मूळस्तंभ - अध्याय १

‘ मूळस्तंभ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्री गणेशायनमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ ॐ नमोवासुदेवाय ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्र्लोक ॥

श्रीसच्चिदानंदमव्यक्तं निर्विकारं निरामयम् ॥ गुरुगम्यं परं गुह्यं पुरुषं तं नमाम्यहम् ॥१॥

ॐ नमोजी आद्या ॥ वेदासी प्रतिपाद्या ॥ जयजयाजी स्वयंवेद्या ॥ श्री आत्मस्वरुपा तुं ॥१॥

नौत्यौंकारेश्वरं शंभुभात्मनिवृत्तिसागरे ॥ रम्यं तं परमं ज्ञानमार्गदं परमेश्वरम् ॥१॥

सुरैःसोपानमार्गेण सेवितो मृत्युसानुना ॥ नमोऽस्तु शंभवे तस्मै परब्रह्यस्वरुपिणे ॥२॥

शिवायै शंकरेणादौ कथिते विस्तरात्खलु ॥ मुलस्तंभ ब्रवीम्यद्य संक्षेपाद्देशभाषया ॥३॥

पंचशुन्यात्र्यक्षर ॥ॐ नमोजी परात्पर ॥ सिध्द साकार चराचर ॥ अक्षरेय ॥२॥

हें वेदशास्त्रांचे बीज ॥ सिध्दांत -गहिवर गुज ॥ यापासुनी महातेज ॥ प्रगट झालें ॥३॥

हेंचि द्दश्य चारखाणी ॥ चव -यायशीं -लक्ष जीवयोनी ॥ एकवीस स्वर्गाची उभवणी ॥ यापासुनी ॥४॥

श्र्लोक ॥ आद्यशून्ये जलं चैव शुभ्रवर्ण च द्दश्यते ॥ भवे भवस्थितलया मेघमाला यथा तथा ॥१॥

मध्यशून्ये रजोधुम्रनीलवर्ण च तेजसा ॥ आदौ मध्ये रविर्ज्ञेयी विष्णुमाया प्रवर्तते ॥२॥

ऊर्ध्वशून्ये गतिश्वोर्ध्वा श्वेतस्फटिकवर्णवत् ॥ वायुजीवावीश्वरश्वज्ञानचैतन्यमेव च ॥३॥

आद्दशून्यं मध्यशून्यमूर्ध्वशून्यं निरामयम् ॥ चतुर्थे पंचमे वेत्ति मोक्षं च भवबंधनात् ॥४॥ दोहा ॥

आदिशून्य मध्यशून्य , ऊर्ध्वशून्य दीठा ॥ चतुर्थशून्य लीजियो , पंचशून्यमों पैठा ॥१॥

तथा परम निरंतर वास ॥अनंतसिद्वांतविश्वास ॥ वैश्य जपती जयास ॥ तो आदिनाथ ॥५॥

हें जाणिजे जाणणें ॥ घेऊन जाईजे प्राणें ॥ तिहीं लोकींचे विवरणें ॥ मनेंचि कीजे ॥६॥

हा मूळस्तंभ सर्वाआदि ॥ येर सर्वथा निंदावादी ॥ हें जाणीतलियावरी सिद्वी ॥ मीच निरुतें ॥८॥

जाणा पांच शून्यांची करणी ॥ आणि पिंडब्रह्यांडाची उभवणी ॥ या मूळस्तंभपुराणीं ॥ आणि शिवबीजें असती ॥९॥

ऐसी हे आदिमूळटीका ॥ जो जाणे तो सकळांनिका ॥ येर बोलतां सोसुं ऐका ॥ बहुतां शास्त्रीं ॥१०॥

वेदशास्त्रें पुराणें ’नेति नेति ’ म्हणती ॥ आणि मृत्यूलोकीं ऐसें बोलणें ऐकती ॥ ऐकोनी उरले न राहाती ॥ पडिले पंथी वाचेचिया ॥११॥

एक द्वैताद्वैर शास्त्रें प्रतिपादिती ॥ तीं शास्त्रें सांडिती परतीं ॥ मूळस्तंभ आदिबीज धरीं चित्तीं ॥ तैं भ्रांति फिटेल सर्व ॥१२॥

देखसी गुरुमुखें गुरुगम्य ॥ शिवरहस्य शिव अगम्य ॥ परात्पर ब्रह्यरम्य ॥ स्वयें होसी ॥१३॥

तंव पार्वती म्हणे जी देवा ॥ हा मूळबीजाचा विस्तारु आघवा ॥ मजप्रती तुम्हीं सांगावा ॥ कृपा करुनी ॥१४॥

ईश्वर उवाच ॥ श्लोक ॥ ॥ नांह ब्रह्या न वै विष्णू रुद्रो भानुश्व तारकाः ॥ नाकाशमग्रिर्भूमिश्व न सोमश्व समीरणः ॥१॥

न ग्रहा चंद्रसूर्याद्या नोदकं च दिशो दश ॥ कैवल्यरुपी भगवानेकएवं सदाशिवः ॥२॥

मी नव्हे ब्रह्या ना विष्णू ॥ रुद्र तारादि नव्हे भानु ॥ आकाश सोम पावनु ॥ अग्नि भुमि ना उदक ॥१५॥

नव्हे चंद्र सूर्यादि ग्रह पाहीं ॥ दशदिशा हे कांहींच नाहीं ॥ तें एकाचि शिव पाहीं ॥ कैवल्य स्वरुप ॥१६॥

ऐसे ऐकल्यावरी ॥ काय म्हणे शैलकुमरी ॥ मग हे रचना कवणे परी ॥ रचिली देवा ॥१७॥

मग ईश्वर म्हणे देवी ॥ एकचित्तें परिसिजे शांभवी ॥ जे निराकार पदवी ॥ ते सांगुं तुज ॥१८॥

अतीत अभ्यागत अरुपपर ॥ अमूळ अकुळ अगोचर ॥ अगम्य अगणित चराचर ॥ एवं देवी रुप माझें ॥१९॥

तंव देवासि म्हणे पार्वती ॥ हें मज प्रत्यया आणावेंती ॥ आणि या साकाराची रीती ॥ मज सांगा देवा ॥२०॥

तुम्हां युगें भरलीं किती ॥ तुम्हां मज गृहाश्रम कवणे रीती ॥ आणि तुझी स्वरुपस्थिती ॥ मज सांग देवा ॥२१॥

मग म्हणे शूळपाणी ॥ देवीं परिसें अठरा युगांची उभवणी ॥ साठ सहस्त्र देव मजपासुनी ॥ उत्पन्न जाहले ॥२२॥

ते कसे परिस भवानी ॥ तुज सांगेन धरीं मनीं ॥ इंद्र आपणासी नेणुनी ॥ जन्ममरणा योग्य झाला ॥२३॥

पार्वती तुं मुख्य करुन ॥ आणि तेहतीस कोटी देव जाण ॥ ते नाना उग्रतपेंकरुन ॥ शांत झाले ॥२४॥

परी जे शांत न होतां गेले ॥ ते जन्ममरणाभीतरीं पडिले ॥ अकरा रुद्र अज्ञानीं सांपडले ॥ऐक पार्वती ॥२५॥

गंगा तप उग्र करुन सरली ॥ हा ठाव न देखतांचि गेली ॥ अगम्य इतिहास श्रुति स्मृति सरली ॥ मंत्र यंत्र तंत्र आदि दैवत ॥२६॥

बीजें बिंदु सत्त पाताळॆं जाण ॥ सत्तऋषि तंत्र षट् दर्शन ॥ हे कुळजाळाभीतरीं होऊन ॥ ठेली असे ॥२७॥

समस्त उत्पत्ति स्थिति प्रलयादि ॥ हे कामदहनामाझारी भविष्यभिक्षादी ॥ मुख्य करुनी समस्त अवतारमांदी ॥ माझारी ठेवुनी ॥२८॥

उत्पत्ति स्थिति प्रलय पावे जग ॥ तरी मज सदाशिवाचा एक युग ॥ ऐसीं युगें अठरा चांग ॥ माजी असती देवी ॥२९॥

तीं कवणें कवण परियेसीं ॥ अठरा युगें तीं कैसी ॥ त्यांची नामे तुजपासीं ॥ सांगेन देवी ॥३०॥

अनंत युग , विस्तारण युग ॥ अद्वुत युग , तामस युग , तारज युग ॥ तांडज युग , भिन्नज , भिन्नयुक्तयुग ॥ आणि अभ्यागत नवम ॥३१॥

मनरण्ययुग , अव्यक्तयुग , तांबुज युग ॥ विश्वावसु युग , अलंक्रुत युग ॥ क्रुत त्रेता द्वापार युग ॥ आणि कलियुग अठरावें ॥३२॥

ऐसा अठरा युगांचा संघ भला ॥ त्यांमध्यें अनंत युग तो पहिला ॥ चौदा कोटि वर्षे वर्तोनि राहिला ॥ संख्या त्याची ॥३३॥

तंव पार्वती म्हणे देवा एक पुसतें पाहीं ॥ तुम्ही मागें बोलिलेत आदि नाहीं ॥ चतुर्थ शून्य चंद्रसुर्य नाहीं ॥ नाहीं तेहतीसकोटी देव ॥३४॥

प्रथम विष्णु महेश नाहीं ॥ आणि आदि ब्रह्या नाहीं ॥ चार देव शास्त्रेंही नाहीं ॥ पुराणें कैंची ॥३५॥

वेद शास्त्र पुराणें नाहीत ॥ मग देव कैंचे असत ॥ देव धर्म नाहीं विख्यात ॥ मग गुरु शिष्य कैंचे ॥३६॥

पंचभुतें नाहीं मग सप्त पाताळ लोक सैंचे ॥ एकवीस स्वर्ग नाहीं मज रवि सोम कैंचे ॥ चंद्र सुर्य नाहीं मग रात दिन कैचे ॥ दिन रात्रीविण कैंचे सात वार ॥३७॥

सप्तवार नाहीं मग पक्ष मास कैंचे ॥ पक्षमास नाहीं मग अयन कैंचे ॥ अयनें नाहीं मग संवत्सर कैंचे ॥ संवत्सर नाहीं मग कैंचीं युगें ॥३८॥

ऐसी बोलिली पार्वती ॥ मग ईश्वर कथन करिती ॥ म्हणे तें कालज्ञान एक -चित्तीं ॥ परिस देवी ॥३९॥

मी जांभई देईं जेवेळीं ॥ तेव्हां बोटीं वाजवी चिपुळी ॥ त्या चिपुळ्या तीनशें साठ जेवेळी ॥ तीं एक घटिका ॥४०॥

ऐशा आठ घटिका ॥ तैं प्रहर निका ॥ ते आट प्रहर होती देखा ॥ तैं एक दिनरात्र ॥४१॥

ते रात्रदिन तीस ॥ तैं होय एकमास ॥ ऐसे लोटतां बारा मास ॥ एक होय संवत्सर ॥४२॥

हें संवत्सर कालप्रमाण ॥ दशशत म्हणजे सहस्त्र जाण ॥ आणि शतसहस्त्र म्हणजे लक्षपूर्ण ॥ शतलक्ष म्हणजे एककोटी ॥४३॥

चवदा -

कोटी भरलिया जाण ॥ एक अनंतयुग होय पूर्ण ॥ अठरायुगांमध्यें पहिला हा जाण ॥ पार्वती वो ॥४४॥

हा अनंतयुग चवदाकोटी वर्ष ॥ सांगितला चिपुळि यांचे निमिर्षे ॥ आणिक देवी परिसें ॥ जें पुसिलें तिंवा ॥४५॥

ते अनंतयुग मज इच्छा झाली ॥ जे मज ईश्वरासी इछा उपजली ॥ ते इच्छा व्यक्तीं सामावली ॥ आदि इच्छाशक्ति माझी ॥४६॥

पार्वती पुसे ईश्वरासी ॥ तुमची इच्छा जन्मली कैसी ॥ आणि अवतार झाले तियेसी ॥ ते कोण कोणा ॥४७॥

ती शक्ति आवरिली कैसी ॥ तिच्या माता पितंयासी ॥ कवण नगर तियेसी ॥ आणि काय नाम ॥४८॥

मग म्हणे शूळपाणी ॥ दहा अवतर तुझे योगिनी ॥ तवं बोलिली दाक्षायणी ॥ ते सांगा अवतार कोण कोण ॥४९॥

कोण पिता कोण जननी ॥ जन्म कोणे नगरस्थानीं ॥ दहा अवतार कवण गुणीं ॥ ते सांगा मज ॥५०॥

ऐसा प्रश्न ऐकोन ॥ सांगता झाला त्रिनयन ॥ परिस म्हणे पंचानन ॥ एकचित्तें पार्वती ॥५१॥

प्रथम ते शिवायणी ॥ पुंरदररायाची कन्या जाणीं ॥ जनमेजया माता अंगुष्ठपुरपट्टणीं ॥ जन्मली असे ॥५२॥

नंदिनी नामक दुसरी ॥ निभ्रमारायाची कुमरी ॥ अरादेवी माता सुंदरी ॥ शैलक्षणपट्टणीं जन्मली ॥५३॥

तिसरी जाण वैष्णवी ॥ नरहरी रायाची कन्या जाणीं बरवी ॥ द्राक्षपुरपट्ट्णीं उद्ववी ॥ जाहली असे ॥५४॥

आणि चवथी ब्रह्याणी ॥ वेदाक्षरायाची कन्या जाणीं ॥ पुरहरमाता कौसल्या -पट्टणीं ॥ जन्मली असे ॥५५॥

पांचवी दाक्षायणी ॥ दक्षरायाची कन्या सुगुणी ॥ जन्मली क्षिप्रापुरपट्टणीं ॥ आणि अमरगंधा माता ॥५६॥

सहावी आर्या सातवी मोहिनी ॥ ह्या अमररायाच्या कन्या सुगुणी ॥ कुंदनादेवी माता जाणीं ॥ भाग्यवंत नगरी जन्मल्या ॥५७॥

आठवी दुर्गादेवी धन्या ॥ वज्रपाणीरायाची कन्या ॥ राणादेवी माता मान्या ॥ कनकपुरपट्टणीं जन्मली ॥५८॥

नववी देवी ती भद्रा ॥ काळरायाची कन्या सुभद्रा ॥ मानादेवी माता महेंद्रा ॥ ब्रह्यपुरपट्टणीं जन्मली ॥५९॥

दहावी जाण पार्वती ॥ हिमंवतरायाची कन्या निगुती ॥ विश्वजा माता भाग्यवती ॥ अदायोपट्टणीं जन्मली ॥६०॥

ऐसे हे पार्वतीचे अवतार ॥ शिव सांगे प्रबंधसार ॥ मग शिवा म्हणे कोणॆ युगी कोण प्रकार ॥ ते मज सांगा देवा ॥६१॥

मग बोलिला त्रिनयन ॥ दोहों युगीं एकैक जनन ॥ ऐसी अठरा युगें प्रमाण ॥ उत्पत्ति स्थिति तुझी ॥६२॥

प्रथमयुग अनंत ॥ अंनत नाम प्रकाशत ॥ त्यामाजी घडत मोडत ॥ तें मूळस्थान ॥६३॥

अनंतयुग परात्पर ॥ तें उपासिजे निरंतर ॥ हें सर्व साकार तयाअभ्यंतर ॥ सामावलें ॥६४॥

ते अनंतयुगीं ऐश्वर म्हणती ॥ देव शिव आणि शक्ति ॥ तिचे वामभुजे निश्चिती ॥ जन्मला नारायण ॥६५॥

त्याचे नाभीस जन्मला ब्रह्या आपण ॥ मग त्या ब्रह्ययापासून ॥ बारा ब्रह्ये जाहले जाण ॥ पार्वती वो ॥६६॥

ते सांगिजेतील कोण कोण ॥ आदिनारायणचा चतुरानन ॥ तो वाचस्थळनंदन ॥ पद्मावतीनगरीं जन्मला ॥ ६७॥

तो आदिनारायणाचा कुमार ॥ नाभिपासाव त्याचा विस्तार ॥ त्यापासाव जन्म अपार ॥ प्रगटले वेद चारी ॥६८॥

मग चवदाकोटी वर्ष भरी ॥ अनंतयुग लोटल्यावरी ॥ वेद विस्तारले सर्वत्र चारी ॥ त्या चतुराननें ॥६९॥

त्या वेदापासाव सविस्तर ॥ जहालें समस्त चराचर ॥ आणी इंद्रासि जन्म अपार ॥ झाले देवी ॥७०॥

मग पार्वती म्हणे जी देवा ॥ या ब्रह्ययासी करणीचा ठेवा ॥ कोणें दिला तो सांगावा ॥ समूळ त्रिपुरारि ॥७१॥

मग त्रिपुरारी बोलिला ॥ पशुमुखें अंधकारें ब्रह्या निर्बुजला ॥ मग म्यां त्यासि उपदेश केला ॥ ब्रह्य गायत्रीचा ॥७२॥

तंव पार्वती बोलिली ॥ ब्रह्ययासी गायत्री उपदेशिली ॥ ते मजप्रती पाहिजे सांगितली ॥ देवाधिदेवा ॥७३॥

ईश्वर उवाच ॥ ॐसोहं ब्रह्यरुपाय ब्रह्यणे स्वाहा ॥

हा मंत्रउपदेश ब्रह्ययासि उत्तम ॥ मग ब्रह्या करि ध्यान निजवर्म ॥ भूमध्यें लक्ष लाविंता परब्रह्य ॥ देखिलें मध्यें ॥७४॥

ॐहंसोहं ज्योतिलिंगस्वरुप नीललोहित ॥ विरंचीनें ललाटी चिंतिलें अखंडित ॥ मग मी प्रगटलों तेथ ॥ ध्यानस्वरुपीं ॥७५॥

तो भ्रूमध्यें ध्यान करी ॥ लक्ष लावुन अभ्यंतरी ॥ ज्योतिःस्वरुप अखंडकारी ॥ देखिले मज ॥७६॥

भ्रूकटीमध्यें चिंतिलें माते ॥ उपसाम केला बरब्या आर्ते ॥ तंव पार्वती ईश्वरातें ॥ विनंती करी ॥७७॥

म्हणे जी देवा हे पिनाकेश ॥ त्यासी तप करितां झाले किती दिवस ॥ मग प्रगटलेत ध्यानास ॥ तें सांगा मज ॥७८॥

मग म्हणे पिनाकपाणी ॥ सर्व साकार करावयाची करणी ॥ ब्रह्ययास सांगितली आम्हीं भवानी ॥ मग तो सृष्टिरचना करी ॥७९॥

परी ऐसें करिता विष्णुकुमरा ॥ जन्म गेले वो बारा ॥ अनंतयुग उपरां ॥ बारा ब्रह्ये ॥८०॥

तंव म्हणे शैलकुमरी ॥ या ब्रह्ययासि जन्म कोणे नगरी ॥ तयाचीं माता पिता कोण त्रिपुरारी तें सांगा मज ॥८१॥

ऐसे बोलिली पार्वती ॥ मग ईश्वरदेव सांगती ॥ म्हणत ऐक एकचित्ती ॥ पार्वती वो ॥८२॥

ईश्वर उवाच ॥ ॥

प्रथम ज्येष्ठ कमळसेनाचा ॥ आणि पुष्पदेवाचा ॥ तो कुमर असे साचा ॥ रुदनानगरी जन्मला ॥८३॥

कमळसेन रीतीरायाचा कुमरु ॥ तो सुंदरेचा लेंकरु ॥ जयंत -नगरी साचारु ॥ जन्मला जाण ॥८४॥

तिलोत्तम विचारु ॥ हेमगंधरायाचा कुमरु ॥ साठवियेचा अंधारु ॥ मौधानगरी जन्मला ॥८५॥

कुल्लाळ कुबेररायाचा ॥ कुमर जाण वायुधेचा ॥ मंगळनगरी साचा ॥ जन्मला असे ॥८६॥

अलील वज्रपाणीरायाचा ॥ कुमस्तुरिया देवीचा ॥ तुरंगणापूर नगरीं त्याचा ॥ जन्म जाहला ॥८७॥

पीतांबर रुद्रगर्भ -रायाचा ॥ कुमर वज्रदेवीचा ॥ मृगाक्षनगरीं साचा ॥ जन्मला जाण ॥८८॥

वेदांग आपोजनारायाचा ॥ कुमर वागनत्रेचा ॥ लावण्यपूरनगरीचा ॥ जन्म त्याचा असे ॥८९॥

सुजनु अर्जरायाचा ॥ कुमर वो गा देवीचा ॥ तुळापूरनगरीचा ॥ जन्म झाला ॥९०॥

अल्नदु सारंगरायाचा ॥ कुमर वृगरुछलेचा ॥ नाभिपट्टणीं त्याचा ॥ जन्म जाहला जाण ॥९१॥

गजानन ऐरावत रायाचा ॥ कुमर कुंभस्थळॆचा ॥ वृक्षस्थळपूर नगरी साचा ॥ तयाचा जन्म ॥९२॥

द्रव्यधर्म अवघ्यारायाचा ॥ कुमर निव्रुत्तिकेचा ॥ अक्षयनगरीचा ॥ त्याचा असे जन्म ॥९३॥

सुनीळ श्रीरंगरायाचा ॥ कुमर जाण नयनीचा ॥ कमळापुर नगरी साचा ॥ जन्म त्याचा होय ॥९४॥

ऐसे हे बारा ब्रह्ये मुख्य ॥ यांपासुन झाले असंख्य ॥ परी हें माझें भरे जंव निमिष ॥ तंव आले गेले ॥९५॥

तंव देवासी म्हणॆ पार्वती ॥ या ब्रह्ययापासाव जन्मले किती ॥ आणि कवणापासून कवणाची उत्पत्ति ॥ तें सांगा मज स्वामी ॥९६॥

प्रथम ब्रह्या तो कवण ॥ त्याच्या आयुष्याचे किती प्रमाण ॥ आणि उत्पत्ति यापासुन ॥ कवण झाली ॥९७॥

आणि देवा तुम्ही बोलिले विशेष ॥ जे तुमच्या निमिषा -माजी गेले असंख्य ॥ तरी तुम्हीच सर्वा मुख्य ॥ होतेति कैसें ॥९८॥

हाजी युगांत युगींअपार ॥ जरी तुम्हीं होतेती ईश्वर ॥ तरी तुम्हांपासुन विस्तार ॥ झाला कीं नाहीं ॥९९॥

तुमची सेवा कवण करी ॥ तुमचीं आभरणें कवणेपरी ॥ आणि ध्यान धारणा समाधिलहरी ॥ तें मज सांगा देवा ॥१००॥

तुम्ही एकलेचि आदि अमत ॥ दुसरा कोण नाहीं बोलत ॥ तरी तुम्ही ध्यान कवणाचें असा करित ॥ तें सांगा स्वामी ॥१॥

या माझिया प्रश्र्नासी निरुपण ॥ तुम्ही मज करावें श्रवण ॥ मग मी आदि अंत जाणेन ॥ तुम्हांस देवा ॥२॥

मग म्हणे देव धूर्जटी ॥ निराकार निरखी याचे शेवटी ॥ प्रपंचाचिये पाहतां पटी ॥ तारजयुगीं सृष्टी आरंभली ॥३॥

ते नारायणाचिये पोटी ॥ नाभिकमळसंपुटीं ॥ तेथुनी जन्मली हे सृष्टी ॥ चतुर्थ दिवसांची ॥४॥

सरिसा ब्रह्या आपण ॥ होत सृष्टीचें निर्माण ॥ ऐसें देखुनी विरंचीचे मन ॥ भयभीत जाहलें ॥५॥

मग तो न्याहाळून पाहे तयेवेळां ॥ तंव तो काहींच न देखे डोळां ॥ मग तो भयचकित झाला ॥ ब्रह्या आपण ॥६॥

मग तेणॆ धाकें सांडिलें ॥ नेत्र लावुनी ध्यान मांडिलें ॥ त्यामध्ये ललाटीं चिंतिलें ॥ स्वरुप माझें ॥७॥

ही व्हावी सृष्टी -रचना ॥ ऐसी मनीं धरुनी कल्पना ॥ म्हणूनी उग्र तप ध्याना ॥ तेणें केलेंमाझॆं ॥८॥

मग ज्योतिलिंग अलोहित ॥ ललाटी चिंतिले अखंडित मातें ॥ उपसाम केला बरव्या आतें ॥ तेवेळी मी प्रगटलों तेथें ॥ प्रसन्नत्वें देवी ॥११०॥

मग ब्रह्या म्हणॆ जी देवा ॥ लाविजे सृष्टीरचनेचा दिवा ॥ निराकार निशीचा फेडावा ॥ अंधकार हा ॥११॥

ही व्हावी सृष्टीरचना ॥ माझी पुरवावी कल्पना ॥ जरी तूं झालासी प्रसन्न ॥ व्योमकेशा ॥१२॥

मग आम्हीं तयासी म्हटलें ॥ तुवां सृष्टीकृत्य पाहिजे केलें ॥ म्हणोनी तयासी दीधले ॥ सिध्द उत्तर ॥१३॥

मग सृष्टी करी ब्रह्या ॥ ऐसा सिध्दनामाचा देऊनि महिमा ॥ ऐसें आलें विश्रामा ॥ चित्त तयाचें ॥१४॥

अहो संकल्प सृष्टीरचनेचा ॥ जरी मी साचार न करीं त्याचा ॥ तरी मनोधर्म उपशमनाचा ॥ उरेल कैसा ॥१५॥

प्रलय , स्थिति , उत्पत्ति ॥ माझिये इच्छेपासाव होती ॥ येर वाढवीं संसृती ॥ वारयावीण ॥१६॥

अलोहीत दिव्य तेज ॥ भ्रूमध्यें चितिंले मज ॥ यालागीं वेदां झालें बीज ॥ स्वरुप माझॆं ॥१७॥

मग ब्रह्या म्हणॆ देवा परियेसा ॥ मज काहीं उपदेशाजी आदि -पुरुषा ॥ मग त्याचे ह्वदयीं घातला ठसा ॥ त्रिपदा गायत्रीचा ॥१८॥

गायत्रीमंत्र उपदेशिला ॥ आदिब्रह्या ऐसा म्हणविला ॥ मग सरता झाला ॥ जगत्रयामाजी ॥१९॥

त्या ब्रह्ययासी पांच मुखें ॥ मग एक वेगळें केलें तबकें ॥ तेवेळीं सकलही त्रैलोक्यें ॥ सहीत आम्हां सुख झालें ॥१२०॥

तंव ते आदिशक्ति म्हणे त्रिपुरारी ॥ मग मुखें जी उरलीं चारी ॥ त्या मुखीं काय उच्चारी ॥ तें सांगा देवा ॥२१॥

तुम्हीं म्हणंती गायत्रीमंत्र ॥ ते गायत्रीपासाव झाले विस्तार ॥ तरी कैसा प्रकार ॥ त्या उपदेशाचा ॥२२॥

आणि त्या ब्रह्ययाचा आयुर्दाय केतुका ॥ आणि तो कोणीयुगीं जन्मला ॥ त्याचा व्रतबंध कोणें केला ॥ तो मज सांगा स्वामी ॥२३॥

मग बोले पिनाकपाणी ॥ तुझे प्रश्न तुज सांगतो तिन्ही ॥ तरी तुं एकाग्र चित्त करुनी ॥ परियेसी देवी ॥२४॥

आतां सांगेन गायत्रींमंत्राचा भेद ॥ जो म्यां केला बीज -कंद ॥ जेंणें पाविजे अविनाशपद ॥ तो गायत्रीशब्द परियेसी ॥२५॥

मागें सांगितली प्रथम पाच शून्यें ॥ त्याचें सांगेन विवरण ॥ त्या गायत्री पदाचें विंदान ॥ परियेसी देवी ॥२६॥

ऐसी हीं बीजें ऐक ॥ आदि ॐकार हें एक ॥ नादोनि ऐसी बीजें दोन देख ॥ परमात्माचि विस्तारला ॥२७॥

या बीजापासून विस्तार झाला ॥ आणि यापासून भूतसंघ झाला ॥ आणि महाभूतांपासून उद्ववला ॥ तो सांगेन ॥२८॥

 

ईश्वर उवाच

 

सोहं

हे त्रिपदागायत्री

 

अलेबीजगा

ना

नादुशिवगा

मा

माबिंदुगा

सी

सिद्धिविद्यागा

धं

धंदाकरूंसर्व

आकारजालादि

इच्छावर्तेआप

उद्भवलेगा

ऋतुनवगा

लृ

लीलासर्वगा

एकाचिरसु

ऐक्यएकत्रगा

ॐ वोलामुत

ॐह

चतुर्थचरणासहित

कर्मसर्वहिगा

संचलेंतेंचिगा

ठकलेंसहजगा

तत्वपूर्णगा

१०

पसरलेपूर्णगा

सो

एवंबीजकारला

अलंकाराआलेगा

क्ष

क्षयागेलेगा

सी

सिद्धब्रह्मगा

महारसुसर्वगा

ब्रह्मएकसर्वगा

अलंकारूज्याला

ओतलामुसगा

 

 

लव

ये

क्ष

सत्व

रज

सो

रूद्र

विष्णु

ब्रह्मा

तम

रज

सत्व

क्ष

ये

 

तम

ब्रह्मा

विष्णु

रूद्र

शंभु

 

ईश्वर म्हणे ऐक एकाचित्ते बीजाअक्षरे ; सर्व विस्तारातें ॥ आणि तुजप्रती अर्थप्रकाशातें ॥ मी सांगेन ॥२९॥

लःआकाश ,वःवायु , कःतेजं ॥डःआपं , बःपृथ्वी , ॐ पातां सहज ॥ ॐ कार क्षकार यंयंबीज ॥ ऐसी हीं बीजें आठ ॥१३०॥

आणि त्रिगुणात्मक जाण ॥ सत्व रज तमोगुण ॥ एतन्मय पदें तीन ॥ बोलिजे देवी ॥३१॥

प्रथम प्राण त्वंपद ॥ रजोमय असिपद ॥ आणि सत्वमयतत्पद ॥ यातें ब्रह्या जपे ॥३२॥

चवथा चरण जपती शिवज्ञानी ॥ तेचि अजपा बोलिजे जनीं ॥ ते कैसें परियेसी भवानी ॥ स्वस्थ चितें ॥३३॥

ॐपयोरजसेसावदय ॥ हें शिवपद जाण सुंदर ॥ हे अजपा बोलिजे परिकर ॥ ते ब्रह्य गायत्री तीस अक्षर ॥ परियेसी देवी ॥३४॥

ही उपदेशिली ब्रह्ययासी ॥ आणि अजपा दीधली सिद्वासी ॥ ऐसीं अक्षर्रें अजपेसी ॥ छत्तीस जाण ॥३५॥

अजपा शिव उपदेश ॥ हं क्षं री बीजे बोलिजे तियेस ॥ स्थनकें कोण परियेस ॥ पार्वती वो ॥३६॥

लःआकाश , वःवायु , कःतेज ॥ डःआप , बःपृथ्वी , ॐपाताळ सहज ॥ ना आकाश , ॐकार क्षकार हें बीज ॥ मिळोनि आठ ॥३७॥

सत्व रज तम हे गुण ॥ एतद्रूप बीजें तीन ॥ परी तीन मिळोनि एक पूर्ण ॥ ऐसी हीं नव बीजे ॥३८॥

हींचि नवही स्थानकें जाणिजे ॥ हेच तंव ’अंख ’ सगुण ब्रह्य बोलिजे ॥ ऐसीं ही अकरा बीजें ॥ जाहलीं देवी ॥३९॥

हेचि दशदेह भवानी ॥ सांगतो आतां तुजलागुनी ॥ तरी स्वस्थ मानसें करुनी ॥ ऐक देवी ॥१४०॥

स्थूळदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह , महाकारणदेह, ज्ञानदेह , विराटदेह, हिरण्यगर्भदेह सातवा ॥४१॥

मायादेह ; मूळप्रकृतिदेह ॥ आणी दहावा तो पद्मदेह ॥ ऐसे हे जाणावे दशदेह ॥ गुरुमुखे सरुनी ॥४२॥

ऐसे जाणून देहरुप ॥ यापरी पूजिजे ज्योतिःस्वरुप ॥ हे स्वयं समाधि अमूप ॥ गुरुमुखें जाणावी ॥४३॥

मग पार्वर्ती म्हणे देवासी ॥ माझी विनंती परियेसी ॥ हे देवा नेटेबोटेंसी ॥ मज निरुपण कीजे ॥४४॥

मग ईश्वर म्हणे वो देवी ॥ तीं निजबीजें परिसावी ॥ जीं समाधिसुखें जाणावीं ॥ ते ओळखावी देहीं नेटेबोटें ॥४५॥

शंकर म्हणे बीजें जाणा ॥ त्या तीन्हीं नाडी गहना ॥ इडा पिंगला सुषुम्ना ॥ जाण देवी ॥४६॥

अकार इडा निगुती ॥ ॐकार पिंगला म्हणती ॥ हंकार सुषुम्ना जगतीं ॥ प्रसिद्ध जाणा ॥४७॥

निरंजनी शंखिनी नाळ ॥ शरीर चैतन्य तें वंकनाळ ॥ या दोहींमध्यें दकाकीमुख निर्मळ ॥ तें उत्तरायण जाणावें ॥४८॥

प्राणशक्ति ना निवृत्ती ॥ रंग नाम बीजाक्षर गणती ॥ गगनाधारें उठ्ती ॥ मनाचा अग्नि चंद्रवसे ॥४९॥

तेथें सुषुम्ना पंचप्राण ॥ अंतः -करण होऊनि पराध जाहली जाण ॥ ते कोण कोण सांगेन ॥ पार्वती वो ॥१५०॥

नाग , कृकल , कृर्म . ॥ देवदत्त आणि धनंजय पंचम ॥ हे पंचप्राण सूक्ष्म ॥ पार्वती वो ॥५१॥

श्रोत्रासि श्रवणें वाचेसि वदंणें ॥ चक्षूसी सर्वही देखणॆं ॥ घ्राणासी परिमळ घेणें ॥ आणि स्पर्शणें त्वचेसी ॥५२॥

शब्द स्पर्श रुप रस गंघ परिकरें ॥ ऐसीं ही पंधरा तत्वें सुंदरे ॥ हें सर्व चंद्राचेनी आधारे ॥ जाण देवी ॥५३॥

तंव शक्ति म्हणे जी देवा ॥ माझा प्रश्न सांगितला बरवा ॥ त्रिपदा गायत्रीचा उगावा ॥ बरवा केला स्वामी ॥५४॥

बीज आणि बीजांकुर ॥ आणि चंद्राचा समाचार ॥ हा तो तारजयुगीचां विस्तार ॥ बरवा केला ॥५५॥

चंद्र आकाशीं आपण ॥ आणि चंद्र आयुष्यासी कारण ॥ पूर्णबळ चंद्री गहन ॥ आणि सूर्य भुवन सांगा देवा ॥५६॥

मग देवे सांगुं आरंभिले ॥ आवो चंद्रे चित्त चेतविलें ॥ सूर्य साकार करुन दाखविलें ॥ आदिबीजें ॥५७॥

तो आतां सांगेन सूर्यदेवो ॥ देवी चंचळ चित्त होऊं नेदी जेवों ॥ मज तुझा फिटेल संदेहो ॥ सर्व देखसी तुं ॥५८॥

घाण तत्वाचेनि मेळें ॥ सुर्य वतें ज्याबळें ॥ तेथें स्थूळ पवन मेळें ॥ पंचप्राण पार्वती ॥५९॥

प्रथम प्राण दुसरा अपान ॥ तृतीय समान चवथा उदान ॥ आणि पाचवा व्यान हे पंचप्राण ॥ स्थूळ वायु बोलिजेत ॥१६०॥

हातें होय देणें घेंणे ॥ पायासी चालणॆं फिरणें ॥ गुदें मलोत्सर्ग करणें ॥ उपस्थें जाणें ; लघु -शंका ॥६१॥

हे पांचांचेनी संगे वर्तती ॥ हीं पांच कर्मेद्रियें होतीं ॥ ऐसे जाण तुं पार्वती ॥ आदिमाये ॥६२॥

संकल्प विकल्प करिते मन ॥ प्रतिबोधाचें लक्षण ॥ तो अहंकार ऐसें मिळोन ॥ ते बुद्वि सर्वागातें चेतवी ॥६३॥

तेंच अभिमानलक्षण ॥ तो असे अहंकारु जाण ॥ ऐसे चारी मिळोन ॥ त्यासी अंतःकरण बोलिजे ॥६४॥

विषयभावें वर्तते जागृतीं ॥ निद्रा संधिस्वप्न नाथला स्थिती ॥ सुख निद्रा जे करिती ॥ ते सुषुप्ति जाण ॥६५॥

या तिन्ही अवस्थांते विचारुन वर्तती ॥ तुर्या अर्धमात्रा निगुती ॥ ऐशा चारी अवस्था पंचज्योति ॥ उन्मनी जाण ॥६६॥

जाणें तें तुर्याज्ञान नेणें तें त्रिगुणज्ञान ॥ होय नव्हे करी तो संदेह पूर्ण ॥ अनारिसा उफरटा करी तो विप्र हो जाण ॥ विसरिजे ते विस्मृती ॥६७॥

अज्ञान तें संदेह ॥ विप्र हो विश्वमूर्ती हे ॥ विकल्प चारी हे ॥ जाणावें पैं ॥६८॥

भोंगे वतें राजसाहंकार ॥ वोखटे न तो सात्विकाहंकार ॥ हिंसा वर्ते तो तामसाहंकार ॥ जाण देवि ॥६९॥

ऐसे हे अहंकार राजस सात्विक तामस ॥ हेच ब्रह्या विष्णु रुद्रांचे अंश ॥ यांपासुन जगत्रयास ॥ उत्पत्ति होतसे ॥१७०॥

आतां पंच भुतांची उत्पत्ति ॥ होय ते देवी संगेन तुजप्रति ॥ तीं एकमेकांप्रती जन्मती॥ तें ऐक देवि ॥७१॥

शून्य ब्रह्यांडापासून ॥ आकाश जन्मलें तेथून ॥ सर्व जनां त्यापासून ॥ जन्म झाला ॥७२॥

त्या आकाशी जन्मला पवन ॥ मग तेज जन्मलें त्यापासून ॥ ऐसें एकमेका प्रसवुन ॥ भूतसृष्टी जाहली ॥७३॥

मग तेजीं आप जन्मलें ॥ पृथ्वीतत्व आपें जाहले ॥ पृथ्वीतत्वीं रोपिलें ॥ सर्व बीज हो ॥७४॥

ऐसे नाहीं पैं शून्य झालें ॥ सर्व ब्रह्याचि विस्तारलें ॥ ईश्वर तत्व पूंजाळलें ॥ मूळ मंत्रेसी ॥७५॥

जीं पंचमुखें ईश्वरासी ॥ तीं प्रसवली तत्वांसी ॥ ते एकचित्तें परियेसीं ॥ पार्वती वो ॥७६॥

श्रीमुख क्च्छपमुख ॥ जबुंकमुख वृकमुख ॥ दर्दूर मुख हें पंचंम मुख ॥ आतां उत्पत्ति सांगेन ॥७७॥

ईशान तो आकाश ॥ वायु तो तत्पुरुष ॥ अघोर तो तेजप्रकाश ॥ वामदेव तो आप म्हणिजे ॥७८॥

पृथ्वी सद्योजातापासुनी ॥ ऐसे एक ब्रह्ययाहोउनी ॥ सर्व तें जाणिजें मनीं ॥ आकारु जाहला ॥७९॥

प्रथम मुख ईशान ॥ द्वितीय तत्पुरुष , अघोर तीन ॥ चतुर्थ वामदेव जाण ॥ आणि पंचम सद्योजात ॥१८०॥

हीं पांच मुखें जाणी ॥ यांपासूनी तत्वांची उभावणी ॥ येणेचिं अनुक्रमें गगनी ॥ विलय पावती ॥८१॥

हे नादबिंदासी व्यापक ॥ यांतेच म्हणिजे आकारिक ॥ आतां सांगेन आणिक ॥ रुपारुक्ष भक्षी ॥८२॥

पृथ्वी जाण आपीं विरे ॥ तैसेंचि आप तेजीं मरे ॥ तेज वायुसी समरे ॥ वायु निरालंबी सामावे ॥८३॥

जैसी दीप -कळिका सामावे गगनीं ॥ तैसी ते जाय हारपोनी ॥ तैसी भूतें भूतांतें गिळूनी ॥ शून्याचि उरे ॥८४॥

ऐसा संकोच विकास ॥ द्वैताद्वैत भासाभास ॥ यावेगळा जो प्रकाश ॥ तें रुपा -तीत ॥८५॥

एवं हे पद पिंडब्रह्यांड झालें ॥ रुपातीत बोलिलें ॥ उत्पत्ति प्रलयासी सांगितलें ॥ आदिशक्ति वो ॥८६॥

मग इतुकियावरी ॥ पार्वती देवासी प्रश्न करी ॥ तें ऐकावे पुढारी ॥ म्हणे श्रीशंकर ॥१८७॥

इति श्रीशिवनिबंधे ईश्वरपार्वती संवादे प्रथमोऽध्यायः ॥१॥

श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP