सोमवार प्रातःस्मरण - प्रारंभी विनंति करु...

हरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .


प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा । अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा ॥

चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी । हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥१॥

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे । माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ॥

माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे । गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥२॥

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते । ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ।

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ॥

तव भक्तिलागी तनु ही झिजू दे ।

तव चरणकमली मन हे निजू दे ॥

तव भजनी ठेवी ही वाचा रिझाया ।

नमस्कार माझा तुला गुरुराया ॥१॥

१ )

धन्य श्रीहरिमंदिर । आमुचे धन्य श्रीहरिमंदिर ॥धृ॥

सर्वतोमुखी एकचि चाले । हरिनामाचा गजर ॥१॥

भूलोकीचा स्वर्ग असे हा । दुःख नसे तिळभर ॥२॥

बद्धजीवांचे त्रिताप निववुनि । देई सदैव आधार ॥३॥

मुमुक्षूते निजबोध देई । व्हावया भवनदीपार ॥४॥

साधका सुलभ साधन दावी । दे शांति सत्वर ॥५॥

शरणागतांसी ब्रह्मोपदेशे । जाणविते अमर ॥६॥

ज्यापासुनि मी सुखी जाहले । असो विजय निरंतर ॥७॥

भजन - गुरुराया मजवरी करी करुणा । तुजविण शरण मी जाऊ कुणा ॥

२ )

उठा उठा हो भाविकजन , गंगेमाजी करा स्नान । विश्वनाथाचे घ्या दर्शन , त्रिविधताप निवतील ॥१॥

स्मरता सदाशिव मायबाप , जाय चित्ताचा संताप । आनंद होय अमूप , विघ्नसंकटे हरतील ॥२॥

कृष्णा , वेण्या , तुंगा , नर्मदा , भीमा , तापी , शरयू , गोदा । येती शिवदर्शना सदा , त्या पावन करतील ॥३॥

भोगा , यमुना , सरस्वती , घटप्रभा , नेत्रावती । सांबदर्शनासी येती , तुम्हा सहज भेटतील ॥४॥

पाहोनि माध्यान्हसमय , स्नाना ये गुरु दत्तात्रय । हर्षे डोले गंगामाय , कलिमल दूर होय म्हणुनि ॥५॥

भजन - गुरुवरा सदगुरुवरा , येउंदे करुणा तुला रे मायबाप ॥

३ )

हरिभजना विस्मरलो रे । देहसुखा अनुसरलो रे । धनसुतदारा मोहित होउनि । अविचारे बहु रडलो रे ॥१॥

त्रिविधतापे पोळलो रे । सुपथ न मिळता गळलो रे । बहु जन्मीचे पुण्य फळले । सदगुरुचरणी लोळलो रे ॥२॥

प्रेमामृते भिजलो रे । दैवी गुणांनी सजलो रे । कनवाळु सदगुरुमायकृपेने । आनंदसेवनी धजलो रे ॥३॥

गुरुपदाची जोड रे । पुरवी जीवीचे कोड रे । कलिमलदहनसदगुरुस्मरणे । शेवट झाला गोड रे ॥४॥

भजन - मजला उध्दरि सदगुरुनाथा श्रीगुरुनाथा , तू मायबाप दीनांचा ॥

४ )

तू दयाळु दीन हौ तू दानी मै भिकारी । हौ प्रसिध्द पातकी तू पापपुंजहारी ॥१॥

नाथ तू अनाथ को अनाथ कौन मोसो । मो समान आरत नही आरत हर तो सो ॥२॥

ब्रह्म तू हौ जीव हूं ठाकूर हौ चेरो । तात मात गुरु सखा तू सब विधि हित मेरो ॥३॥

तोहि मोहि नातो अनेक मानिले जो भावे । जो त्यो तुलसी कृपाल चरण शरण पावे ॥४॥

भजन - जगदीशा , जय जय पुराणपुरुषा । सदगुरु धाव बा ॥

५ )

भेटेना गुरु भेटेना । सखी ।धृ०।

तनधनगृहदारासुतविषयी । मन कदापि विटेना ॥१॥

त्रिविधतापे पोळलो भारी । लोटता काळ लोटेना ॥२॥

मार्ग दिसेना चैन पडेना । आशापाश तुटेना ॥३॥

काय करु मी कोणा सांगू । दुःख पोटी साठेना ॥४॥

बोध मिळेना दुःख टळेना । घोर भवांबुधि आटेना ॥५॥

कलिमलदहन गुरुबोधाविण । भवभ्रमपट फाटेना ॥६॥

भजन - श्रीकृष्ण चैतन्यप्रभु नित्यानंदा । हरेराम हरेकृष्ण राधेगोविंदा ॥

६ )

संतमांदी जाउनि मिळू । सगुण अगुण हरिमय जे झाले , त्यांच्या पायी लोळू ।धृ०।

हरिभक्तीचे तेज फाकते , अंगी चितसुख - कळा चमकते । त्या पाहुनि निजशांति लाजते , त्यांच्या पायी लोळू ॥१॥

जिकडे जाई त्यांची दृष्टि , तिकडे होई कृपामृतवृष्टि । ज्यांच्या वचने तुष्टी पुष्टी , त्यांच्या पायी लोळू ॥२॥

शांतिमंदिरी सदा क्रीडती , अज्ञजनांसी ते जागविती नाही मानाची ज्या प्रीति , त्यांच्या पायी लोळू ॥३॥

ऐसे जे ते साधुसंत , अखंड प्रेम मूर्तिमंत । दीनांचे हितकारी आप्त , त्यांच्या पायी लोळू ॥४॥

राया रंकावरी सम प्रेम , हाचि ज्यांचा प्रेमोद्यम । कृष्णदासाचे सुखधाम , त्यांच्या पायी लोळू ॥५॥

भजन - तुमबिन गुरुजी मै निराधार । अनाथ को मुझे देवोजी आधार ॥

७ )

गुरुबिन कौन बतावे बाट । बडा बिकट यमघाट ॥१॥

भ्रांति की बाडी नदियां बिचमो । अहंकारकी लाट ॥२॥

मदमत्सरकी धार बरसत । मायापवन घनदाट ॥३॥

कामक्रोध दो पर्बत ठाडे । लोभचोर संगात ॥४॥

कहत कबीर सुन मेरे गुनिया क्यौं करना बोभाट ॥५॥

भजन - सच्चिदानंद कृष्ण सच्चिदानंद ॥

८ )

श्रीसंतांचिया माथा , चरणावरी माझा । देही भाव दुजा , नाही नाही ॥१॥

नामाचे चिंतन , करिती सर्व काळ । ते माझे केवळ , मायबाप ॥२॥

मायबाप म्हणो , तरी लाजिरवाणे । चुकविले पेणे , संतजनी ॥३॥

ज्या ज्या जन्मा यावे , मायबापे दोन्ही । परि संत निर्वाणी , मिळती ना ॥४॥

येचि देही डोळां , संतांसी देखिले । एकाजनार्दनी वंदिले , चरण त्यांचे ॥५॥

भजन - चला चला रे सर्व मिळोनि श्रीहरिमंदिरी जाऊ , तेथे हरिनाम घेऊ । माळ हरिगळां वाहू ॥

९ )

शेवट गोड करी । गुरुराया ॥धृ०॥

पंचविषयी आसक्त होउनि । बनलो मी अविचारी ॥१॥

अनन्यभक्ति दान देउनि । करी मज सुविचारी ॥२॥

तवपदकमलामोद सेवुनि । राहीन निरंतरी ॥३॥

कलिमलदहना पदरी घे दीना । तूचि माझा कैवारी ॥४॥

भजन - महाराज सिध्दारुढ माउली ॥

आरती -

१ ) काकड आरती माझ्या प्रेमळ सिध्दा ओवाळू । अनन्यभावे शरण जाउनि आज्ञेसी पाळू ॥धृ०॥

तुजविण कोणी न वाली म्हणुनि तत्पायी लोळू । गुरुचरणाच्या बळकट ध्यासे विघ्नाते टाळू ॥१॥

ओल नाही ते फोल बोलणे क्षणोक्षणी गाळू । गुरुगुण सुंदर गीत सदोदित ह्रदयात घोळू ॥२॥

सदभाव सदभक्तिचा अरि दुःसंग वगळू । सदा गुरुभजनी रत होउनि निंदास्तुति गिळू ॥३॥

अहर्निशी गुरुबोधश्रवणे द्वैतभाव कोळू । कलिमलदहनकृपामृत पिउनि निजानंदे डोलू ॥४॥

२ )

ओवाळू आरती माता कलावती । पहाता तुझी मूर्ति मनकामनापूर्ति ॥धृ०॥

भावे वंदिता तव दिव्य पाउले । संसारापासुनि माझे मन भंगले ॥

तुझ्या भजनी नित चित्त रंगले । झाली ह्रत्तापाची पूर्ण शांति ॥१॥

गौरवर्ण तनुवरि शोभे शुभ्र अंबर । दर्शनमात्रे लाभे आनंद थोर ॥

भाषणे सकल संशय जाती दूर । विशालाक्ष मज दे गुणवंती ॥२॥

घालीन लोटांगण , वंदीन चरण , डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।

प्रेमे आलिंगीन , आनंदे पूजीन , भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥

त्वमेव माता च पिता त्वमेव , त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव , त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात ।

करोमि यद्यत सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ॥३॥

नमोऽस्तु अनंताय , सहस्त्रमूर्तये , सहस्त्रपादाक्षशिरोरुबाहवे , सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते , सहस्त्रकोटीयुगधारणे नमः ॥

विज्ञापना - हे विश्वजनका , विश्वंभरा , विश्वपालका , विश्वेश्वरा ! माझ्या मनाची चंचलता दूर कर . हे सर्वव्यापी , सर्वसाक्षी , सर्वोत्तमा सर्वज्ञा ! तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे . हे प्रेमसागरा , प्रेमानंदा , प्रेममूर्ते , प्रेमरुपा ! माझे दुर्गुण नाहीसे करुन शुध्दप्रेमाने ह्रदय भरु दे . हे ज्ञानेशा , ज्ञानमूर्ते , ज्ञानांजना , ज्ञानज्योति ! तुझ्या चरणी माझी श्रध्दा भक्ति दृढ कर . हे मायातीत , मायबापा , मायाचालका , मायामोहहरणा ! समदृष्टि आणि अढळ शांति मला दे . हे कमलनयना , कमलाकांता , कमलानाथा , कमलाधीशा ! माझ्या नेत्रांना सर्व स्थावरजंगमात तुझे दर्शन घडू दे . माझे कान तुझे कीर्तन श्रवण करु देत . हे पतितपावना , परमेशा , परमानंदा , परमप्रिया माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे . तुझ्याभोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत . हे गुरुनाथा , गुरुमूर्ते , गुरुराजा , गुरुदेवा ! माझे मन निरंतर तुझे ध्यान करु दे . तुझ्या चरणकमली मला अखंड थारा दे .

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP