श्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ८

श्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .


भगवान् शंकर पुढे सांगू लागले , की हे पार्वती , भीमेच्या तीरावर संकटातून मुक्त करणारे दुर्गातीर्थ आहे . त्याच्या पूर्वदिशेस महाकालेश्वराजवळच कालरुप हे तीर्थ आहे . उज्जयिनी प्रमाणेच येथील स्नानाचे माहात्म्य आहे . श्री नृसिंहासमोरच भीमा तीरावर महानादेश्वराचे मंदिर आहे . दुर्गातीर्थावर विमलेश्वर हे शिवमंदिर आहे . येथील महिमा काशीविश्वेश्वराएवढा आहे . हा सर्व परिसर शिवप्रतीकांनी आणि प्रभावाने भारलेला आहे . याच्या जवळच गोकर्ण महाबळेश्वराप्रमाणे असणारे कोटितीर्थ आहे . याच्या परिसरात कितीतरी शिवतीर्थे आहेत . ही तीर्थे , तेजस्तीर्थ , कालांजन , त्रिदंडकतीर्थ आणि छालगंड या नावाने प्रसिद्ध आहेत . या सर्व तीर्थांमध्ये भगवान शंकर विविध रुपात विराजमान आहे . या नीरानरसिंहपूर्त क्षेत्रातील श्रीनृसिंहाच्या दर्शनासाठी गंगेचे ठायी असनारा जयंत , पुरुक्षेत्राहून संहत , गाकर्णाजवळील सौम्य क्षेत्रातील कुक्कुटनाथ , येथे येऊन राहिले आहेत . या भीमानीरा संगमात ब्रह्मावर्ताहून देवराट् ‌, प्रभासपहणाहून सोमनाथ , गयेतील फल्गुतीर्थातील धर्मेश , वामेश्वर येथील जटादेव , हरिश्चंद्र क्षेत्रातील हरिहरेश्वर , वृषध्वज क्षेत्रातील वृषेश , वात्सनापथातील भव , भद्रकर्ण , येथील शिव , धर्मलिंग येथील हरिश्वर हे आले आहेत . तसेच नेपाळातून पशुपती , दारुका क्षेत्रातील , दंडधारी , कनखलाहून उग्र , रुदालयाहून रुद्र , केदाराहून गर्भेश , सुवर्णतीर्थाहून सहस्त्रनेत्र असलेला ईशान , सर्वमेध्य येथून सर्वेश व श्रीशैल्य येथून त्रिपुरांतक येऊन या तीर्थामध्ये वास करीत आहेत . जालेश्वराहून त्रिशूळी , काश्मीरातून विजयेश्वर , आम्लातकाहून सूक्ष्मेश , मरुजांगलाहून चंडेश , हे आले आहेत . रुद्रकोटाहून महायोगी , प्रयागहून शूलटंक , महेद्रक्षेत्राहून महाव्रत , मरुकोटाहून महोत्कट , पुष्कर येथून अयोगीश , कोल्हापुरातील कपालधारी , माहेश्वर येथून दीप्तिनाथ , आणि भूतेश येथून भस्मगात्रवान , हे आले आहेत . गंगासागराहून अमरेश , विंध्याहून धरणीवाराह , कैलासाहून गणनायक , हेमकूटातील विरुपाक्ष , पातालनिवासी हाटकेश्वर , किरातक्षेत्राहून किरातेश , जललिंगयेथून जलेश्वर , या शिवदेवता येथे अवतीर्ण झाल्या आहेत . वडवाग्नीतून अनलेश्वर , अमरकंटकाहून ओंकारेश्वर , देवकाय येथून उमानाथ , विरजस्कक्षेत्राहून स्वयंभू , लकुलीकाहून परोहत , नकुलेश क्षेत्राहून स्वयंभू , लकुलीकाहून परोहत , हे सर्व येथे आले आहेत . सप्तगोदावरी तीथाहून भीमेश्वर , कर्णिकार येथून गुणाध्यक्ष , त्रागताहून गदादरेश्वर , गंधमादनाहून भूर्भुवःस्वपती , तसेच काशीहून श्री विश्वेश , हे सर्व देव , साक्षात् ‌ कल्पवृक्षच असलेल्या या श्रीनरहरीच्या दर्शनार्थ येऊन राहिले आहेत . या सर्वांचे सविस्तर वर्णन , हे पार्वती , करणे मलाही शक्य होणार नाही .

याभगवान नरहरीच्या परिसरात असणार्‍या तीर्थांत स्नानदानादि कर्मे केल्याने किती जीवांचा उद्धार झाला , हे , पार्वती , मलाही सांगता येणार नाही . दक्षिणवाहिनी अशा या भीमेचे माहात्म्य नारदांनी वर्णन केले आहे . पूर्वी तीर्थयात्रा करण्यासाठी विश्वमित्र , अगस्ती , कण्व , देवल यासारखे ऋषी शिष्यांसह संचार करीत होते . प्रवासाने ते अगदी दमूल गेले त्यांना समाधान वाटेना . सर्वात श्रेष्ठ तीर्थ कोणते , प्रवासाने ते अगदी दमून गेले त्यांना समाधान वाटेना . सर्वात श्रेष्ठ तीर्थ कोणते , याविषयी त्यांच्यात चर्चा सुरु झाली . काशी , अवंती , अशा तीर्थांचे वर्णन काहीनी केले , पण निर्णय होईना . या सर्वात वसिष्ठ काहीच बोलत नव्हते . इतर ऋषींनी त्यांना या मौन राहाण्याचे कारण विचारले . वसिष्ठ म्हणाले की , या वादाचा निर्णय परमभक्त नारदावाचून कोणी करुं शकणार नाही . ते ऐकून ऋषी म्हणाले , नारदमुनी आहेत तरी कुठे ? कोणत्या तीर्थात ते असावेत ? अंतर्ज्ञानाने त्या ऋषींनी पाहिले तेव्हा नारद भीमातरी असल्याचे त्यांना कळले . सर्व ऋषी नंतर त्यांच्याकडे आले . नारद त्यावेळी ध्यानमग्न होते . ते नृसिंहाचे ध्यान करीत होते . शुभ्रवेष धारण केलेल्या त्या ध्यानस्थ नारदांना सर्वांनी वंदन केले . आपल्या मनातील प्रश्न मोठ्या उत्सुकतेने त्यांनी नारदांनी विचारुन आपले क्लेश व अज्ञान दूर करण्याची विनंती केली . नारद म्हणाले की , आपली मते व अभिमान बाजूस ठेवाल तर तुमची शंका मी निश्चितपणे दूर करु शकेन , आपणास येथील वृतांत मी सांगतो .

या पवित्र क्षेत्रात , भगवान शंकर व श्रीविष्णु एकरुप होऊन वास्तव्य करीत आहेत . ब्रह्मदेवानेच हे आम्हा पुत्रांना कल्याणार्थ सांगितले आहे . सर्व तीर्थक्षेत्रे येथे श्री नृसिंहदर्शनासाठी येतात . चारी मुक्ती या नृसिंहदर्शनाने साध्य होतात . याकरिता पित्याच्या आज्ञेने मी हरिहरांच्या या एकात्मरुपाचे ध्यान करीत राहात आहे . येथे दक्षिणवाहिनी भीमा आहे . ती शिव स्वरुप तर नीरा प्रत्यक्ष नृसिंहरुप आहे . त्यांचा हा पावन संगम असून येथे ऐहिक व पारमार्थिक कल्याण साध्य होते . गुप्तधन हाती यावे त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने हे परम गुह्य प्रगट केले आहे . नारदांचे हे बोलणे ऐकून , हे पार्वती , ते सर्व ऋषी या क्षेत्रात राहू लागले ; आणि अखेर नृसिंह स्वरुपात लीन झाले . कालांतराने त्या ध्यानमग्न ऋषींनी दिसले की , सर्व तीर्थे या संगमावर श्रीनृसिंहाचे पूजन करीत आहेत . पूजा झाल्यावर , सायंकाळी घरी परतणार्‍या पक्ष्यांप्रमाणे ही तीर्थे आपल्या ठिकाणी गेली . प्रतिदिवशी तिन्ही वेळां ही तीर्थे दर्शनार्थ येथे येत असतात . यामुळे आश्चर्यमुग्ध झालेले ऋषी या क्षेत्रांचे गुणगान करीत स्वस्थानी परत निघाले .

याप्रमाणे ‘भीमतील तीर्थ वर्णन ’ हा आठवा अध्याय पूर्ण झाला .

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP