मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ७

संकेत कोश - संख्या ७

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


सप्त द्वारें परमार्थ साधनाचीं - १ श्रवण , २ साधन , ३ नित्या - नित्य वस्तु विवेक , ४ मनन , ५ निदिध्यासन , ६ वैराग्य व ७ साक्षात्कार . ( भा . रा . ५ - ४५ )

सप्त द्वारें स्वर्गाचीं - १ तप , २ दान , ३ शम , ४ दम , ५ ही , ६ आर्जव व ७ सर्वभूतानुकंपा . ( म . वा . को . )

सप्तर्षि महाप्रलयांतून बचावलेले - १ ब्रह्मा , २ वसिष्ठ , ३ भृगु . ४ अत्रि , ५ दक्ष , ६ काश्यप व ७ आंगिरस . ( Wisdum of India )

सप्त द्वीप - १ जबुद्वीप , २ प्लक्षद्वीप , ३ शाल्मलीद्वीप , ४ कुशद्वीप , ५ क्रौंचद्वीप , ६ शाकद्वीप आणि ७ पुष्कद्वीप . असे , पृथ्वीचे प्राचीन काळचे सात मोठाले विभाग .

जंबुप्लक्षामिधानौ च शाल्मलश्च कुशस्तथा ।

कौंचशाकौ पुष्करश्च ते सर्वे देवभूमयः ॥ ( वृ . ना . पूर्वखंड )

सप्त देह - १ स्थूलदेह , २ सूक्ष्मदेह , ३ प्राणदेह , ४ वासनादेह , ५ मानसदेह , ६ बुद्धिदेह आणि ७ आत्मदेह . अस्तिस्वाच्या या सातश्रेणी आहेत . त्यांना सात पडदे किंवा चैतन्याचीं वसनें म्हणतात . ( धवलगिरि )

सप्त धातु ( खनिज )- १ सोनें , २ रुपें , ३ तांबें , ४ शिसें , ५ जस्त , ६ कथिल व ७ लोखंड .

सप्त धातु ( शरिरांतील सात रस )- ( अ ) १ रस . २ रक्त , ३ मांस , ४ मेद , ५ अस्थि , ६ मज्जा आणि ७ शुक्र , ( सुश्रुत );

( आ ) १ वसा , २ रुधिर , ३ मांस , ४ मेद , ५ मज्जा , ६ अस्थि आणि ७ स्नायु . हे सात धातू असून हे देहाचें धारण करतात

रसो रुधिरं मांसश्च मेदो मज्जास्थिरेतसः ।

सप्तधातच इमे प्रोक्ताः सर्वदेहसमाश्रिताःअ । ( कर्णहंस )

सप्त धान्यें - ( अ ) १ सातु , २ गहूं , ३ साळ , ४ तीळ , ५ राळे , ६ सांवे आणि ७ हरमरे ; ( आ ) १ साळी , २ यव , ३ तीळ , ४ उडीद , ५ राळे . ६ गहूं आणि ७ हरमरे .

सप्त नद - १ शोणनद , २ सिंधुनद , ३ हिरण्याक्ष , ४ कोक , ५ घर्घर ( घगर ), ६ लोहित आणि ७ शतलज्ज ( सतलज ) हे सात नद होत . " शतलज्जो नदाः सप्त यावना ब्रह्मसूनवः ॥ " ( अ . म . ३० - १७ )

सप्त पदार्थ ( न्यायशास्त्र )- १ द्र्व्य , २ गुण , ३ कर्म , ४ सामान्य , ५ विशेष , ६ समवाय आणि ७ अभाव . अशीं विश्वाचीं सात मूलद्रव्यें वैशेषिक दर्शनानें मानिलीं आहेत . सृष्टि ही अशी सप्तपदार्थात्मकच आहे .

सप्त पदार्थ विद्या - १ शिल्पविद्या , २ जलविद्या , ३ वातविद्या , ४ दर्शनविद्या , ५ नादविद्या , ६ विद्यल्लताविद्या आणि ७ चुंबकविद्या . ( म . वा . को . )

सप्तपदी - ( अ ) विवाहविधींतील प्रमुख अंग - लाजाहोमानंतर वरानें वधूचा हात धरून अग्नि व द्विज यासमक्ष एकेका अशा सात अक्षतपुंजांवर चरण ठेवून सात पावलांनीं आपल्याजवळ आणणें . याला सप्तमदी म्हणतात . सप्तपदीविना विवाह पूर्ण होत नाहीं .

विवाहहोम झाला संपूर्ण , सप्तपदी पाणीग्रहन ( रुक्मि . स्वयं . १६ - २६ ) ( आ ) वधू आपल्या पतीबरोबर सात पावलें चालून आपल्या सात मागण्या मान्य करून घेत . पहिल्यांत अन्न , दुसर्‍यांत बल , तिसर्‍यांत धनवस्त्रादि , चौथ्यांत सुख , पाचव्यांत गाय , सहाव्यांत सर्व ऋतंत सुख आणि सातव्यांत सख्य , सज्जनांची मैत्री सात पावलें बरोबर चालण्यानें होते .

सप्त पाताळ - ( अ ) १ अतल , २ वितल , ३ सुतल , ४ रसातल , ५ महातल , ६ तलातल आणि ७ पाताल ; असे सात पाताळ

( अधोलोक ) आहेत ( बृहन्नारदीय पूर्वखंड ); ( आ ) १ अहितळ , २ महितळ , ३ सुतळ , ४ कर्मतळ , ५ वितळ , ६ शंकातळ आणि ७ रसातळ . ( मूळस्तंभ कथासार ) ( इ ) १ अतळ - सुमात्रा , २ वितळ - बोर्निओ , ३ सुतळ - जावा , ४ रसातळ - सेलिबिस , ५ महातळ - ऑस्ट्रेलिया , ६ तळातळ - न्यू गिनी व ७ पाताळ - न्यूझीलंड ( भारतभक्तिस्तोत्र )

सप्तप्राण आणि त्यांचीं सात स्वरूपें - ( मनुष्य शरीरांत सातप्राण आहेत . त्यांचीं नांवें व स्वरूपें अनुक्रमें )- १ ऊर्ध्व - अग्नि , २ प्रौढ - आदित्य , ३ अभ्यूढ - चंद्रमा , ४ विभू - पवमान , ५ योनि - आप , ६ प्रिय - पशु आणि ७ अपरिमित - प्रजा . ( अथर्व १५ - १ - ९ )

सप्त पाश - ( अ ) १ काळपाश - आयुष्यघात , २ कर्मपाश - अनैश्वर्यवंत , ३ धर्मपाश - आश्रमगत , ४ ब्रह्मपाश - वैदविहितार्थ , ५ मोहपाश - देहममता , ६ आशापाश - मुख्यमाया आणि ७ जन्मपाश - कनककांता ( भा . सुंदर , १९ - ११ )

( आ ) १ अहं , २ बायको , ३ पुत्र , ४ गृह , ५ स्वजन , ६ धन आणि ७ आशा . असे सात पाश माणसाला बांधून ठेवतात . ( भा . रा . सुंदर , २२ - ४४ ) " आशा पाश सप्तमहा " ( हरिवरदा अ . ८० ).

सप्त प्रकृति - १ जति , २ देश , ३ कुल , ४ काल , ५ वय , ६ बल आणि ७ प्रतिव्यक्ति ( व्याक्तिवैशिष्टय ). या सातांनीं सात प्रकारच्या प्रकृती ( मनुष्य शरीराच्या ) बनतात , असें आयुर्वेदांत मानलें आहे . ( वाग्मट , शा . ८ - २२ )

सप्त प्रयाग - ( अ ) १ रुद्रप्रयाग - मंदाकिनी व अलकनंदा संगम , २ नंदप्रयान , ३ कर्णप्रयाग , ४ देवप्रयाग , ५ पार्वतीप्रयाग , ६ विष्णुप्रयाग - विष्णुगंगा व अलकनंदा संगम आणि ७ प्रयागराज - गंगा व यमुना संगम . हे सात प्रयाग ( महानद्यांचे संगम ) आहेत ; ( आ ) १ प्रयाग , २ देवप्रयाग , ३ कर्णप्रयाग , ४ नदंप्रयाग , ५ श्यामप्रयाग - श्यामगंगा व भागीरथी संगम , ६ गुप्तप्रयाग आणि ७ हरिप्रयाग .

सप्त भयें - १ इहलोकमय , २ परलोकमय , ३ वेदनाभय , ४ मृत्युभय , ५ अगुप्तिभय , ६ अश्लोकमय , व ७ अकत्मात्‌‍भय .

( रत्नकरंडक श्रावकाचार अ . १ )

सप्त भूमिका वासनाक्षयाच्या ( वेदांतशास्त्र )- १ योगभूमिका , २ विचारभूमिका , ३ असंसर्गा , ४ स्वप्रभूमिका , ५ सुषुप्तिभूमिका , ६ मनोलय आणि ७ कैवल्य . ( चंद्रकांत , भाग २ रा )

सप्त भूमिका ज्ञानाच्या - १ शुभेच्छा , २ विचारणा - अध्यात्मशास्त्र आणि संतसमागम , ३ तनुमानसा - मनःक्षयकारिणी , ४ सत्त्वापत्ति - चित्तनिर्मळ होणें , ५ असंसक्ति - अनासक्ति , ६ पदार्थाभावना - आत्मवस्तूची भावना आणि ७ तुर्यगा - अवस्थात्रयाच्या पलीकडे जाणें , सातव्या अवस्थेंत मनुष्य जीवन्मुक्त होतो . ( रा . गी . ७ - ३४ ) ( यो . वा . )

सप्त मधु अथवा सात मधु पदार्थ - १ ब्राह्मण ( ज्ञान ), २ राजशासन ( प्रजारंजनरूपमधु ), ३ धेनु , ४ वैल , ५ तांदूळ , ६ जव आणि ७ मध . व्रीहिश्च यवश्च मधुसप्तमम् ‌‍ ॥ ( अथर्व - अनु - मराठी . भाग २ रा )

सप्त महारथी - १ द्रोण , २ कर्ण , ३ कृपाचार्य , ४ कृतवर्मा , ५ अश्चत्थामा , ६ शल्य आणि ७ जयद्रथ , हे कौरव पक्षीय सात महारथी . या सातांनीं मिळून भारतीय युद्धांत एकाकी वीर अभिमन्यूचा वध केला .

सप्त महानद्या - १ गंगा , २ यमुना , ३ गोदावरी , ४ सरस्वती , ५ नर्मदा , ६ सिंधु , ७ कावेरी . यांचें स्नानसप्रयीं स्मरण करावें .

सप्त मातृका - ( अ ) १ श्री , २ लक्ष्मी , ३ धृति , ४ मेधा , ५ श्रद्धा , ६ विद्या आणि ७ सरस्वती ; ( आ ) १ ब्राह्मी , २ माहेश्वरी , ३ कौमारी , ४ वैष्णवी , ५ वाराही , ६ इंद्राणी आणि ७ चामुंडा या सप्त मातृका देवता होत . खेरीत ऐन्द्री ही आठवी भातृका म्हणजे देवीच्या आठ विभूति सांगितल्या आहेत . ( डामरतंत्र )

ब्राह्मी माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा ॥

वाराही च तथेंद्राणी चामुंडा सप्तमारतः ॥ ( देवी भा . स्कंध १२ )

सप्त माया - १ गायत्री , २ सत्यवती , ३ ज्ञानविद्या , ४ लक्ष्मी , ५ उमा , ६ वर्णिका व ७ धर्मद्रवा . ब्रह्मदेवानें सृष्टि निर्मितांना मायेचें साह्म घेतलें व तें तिनें या सप्तरूपांनीं दिलें . अशी कथा आहे . ( प्रा . च . को . )

सप्त माया - १ महामाया , २ वैष्णवीमाया , ३ दैत्त्येयीमाया , ४ गौह्मकी माया , ५ पैशाची माया , ६ आसुरी माया व ७ राक्षसा माया . " सप्त माया व्यतिक्रम्य मायां सयुयुजोष्टमीम् ‌‍ " सत्तात्मिका अथवा सात्विकी माया या आठव्या मायेचा प्रयोग करून प्रद्युम्नानें शंबरासुराचा वध केला . ( विष्णु . ५ - ७ - १८ )

तितृकिया सात्विकी माया योगें ।

शंवर सवेगें पाडिला ॥ ( हरिवरदा ५५ - २०४ )

सप्त मुक्तिप्रद क्षेत्रें - ( अ ) १ अयोध्या , २ मथुरा , ३ माया , ( हरिद्वार ) ४ काशी , ५ कांची , ६ अवंतिका - उजयिनी आणि ७ द्वारका ,

अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका ।

पुरी द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायिकाः ॥ ( गुरुड . १६ - ११४ )

( आ ) ( परशुराम निर्मित )- १ रजतपीठ - उडपी , २ कुमार पर्वत - सुब्रह्मण्यक्षेत्र , ३ कुंभकाशी - कुंभकोणम् ‌‍, ४ ध्वजेश्वर महादेव , ५ क्रोड ऋषीच्या आश्रमी शंकर नारायण क्षेत्र , ६ गोकर्ण आणि ७ मूकांबा देवी .

रोप्यपीठं कुमाराद्रिः कुंभकाशी ध्वजेश्वरः ।

क्रोडगोकर्णमूकांबाः सप्तैते मोक्षदायकाः ॥ ( यात्राकल्पलता )

सप्त मृत्तिका - १ अश्वाच्या जागेंतील , २ गजाच्या जागेंतील , ३ चव्हाटयावरची , ४ वारूळ , ५ संगमावरची , ६ डोड आणि ७ गायीच्या गोठयांतील . या सात ठिकाणांहून आणलेली मृत्तिका वस्तुशांति इत्यादि कर्मांत लागतात . ( धर्मशास्त्र )

सप्त मौक्तिक स्थानें - १ शिंपा , २ डुकारचें मस्तक , ३ सर्पमस्तक , ४ शंख , ५ मत्स्य , ६ बेडूक ( किंवा वेळू ) आणि ७ हत्ती , ( निघंट प्रकाश )

सप्त रक्त - १ तळहात , २ पायाचे तळवे , ३ नेत्रांचे कोपरे , ४ जीभ , ५ ओठ , ६ पडजीभ आणि ७ नखे , या सात ठिकाणांच्या रक्ताला सप्तरक्त ही संज्ञा आहे .

सप्त रंग - लाल , २ नारिंगी , ३ पिवळा , ४ हिरवा , ५ निळा . ६ पारवा आणि ७ जांभळा . हे सूर्यकिरणांच्या पृथक्करणानें होणारे अथवा इंद्रधनुष्यांत दिसणारे सात रंग .

सप्त रशिम ( किरणें ) सूर्याची - १ सुषुम्ना , २ हरिकेश , ३ विश्वकर्मा , ४ विश्वश्रवा , ५ संयद्वसु , ६ अर्वावसु व ७ स्वरकु वा स्वरत . ( कूर्म . ४३ - ३ )

सप्त रशिममय सृष्टि - १ सूर्याचीं किरणेंज सात , २ पृथ्वीच्या धातु व उपधातुहि सात , ३ रत्नाचे रंग सात , ४ मनुष्याच्या शरिरांतील धातु व उपधातुहि सात , ५ त्वचा सात , ६ अग्नीच्या कला सात आणि ७ त्यांचीं राहण्याचीं ठिकाणेंहि सात . अशी सर्व सृष्टि सप्त रश्मिमय आहे . ( आरोग्य मंदिर ऑगस्ट १९५४ )

सप्तरस - १ पृथ्वी , २ जल . ३ वनस्पति , ४ मनुष्य , ५ वाचा , ६ ऋचा व ७ साम असे सात रस अध्यात्म ( वेदांत ) शास्त्रांत मानले आहेत . सामाचे सार उद्नीथ म्हणजे ओंकार हा आठवा रस होय .

" स एष रसानां रसतमः परमः परार्ध्योऽयं उद्नीथः " ( सु . )

सप्त लोक - १ भूलोक - पृथ्वी , भुवर्लोक - पृथ्वी आणि सूर्य यामधील , ३ स्वर्लोक - सूर्य आणि ध्रुव यांमधील , ४ महर्लोक - सूर्य व नक्षत्रें यांचा , ५ जनलोक - ब्रह्मदेवाच्या मानस्पुत्रांचा . ५ तपोलोक - तपस्वी लोकांचा आणि ७ सत्यलोक - ब्रह्मदेवाचा . असे सात ऊर्ध्व लोक पुराणांत वर्णिले आहेत . ( वायु . पूर्वार्ध . ५० - ७९ ) ( आ ) जीव , जगत् ‌‍ आणि ईश्वर ही एक वस्तु आहे आणि स्वतःच्या आनंदासाठीं ती सात प्रकारची झाली आहे . त्याला वेदांतांत सप्तलोक असें म्हटलें आहे . तें असें :- १ सत् ‌‍- सत्यलोक , चित् ‌‍ - तपोलोक , ३ आनंद - जनलोक , ४ विज्ञान - महर्लोक , ५ मन - स्वर्लोक , ६ प्राण - भुवर्लोक व ७ शरीर - भूलोक .

( पूर्णयोगी श्रीअरविंद )

सप्तविध व्यसनें - ( अ ) १ द्यूत , २ मांस , ३ स्रुरा , ४ वेश्या , ५ दिवानिद्रा , ६ परानिंदा व ७ मृगया ; ( आ ) १ हिंसा , २ चोरी , ३ व्यमिचार , ४ मद्यपान , ५ असत्य भाषण , ६ जुगार व ७ दुष्टसंगति ; ( इ ) १ जारण , २ मारण , ३ विध्वंसन , ४ स्तंभन , ५ मोहन , ६ वशीकरण आणि ७ उच्चाटन ; ( ई ) १ द्यूत , २ मृगया , ३ मद्यपान , ४ कठीण दंड , ५ अयोग्य दान , ६ कामिनी आणि ७ कठोर भाषण .

सप्त व्याह्रति - व्याह्रति म्हणजे आविष्कार . या सात आहेत . १ भूः , २ भूवः , ३ स्वः , ४ महः , ६ तपः , व ७ सत् ‌‍ ( ऋग्वेद १० - ६७ ) आणि यांचा भाव १ अस्तित्व , २ ज्ञान , ३ प्रकाश , ४ महत्त्व , ५ प्रजनन , ६ सहनशक्ति आणि ७ सत्यनिष्ठा . या सात शब्दांत आहे . या सात व्याह्रति म्हणजे वेदांतील सांकेतिक शब्द होत . ( पुरुषार्थ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP