मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ६

संकेत कोश - संख्या ६

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


सहा दोष पद्य रचनेसंबंधीं - १ कर्णकठोर , अपरिचित किंवा क्लिष्ट शब्दयोजना , २ शब्दांची ओढाताण , ३ भिन्न भाषांतील शब्दांचे समास , ४ त्याच त्या शब्दांची पुनरावृत्ति , ५ रसाला प्रतिकूल चाल व ६ यतिमंग . ( नाटक - शास्त्र व तंत्र )

सहा दोष ( पाठकाचे - पठण करणाराचे )- १ गात म्हणणारा , २ जलद जलद म्हणणारा , ३ वाचतांना किंवा म्हणतांना डोकें हलविणारा , ३ लिहिलेलें वाचणारा , ५ अर्थ न जाणणारा व ६ बारीक आबाजाचा .

गीती शीघ्री शिरःकंपी तथा लिखितपाठकः ।

अनर्थज्ञोऽल्पकंठश्र षडेते पाठकाधमाः ॥ ( पा . शिक्षा ३२ )

सहा दोष ( स्त्रियांचे बाबतींत )- ( अ ) १ मद्यपान , २ दुर्जनसंगति , ३ पतीपासून दूर राहणें , ४ इकडे तिकडे भटकणें , ५ परगृहीं निद्रा , आणि ६ परगृहवास ( मनु . ९ - ३३ ); ( आ ) १ अनृत , २ साहस , ४ माया , ५ जाणीव कमी , ५ अतिलोभ आणि ६ अशुचित्व .

अनृतं साहसं माया मूर्खत्वमांतेलोभता ।

अशौचत्वं निदर्यत्वं स्त्रीणां दोषाः स्वभावजाः ॥ ( वृ . चा . )

सहा द्वारें मसलत फुटण्याची ( राजनीतिशास्त्र )- १ मद , २ निद्रा , ३ अज्ञान ( शत्रुकडील गुप्त हेर वगैरेबद्दल ), ४ चेहर्‍यावरील विकार , ५ दुष्ट मंत्र्यावर विश्वास आणि ६ अकुशल दूत . ( म . भा . उद्योग . ३९ - ३९ )

सहा ’ न ’ कार - १ मौन , २ विलंब , ३ भिवया चढविणें , ४ अधोवदन , ५ निघून जाणें आणि ६ विषयांतर .

मौनं कालविलम्बश्च प्रयाणं भूमिदर्शनम ‌‍ ।

भरुकुटयन्यमुखी वार्ता नकारः षड्‌‍विधः स्मृतः ॥ ( सु . )

सहा नराधम - १ कोणतेंहि काम न करितां ज्यांत त्यांत घोटाळा करणारा , २ कामाकडे अति दुर्लक्ष करणारा , ३ नेहमीं खोटें बोलणारा , ४ द्दढ प्रेम न करणारा , ५ स्नेहभावाचा त्याग केलेला आणि ६ स्वतःला शहाणा समजणारा . ( म . भा . उद्योग ३७ - ३७ )

सहा नास्तिक दर्शनें - १ चार्वाक , २ सौत्रांत्रिक , ३ वैभाषिक , ४ योगाचार , ५ माध्यमिक आणि ६ अर्हत् ‌. ( वृ . प्र . )

सहा निसर्गदत्त वैद्य - १ सूर्यप्रकाश , २ अन्न , ३ हवा , ४ पाणी , ५ व्यायाम आणि ६ विश्रांति , हे सहा निसर्गदत्त वैद्य परमेश्वरानें मनुष्याच्या सन्निध ठेविले आहेत . त्यांची आठवण ठेवावी . ( प्रातःस्मरण )

सहा पद्धती सुगंधी पदार्थ तयार करण्याच्या - १ भावन , २ पाचन , ३ बोधन ४ वेधन , ५ धूपन व ६ वासन . ( गंधसार )

सहा पारतंत्र्यें - १ स्वाभावा - पारतंत्र्य , २ ईश्वर - पारतंत्र्य , ३ प्रकृति - पारतंत्र्य , ४ गुण - पारतंत्र्य ५ कर्म - पारतंत्र्य आणि ६ काल - पारतंत्र्य .

सहा पुरणप्रसिद्ध सभा - १ इंद्रसभा . २ वरुणसभा , ३ कुवेरसभा , ४ यमसभा , ५ ब्रह्मसभा आणि ६ धर्म ( मय ) सभा . ( पांडव प्र . १६ - ४ ).

सहा प्रकारची अभिज्ञा ( दिव्यज्ञान )- १ दिव्यद्दष्ठि , २ दिव्यथुति , ३ कामरूप , ४ पूर्वजन्मस्मृति , ५ दिव्यज्ञान आणि ६ विमक्तिज्ञान ( बुद्धदर्शन )

सहा प्रकार ( ऋषींचे )- १ छंदऋषी - वसिष्ठ कण्व २ इ . ब्रह्मऋषी - अत्रि वगैरे , ३ महर्षि - भृगु वगैरे , ४ रजर्षि - विश्वामित्र , जनक , ऋतुपर्ण इ . ५ गोत्रऋषी - शांडिल्य - कौंडिण्य वगैरे आणि ६ देवऋषी - नारद . ( ऐति . गोष्टी भाग , ३ रा )

सहा प्रकार उन्मादाचे - १ वातोन्माद , २ पित्तोन्माद , ३ कफोन्माद , ४ सान्निपाति उन्माद , ५ मानसिक उन्माद व ६ विषयन्य उन्माद . ( आयुर्वेद )

सहा प्रकारचे ऐतिहासिक विपर्यास ( दोष )- १ स्थलविपर्यास , २ कालविपर्यास , ३ घटनाविपर्यास , ४ कार्य - करण विपर्यास , सभावविपर्यास आणि ६ परिस्थितिविपर्यास . असे सहा प्रकारचे दोष इतिहासशास्त्रांत मानले आहेत . ( साहित्याचा संसार )

सहा प्रकारचे गुरू - १ प्रेरक , २ सूचक , ३ वाचक , ४ दर्शक , ५ बोधक आणि ६ शिक्षक . ( मंत्रशास्त्र )

सहा प्रकारचे गंध - १ लवंग , बेलदोडे वगैरेंज्चा खमंग वास , २ फुलें , अत्तर वगैरेंचा वास , ३ पक्क फळांचा स्वादिष्ट वास , ४ तरपेंटाईन वगैरेंचा दर्प , ५ कुजक्या पदार्थांचा दुर्गंध आणि ६ डांबर वगैरेंचा जळफट

सहा प्रकारांनीं अंतरंग जाणतां येतें - १ चर्या ( चाल रीत ), २ इंगित ( खाणाखुणा ), ३ चेष्टा ( हालचाल , ) ४ भाषण , ५ द्दष्टि आणि ६ मुखचर्या . ( मनु . ८ . २६ )

सहा प्रकारांनी तीळ पापाचाअ नाश करणारे आहेत - १ तिलमिश्रित पाण्यानें स्नान , २ तीळ बाटून अंगास लावणें , ३ तिळांनीं हवन करणें , ४ तिलोअदकानें तर्पण , ५ तीळ भक्षण आणि ६ तिलदान .

तिलस्नायी तिलोद्वर्ती तिलहोमी तिलोदकी ।

तिलभुक्‌‌ तिलदाता च षट्‌‌तिलाः पापनाशकाः ॥ ( सु . )

सहा प्रकारचीं दर्शनें ( मतें )- १ शैव दर्शन , २ शाक्त दर्शन , ३ वैष्णव दर्शन , ४ गाणपत्य दर्शन , ५ सौर दर्शन आणि ६ कापालिक दर्शन .

दर्शनं षड्‌‌विधं प्रोक्तं शैवशाक्तेयवैष्णवम् ‌‍ ।

गाणपत्यं च सौरं च कापालिकमिति स्मृतम् ‌‍ ॥ ( सु . )

सहा प्रकार दक्षिणेचे - १ धेनु , २ भूमि , ३ सुवर्ण , ४ रौप्य , ५ वस्त्र व ६ अश्व . ( म . भा . आरण्यक पर्व )

सहा प्रकारचा देह - १ स्थूलदेह , २ वासनादेह , ३ मनोदेह , ४ कारणदेह , ६ बुद्धिदेह आणि ६ निर्वाणदेह . असे सहा प्रकारचे देह असतात असें थिऑसफीनें ( ब्रह्मविद्या ) मानलें आहे .

सहा प्रकारचे दुर्ग - १ निर्जन प्रदेश दुर्ग , २ भूदुर्ग ( भुईकोट किल्ला ), ३ डोंगरी किल्ला . ४ नरदुर्ग - नगराभोंवतीं पहारा वा अनन्यनिष्ठ सेवक असणें , ५ मृद्‌‌दुर्ग - मातीचा तट आणि ६ नगराभोवतीं दुर्गम अरण्य असणें . असे सहा प्रकार दुर्गांचे

( किल्लयांचे ) प्राचीन काळीं असत .

सहा प्रकार दूषित अन्नाचे - २ आश्रयदुष्ट , २ कालदुष्ट , ३ भावदुष्ट , ४ स्वभावदुष्ट , ५ वाग्दुष्ट आणि ६ संसर्गदुष्ट . ( भविष्य . पु . )

सहा प्रकार प्रकृतीचे - १ स्वभाव , २ ईश्वर , ३ काल , ४ यद्दच्छा , ५ नियति आणि ६ परिणाम . ( सुश्रुत . शा . अ . १ )

सहा प्रकारचे पशुमानव - १ वेदपशु , २ शास्त्रपशु , ३ पुराणपशु , ४ देवपशु , ५ नरपशु , व ६ स्त्रीपश , असे सहा प्रकारचे पक्षपाती अविचारी मानव जगांत असतात . ( निर्पक्ष सत्यदर्शन )

सहा प्रकार भक्तीचे ( जैनधर्म )- १ नामभक्ति , २ स्थापनाभक्ति , ३ द्र्व्यभक्ति , ४ भावभक्ति , ५ क्षेत्रभक्ति आणि ६ कालभक्ति .

( कल्याण - भक्ति अंक )

सहा प्रकार भाज्यांचे - १ पानें - मेथी , चुका , पाचवत इ ., २ फुलें - कोबी हदगा इ , ३ फळें - भोपळा , कारली इ ., ४ कंद - सुरण , रताळी इ ., ५ देठ - अळू - शिरस इ . व ६ भुईफोड - भूमि , गोमय , लाकूड इत्यादिकांत पावसाळ्यांत पत्पन्न होणारी छत्रीवजा दिसणारी वनस्पती . ( बृहद्योग तरंगिणी )

सहा प्रमुख प्रकार ( भाताचे )- १ वांगीभात , २ दोडकेभात , ३ तोंडालीभात , ४ वाळकीभात , ५ केळीभात व ६ बटाटेभात . ( स्वयं - पाक शास्त्र )

सहा प्रकार रतिक्रियेचे - १ उत्तान रत , २ तिर्यग् ‌‍ रत , ३ उपविष्ट रतु , ४ स्थित रत , ५ आनत रत व ६ विपरीत रत .

( रतिशास्त्र )

सहा प्रकार राजनीतीचे - १ संधि - प्रसंगीं परस्पर साह्म , २ विग्रह - युद्ध , ३ यान - आक्रमण , ५ आसन - शत्रूची उपेक्षा करणें , ५ द्वैधीभाव - केव्हां संधि केव्हां विग्रह व ६ द्वैध - दुटप्पी धोरण .

तथा चान्वीक्षिकीं विद्यां राजनीतिं च षड्‌‌विधाम् ‌‍ ॥ ( भाग . १० . ४५ - ३४ )

सहा प्रकार लघुकथांचे - १ स्वभावप्रधान , २ कथानकप्रधान , ३ तत्त्वप्रधान , ४ लघुतम कथा , ५ रूपक कथा . व ६ स्वैर कथा . असे हे सहा प्रकार प्रचारांत आहेत . ( ल . क . कशा लिहाव्या ? )

सहा प्रकारची वनस्पति - सृष्टि - १ वनस्पति - फुलावांचून फळ येणारे वड , पिंपळ इ ., २ औषधी - एक वार फुलें फळें येऊन नाश पावणारे - केळी , धान्यें इ ., ३ लता - वृक्षाचा आधार लागतो असा , ४ त्वक्‌‍सार - त्वचा कठीण असे वेळू , वगैरे , ५ विरुध् ‌‌- आधाराशिवाय वाढतात अशा आणि ६ द्रुम - फुलें फळें येणारे आंबा इत्यादि वृक्ष .

सहा प्रकारचे विरह - १ प्रांरभ विरह - लग्नच न झाल्यामुळें बायको नाहीं म्हणून , २ क्षणिक विरह - नजरेआड झाल्यामुळें , ३ वाङ्‌‍मयविरह - तंटा - बखेडा होऊन अबोला झाल्यामुळें , ४ परोक्ष विरह - मोहरीं गेल्यामुळें ५ प्रत्यक्ष विरह - बायको आजारी झाल्यामुळें आणि ५ चिरविरह - पत्नी मृत झाल्यामुळें होणारा विरहा ( भावबंधन अंक १ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP