मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या १०

संकेत कोश - संख्या १०

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


दहा प्रकारचे गुरु - १ उपाध्याय , २ पिता , ३ माता , ४ वडील बंधु , ५ शासक , ६ मामा , ७ श्वशुर , ८ आईचे वडील , ९ पित्याचे वडील व १० चुलता . ( कूर्म पुराण )

दहा प्रकार चुंबनाचे - १ मिलित , २ स्फुरित , ३ घाटिक , ४ तिर्यक् ‌‍, ५ उत्तरोष्ठ , ६ पीडित , ७ संपुट , ८ हनुववत्र , ९ प्रतिबोध आणि १० समौष्ठ चुंबन , ( अनंगरंग )

दहा प्रकारचीं बलें - १ विद्या , २ कुलीनता , ३ मित्रपरिवार , ४ बुद्धि , ५ सत्त्व , ६ धन , ७ तपस्या , ८ सहाय्यता , ९ सामर्थ्य आणि १० दैव .

विद्याभिजनमित्राणि बुद्धिसत्त्वधनानि च ।

तपःसहायवीर्याणि दैवं च दशमं बलम् ‌ ॥ ( म . भा . शांति , अ . १५४ )

दहा प्रकारच्या मुद्रा ( योगशास्त्र )- १ महामुद्रा , २ महाबन्घ , ३ महाभेद , ४ खेचरी , ५ जाळंदरबंध , ६ मूलबंध , ७ विपरीत कृति , ८ उड्डीयान , ९ वज्रोली , व १० शक्ति चालना . ( शिवसंहिता ) ह्मा दहा मद्रा जरा व मरण यांचा नाश करणार्‍या आहेत . ( ह . प्र . )

दहा प्रसिद्ध भाट - १ वेलंग , २ बलाख , ३ भीमसी ( कृतयुग ), ४ पिंगळ , ५ रंपाल ( त्रेतायुग ), ६ सूत , ७ संजय ( द्वापारयुग ), ८ चंदभाट , ९ वेताळभाट आणि १० गंगभाट ( कलियुग ). असे दहा प्रसिद्ध भाट होऊन गेले . ( अमृत ऑगष्ट १९५५ )

दहा प्रकार मनोव्यवसायाचे - १ ग्रहण , २ धारण , ३ स्मरण , ४ व्याप्ति , ५ व्यवस्था , ६ चिकित्सा , ७ निर्णय , ८ निश्चय किंवा श्रद्धा , ९ प्रकटीकरण व १० क्रिया . या सर्वांना बुद्धि लागते व त्या प्रत्येक प्रकारासंबंधानें बुद्धीचें प्रामाण्य सांभाळावें लागतें . ( केळकरांची निबंधमाला )

दहा प्रकारचे यज्ञ - १ अग्निहोत्र , २ दर्शपौर्णमास , ३ चातुर्मास्य , ४ पशुयाग , ५ सोमयाग हे पांच नैमित्तिक व १ देवयज्ञ , २ पितृयज्ञ , ३ ब्रह्मयज्ञ , ४ भूतयज्ञ आणि ५ मनुष्ययज्ञ , हे पांच नित्य मिळून दहा यज्ञ होत .

दहा प्रकारची व्यृहरचना - १ गुरुड , २ मकर , ३ श्येन , ४ अर्ध - चंद्र , ५ वज्र , ६ शकट , ७ मंडल , ८ सर्वतोभद्र , ९ चक्र आणि १० सूची . अशी दहा प्रकारची व्यूहरचना प्राचीन काळीं युद्धांत करीत असत . ( अग्नि २ - ३६ )

दहा प्रकार शाक भाजांचे - १ मूल - मुळा , गाजर इ ., २ पान - अळू . चुका इ ., ३ करीर - वेळूचा कोंब , ४ अग्र - शेंडे शेंडे खुडलेली - हरभरा इ .. ५ फळ - वांगी , तोंडली , इ ., ६ कांड - ऊंस , ७ अधिरूढ - बीजांकुर - वाल . मटकी , इ . मोड आणवलेली , ८ त्वक - केळ्याची साल ९ फूल - केळफूल , हदगा , इ ., आणि १० कवच - छत्राक .

मूलपत्र - करीराग्र - फकाण्डाऽधिरूढकमऽऽ७ ।

त्वक् ‌‍ पुष्प - कवचं चैव शांक दशविधं स्मृतम् ‌‍ ॥ ( अमर )

दहा प्रकारच्या सभा - १ राजसभा , २ विलाससभा , ३ सभ्यसभा , ४ संतसभा , ५ सजनसभा , ६ महाजनसभा , ७ सर्वाशा परिपूर्णकारक सभा , ८ ज्ञानसभा , ९ मित्रसभा व १० प्रीतिसभा असे दहा प्रकार . ( प्रतिष्ठान मासिक . )

दहा प्रकार सामान्य धर्माचे - १ क्षमा , २ सत्यभाषण , ३ दया , ४ दान , ५ शौच , ६ इंद्रियनिग्रह , ७ सूर्यपूजन , ८ अग्नीमध्यें हवन , ९ संतोष व १० चौर्य कर्माचा त्याग .

सूर्यपूजाऽग्निहवनं संतोषः स्तेयवर्णनम् ‌‍ ।

सर्वव्रतेष्वयं धर्मः सामान्यो दशधा स्मृतः ॥ ( भविष्य ब्राह्म . १६८ - ८ )

दहा प्रकार सूक्तांचे - १ देवता , सूक्तें , २ ध्रुवपद सूक्तें , ३ कथा सूक्तें , ४ संवाद सूक्तें , ५ दानस्तुति सूक्तें , ६ तत्त्वज्ञान सूक्तें , ७ संस्कार सूक्तें , ८ मांत्रिक सूक्तें , ९ लौकिक सूक्तें व १० आप्री सूक्तें , सूक्त म्हणजे मंत्रसमूह . ( History of Dharamashastra Vol. V. )

दहा प्रकारचीं स्नानें - १ आग्नेय - भस्मस्नान , २ वारुण - पर्जन्य - स्नान , ३ ब्राह्म - गायत्र्यस्नान , ४ वायव्य - गाईच्या पायांच्या धुळीचें , ५ अवगाहन - बुडी मारणें , ६ कंठस्नान , ७ कटिस्नान , ८ कापिल - ओल्या वस्त्रानें अंग पुसणें , ९ मंत्रस्नान - मंत्रानें मार्जन आणि १० मानसस्नान .

आग्नेयं वारुणं ब्राह्मं वायव्यं चावगाहनम् ‌‍ ।

कंठस्नानं कटिस्नानं कापिलं मंत्रमानसे ॥ ( विश्वब्रह्मपुराण )

दहा प्रकार हास्याचे - १ विनोद , २ अट्टहास , ३ अतिरंजना , ४ विद्रूप , ५ परिहास , ६ उपहास , ७ व्याजोक्ति , ८ वक्रोक्ति , ९ व्यंग्य व १० विकृति ( हिंदी सा . कोश )

दहा प्रजापति - १ मरीचि , २ अत्रि , ३ अंगिरा , ४ पुलस्त्य , ५ पुलह , ६ क्रतु , ७ भृगु , ८ वसिष्ठ , ९ दक्ष आणि १० नारद , हे दहा ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होत . यांपासून पुढें सर्व प्रजा उत्पन्न झाल्या . ( भाग . ३ - १२ - २१ )

दहा प्राण तालांचे - १ काल , २ मार्ग , ३ क्रिया , ४ अंग , ५ ग्रह , ६ जति , ७ कला , ८ लय , ९ यति व १० प्रस्तार , संगीत क्रियेच्या गतीचें नियमित प्रमाण ज्याच्या योगानें दाखविलें जातें त्यास ताल म्हणतात . तालास लागणार्‍या विशेष महत्त्वाच्या गोष्टीस प्राण अशी संज्ञा आहे . ( म . ज्ञा . को . वि . १९ )

दहा प्रमुख स्थानें चुंवनाचीं - १ ललाट , २ केश , ३ कपोल , ४ नयन , ५ वक्ष , ६ स्तन , ७ ओष्ठ अंतर्मुख , ८ वंक्षण , ९ कक्षा आणि १० वरांग . हीं दहा चुंबनाचींज प्रमुख स्थानें कामशास्त्रांत सांगितलीं आहेत . ( वा . कामसूत्रें )

दहा प्रमुख दार्शनिक वाद - १ आरंभवाद , २ संघातवाद , ३ असत्ख्यातिवाद , ४ आत्मख्यातिवाद , ५ परिणामवाद , ६ विवर्तवाद , ७ द्दष्टिसृष्टिवाद , ८ प्रतिबिंबवा , ९ सत्ख्यातिवाद आणि १० अख्यातिवाद . असे दहा प्रमुखवाद दर्शन ग्रंथांतून सांगितले आहेत .

दहा भास्कर क्षेत्रें - १ काशी , २ पुष्पगिरि , ३ कांची , ४ निवृत्ताख्या ( निवृत्ति संगम ), ५ अलंपुरी , ६ श्रीशैल , ७ श्रीविरूपाक्ष , ८ सेतुबंध रामेश्वर , ९ केदार व १० गोकर्ण .

काशी पुष्पगिरिःअ कांची निवृत्ताख्या अलंपुरी ।

श्रीशैलः श्रीविरूपाक्षः सेतुः केदार एव च ।

गोकणें च दशैतानि भास्कराण्याहुरुत्तमाः ॥ ( स्कंद - गोकर्ण अ . ६६ )

दहा मर्मस्थानें ( शरीरांतील )- १ शिरोबंधन , २ रसनाबंधन , ३ कंठ , ४ रक्त , ५ ह्रदय , ६ नामि , ७ मूत्राशय , ८ शुक्र , ९ ओज व १० गुद् ‌‍.

दश जीवितधामानि शिरोरसनबंधनम् ‌ ।

कंठोऽस्त्रं ह्रदयं नाभिर्बस्तिः शुक्रौजसी गुदम ‌ ॥ ( वाग्मट , शरीअर ३ - १३ )

दहा ’ म ’ कार चंचल होत - १ मन , २ मधुकर , ३ मेघ , ४ मानिनी , ५ मदन , ६ मरुत ‌‍- वारा , ७ मा ( लक्ष्मी ), ८ मद , ९ मर्कट आणि १० मत्स्य . हे दहाजण अति चंचल होत . त्यांत मनाला अग्रस्थान दिलें आहे .

मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत ‌‍ ।

मा मदो मर्कटो मत्स्यो मकरा दश चंचलाः ॥ ( सु . )

दहा मुख्य मुद्रा - १ महामुद्रा , २ महाबंध , ३ महावेध , ४ खेचरी , ५ उड्डियान . ६ मूलबंध , ७ जालंधरबंध , ८ विपरीत करणी , ९ वज्रोली व १० शक्तिचालन , या दहा मुद्रा जरा व मरण यांचा नाश करणार्‍या आहेत . ( इ . प्र . )

दहा मंत्रब्राह्मण ग्रंथकार व विधर्माचा नाश करणारे - १ वसिष्ठ , २ शक्ति , ३ पराशर , ४ इंद्रप्रमति , ५ भरद्वसु , ६ मैत्रावरुण , ७ कुण्डिन , ८ सुद्युम्न , ९ बृहस्पति आणि १० भरद्वाज .

’ दशमस्तु भरद्वाजो मन्त्रब्राह्मणकारकः ।

एते चैव हि कर्तारो विधर्मध्वंसकारिणः ॥ ’ ( वायु , पूर्वार्ध ५६ - १०६ )

दहा मंत्री ( श्रीकृष्णसभेचे )- १ उद्धव , २ वसुदेव , ३ कंक , ४ विपृथु , ५ श्वफल्क , ६ चित्रक , ७ गद , ८ सत्यक , ९ बलमद्र व १० पृथु . हे दहा यदुकाळांतील ज्येष्ठ व श्रेष्ठ असे दहा मंत्री श्रीकृष्णाच्या सभेंत होते . ( हरिवंश विष्णुपर्व )

दहा यतिधर्म - १ क्षमा , २ निर्लोभता , ३ आर्जव , ४ मार्दव , ५ तप , ६ संयम , ७ सत्य , ८ शौच , ९ आकिंचन्य , व १० ब्रह्मचर्य . ( जैनधर्म )

दहा यम ( नियमन - आत्मसंयमन )- ( अ ) १ अहिंसा , २ सत्य , ३ चोरी न करणें , ४ ब्रह्मचर्य , ५ दया , ६ सरळपणा , ७ क्षमा , ८ धैर्य ,

९ मिताहार आणि १० पवित्रता ; ( आ ) १ सत्य , २ क्षमा , ३ आर्जव , ४ ध्यान , ५ आनृशंस्य ( क्रौर्याचा अभाव ), ६ अहिंसा , ७ इंद्रियदमन , ८ प्रसन्न चित्त , ९ सद्वर्तन आणि १० सर्वाभूतीं दया .

दहा यमकें ( अलंकारप्रकार )- दोन चरणांतील शेवटचीं कांहीं अक्षरें एकाच ध्वनीचीं किंवा तींच तीं असलीं तर यमक हा अलंकार होतो . त्याचे प्रकार - १ आद्ययमक , २ अंत्ययमक , ३ चरणयमक , ४ पूर्णयमक , ५ दामयमक , ६ अश्वघाटी यमक , ७ पुष्पयमक , ८ संदष्टयमक , ९ संयुतावृत्ति यमक व १० पंक्तियमक .

दहा विश्वेदेव - १ क्रतु , २ दक्ष , ३ वसु , ४ सत्य , ५ काल , ६ काम , ७ धुनि , ८ रोचन , ९ पुरुरवा आणि १० आर्द्रव .

धुनिश्च रोचनश्चैव तथा चैव पुरुरवाः ।

आर्द्रवश्च द्शैते तु विश्वेदेवाः प्रकीर्तिताः ॥ ( बृह - स्मृति )

दहा व्यसनें ( कामवासनेपासून उत्पन्न होणारीं )- १ मृगया , २ अक्षक्रीडा , ३ दिवसा निद्रा , ४ परदोषकथन , ५ स्त्रीसंभोग ( अमर्यादित ), ६ मद्यपान , ७ अतिगायन , ८ अतिवादन , ९ अतिनर्तन आणि १० अकारण भ्रमण , ( मनु ७ - ४७ )

दहा वाहनें श्रीविष्णूचीं - १ हंस , २ सिंह , ३ हनुमान् ‌ , ४ शेष , ५ गुरुड , ६ दंतावळ , ७ रथ , ८ अश्च , ९ शिबिर आणि १० पुष्पक . ( कल्याण भागवतांक )

दहा शिक्षणानुग्रहास पात्र - १ आचार्यपुत्र , २ सेवक , ३ अन्य कोणतेंहि ज्ञान सांगणारा , ४ धार्मिक , ५ पवित्र , ६ आप्त , ७ ग्रहण करण्यास सम्रर्थ , ८ धनदाता , ९ हितेच्छु व १० ज्ञातिवर्ग , ( मनु २ - १०९ )

दहा विशेषणें वेदानें स्त्रीस दिलेली - १ इडा - उत्तम वाणीनें युक्त , २ रन्ता - रमणीय , ३ हव्या - पूजनीय , ४ काम्या - कामना पूर्ण करणारी , ५ चंद्रा - आल्हाद देणारी , ६ ज्योति - अज्ञानांधकार हरण करणारी , ७ दीनता - हीनता रहित , ८ ज्ञान संपादन करणारी , ९ उदार भावनायुक्त आणि १० बहुश्रुता .

इडे रन्ते हव्ये काम्ये चन्द्रे ज्योतेऽदिते सरस्वति महि विश्रुति ।

एता ते अऽघ्न्ये नामानि देवेभ्यो मा सुकृतं ब्रूतात् ‌ ॥ ( माध्यदिन - शुक्ल यजुर्वेद संहिता ८ - ४३ )

दहा वैशिष्टयें सर्व सामान्य हिंदुधर्माचीं - १ ब्रह्म हें एकच सत्तत्व आहे . २ सर्वधर्मसहिष्णुता , ३ एकांत अनेकत्व आणि अनेकांत एकत्व - परमेश्वर एक असून सर्वांतर्यामी असल्यामुळें अनेकत्व . अशा प्रकारें अनेकत्व असूनहि तो मूळांत एकच आहे म्हणून एकत्व , ४ ऋणत्रय ( देव , ऋषि व पितर ), ५ पुरुषार्थ चतुष्टय ( धर्म , अर्थ , काम व मोक्ष ), ६ वर्ण आणि जाति , ७ आश्रम व्यवस्था ,

( ब्रह्मचर्य , गार्हस्थ्य , वानप्रस्थ आणि संन्यास ) ८ कर्म आणि पुनर्जन्म , ९ कर्म , भक्ति व ज्ञान हे तीन मार्ग व १० अधिकार भेद .

( History of Dharmashastra VOL. V. Part. II )

दहा सर्वौषिधि - १ कोष्ठ , २ जटामांसी , ३ साधी हळद , ४ आंबे - हळद , ५ मुरामांसी ६ शिलाजीत , ७ चंदन , ८ वेखंड , ९ चाफा व १० नागरमोथा .

कुष्ठं मांसी हरिद्रे द्वे मुरा शैलेयचंदनम् ‌‍ ।

वचा ञ्चंपकमुस्ते च सर्वौषध्यो दश स्मृताः ॥

( Historiy of Dharmashastra VOL. V, Prt .. I ) हीं सर्वोपयोगीं औषधें होत .

दहा सत्पुरुषांचींज लक्षणें - १ भक्ति , २ परमेश्वरावर निष्ठा , ३ निर्मयता , ४ ध्यान , ५ विराग्य , ६ सरलता , ७ करुणा , ८ निर्जनप्रियता . ९ अनिदा आणि १० शास्त्रनिष्ठा . ( कल्याण संतांक )

दहा संस्कार ( मंत्रसिद्धीसाठीं )- १ जनन , २ दीपन , ३ बोधन , ४ ताडन , ५ अभिषेक , ६ विमलीकरण , ७ जीवन , ८ तर्पण , ९ गोपन व १० आप्यायन , हे संस्कार मंत्रसिद्धीसाठीं करावे लागतात , असा सांस्कारिक मंत्र लवकर सिद्ध होतो . ( कल्याण संतांक )

दहा स्थानें अग्नीचीं - १ ते ३ प्रुथिवी वगैर तीन लोक , ४ अग्नि , ५ वायु , ६ आदित्य , ७ अप् ‌‍ , ८ औषधी , ९ वनस्पति आणि १० शरीर . ( ऋग्वेद . मंडळ . १० - ३ )

दहाजण धर्म जाणत नाहींत - १ मद्यपि , २ वेसावध ३ उन्मादग्रस्त , ४ थकलेला , ५ क्रुद्ध , ६ बुभुक्षित , ७ उतावळा , ८ लुब्ध , ९ मित्रा आणि १० विषयलंपट . तेव्हां शहाण्यानें यांशीं संबंध ठेवूं नये .

मत्तःअ प्रमत्त उन्मत्तः श्रान्तः क्रुद्धो बुभुक्षेतः

त्वरमाणश्व लुब्धश्च भीतः कामी च ते दश ॥ ( म . भा . उद्योग )

दहाजण पोष्य होत - १ आई , २ बाप , ३ गुरु , ४ पत्नी , ५ प्रजा , ६ दीन , ७ आश्रित , ८ पाहुणा , ९अ अतिथि आणि १० अग्नि .

पिता माता गुरुर्मार्या प्रजा दीनः समाश्रितः ।

अभ्यागतोऽतिथिश्चाग्निः पोष्यवर्ग उदाह्रतः ॥ ( दक्षस्मृति ) ( देवी भाग . ११ - १२ - २० )

दहाजण षण्मुद्रा साध्य झालेले - १ ध्रुव , २ प्रह्लाद , ३ मारुति , ४ लक्ष्मण , ५ मयूरध्वज , ६ हरिश्चंद्र , ७ रुक्मांगद , ८ अंबरीष , ९ अर्जुन आणि १० श्रीकृष्ण .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP