श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ४ था

ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.


श्री गणेशाय नम: ॥ श्री गुरुभो नम: ॥
जे शिव बोलीले वरद वचन ॥ मुक्तदेवा तुज अक्षयी हो जाण ॥ ऐंसा वर समस्त देऊन ॥ शस्त्र तयासी दिधले ॥१॥
शिव दिधले पाशुपत शस्त्र ॥ ब्रह्मा देत शस्त्र समस्त ॥ सकळ देव आयुधे देत ॥ वाचवी म्हणे आम्हासी ॥२॥
सर्व ऋषीनी वर देऊनी ॥ सांगाते शक्ती दिधली जाण ॥ तेणे निमजा देवी आपण ॥ साहे जाहली मुक्तदेवा ॥३॥
ऐसा अभय वर देऊन ॥ शिव चरण नमस्कारोन ॥ ऋषीसमुदाये संगे घेऊन ॥ याग रक्षणा चालीले ॥४॥
मग अघोर आरण्ये पंथी ॥ वृक्ष लागले नाना जाती ॥ ब्रम्हदारण्यामाजी वस्ती ॥ यात्रशाळा निर्मिमयल्या ॥५॥
ऋषी समस्त मंत्रघोष करिती जाणा ॥ मुक्तदेव यज्ञ करि रक्षण । विप्रासी म्हणे तुम्ही असा निर्भय मना ॥ विघ्न मी निवारित असे ॥६॥ शुक्राचार्य जाउनी वेगे ॥ जानुमंडळा प्रती वृत्तांत सांगे ॥ यागाची पूर्णहुति होता सवेगे । तुझे शीर छेदिती ॥७॥
या कारणे आता त्वरा ॥ यज्ञालागी विघ्न करा ॥ नाही तरी विचार बरा ॥ दिसत नाही पुढे ॥८॥
ऐसा असूर गुरु जानुमंडळा बोलत ॥ दैत्य बोलाविले समस्त ॥ आज्ञापिले निशाचराते ॥ याग विधंसूनी यावे सत्वर ॥९॥
ऐसे ऐकता सत्वर ॥ दहा सहस्त्र धावीन्नले निशाचरा ॥ मांस खेड पर्वंत रुधीर॥ यज्ञावरी वर्षंती ॥१०॥
मग घाबरला ऋषी मेळा ॥ कापू लागले तेव्हा चळ-चळा ॥ मुक्तदेवासी म्हणती वीर सबळा ॥ निशाचर पातले ॥११॥
मुक्तदेव म्हणे समस्ता ॥ स्वस्त बैसावे यज्ञासनी आता ॥ विध्वंसोनी राक्षता समस्ता ॥ याग सिध्दी पाववीन ॥१२॥
निमजा देवी पूजोनी ॥ सन्निध घेतली ते जननी ॥ नानापरि युध्द करोनी ॥ निशा चर संहारिले ॥१३॥
राक्षस संहारिले दहा कोटी ॥ ते संहारिले उठा उठी ॥ क्षण मात्र न लागता ॥१४॥
सर्व संहारिले दैत्य ॥ स्वाहाकार करिती ऋषी समस्त ॥ कळली जानूमंडळासी मात ॥ आला त्वरीत त्या ठायीं ॥१५॥
क्रोधे दशन रग डीत॥ खदीरांगरां ऐसे नेत्र दिसत ॥ शस्त्रा सह सैन्य मंडित ॥ गर्जना करिती सिंह नादे ॥१६॥
ऐकता असूराची ध्वनी ॥ कापूं लागली तेव्हा धरणी फणीवर दचकला मनी ॥ अचल धरणी थरारिली ॥१७॥
ऋषी कापती थर थरा ॥ म्हणती समस्ताचा अंत:पुरला ॥ मग स्मरती त्रिपूर गौराला ॥ वाचवी दातारा या प्रळयी ॥१८॥
मुक्तदेवासी म्हणती ऋषी समस्त ॥ आम्हासी जाउदे त्वरीत ॥ यज्ञ न होय समाप्त ॥ महा प्रळय मांडिळा ॥१९॥
मुक्तदेव म्हणे धरा धीर ॥ शिव कृपे मश्यक आसुरा ॥ आताची करितो संहार ॥ क्षण एक न लागता ॥२०॥
जय जय ओ अव्यक्त शक्ती ॥ जय जय ओ अव्यक्त शक्ती ॥ जय जय ओ अमूर्त मूर्ती ॥ चित्त शक्ती चिन्मात्रे ॥२१॥
जय जय ओ जगदंबे ॥ अरंभस्तंभे ॥ जय जय ओ सौभाग्य शोभे ॥ स्वयं स्वयंभे कुमारी यो ॥२२॥
जय जय ओ अनादि ॥ ना कळसी मनोबुध्दी ॥ देव देवी इही शब्दी ॥ तु त्रिशुत्धीनादसी ॥२३॥
ऐसे बोलोनी वोहिला ॥ निमजा देवी प्रार्थिला ॥ मग साहे करोनी शक्तीला ॥ उभा ठाकला रणामाजी ॥२४॥
यरीकडे असून येत ॥ रथी दिसे जैसा पर्वत ॥ द्बादश योजनें भोवता ॥ प्रज्वाळाग्नी समागमे ॥२५॥
आणि सैन्याची दाटी ॥ असुर मिळाले लक्षकोटि ॥ शीळा पर्वत हनवटी ॥ घेवोनी वृक्ष कोटी धाविन्नले ॥२६॥
मुक्तदेव मांडोनी ठाण ॥ सोडिले मग कुर्‍हाडी बाण ॥ फोडीले पर्वत पाषाण ॥ सवेची शीर उडविले ॥२७॥
मंत्राक्षता टाकोनी जाण ॥ विझविला द्बादश योजने अग्नी ॥ सवेची सोडूनी सात बाण ॥ सर्व सैन्य संहारिले ॥२८॥
मग क्रोधावला असुर ॥ रथ लोटला सत्वर ॥ सहस्त्र बाणी लावूनी मुक्तदेवा वरी सोडला ॥२९॥
मुक्तदेव चपळत्वे सत्वर ॥ बाण लाविले दोन सहस्त्र ॥ दैत्याचे बाण वरचेवर तोडुनी सर्व संहारिले ॥३०॥
रथ तुरंगा सहित ॥ यकसरा संहारा होता ॥ वीराचीशी सूर्य मंडळ पाहता ॥ रुधिर वाहत भड भडा ॥३१॥
रुधिराचे पुर लोटले ॥ ते सागरासी मिळाले ॥ रथ तुरंग हात्ति वाहू लागले ॥ सैन्य मिळाले सर्व हे ॥३२॥
मग जानु मंडळ खवळला ॥ म्हणे हा कवण वीर आला ॥ एकालाची सैन्य संहारिला ॥ का अवतरला सदाशिव ॥३३॥
नाना नाटक दैत्य ज्या:ती ॥ माव कळा करी नाना गती ॥ जे जे बाणसोडी मुक्ती ॥ ते शक्ती छेदीत ॥३४॥
ऐसे घोर युध्द झाले ॥ मुक्तदेवाने तीन बाण सोडीले ॥ शीर उडवोनि भुजा छेदिले ॥ मग पडीले धरणीये ॥३५॥
इति ब्रह्मांडपुराण इतिहास । भविष्योत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्मं शास्त्र प्रमाण त्यास ॥ चतुर्थांध्याय गोड हा ॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥।

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP