TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

रोगोपचार - हगवनीचा उपचार

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


हगवनीचा उपचार

असवंद रस मदासि दिजे स्तुराहे ॥

आडळसी याचा रस मदासी दिजे रक्त राहे ॥

पोईचा रस अजमोदा राळ धाय फूल सुंठि जायफळ सम भाग चूर्ण करुण देने संग्रहणी शमे ॥

बाबळेच्या डिरियासि लवण वाटून देणे संग्रहणी शमे ॥

दाळिंबफळ जिजे ताके वाटून दिजे रक्त राहे ॥

वज्रमुळी दहियासि दिजे हगवन राहे ॥

पोस्त जायफळ सुंठि पाणियासि दिजे हागवन जाये ॥ रक्त थांबे ॥

कोळसा बीज ३ राळ वस्त्रगाळीत किजे गाइचे दह्यासि दिजे रक्त राहे ॥

धावडि याचि सालि काथ दहियासि दिजे रक्त राहे ॥

वेखंडाचि मसि निंबात घालून दिजे रक्त राहे ॥

तिळवनीचि पाने ७ मिरे ७ पानियेसि दिजे रक्त थांबे ॥

जायफळ अर्ध हिरव भाजल मदासि दिजे रक्त राहे ॥

बिबवेटाक ९ मेथि पाव टाक हिंग टाक ३ सुंठि टाक ९ इतुके तुपाचा भांडा घालून मवागि कढवजे बिबव्याचे तेल वोखदास जिरे ऐसे किजे ते वोखद टाक १ चूर्ण दहियासी दिजे हगवन मुरडा राहे ॥ मोहाचा ढिग दिजे हगवन राहे ॥

तुपटीबरा दिजे संग्रहणी जाये १ वडाच्या पांब्याचा काढा तुपप्रति पाके दिजे हगवन राहे ॥

आकोल मुळाचे चूर्ण करूनटाक तांदुळाचे धुवनेसी दीजे संग्रहणी रक्त राहे ॥

अतिसार वमे ॥ घेटूळिमूळ मेडसिंगचूर्ण करूण देने मोंढिचे दुधेसि संग्रहणी जाय ॥

काळामुळा वेखंड मदसी चूर्ण करूण निंबरसे दिजे संग्रहणी रक्त राहे ॥

विषखापरि ताकासि दिजे मुरडा राहे ॥ सुंठि वैरागडे मीठ करणीकरूण ताकासि दिजे आव मुरडा राहे ॥

रानद्राक्षेयाचि मुळि वासनेचि मुळि गाइचे दह्यासि दिजे हागवन राहे ॥१॥

मोहाचि अंतरसाल दह्यासि दिजे रक्त राहे ॥ भद्रमुस्ता पिकले केळ कुडाचून दिजे अतिसार नासे ॥

हिरडा हिंग तुपांत तळून मिठाचा रज वाटून दह्यासी दीजे हगवन राहे ॥ जायफळ मोठे कोरून अहिफेटा ॥

घालून वरि कनकिने लेप करूण कनीक जळे तो वर पाकिजे मग फोडून जायेफलाचा भुरका कीजे त्यांत सुंठ टाक ॥४॥

हेहि अर्धी हिरवी अर्धी भाजला हिंग ॥

येकत्र चूर्ण कुडि पाकुन तूप तळउन दिजे पथ्य तूप भात चळवळीत दिजे रक्त राहे अतिसार शमे ॥

राळ भाग साकर दिजे अतिसार शमे ॥ आंबि अंतरसाल वाटून वरि चुला घालून दिजे हगवन रक्त थांबे ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-06-23T04:41:12.3770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गोंधळ केला माकडांनी, त्‍यांत दारूची मेजवानी

  • माकडास जर गोंधळ घालावयास बोलावले व त्‍यांत त्‍यास प्रथम दारूची मेजवानी देऊन नंतर गोंधळ घालण्यास सांगितले तर जी गडबड, दंगा वगैरे होईल तो पुसूंच नका. तु०-आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। 
RANDOM WORD

Did you know?

Why Cows are considered secred in Hinduism?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.