सूर्य . अशा आयुर्वेदाच्या प्राचीन अठरा संहिता व शास्त्रकार होत . ( हारितसंहिता )

अठरा उपधान्यें - १ सजगुरा ( बाजरी ), २ भादली , ३ वरी , ४ नाचणी ५ बरग , ६ कांग , ७ खपले गहूं , ८ मका , ९ करडई , १० राजगिरा , ११ मटकी , १२ पावटा , १३ वाल , १४ मूग , १५ कारळ . १६ देवभात , १७ सातु आणि १८ अंबाडी .; ( आ ) १ सजगुरा , २ नाचणी , ३ वरी , ४ मका , ५ मटकी , ६ राजगिरा , ७ शिरस , ८ पांढरफळी , ९ जिरे , १० मेथी , ११ वेणुबीज , १२ देवभात , १३ कमळबीज , १४ पाकड , १५ अंबाडी , १६ भेंडीबीज , १७ गोवारी आणि १८ कुड्डयाचें बीज . यांत खसखस व पांढरा राळा धरून कोणी वीस संख्या मानतात . ( म . ज्ञा . को . वि . ६ )

अठरा उपपुराणें - ( अ ) १ भागवत , २ माहेश्वर , ३ ब्रह्मांड , ४ आदित्य , ५ पराशर , ६ सौर , ७ नंदिकेश्वर , ८ सांब , ९ कालिका , १० वारुण , ११ औशनस , १२ मानव , १३ कापिल , १४ दुर्वासस् ‌, १५ शिवधर्म , १६ बृहन्नारदीय , १७ नरसिंह व १८ सनत्कुमार ; ( आ ) १ सन्त्कुमार , २ नृसिंह , ३ नंदी , ४ दुर्वास , ५ नारद , ६ कापिल , ७ मानव , ८ उशनस , ९ वारुण ; १० काली , ११ वासिष्ठलिंग , १२ माहेश्वर , १३ सांब्र , १४ सौर , १५ पाराशर , १६ शिव ( धर्म ). १७ मारिच व १८ भागवत ( भार्गव ); ( इ ) ( देवी भागवत ) १ लघुकालिका , २ बृहत्कालिका , ३ पराशर , ४ सिंह , ५ नारद , ६ सनत्कुमार , ७ सौर , ८ दुर्वास , ९ कपिल , १० मानव , ११ विष्णुधर्मोत्तर , १२ शैवधर्म , १३ महेश्वर , १४ नंदी , १५ कुमार , १६ औशनस , १७ देवी व १८ वरुण ( सर्स्वती कोश )

अठरा कारखाने - १ उष्ट , २ खबुतर , ३ जनान , ४ जवाहीर , ५ जामदार , ६ चिकीर , ७ तालीम , ८ तोफ , ९ थट्टी , १० दप्तर , ११ दारू , १२ दिवान , १३ नगार , १४ पील , १५ फरास , १६ बंदी , १७ मोदी व १८ शिकार , असे अठरा कारखाने मराठयांच्या राजवटींत सरकारी असून त्यांवर स्वतंत्र अधिकारी असत .

अठरा गृह्मसूत्रें - १ बौधायन , २ आपस्तंब , ३ सत्याषाढ , ४ द्राह्यायण , ५ शांडिल्य , ६ आगस्त्य , ७ आश्चलायन , ८ शांभव , ९ कात्यायन ही नऊ पूर्वगृह्मसूत्रें आणि १० वैखानस , ११ शौनकीय , १२ भारद्वाज , १३ अग्निवैश्य , १४ जैमिनीय , १५ वाधूल . १६ माध्यांदिन , १७ कौंडिण्य व १८ कौषीतकी . ही नऊ अपरगृह्मसूत्रें होत . ( म . ज्ञा . को . वि . १२ )

अठरा ज्योतिषशास्त्रप्रवर्तक - १ सूर्य , २ पितामह , ३ व्यास , ४ वसिष्ठ , ५ अत्रि , ६ पराशर , ७ कश्यप , ८ नारद , ९ गर्ग , १० मरीचि , ११ मनु , १२ अंगिरा , १३ लोमश , १४ पुलिश , १५ च्यवन , १६ पवन , १७ भृगु व १८ शौनक .

लोमशः पुलिशश्चैव च्यव्नःपवनो गुरुः ( भृगुः ) ।

शौनकोऽष्टादशैवैते ज्योतिःशास्त्रविशारदाह ॥ ( सम्प्रदायवृत्तम् ‌ )

अठरा तत्त्वें लिंगशरीराचीं - १ बुद्धि , २ अहंकार , ३ मन , ५ पंचज्ञानेंद्रियें , ५ कर्मेंद्रियें व ५ पंचतन्मात्रा या अठरा तत्त्वाचें लिंग अथवा सूक्ष्म शरीर तयार होतें , असें वेदान्तशास्त्र मानतें .

अठरा दोष मोक्ष प्राप्तीच्या आड येणारे - १ क्षुधा , २ तृषा , ३ जरा , ४ रोग , ५ जन्म , ६ मरण , ७ भय , ८ मद , ९ राग , १० द्वेष , ११ मोह , १२ चिंता , १३ अरति , १४ निद्रा , १५ विस्मय , १६ विषाद , १७ स्वेद व १८ खेद . ( रत्न - श्रावकाचार अ . १ )

अठरा धान्यें - १ गहूं . २ साळ , ३ तूर , ४ जव , ५ जोंधळा , ६ वाटाणा , ७ लाख , ८ चणा , ९ जवस , १० मसूर , ११ मूग , १२ राळा , १३ तीळ , १४ हरीक , १५ कुळीथ , १६ सांबा , १७ उडीद व १८ चवळी , यांत नऊ एकदल व नऊ द्विदल धान्यें आहेत .

गोधूमशालितुवरीयवयावनाल - वातनलंकचणकाअतसामसूराः ॥

मुद्रप्रियंगुतिलकोद्रवकाः कुलित्थाः । श्यामाकमाषचवला इतिअ धान्यवर्गः ॥ ( म . ज्ञा . को . )

अठरा नारू - अलुतेदार - १ तेली , २ तांबोळी , ३ साळी , ४ सनगर , ५ शिंपी , ६ माळी , ७ गोंधळी , ८ डौरी , ९ भाट , १० ठाकर , ११ गोसावी , १२ जंगम , १३ मुलाणी , १४ वाजंत्री , १५ घडशी , १६ कलावंतु , १७ तराळ किंवा कोरबू आणि १८ भोई ( गांवगाडा )

अठरा नांवें ( श्रीगीतेचीं )- १ गीता , २ गंगा , ३ गायत्री , ४ सीता , ५ सत्या , ६ सरस्वती , ७ ब्रह्मविद्या , ८ ब्रह्मवल्ली , ९ त्रिसंध्या , १० मुक्तिगोहिनी , ११ अर्धमात्रा , १२ चिदानंदा , १३ भवघ्नी , १४ भयनाशिनी , १५ वेदत्रयी , १६ परानन्ता , १७ तत्त्वार्थ व १८ ज्ञानमंजिरी .

गीता गङ्रगा च गायत्री सीता सत्या सरस्वती ।

ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तिगोहिनी ॥

अर्धमात्रा मिदानंदा भवघ्नी भयनाशिनी ।

वेदत्रयी परानन्ता तत्त्वार्थज्ञानमंजिरी ॥ ( कल्याण गीतातत्त्वांक )

अठरा नांवें ( शिवाचीं )- १ शिव , २ पशुपति , ३ मृत्युञ्जय , ४ त्रिनेत्र , ५ कृतिवास , ६ पञ्चवक्त्र , ७ शितिकण्ठ , ८ खण्डपरशु . ९ प्रमथाधिप , १० गङ्‌गाधर , ११ महेश्वर , १२ रुद्रा , १३ विष्णु , १४ पितामह , १५ संसारवैद्य , १६ सर्वज्ञ , १७ परमात्मा , व १८ कपाली . ( कल्याण शिवांक )

अठरा न्याय - १ हंसक्षीर न्याय , २ उदंडापूप न्याय , ३ बीजांकुर न्याय , ४ लोहचुंबक न्याय , ५ वह्लिधूम न्याय , ६ स्थालिपुलक न्याय , ७ स्वाभिमृत्य न्याय , ८ रविघूक न्याय , ९ कूपमंङ्रक न्याय , १० सिंहावलोकन न्याय , ११ अरुंधतिदर्शन न्याय , १२ अंथचटक न्याय , १३ सूर्यजयद्रथं न्याय , १४ काकदंतगवेषण न्याय , १५ पंकप्रक्षालन न्याय , १६ पिष्टपेषण न्याय , १४ काकाक्षिगोलक , न्याय , व १८ घुणाश्वर न्याय , असे अठरा न्याय , तर्कशास्त्रांत सांगितले आहेत . न्याय , म्हणजे निर्दोष विचारचर्चा , अनुमानें यांना अवश्य असे नियम .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP