ग्रहलाघव - श्रृंगोन्नत्यधिकार

ज्योतिषशास्त्राविना हिंदू धर्मियांचे कार्य एक क्षणसुद्धा चालू शकत नाही .


चंद्राच्या श्रृंगोन्नतीचा काल .

मासस्य प्रथमेऽन्तिमेऽथवांऽघ्रौ विधुश़ृङ्गोन्नतिरीक्ष्यते यदह्नि ॥

तपनास्तमयोदयेऽवगम्यास्तिथयः सावयवाः क्रमाद्रतैष्याः ॥१॥

अर्थ -

प्रत्येक महिन्याच्या शुद्ध प्रतिपदे पासून शुद्ध अष्टमी पर्यंत किंवा कृष्णपक्षाच्या अष्टमी पासून अमावास्येपर्यंत श्रृंगोन्नति पाहावी . नंतर शुद्धपक्षीं ज्यादिवशीं श्रृंगोन्नति पाहाणें असेल त्यादिवशीं सायंकाली रवि , चंद्र , राहु आणि शुद्ध प्रतिपदेपासून एकंदर गततिथि आणाव्या आणि कृष्णपक्षीं श्रृंगोन्नति पाहाणें असल्यास अभीष्ट दिवशीं सूर्योदयीं रवि , चंद्र , राहु आणि एष्य तिथि आणाव्या .

उदाहरण .

शके १५३२ ज्येष्ठ शुद्ध ५ गुरूवार तें दिवशीं चंद्राच्या श्रृंगोन्नतीचें साधन . अहर्गण ८०२३ , प्रातःकालीन मध्यमरवि १ रा . १६अं . ३३क . ५४ वि . चंद्र ३ रा . ९अं . ३३क . ११वि . उच्च ७ रा . २४अं . ५७क . ४८विक . राहु २ रा . २२अं . २४ कला २३ विक . रविमंद केंद्र १ रा . १अं . २६क . ६वि ., मंदफल धन १अं . ८क . २२वि . मंदस्पष्टरवि १ रा . १७अं . ४२क . १६वि ., अयनांश १८ , ८क . चरऋण १०६वि . स्पष्टरवि १ रा . १७अं . ४०क . ३७वि . स्पष्टगति ५७ कला २० विक .; त्रिफलचंद्र ३रा . ९अं . १ क . २विक ., मंदकेंद्र ४ रा . १५अं . ५६क . २०विक . मंदफलधन ३अं . २९क . २१वि . स्पष्टचंद्र ३रा . १२ अंश ३० क . ४९ वि ., स्पष्टगति ८३७क . १ वि .; दिनमान ३३ घ . ३२प . या घटिकांचे चालन देऊन आणलेलें सायंकालीन ग्रह रवि १ रा . १८अं . १२क . ३२वि ., चंद्र ३ रा . १९अं . ४९क . २वि ., राहु २ रा . २२अं . २२क . ३७ विकला सायंकालीं गततिथि ५ घ . ७प .

गतैष्यसावयवतिथि आणि पंचांगस्थ रवि यांपासून चंद्रसाधन .

रविहततिथयोंऽशास्तद्वियुग्युक्क्रमेण

द्युमणिरपरपूर्वे मासपादे विधुः स्यात् ॥ऽऽ॥

अर्थ -

तिथींस १२ नीं गुणून गुणाकार अंशादि येईल तो श्रृंगोन्नतिकृष्णपक्षीं आहे तर रवींत वजा करावा आणि शुक्लपक्षी आहेतर रवींत मिळवावा म्हणजे चंद्र होतो .

उदाहरण .

सावयवतिथि ५ घ . ७प . २०१२ =६१अं . २८क . ०विक . श्रृंगोन्नति शुक्लपक्षीं आहे म्हणून रवि १ रा . १८अं . १२क . ३२विक .+६१अं . २८क . = ३ रा . १९अं . ४०क . ३२ विकला हा चंद्र झाला .

वलन आणि सित यांचे साधन .

नृपगुणतिथिरूना सवघ्नतिथ्याऽक्षभाघ्नी शरकुत्ददृदगाशा संस्कृताऽर्कापमांशैः ॥२॥

चन्द्रस्य च व्यस्तशरापमांशैर्द्विनिघ्नतिथ्या वित्दृताऽङ्गुलाद्यम् ॥

संस्कारदिक्कं वलनं स्फुटं स्यात् स्वेष्वंशहीनास्तिथयः सितं स्यात् ॥३॥

अर्थ -

तिथींस १६ नीं गुणून जो गुणाकार येईल त्यांतून तिथींचा वर्ग वजा करावा ; बाकी राहील तिला पलभेनें गुणून त्या गुणाकारास १५ नीं भागावें आणि अंशादि भागाकार उत्तर असें समजून त्याचा व सूर्याच्या क्रांतीचा संस्कार करावा म्हणजे संस्काराचे दिशेचा स्पष्ट भागाकार होतो . नंतर चंद्राची स्पष्ट क्रांति करून ती दक्षिण तर उत्तर आणि उत्तर असेल तर दक्षिण असें मानून तिचा आणि स्पष्ट भागाकाराचा संस्कार करावा . व त्या संस्कारास तिथींस २ नीं गुणून जो गुणाकार येईल त्यानें भागावें म्हणजे अंगुलादि वलन होते तें संस्कार दक्षिण आहे तर दक्षिण आणि उत्तर आहे तर उत्तर असें जाणावें . तिथींस ४ नीं गुणून ५ नीं भागावें म्हणजे अंगुलादि सित होतें .

उदाहरण .

तिथि ५ घ . ७प . २०१६ ( =८१ ति . ५७घ . २०प .) = तिथींचा वर्ग २६ ..१४घ . १३प . = ५५ति . ४३घ . ७प ., यांस पलभे (५अं . ४५प्र .अं .) नें गुणून गुणाकार ३२० ..२२ ..५५ ÷ १५ = २१अं . २१क . ३१विकला हा भागाकार उत्तर + सूर्य क्रांति उत्तर २१अं . ४४क . २९विक . = स्पष्ट भागाकार उत्तर ४३अं . ६क . ० विकला चंद्राची स्पष्टक्रांति उत्तर २०अं . ४१क . ९ विकला आहे म्हणून ती स्पष्ट भागाकारांतून वजा करून बाकी उत्तर २२अं . २४ कला . ५१ विकला ÷ तिथींची दुप्पट १० ति . १४ घ . ४० पलें = २ अंगु . ११ प्र .अं . हें उत्तर वलन झालें . तिथि ५ घ . ७प . २० ४ ( =२० तिथि २९घ . २०प .) ÷ ५ =४अं . ५ प्र .अं . हेंच चंद्राचें सित झालें .

चंद्रश्रृंगोच्य दिशाज्ञान .

उन्नतं वलनाशायामन्यस्यां स्यान्नतं विधोः ।

वलनस्याङ्गुलैः श़ृङ्गं किमत्र परिलेखतः ॥४॥

अर्थ -

वलनास जी दिशा असेल त्या दिशेकडे श्रृंगाची उन्नति होईल आणि अन्यदिशेस श्रृंगाची नति होईल असें जाणावें . वलनाची जीं अंगुलें असतील तत्तुल्य श्रृंगोच्याचें मान जाणावें .

उदाहरण .

चंद्राचें वलन उत्तर २ अं . ११ प्र . अं . म्हणून श्रृंगोन्नतिउत्तरेकडे होईल . व श्रृंगो नति दक्षिणेकडे होईल . आणि श्रृंगाचें मान २अं . ११ प्र . अं . होईल .

श्रृंगोन्नत्यधिकार समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : February 24, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP