मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ८

संकेत कोश - संख्या ८

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


अष्ट अभिमानस्थानें - ( अ ) १ कुल , २ रूप . ३ तारुण्य , ४ गर्व , ५ तप , ६ संपत्ति , ७ राज्य ( अधिकार ) आणि ८ विद्या ; ( आ ) १ जात्यभिमान , २ कर्माभिमान , ३ विद्याभिमान , ४ धनाभिमान , ५ मूर्खपणाचा अभिमान , ६ बलाभिमान , ७ मद्यप्राशन आणि ८ अहंकार .

सातवी मद्य प्राशनाची मस्ती ।

आठवी मस्ती मीपणाची ॥ ( सि . बो . ४७ - ७७ )

अष्त अमात्य ( रामायणकालीन )- १ धृष्टि , २ जयंत , ३ विजय , ४ मुराष्ट्र , ५ राष्ट्र्वर्धन , ६ अकोप , ७ धर्मपाल आणि ८ सुमंत्र .

धृष्टिर्जयन्तो विजयः सुराष्ट्रो राष्ट्रवर्धनः ।

अकोपो धर्मपालश्च सुमन्त्रश्चष्टमोऽर्थवित् ‌‍ ॥ ( वा . रा . बाल . ७ - ३ )

अष्ट आत्मगुण - १ अनसूया - निर्मत्सरता , २ भूतदया , ३ सहनशक्ति , ४ अनायास - क्षुद्र कामासाठीं शरिरास कष्ट न देणें , ५ मांगल्य , ६ दैन्यवाणें नसणें , ७ अंतर्बाह्म - पवित्रता आणि ८ अभिलाषबुद्धि नसणें . ( भ . ब्राह्म . ) ( गौतमस्मृति ). ( आ ) १ दया , २ क्षमा , ३ अनसूया , ४ शौच . ५ उद्वेग हीनता , ६ मंगल , ७ अकार्पण्य - उदारता आणि ८ अस्पृहा - निष्कामता . ( आश्चलायन गृह्मसूत्र )

अष्ट आद्य गोत्र प्रवर्तक - १ कश्यप , २ अत्रि ; ३ भरद्वाज , ४ विश्वा - मित्र , ५ गौतम , ६ जमदग्नि , ७ वसिष्ठ आणि ८ अगस्ति . ( म . भा . उपसंहार )

अष्ट आयुधें ( श्रीकृष्णाचीं )- १ शंख , २ चक्र , ३ गदा , ४ पद्म , ५ गोशृंग , ६ गोवर्धन , ७ पांवा व ८ मुरली . भागवतांत वर्णन केल्याप्रमाणें ही अशी अष्टभूजा असलेली मूर्ति मोहाडी ( जि . नाशिक ) येथें आहे . ( केसरी १४ - ९ - ५६ )

अष्त आयुधें ( देवीचीं )- १ खड्‌‍ग , २ शूल , ३ गदा , ४ चक्र , ५ शंख , ६ धनुर्बाण , ७ भुशुंडी व ८ परिघ . ( दुर्गा सप्तशती १ - ८० )

अष्ट आय ( आकार - स्वरूप )- १ ध्वज , २ धूम , ३ सिंह , ४ श्वान , ५ बृषम , ६ खर , ७ गज आणि ८ उंट . जागेच्या लांबीरुंदीच्या गुणाकारास आठाने भागून जी बाकी ( जो अंक ) राहील तीस आय म्हणतात . वास्तूसाठीं नियोजिलेल्या क्षेत्राच्या क्षेत्रफळास आठांनीं भागून जो शेष राहतो त्यास आय म्हणतात . असे आय आठ आहेत . ( शिल्पशास्त्र )

सभा रचिली येवेळीं । आठही आय साधिलें तळीं ।

अष्टदिक्‌‌पाळ महाबळी । पायाचे मुळीं स्थापिले ( पां . प्रा . १५ - २५ )

ध्वजो धूमश्च सिंहश्च शुनको वृषमस्तथा ।

खरश्चैव गजश्चैव वायसो वास्तु योनयः ॥ ( पाशुपततंत्रसमुच्चय )

अष्ट उपांगें ( वेदाची )- १ प्रातिपद - व्याकरण , २ अनुपद , ३ छंद , ४ भाषा , ५ धर्म , ६ मीमांसा , ७ न्याय आणि ८ कर्मसंहिता .

अष्ट उपद्वीपें - १ स्वर्णप्रस्थ , २ शुक्ल , ३ आवर्तन , ४ रमणक , ५ मंदर हरिण , ६ पांचजन्य , ७ सिंहल आणि ८ लंका . हीं आठ उपद्वीपें जंबुद्वीपाच्या आसमंतात् ‌‍ क्षार समुद्रांत आहेत . ( भाग . स्कंध ५ अ . १९ )

अष्त उपरस - ( अ ) १ गंधक , २ गेरु , ३ हिराकस , ४ तुरटी , ५ हरताळ , ६ मनशीळ , ७ अंजन आणि ८ कुकुष्ट . ( र . र . समुच्चय );

( आ ) १ हिराकस , २ गेरु ३ शिलाजित , ४ सुर्मा , ५ गंधक , ६ हरताळ . ७ तुरटी आणि ८ रसकापूर . ( रसायनसार )

अष्टाध्यायी - पाणिनीकृत व्याकरण सूत्रांचे आठ अध्याय

अष्ट ऐश्चर्यें - १ दासदासी , २ नौकर , ३ पुत्र , ४ बंधुवर्ग , ५ वास्तु , ६ वाहन , ७ धन आणि ८ धान्य .

दासी भृत्यःअ सुतो बंधुवर्गस्तु वाहनमेव च ।

धनं धान्यमिदं प्रोक्तमष्टैश्चर्यं प्रकीर्तितम् ‌‍ ॥ ( सु . )

अष्ट कमल ( ह्ठयोग )- १ मूलाधार , २ विशुद्ध , ३ मणिपूर , ४ साधिष्ठानचक , ५ अनाहत , ६ आज्ञाचक्र , ७ सहस्त्रारचक्र आणि ८ ब्रह्मरंध्र . हठयोगांत मूलाधारापासून कपालापर्यंत मिन्न मिन्न स्थानीं हीं आठ कमलें मानलीं गेलीं आहेत . त्यांस अष्ठ कमल म्हणतात .

अष्टकरिणी - १ अम्रभू , २ कपिला , ३ पिंगला , ४ अनुपमा , ५ ताम्रकणीं , ६ शुभ्रदंती , ७ अंगना व ८ अजनावती . या आठ दिग्गज स्त्रिया होत ( गीर्वाण लघुकोश )

अष्टकाल - १ निशांत - सूर्योदयापूर्वींचा दोन तासाचा . काल , २ प्रातःकाल , ३ पूर्वाह्ल , ४ मध्याह्ल , ५ अपराह्ल . ६ सायाह्ल ७ प्रदोषव ८ निशा - रात्रीचा समय . असे अहोरात्राचे आठ भाग मानले आहेत .

अष्ट कुलाचल - १ नील , २ निषध , ३ विंध्याचल , ४ माल्यवान् ‌‍, ५ मलय , ६ गंधमादन , ७ हेमकूट आणि ८ हिमालय .

अष्ट कुमारिका - १ दयंती , २ मालिका , ३ कौमुदिका , ४ सुशीला , ५ भाति , ६ उन्नति , ७ पुष्पावती व ८ चंद्रिका . ह्या इंद्राच्या कुमारिका मानलेल्या आहेत . ( कथाकल्पतरु )

अष्ट कृष्ण - १ श्रीनाथ , २ नवनीतप्रिय , ३ मथुरानाथ , ४ विठ्ठलनाथ , ५ द्वारकानाथ , ६ गोकुळनाथ , ७ गोकुळचंद्रमा आणि ८ मनमोहन . अशा श्रीकृष्णाच्या आठ प्रतिमांस वल्लभ संप्रदयांत अष्टकृष्ण अशी संज्ञा आहे . ( आदर्श हिंदी शब्दकोश )

अष्टगण ( काव्यशास्त्र )- अक्षरांच्या - गुरुलघुत्वावरून दिलेली संज्ञागण तीन अक्षरांचा होतो हे आठ असून त्यांची नावे , म , य , र , स , त , ज , भ , व न अशी आहेत .

अष्टगण ( वर्ग )- कवितेंत अक्षराच्या गुरुलघुत्वावरून पाडलेले वर्ग . असे आठ आहेत .

गण देवता

१ मगण - तिन्ही अक्षरें गुरु , उदा . - माताजी - पृथ्वी .

२ यगण - आद्याक्षर लघु , उदा . - यशोदा - आपजल .

३ रगण - मध्यअक्षर लघु , उदा . - रामजी - अग्नि .

४ सगण - अंत्याक्षर गुरु , उदा . - सरिता - वायु .

५ तगण - अंत्याक्षर लघु , उदा . - ताराप - आकाश .

६ जगण - मध्यअक्षर गुरु . उदा . - जटायु - सूर्य .

७ भगण - आद्याक्षर गुरु . उदा . - भारत . - चंद्रमा .

८ नगण - तीन्ही अक्षरें लघु , उदा . - नगर - नाग ( पंचग्रंथी )

अष्त गणेश - १ विनायक , २ विघ्नराज , ३ द्वैमातुर , ४ गणाधिप , ५ एकदंत , ६ हेरंब , ७ लंबोदर आणि ८ गजानन . ( अमरकोश )

अष्टगंध - ( अ ) १ चंदन , २ अगरु , ३ देवदार , ४ कोष्टकोळींजन , ५ कुसुम , ६ शैलज , ७ जटामांसी आणि ८ सुरगोरोचन , हीं आठ सुंगधी द्रव्यें एकत्र करून केलेलें गंध ; ( आ ) १ कस्तुरी , २ केशर , ३ कृष्णागरू , ४ गोरोचन , ५ चंदन , ६ रक्तचंदन , ७ गोपीचंदन आणि ८ मलयागर ; ( इ ) ( देवीचें )- १ अगरु , २ कस्तुरी , ३ गोरोचन , ४ कुंकू , ५ जटामांसी , ६ नखला , ७ चंदन आणि ८ तगराचें गंध .

’ अष्टम तगराचे गंध जाण । गंधाष्टक देवीचे ’ ( देवी महात्म्य )

अष्टगुण अमात्यपदास आवश्यक - १ शुश्रूषा , २ श्रवण , ३ ग्रहण , ४ धारण , ५ ऊहन ( अंदाज ), ६ तर्क , ७ अपोहन - अविद्या निरसन व ८ असत्तर्क निरसन . ( म . भा . भीष्म अ ८५ ) सविलास अविद्या निरसन । अपोहन या नांव । ( ए . भा . १३ - १८५ )

अष्टगुण ( बुद्धीचे )- १ शुश्रूषा , २ श्रवन , ३ ग्रहण , ४ धारण , ५ चिंतन , ६ ऊहापोह , ७ अर्थविज्ञान आणि ८ तत्त्वज्ञान .

शुश्रूषा श्रवणं चैव ग्रहणं धारणं तथा ।

ऊहापोहोऽर्थविज्ञानं तत्त्वज्ञानं च धीगुणाः ॥ ( का . नीति . )

अष्ट गुरु - ( अ ) १ मातापित , २ दाई , ३ कुलोपाध्याय , ४ विद्यागुरु , ५ मंत्र गुरु , ६ उपास्ना गुरु , ७ ब्रह्मज्ञानी व ८ मुक्तिदाता ( पंचग्रंथी ) ( आ ) १ बोधकगुरु , २ वेदकगुरु , ३ निषेधगुरु , ४ काम्यगुरु , ५ सूचक्गुरु ६ वाचकगुरु , ७ कारकग्रुरु व ८ विहितगुरु .

विहितो गुरुमित्येवमष्टधा गुरवोमताः ॥ ( विवेकचिंतामणि )

अष्टग्रही - एका राशींत आठ ग्रह असणें या योगाला अष्टग्रही म्हणतात . असा योग साधारणपणें ८००० वर्षांनीं येतो . महाभरतकालीं तसेंच पृथ्वीराज चव्हाणच्या कालीं ( अकरावें शतक ) हा योग आला होता असें म्हणतात . ते ग्रह असेः - १ मंगळ , २ शनि , ३ चंद्र , ४ रवि , ५ बुध , ६ शुक्र , ७ केतु आणि ८ गुरु होत . या योगामुळें पुथ्वीवर पुराच्या पाण्याचे लोट वा रक्ताचे पाट वहातात .

अष्टग्रहैकराशिस्था गोलयोगप्रकीर्तितः ।

प्लावयन्ति महीं सर्वां जलेन रुधिरेण वा ॥ ( ज्योतिषाशास्त्र )

असा योग सन १९६२ फेब्रुवारींत होता . त्यावेळीं पुण्याजवळील पानशेत धरण फुटलें . ( दि . १२ जुलै १९६२ ) निरनिराळ्या नद्यांनन महापूर येऊन बिहार वगैरेकडे जलप्रलय झाले .

अष्ट छाप - १ सूरदास , २ कृष्णदास , ३ परमानंददास , ४ कुंभनदास , ५ चतुर्भुजदास , ६ छीतस्वामी , ७ नंददास व ८ गोविंदस्वामी , हे श्रीबल्लभाचार्यांचे प्रमुख शिष्य व आचार्य होत . यांना अष्ट छाप असें म्हणतात .

अष्टतारिणी - १ देवी भगवतीच्या आठ मूर्ती . १ तारा , २ उग्रा , ३ महोग्रा , ४ वज्रा , ५ काली , ६ सरस्वती , ७ कामेश्चरी व ८ चामुण्डा . ( आदर्श - हिंदी - कोश )

अष्टतारा - १ तारा , २ उग्रा , ३ महोग्रा , ४ वज्रा , ५ नीला , ६ सरस्वती , ७ कामेश्वरी व ८ भद्रकाली अशा तारा देवता आठ प्रकारच्या आहेत . ( मायातंत्र )

अष्टताल - अष्टताल ८४ इंच , मानवाची उंची सामान्यतः आठ ताल मानलेली आहेत . नवताल पुरुष हा श्रेष्ठ पुरुष होय . ( संस्कृतिकोश )

अष्ट तैल - १ कुसुंब - करडी , २ अतसी - जवस , ३ सर्षप - मोहरी , ४ शिरस , ५ नारळ , ६ करंज , ७ मधु आणि ८ खसखस .

अष्ट दर्शन - ( अ ) १ गुरु , २ भाग्यवान् ‌‍ , ३ दाता , ४ कामधेनु , ५ आरसा , ६ प्रमु , ७ सुर्य आणि ८ ईश्वर , ( पांडवप्रताप ); ( आ ) १ दहीं , २ तूप , ३ आरसा , ४ मोहर्‍युआ , ५ बैल , ६ गोरोचन , ७ सुवर्ण आणि ८ पुष्पमाला .

अष्ट दरिद्री - १ अन्न , २ वस्त्र , ३ निवास ( घर ), ४ भूमि ५ संतती , ६ संपत्ति , ७ आप्तइष्ट व ८ मित्रपरिवार . या आठहि गोष्टींचा , ज्याचे ठिकाणीं अभाव , अशास म्हणतात .

अष्टदिशेच्या आठ सिंहाचीं नांवें ( शिवछत्रपतींच्या सिंहासनाचे )

सिंहावरील आसन म्हणजे सिंहासन . १ पूर्वेस - सिंह , २ आग्नयेस - हर्यक्ष , ३ दक्षिणेस - नाग , ४ नैऋत्येस - केसरी , ५ पश्चिमेस - मृगेंद्र , ६ वायव्बेस - शार्दूल , ७ उत्तरेस - गजेंद्र आणि ८ ईशान्येस - हरि . ( श्रीशिवराज्यभिषके )

अष्ट द्वारपाल गौरीचे - १ जया , २ विजया , ३ अजिता , ४ अपराजिता , ५ निभक्ता , ६ मंगला ७ मोहिनी व स्तंभिनी , ( Vastushastra. VOL II )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP