मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ३॥

संकेत कोश - संख्या ३॥

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


औट - म्हणजे साडेतीन .

साडेतीन पीठें - १ तुळजापूरची भवानी , २ मातापुरची रेणुका , ३ जोगाईच्या आंब्याची योगेश्वरी आणि १ - २ कोल्हापूरची लक्ष्मी हीं देवीचीं साडेतीन पीठें मानिलीं आहेत .

साडेतीन् ‌‍ मुहूर्त - १ वर्षप्रतिपदा , २ अक्षय्यतृतीया , ३ विजया - दशमी हे तीन पूर्ण व बलिप्रतिपदा हा अर्धा .

साडेतीन वाद्यें - १ वीणा , २ पखवाज , ३ बांसरी आणि १ - २ मंजिरी मिळून साडेतीन वाद्यें .

साडेतीन शहाणे ( पेशवाईंतील )- १ सखारामबापू बोकील , २ देवाजीपंत चोरघडे , ३ विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस अर्धा शहाण . हे साडेतीन शहाणे मराठयांच्या इतिहासांत प्रसिद्ध आहेत .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP