मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ५

संकेत कोश - संख्या ५

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


पंच मूर्खलक्षणें - १ गर्विष्ठ , २ दुरुत्तरें करणें , ३ हट्टी , ४ अप्रिय भाषण करणें व ५ दुसर्‍याचें भलेंबुरें न जाणणें .

मूर्खस्य पंचचिह्लानि गर्वी दुर्वाचनी तथा ।

हठी चाप्रियवादी च परोक्तं नैव मन्यते ॥ ( सु . )

पंचमूत्रें - १ गाय , २ शेळीं , ३ म्हैस , ४ मेंढी व ५ गाढव या पांच प्राण्यांचीं मूत्रें चेतनावर्धक औषधी आहेत .

गोजनिका महिषीणां नूत्रं गर्दभकस्य च ।

पंचमूत्रं कटूष्णस्य शोधनं वृष्यमीरितम् ‌‍ ( शा . नि . )

पंच मोक्षासनें - १ पर्यंक , २ अर्धपर्यंक , ३ वज्र , ४ वीर आणि ५ सुखासन - पद्मासन पूर्वक - कायोत्सर्ग , ( संस्कृतिकोश )

पंचमृत्तिका - १ विटकर , २ गेरू , ३ क्षार मृत्तिका , ४ भस्म आणि ५ वारुळाची माती . या पांचांना पंच मृत्तिका म्हणतात . व त्य पवित्र मानतात . इष्टिका गैरुका लोणं भस्मवलंइकमृत्तिका ।

रसप्रयोगकुशलैः कीर्तिताः पंचमृत्तिकः ॥ ( र . र . समुच्चय १० . ८३ )

पंच मोक्षसाधनें - १ मुद्राधारण , २ त्रिपुंड्र , ३ विष्णुनामें ठेवणें , ४ विष्णुप्रिय माला धारण करणें व ५ ’ ॐ नमो नारायणाय ’ हा मंत्रोपदेश . हीं पांच मोक्षसाधनें रामानुज संप्रदायांत मानलीं आहेत .

पंच यज्ञ - १ स्नान , २ दान ३ तप , ४ होम व ५ पितृयज्ञ ( तर्पण ). हे पांच यज्ञ नित्याचे होत .

पंच योग - ( अ ) १ क्रियायोग , २ मंत्रयोग , ३ ह्ठयोग , ४ नादयोग , आणि ५ राजयोग ; ( आ ) १ मंत्रयोग ; २ स्पर्शयोग , ३ भावयोग , ४ अभावयोग आणि ५ महायोग , ( लिंग . अ . ५५ )

पंच रत्न - १ रामलला नहच्छू , २ पार्वती मंगल , ३ जानकी मंगल ४ वैराग्य सांदीपनी आणि ५ बरवैरामायण . या श्री संत तुलसीदासांच्या ग्रंथास म्हणतात .

पंच रत्नें - ( अ ) १ माणिक , २ नील , ३ पाच , ४ पुष्कराज व ५ हिरा ; ( आ ) १ सोनें , २ रुपें , ३ मोतीं , ४ माणिक आणि ५ पोवळें . हीं सर्व देवांना प्रिय अशीं पांच रत्नें ( विष्णुधमोंत्तर ); ( इ ) १ इंद्रनीलमणी , २ हिरा , ३ माणिक , ४ मोतीं व ५ प्रवाळ .

नीलकं वज्रंक चेति पद्मरागश्च मौक्तिकम् ‌‍ ।

प्रवालं चेति विज्ञेयं पंचरत्नं मनीषिभिः ॥ ( सु . )

पंच रत्नें ( सौराष्टाची )- १ नदी , २ नारी , ३ घोडे , ४ श्री . सोमनाथ आणि ५ द्वारका . ( हरिदर्शन ).

सौराष्ट्रे पंचरत्नानि नदीनारीतुरंगमाः ।

चतुर्थं सोमनाथं च पञ्चमं हरिदर्शनम् ‌‍ ॥ ( केसरी ११ - ६ - १९५१ )

पंचरत्न गीता - १ श्रीभगवद्नीता , २ विष्णुसहस्त्रनाम , ३ भीष्मस्तवराज , ४ अनुस्मृति व ५ गजेंद्रमोक्ष या पांच अध्यात्म ग्रंथांस समुच्चयानें .

पंचरसा - आवळ्याला संस्कृतमध्यें पंचरस हें नांव आहे . हें अत्यंत आरोग्यदायक असून यांत पंचरसांचें मिश्रण असतें . यापासून आयुर्वेदांतील दीर्घायुदायक च्यवनप्राशा हें औषध तयार करतात .

पंचरसी - १ सुवर्ण , २ रुपें , ३ लोह , ४ तांबें व ५ जस्त . या पांच धातूंच्या मिश्रणानें बनविलेली वस्तु ,

पंच राजचिह्रें - १ छत्र , २ चामर , ३ सिंहासन , ४ मुकुट आणि ५ राजदंड .

पंच लवणें - १ सामुद्र , २ सैंधव , ३ संचळ , ४ बिडलोण आणि ५ बांगड्खार .

पंच लक्षणें ( अनन्य भजनाचीं )- १ निरपेक्षता , २ ईशचिंतन , ३ शांति , ४ समदर्शन व ५ निर्वैर . ( ए . भा . १४ - १६२ ते १८५ )

पंच लक्षणें ( धश्चोटाचीं )- १ सामान्य मनुष्याच्या दुपटीनें आहार , २ वेळीं अवेळीं झोपणें . ३ अति विषयलंपट , ४ मान आणि ५ अपमान . या दोहोंबद्दल सारखाच बेफिकीर .

आहारं द्विगुणं प्रोक्तं शय्या च कुचचर्दनम् ‌‍ ।

नास्ति मानापमानं च धश्चोंट पंचलक्षणम् ‌‍ ॥ ( सु . )

पंच लक्षणें ( पुराणांचीं )- १ सर्ग - उत्पत्ति , २ प्रतिसर्ग - संहार , ३ पुनरुत्पत्ति , ४ मन्वन्तर ( वेगवेगळ्या मनूच्या कालांतील कथा ) आणि ५ वंशानुचरित . ( सूर्यचंद्रवंशीय राजांच्या कथा . )

सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वत्नराणि च ।

वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम् ‌‍ ॥ ( सु . )

पंच लक्षणें ( पुरुषाचीं )- १ सत्पात्रीं त्याग , २ गुणाचा प्रेमी , ३ बंधुवर्गास समान भाग देणारा , ४ शात्र जाणणारा आणि ५ पराक्रमी .

पात्रे त्यागी गुणे रागी संविभागी च बंधुषु ।

शास्त्रे बोद्धा रणे योद्धा पुरुषः पंचलक्षणः ॥ ( सु . )

पंच लक्षणें व्याख्यानाचीं - १ पदांचा च्छेद करणें , २ अर्थ सांगणें , ३ समासांचा विग्रह करणें , ४ वाक्यांची अन्वयद्वारा योजना करणें आणि ४ आक्षेपांचे समाधान . " आक्षेपस्य समाधानं व्याख्यानं पंचलक्षणम् ‌‍ । " ( पंचदशी )

पंच लक्षणें ( श्रेष्ठत्वाचीं - १ निष्काम , २ मननशील , ३ शमदमसंपन्न ४ अद्वेष्टा व ५ समद्दष्टि . निरपेक्षं मुनिं शान्तं विवैंरं समदर्शिनम् ‌‍ । ( भाग . ११ - १४ - १६ )

पंच लहरी - १ गंगालहरी , २ पीयूषलहरी , ३ सुधालहरी , ४ अमृतलहरी व ५ करुणालहरी . या जगन्नाथपंडितकृत पंचकाव्यांना म्हणतात . ( आपटे कोश )

पंच ’ ल ’ कार संपन्न स्त्री भाग्यानेंच मिळतें - १ अनुकूल , २ निर्मल . ३ कुलीन , ४ कुशल आणि ५ सुशील .

अनुकूलां विमलागीं कुलजां कुशलां सुशीलसंपन्नां ।

पंच ’ ल ’ कारां भार्यां पुरुषः पुण्योदयाल्लभते ॥ ( सु . )

पंच लावण्यें स्त्रीजीवनांतील - १ निद्रासौंदर्य , २ स्ननसौंदर्य , ३ मानसौंदर्य , ४ रागसौंदर्य आणि ५ अनुरागसौंदर्य . हीं स्त्रीजीवनांतील पांच प्रकारचीं लावण्यें होत .

पंच लोह - १ कांसें , २ पितळ , ३ तांबें , ४ शिसें व ५ कथील . हे पांच धातु एकत्र केल्यानें तयार होणारा धातु . ( आयुर्वेद )

पंच ’ व ’ कार - १ विद्या , २ वपु , ३ वाचा , ४ वस्त्र आणि ५ विभव . हे पांच ’ व ’ कार मनुष्याला वैभव प्राप्त करून देणारे आहेत .

" वका रेः पञ्चमिहींनो नरो नाप्नोति गौरवम् ‌‍ ॥ ( सु . )

पंच वह्लि - १ प्रलयानल , २ विद्युदानल , ३ वडवानल , ४ शिवनेत्रानल व ५ द्वादशादित्यरूपानल . असे पांच अग्नि . ( हंस कोश )

पंच वक्त्र - वदन - शिवाचीं पांच मुखें १ सद्योजात , २ तत्पुरुष , ३ अघोर , ४ वामदेव व ५ ईशान .

पंच वल्कलें - ( अ ) १ अश्वत्थ , २ अंजीर ( न्यग्रोध ), ३ उंबर , ४ पिंपरी आणि ५ वेतस यांच्या साली . यांना पंच वल्कलें म्हणतात ;

( आ ) १ वड , २ उबंर , ३ पिंपळ . ४ पासेरस आणि ५ नांदुखीं किंवा वेतस .

पंच वर्ज्य नामें - १ आत्मनाम , २ गुरुनाम , ३ कृपणनाम , ४ ज्येष्ठापत्यनाम व ५ पत्नीनाम . ज्याला पुष्कळ जगण्याची इच्छा असेल त्यानें या पांचांस नांवानें संबोधूं नये . सौमाग्यवतीनें पतीचें नांव घेऊं नये हें अनुमेय समजावें .

पंच वज्रनिवारक - १ सुमन्तु , २ वैशंपायन , ३ पुलस्त्य , ४ पुलह आणि ५ जैमिनी . ( प्रा . च . को . )

पंचवर्ण - १ तांबडा वर्ण - रेडइंडियन्स , २ पांढरा - युरोपियन , ३ काळा - शिद्दी , ४ पिवळा - चिनी - जपानी व ५ सांवळा - भारतीय अशी पांच वर्णोंची प्रजा जगांत आहे . ( महाराष्ट्रांत विनोबा . भाग २ रा )

पंच वाचा - १ वैखरी , २ मध्यमा , ३ पश्यन्ती , ४ परा आणि ५ अनिर्वाचा . ( सि . वो . ३४ - ३७ )

पंच वार्तिक - महानुभवावी व्याकरण गुंथ . यांत - १ सूत्रलक्षन , २ सूत्रप्रकृतिलक्षण , ३ सूत्रकारकलक्षण , ४ सूत्रव्याख्यानलक्षण व ५ सूत्रस्वरूपलक्षण . अशीं पांच प्रकरणें असल्यामुळें म्हणतात . ( म . शब्दकोश )

पंच वाद्यें - १ तंतिवीणा , २ वितंत , ३ मृदंग , ४ घनकांस्य व ५ अनाहत वेणुनाद . अशीं पांच वाद्यें आणि त्यांचे नाद आहेत .

पंच वानरशार्दूल - १ ऋषभ , २ शरम , ३ नीळ . ४ गवाक्ष व ५ गवय . हे पांच रामरावणयुद्धांतील प्रमुख वानरवीर .

पांचही वीर संग्रामशीळ । ऋषभ शरम आणि नीळ ।

गवाक्ष गवय अतिप्रवळ । वीरशार्दूल संग्रामीं ॥ ( भा . रा . युद्ध २६ - ३१ )

पंचवायु - १ श्वासवायु , २ गुल्फवायु , ३ स्थिरवायु , ४ चिन्मयवायु व ५ निवांतवायु . ( तत्त्व - निज - विवेक )

पंचविनायक - १ मोद , २ प्रमोद , ३ दुर्मुख , ४ सुमुख आणि ५ गणनायक . पूजा करा भावेंसी । मोदारि पंचविनायका ॥ ( गुरु . च . ४१ - १८४ )

पंचविषय - १ रूप , २ रस , ३ गंध , ४ स्पर्श आणि ५ शब्द . हे पंच ज्ञानेंद्रियानें जाणले जणारे पांच विषय होत .

पंच विषय गीताशास्त्राचे - ( अ ) १ ज्ञान , २ कर्म , ३ भक्ति , ४ योग आणि ५ संन्यास . ( आ ) १ ईश्वर , २ जीव , ३ जगत् ‌‍ , ४ धर्म आणि ५ तत्त्व . " ईशो जीवो अगत् ‌‍ धर्मस्तत्त्वमिति पंचविषया यत्र निर्णीयते तच्छास्त्रम् ‌‍ "

पंचविनय - १ दर्शनविनय , २ ज्ञानविनय , ३ चारित्रविनय , ४ तपोविनय व ५ उपचारविनय ( रत्नकरंडक श्रावकाचार )

पंचवीर - १ त्यागवीर , २ दयावीर , ३ विद्यावीर , ४ पराक्रमवीर व ५ धर्मवीर अशी पांचहि प्रकारची वीरतासंपन्न , वेदमर्यादापालन संरक्षण करणारे म्हणून मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र होते . संत तुळसीदासांनी " रामचरित मानसांत " आणखी एक सहावा प्रकार ’ ऋजुतावीर ’ म्हणूउन वर्णिला आहे .

पञ्चवीराः समाख्याता राम एव तु पञ्चधा ।

रघुवीर इति ख्यातः सर्ववीरोपलक्षणः ॥ ( सु , )

पंच वीरांगना - १ कैकेयी , २ संयोगिता . ३ दुर्गावती , ४ कर्मदेवी आणि ५ झांशीची राणी लक्ष्मीबाई . ( कल्याण नारी अंक )

पंचवृत्ति ( भूमिका )- १ क्षिप्त , २ मूढ , ३ विक्षिप्त , ४ एकाग्र आणि ५ निरुद्ध . ( मानसशास्त्र )

पंच वृष्णीवीर - १ श्रीकृष्ण , २ संकर्षण , ३ प्रद्युम्न , ४ अनिरुद्ध आणि ५ सांब ( अशोक ते कालिदास )

पंचव्रीहि - १ तीळ , २ उडीद , ३ मूग , ४ सांवे व ५ साळी . हीं पांच व्रीहि ( धान्यें ) होत . हा सर्व अरिष्टांचा नाश करणारा धान्यगण म्हणून सांगितला आहे .

तिलाश्च माषामुद्नाश्च श्यामकः शालयः स्मृताः ।

पञ्च धान्यगणः प्रोक्तः सर्वारिष्टनिषूदनः ॥ ( भ . म . ६ - २८ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP