मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ३

संकेत कोश - संख्या ३

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


तीन अवस्था नृत्यकलेच्या - १ लयतालमूलक , २ भावमूलक , आणि ३ रसमूलक . या तिन्ही प्रकारांचा परस्पर सहयोग म्हणजे नाट्य

( नवयुग दि . अंक )

तीन अवस्था ( जीवनाच्या )- १ पुत्र , २ पति आणि ३ पिता .

तीन अवस्था ( स्त्रीजीवनाच्या )- १ कन्या , २ कांता व ३ माता .

तीन अवस्था ( प्रेमाच्या )- १ पूर्वराग ( गुण ऐकून अथवा चित्र वगैरे पाहून उत्पन्न होणारें प्रारंभिक प्रेम ), २ मीलन आणि ३ वियोग . ( कल्याण योगांक ६२ )

तीन अवस्था ( बाल्यदशेच्या )- १ कौमार ( एक ते पांच वर्षे ), २ पौगंड ( सहा ते दहा वर्षें ) आणि ३ कैशोर ( दहा ते पंधरा वर्षें ) अशा बाल्यदशेच्या तीन अवस्था असतात .

कौमारं पञ्चमाब्दान्तं पौगण्डं दशमावधि ।

कैशोरमापंचदशाद्यौवनं तु तत : परम् ‌‍ ॥ ( भाषा . स्कंध १० अ . १२ तळटीप )

तीन अवस्था मानवी जीवनांतील - १ संकल्प २ साधना व ३ सिद्धि .

तीन अवस्था ( सृष्टींतील पदार्थोच्या )- १ घनरूप , २ द्ववरूप आणि ३ वायुरूप . यच्चावत् ‌‍ सृष्टींतील सर्व पदार्थांच्या या तीन अवस्था असतात .

तीन अर्थ - १ वाच्यार्थ , २ लक्ष्यार्थ आणि ३ व्यंग्यार्थ असे तीन प्रकारचे अर्थ एकाच शब्दापासून बोधित होतात , असें अलंकारशास्त्रांत मानलें आहे .

तीन अमावास्या - १ आषाढ वद्य अमावास्या ( दीपपूजा ), २ श्रावण वद्य ( पिठोरी ) आणि ३ भाद्रपद वद्य : ( सर्वपित्री ) या तीन अमावास्या विशेष प्रसिद्ध आहेत .

तीन अवतार ( वायुदेवतेचे )- १ श्रीहनुमान , २ भीमसेन व ३ पूर्णप्रज्ञ ( श्रीमध्वाचार्य . )

प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च ।

पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधक : ॥ ( वायुस्तुति - फ्लश्रुति )

तीन अश्रु - १ आनंदाश्रु , २ दु : खाश्रु आणि ३ नक्राश्रु .

तीन अक्षरी मंत्र - ( १ ) श्रीराम , ( २ ). ॐ हा , अ , उ , म् ‌ हीं तीन अक्षरें मिळून झाला आहे . " ॐ कार । वेदांतासी आधार । हा राज - राजेश्वर । अवघ्या मंत्रविद्येचा " ( शंकराचार्य चरित्र अ ३१ - १०० ). अ ( सत्त्व ), उ ( र्ज ), म् ‌‍ ( तम ), अर्घमात्रा हें शिवाचें स्वरूप . ( हें वर्णत्रय म्हणजे या त्रिगुणाचें निदर्शक सक्तिस्वरूप होय . ( ३ ) ’ ॐ गम् ‌‍ ’ हा एक महान् ‌‍ बीज मंत्र . वैदिक कालीं सीमा प्रदेश ओलांडणार्‍या आक्रमकांशीं लढत असतांना याच मंत्राचा उद्‌‍घोष करीत असत . ( रोहिणी जून १९६३ ) ( ४ )" ॐ तत् ‌‍ सत् ‌‍ " हीं ब्रह्म वाचक तीन अक्षरें आहेत अथवा जगाचे उप्पत्तिस्थान आणि विश्रांतिस्थान , नाम - जति - रहित , आरंमरहित अशा परब्रह्मासच ॐ तत् ‌‍ सत् ‌‍ हें नांव आहे . ( प्रसाद ऑगस्ट १९६३ )

तीन अक्षरांत तीन गोष्टींचें प्रतिनिधत्व - १ भ - र - त , भ - भाव ( भावाविष्कार ) २ र - राग ( रागाविष्कार ) ३ त - ताल ( प्रमाणबद्धता )

( नवयुग दि . अंक १९५५ )

तीन अलंकार - १ शब्दालंकार , २ अर्थालंकार व ३ उभयालंकार हे मुख्य तीन . यांत वाकीचे सर्व प्रकार येतात . अलंकारांची संख्य़ा ६८ आहे . ( म . शब्द कोश )

तीन अवतारांचीं तीन मूल्यें - श्रीराम - सत्य , श्रीकृष्ण - प्रेम व श्रीगौतमबुद्ध - करुणा . ( महाराष्ट्रांत विनोवा )

तीन आदर्श ( स्त्रियांचे )- १ सती , २ सीता आणि ३ सावित्री .

तीन आदर्श पातिव्रता - १ अनसूया , २ द्रौपदी व ३ दमयंती . अनसूया द्रुपदात्मजा दमयन्ती दुख - लीन । निजसतीत्वके तेजसे चमक उठी ये तीन । ( कल्याण - हिंदुसंस्कृति अंक )

तीन आद्य महाकवि - १ ब्रह्मा , २ वाल्मीकि व ३ व्यास .

तीन आधार धर्माचे ( वैदिक )- ( अ ) १ यज्ञ , २ अध्ययन व ३ दान . त्रयो धर्मस्कंधा यज्ञोऽघ्ययनं दानमिति ( छं . उप . २ - २३ - १ ) ( आ ) १ श्रुति , २ स्मृति व ३ पुराणें हे तीन आधार धर्मशास्त्रांत मानतात . म्हणून कोणत्याहि कर्माचे आरंमीं ’ श्रुतिस्मृतिपुराणोक्त " असा संकल्प म्हटला जातो .

तीन आघारस्तंभ शरिराचे - १ आहार , २ निद्रा व ३ ब्रह्नचर्य . या तिन्हींच्या उचित उपयोगावर शरिरांत बल , वर्ण व आयुष्य यांची वृद्धि होते . ( चरक . सूत्रस्थान अ . ११ ).

तीन आनंद ( वेदांत )- १ ब्रह्मानंद , २ वासनानंद व ३ विषयानंद . ( पंचदशी ११ - ८७ )

तीन आविर्भाव एकमात्र महाजीवनाचे - १ जन्म , २ मृत्यु आणि ३ पुनर्जन्म . ( धवलगिरि )

तीन उपदेशपद्भति ( वाङमयांत )- ( अ ) १ वेद - प्रभुसंमित उपदेश - जा . २ पुराणें - मित्रसंमित उपदेश - जायला पाहिजे . ३ दासबोध - कांतासंमित उपदेश - जायचें ना ? ( आ ) १ प्रभुवाक्य -( स्वत : प्रमाण ) २ मित्रवाक्य ( परत : प्रमाण ) व ३ कांतावाक्य ( प्रमाण - अप्रमाणाचा प्रश्न नाहीं . )

तीन उपमाता - १ दाई , २ पालन करणारी मातेशिवाय दुसरी बाई आणि ३ सावत्र आई .

तीन उपाय मोक्ष प्राप्तीचे - १ वैराग्य , २ आत्मज्ञान आणि ३ भाक्ति , ( प्रवोधसुधाकर )

तीन एषणा ( इच्छा )- ( अ ) १ पुत्रैषणा , २ वित्तैषणा आणि ३ लोकैषणा . ( आ ) १ पाणेषणा , धनेषणा व परलोकेषणा या तीन ईषणा सफल करण्याचें मानवी जीवनाचें उद्दिष्ट असतें ( चरक सूत्रस्थान ) ( इ ) १ आहारसंज्ञा , २ परिग्रहसंज्ञा व ३ मैथुनसंज्ञा ( जैन दर्शन )

( ई ) १ भवतृष्णा , २ विभवतृष्णा व ३ कामतृष्णा ( बौद्धदर्शन ) ( उ ) १ इज्जत , २ दौलत व ३ हुकुमत ( फारशी ) ( ऊ ) १ वाईन २ वेल्थ व ३ वुइमेन ( इंग्रजी ) ( ए ) १ आहारेच्छा , २ धनेच्छा व ३ रतीच्छा ( देवी भागवत ).

तीन ऋतु - १ उन्हाळा . २ पावसाळा व ३ हिंवाळा .

तीन ऋणें - ( अ ) १ देवऋण , २ ऋषिऋण आणि ३ पितृऋण . मनुष्य जन्मास येतो तो हीं तीन ऋणें घेऊन येतो . तीं यज्ञ , स्वाध्याय व पुत्रोत्पादन इत्यादींनीं फेडावयाचीं असतात . ’ ब्रह्मचर्येण ऋषिभ्यो यज्ञेन देवेभ्य : प्रजया पितृभ्य : ’ ( वै . संहिता ). चवथें समाजऋण ( भक्तिरसायन ) ( आ ) १ मातृऋण , २ पितृऋण व ३ पत्नीऋण -( श्रीरामकृष्ण ).

तीन ऐकांतिक भक्तश्रेष्ठ - १ विवस्वत् ‌‍ २ मनु आणि ३ इक्ष्वाकु या तिघांना ऐकांतिक भक्तीचें गुह्म ज्ञान नारायणानें सांगितलें ( भ . गी . ४ - १ )

तीन ’ क ’ कार - १ . कनक २ . कांता आणि ३ कादम्बरी हे तीन क कार प्रभावी आहेत .

तीन ललितकला - १ नर्तन २ गायन , आणि ३ बादन . ’ नृत्यं गीतं च वाद्यं च त्रयं ललितमुच्यते ’ ( भ . ना . )

तीन कर्मोनीं पुत्रधर्माची सार्थकता - असेतोंपर्येत मातापित्याचें आज्ञापालन २ कालतिथीस त्यांचे स्मृतीप्रीत्यर्थ अन्नदान व ३ गयेस पिंडदान .

जीवतो वाक्यकरणात् ‌‍ क्षयाहे भूरिभोजनातू ।

गयायां पिण्डदानाच्च त्रिमि : पुत्रस्य पुत्रता ॥

( देवी ६ - ४ - १५ )

तीन कारणें कर्म घाडण्याचीं - १ उपादान कारण , २ निमित्तकारण आणि ३ मूलकारण ( वेदान्त )

तीन काळ - ( अ ) १ सकाळ , २ दुपार आणि ३ संध्याकाळ . ( कालविभाग ); ( आ ) १ भूतकाळ , २ वर्तमानकाळ आणि ३ भविष्यकाळ .

तीन कायित ( शारीरिक ) पापें - ( अ ) १ दिल्याविना एखादी वस्तु घेणें , २ निषिद्ध हिंसा आणि ३ परस्त्रीसंगम हीं तीन शारीरिक पापें होत . ( आ ) १ हत्या , २ चौर्य व ३ परदारागमन .

अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानत : ।

परदारोपसेवा च कायिकं त्रिविधं स्मृतम् ‌‍ ॥

( मनु - १२ - ७ )

तीन किरणयुक्त अथवा प्रकाशमान देव - १ अग्नि , २ वायु आणि ३ सूर्य . ( अथर्व अनु - मराठी )

तीन क्रिया ( प्राणायामाच्या )- १ पूरक - श्वास आंत घेणें , २ कुंभक - श्वास स्थिर करणें व ३ रेचक - श्वास बाहेर सोडणें या तीन क्रियांनीं प्राणायाम पूर्ण होतो .

तीन काळचीं तीन नांवें ( गायत्रीचीं )- १ गायत्री , २ सावित्री आणि ६ सरस्वती .

गायत्रीनाम पूर्वाह्ले सावित्री माध्यमे दिने ।

सरस्वती च सायाह्ले एवं सन्ध्या त्रिधा स्मृता ॥

( वेदव्यास श्रुति )

तीन ’ ग ’ कार - १ गणक , २ गणिका आणि ३ गणिती .

तीन गण - १ देवगण , २ मनुष्यगण आणि ३ राक्षसगण अशा मनुष्याच्या तीन कोटी , प्रकार अथवा गण आहेत . ( कुंडली )

तीन गति ( द्रव्याच्या )- १ दान , २ भोग आणि ३ नाश . या तीन प्रकारांनीं द्रव्याचा विनियोग होतो .

दानं भोगो नाशस्तिस्त्रो गतयो भवन्ति वित्तस्य ।

( भर्तृ . नीति . ४३ )

तीन गति नाडीच्या - १ वक्र , २ त्वरित व ३ स्थिर ( नाडीविज्ञान )

तीन गया - १ मातृगया ( सिद्धपूर - गुजराथ ), २ पितृगया ( गया - बिहार ) व ३ शिवगया - काशी ( काशीखंड )

तीन गुण - १ सत्त्वगुण , २ रजोगुण आणि ३ तमोगुण . ’ सत्त्वं रजस्तमश्चेति प्रसिद्धं हि गुणत्रयम् ‌‍ ’ ( रा . गी . ११ - ३ ). जगांत जें जें आहे तें तें सर्व या तीन गुणांनीं व्याप्त आहे . त्रिविधिस्त्रिविध : कृत्स्न : संसार : सार्वभौतिक :

( मनु . १२ - ५१ )

तीन गुण - ( काव्याचे )- १ उपमा , २ अर्थगौरव आणि ३ पदलालित्य . असा तीनहि गुणसंपन्न संस्कृतवाङ्‌मयांत माघ कवि होऊन गेला . " उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम् ‌‍ दण्डिन : पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणा : " ( सु . )

तीन गुण ( वाङ् ‍ मयांतले )- १ माधुर्य , २ ओज व ३ प्रसाद .

तीन गुण मायेचे - १ उत्पत्ति २ पालन आणि ३ संहार . मायाके गुण तीन है । उत्पत्ति पालन संहार ॥ ( कबीर ),

तीन गुण स्त्रीचें मूल्य वाढविणारे - १ रूप ; २ शील आणि ३ स्वभाव . ( योगीश्वर याज्ञवल्वय )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP