TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १५ वा

ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.


अध्याय १५ वा
श्री गणेशाय नम: ॥ श्री दत्तात्रेयाय नम: ॥
ऐंसे किती येक काळ झालिया-वरी ॥ मुक्तदेवे आठविले त्रीपुरारी ॥ आठविताची त्रीशूळधारी ॥ सर्व गौरी घेऊनी पातला ॥१॥
म्हणे घडी घडी आठवित ॥ काय संकट पडीले तूं तें ॥ मुक्त म्हणे व्यर्थ ॥ स्त्रींया वीण राह ना ॥२॥
ऐंसे ऐकूनी शिवेमात ॥ समाग:मे घेतले त्यांतें ॥ कैलासा नेउन प्रभावतीं तें ॥ दोघे एकत्र मिळाले ॥३॥
कैलासी राहीले मुक्तदेव ॥ शिव पूजोनी स्वभावे ॥ तै पासोन वंशोध्दव ॥ पृथ्वीवर चालत ॥४॥
अष्टपुत्राची उत्पत्ती ॥ आर्य क्षत्रीय त्या म्हणती ॥ शिव पुत्र म्हणोने ख्याती ॥ सोमवंश तयाचा ॥६॥
आर्या वंश कृतकृत्य ॥ द्वापार युगी राज्य करीत ॥ शापा मुळे कलियुगांत ॥ व्यापार ऐंसे करु लागले ॥७॥
ऐंसे मुक्त देवाचे अख्यान ॥ ब्रह्मांडपुराणी वर्णन ॥ वर्ण वैभव खंड प्रमाण ॥ ब्रह्म नारद संवाद तो ॥८॥
मुक्ताख्य व्यास ऋषी वक्ता ॥ भविषोत्तर पुराणीची ही कथा ॥ धर्मं शास्त्र हे पाहता ॥ कर्म युक्त वर्णिले ॥९॥
पुढले आधाइ कथा सुरस ॥ शिव दया करी मुक्तवंशास ॥ ब्रह्मानंदिनी देविस ॥ श्रवण करोत विद्वद्‌जन ॥१०॥
इती ब्रह्मांड पुराणेतिहास ॥ धर्म शास्त्र प्रमाण त्यास ॥ पंचदशोध्याय गोड हा ॥११॥
श्री कृष्णार्पणमस्तु ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-07T01:39:21.9630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

voluntary disclosure (of property) scheme

  • (संपत्ति के बारे में) स्वैच्छिक प्रकटीकरण योजना 
RANDOM WORD

Did you know?

सूतक कोणाचे नसते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.