विवेकसार - चतुर्दश वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


॥ अथ ज्ञानाज्ञान प्रकरण प्रारंभः ॥

श्रीमद्दिव्य लक्ष्मी नृसिंहाय नमः ॥

ज्ञानाज्ञाने विचार्येते कारणे बंधमोक्षयोः ॥

अनुग्रहार्थ लोकांना मया शास्त्रं प्रदश्यर्त्त ॥१॥

ज्ञानस्वरूप जे त्यातें अज्ञानस्वरूप जें त्यातें विचारितों ॥ ज्ञान म्हणतां कोणतें ॥ अज्ञान म्हणतां कोणते म्हणाल तरि ॥ आपण आपणास यथार्थत्वेंकरून जाणव्याचे ज्ञान ॥ आपणास आपण अन्यथा जाणणें अज्ञान ॥ आणखीं या ज्ञानाज्ञानातेच विशेषेंकरून विचारिती ॥। मींच ब्राह्मण म्हणून जाणाव्याचे ज्ञान ॥ मीं मनुष्य म्हणून जाणाव्याचें अज्ञान ॥ आणखीही ज्ञान म्हणतां कोणतें ॥ अज्ञान म्हणतां कोणतें ॥ म्हणून विशेषेंकरून विचारें करितों ॥ अज्ञान म्हणतां कोणते म्हणाल तरि अद्वितीय ऐसा जो आत्मा ॥ त्यातें सद्वितीयत्व ऐशातें ॥ असंग जो आत्मा यातें संगी ऐशातें ॥ अकर्ता जो आत्मा याते कर्ता ऐशातें ॥ अभोक्ता जो आत्मा यातें भोक्ता ऐशातें ॥ जें भासवितें तें अज्ञान ॥ ज्ञान म्हणतां कोणते म्हणाल तरि ॥ अद्वितीय आत्मा जो तो अद्वितीयत्वेंच करून भासणें ॥ असंग जो आत्मा जो तो असंगत्वेंकरून भासणें ॥ अकर्ता जो आत्मा जो तो अकर्तृत्वेंकरून भासणें ॥ अभोक्ता जो आत्मा जो तो अभोक्तृत्वेंकरून भासणें ॥ याप्रकारें भासणें जें आहे तें भासणें जें तेच ज्ञान ॥ ऐसें तरि अद्वितीय आत्मा जो त्यातें सद्वितीय म्हणून जाणाव्याचें अज्ञान म्हणुन बोलिलेत ॥ तैसेच द्वितीयत्वेंकरून भासतो काय म्हणाल तरि भासतो ॥ तुं म्हणुन मी म्हणुन देवदत्त म्हणुन विष्णुमित्र म्हणून याप्रकारें अनेकविधेंकरून भासाव्याचें जें आहे तें अज्ञान ॥ ऐसें तरि अपरिछिन्न जो आत्मा त्यातें परिच्छिन्नत्वेंकरून जाणणें हें अज्ञान म्हणून बोलिलेत ॥ तैसे परिच्छिन्न होत्साता दिसतो काय म्हणाल तरि ॥ या घरामध्यें होतो या घरामध्यें नोहतों ॥ या देशीं होतां या देशी न होतो ॥ म्हणून परिच्छिन्न होत्साता भासाव्याचें जें आहे तें अज्ञान ॥ ऐसे तरि ॥ असंग जो आत्मा यातें संगीत्वेंकरून जाणनें तें अज्ञान ॥ म्हणुन बोलिलेत ॥ तैसे संगी होत्साता भासतो काय तरि ॥ त्यास मिळुन होतों त्यासीं मिळून न होतों ॥ याप्रकारें संगी होउन भासाव्याचें अज्ञान ॥ ऐसें तरि अकर्ता जो आत्मा यातें कर्ता ऐशातें जाणनें जरि अज्ञान म्हणुन बोलिलेत ॥ तैसें कर्ता होऊन भासतो काय म्हणाल तरि ॥ म्यां स्नान केलें म्यां संध्या केली म्यां जप केला म्यां अग्निहोत्र केले म्यां अग्निष्टोम केला याप्रकारें कर्ता होत्साता भासाव्याचे ऐसें ॥ तरि ॥ अभोक्ता जो आत्मा यातें भोक्ता ऐशातें जाणाव्याचे अज्ञान म्हणुन बोलिलें तैसें भोक्ता होत्साता भासतो काय म्हणाल तरि ॥ म्यां भोजन केलें म्यां अपूप भक्षिले ॥ म्यां केळे भक्षिली ॥ म्यां अंबे भक्षिले म्हणून भोक्ता होत्साता भासाव्याचें अज्ञान ॥ संदेह नाहीं सिद्ध ॥ ऐसें जरि अद्वितीय जो आत्मा यातें अद्वितीयत्वेंकरून जाणनें हें ज्ञान म्हणुन बोलिलेत ॥ तैसें अद्वितीय होत्सातां भासतो काय म्हणाल तरि ॥ भासत आहे ॥ कैसे भासतो म्हणाल तरि आत्म्यास अद्वितीयत्व जें तें कोणतें म्हणाल तरि ॥ आत्मा अद्वितीय होत्साता भासतो काय म्हणाल तरि ॥ भासत आहे ॥ कैसे भासतो म्हणाल तरि आत्म्यास अद्वितीयत्व जें तें कोणते म्हणाल तरि ॥ आत्मा अद्वितीय होत्साता भासतो म्हणुन बोलावें ॥ याकरितां आत्म्यास अद्वितीयत्व म्हणजे कोणते म्हणाल तरि ॥ सजातीय विजातीय स्वगत भेद रहितत्व अद्वितीयत्व ॥ तें कैसें म्हणाल तरि दृष्टांतपूर्वक निरोपितों ॥ तो दृष्टांत कोणता म्हणाल तरि ॥ वृक्ष जो दृष्टांत तो इष्टांतभूत जो वृक्ष त्याचे ठांइं सजातीय स्वगत जें त्यातें आहे म्हणायाचे बोलून ॥ दार्ष्टांतिक जो आत्मा याचे ठांइं सजातीय विजातीय स्वगत जे त्यांतें त्याचा भेद जो त्यातें नाही म्हणुन श्रूती बोलते ॥ नव्हे हो आत्म्याचे ठाईं सजातीय स्वगत जें ते त्याचा भेद जो तो प्रसक्त जाहला तरि ॥ आत्म्यास सजातीय विजातीय स्वगत त्याचा जो भेद नाही म्हणुन श्रुतीनें बोलावें ॥ प्रसक्त जाहालें काय म्हणाल तरि प्रसक्त जालें ॥ कैसें प्रसक्त जालें म्हणाल तरि ॥ वस्तूत्व सामान्येंकरून भासतें ॥ वस्तूत्व समजतां म्हटिलें तरि काय म्हणाल तरि ॥ आत्मा येक वस्तू अनात्मा येक वस्तू ॥ ऐसें भासतें ॥ वस्तूसमानता ॥ त्या अनात्म वस्तूचे ठांइं सजातीय विजातीय स्वगत त्याचा भेद आहे म्हणून अनात्माही येक वस्तु म्हणुन त्या अनात्म वस्तुचे ठांइं सजातीय विजातीय स्वगतहि त्याचा भेद प्रसक्त जाला म्हणुन ॥ आत्म्याचे ठांइं सजातीय विजातीय स्वगत त्याचा भेद नाही म्हणून श्रूति निराकरण करिते ॥ श्रुतिच्या बोलण्यावरून हा अर्थ आमच्या बुद्धीचे ठांइं कैसा अरूढ होईल ॥ विचार केल्यानें होईल ॥ ते कैसे म्हणाल तरि ॥ आत्मा म्हणिजे सद्रूप कीं ॥ सद्रूप ऐसा जो आत्मा यास सदंतर नाही म्हणून सजातीय भेद नाहीं ॥ नव्हे हो तुं आहेस मीं आहे ॥ पृथ्वी सत्य आप सत्य तेज सत्य वायु सत्य आकाश सन् याप्रकारें सदासच अनेक भेद जो तो म्हणून आत्म्यास सजातीय भेद नाही ॥ ऐसे कैसे बोलावें म्हणाल तरि ॥ सर्वत्र सन् सन् ऐसें सद येक होऊन आहे म्हणून आत्म्यास सजातीय भेद नाही ऐसें बोलूं ये ॥ नव्हेही सद येकरूप होऊन आहे कीं त्यास भेद नाही म्हणून बोलिलेत ऐसे तरि घट घट म्हणण्याचेंही येकरूप आहे तेथेंही भेद जो तो नसिला पाहिजे भेद तरि आहे ॥ म्हणून सदासही येकरूपत्वेंकरून सजातीयही सजातीय भेदहि नाही ऐसें बोलता नये ॥ ऐसें तरि त्या घटादिकाचे ठांई आकार वैलक्षण्य आहे म्हणून तेथें सजातीय सजातीय भेदही आहे ॥ सदाचेठाई तरि आकारवैलक्षण्य नाही म्हणून सजातियही सजातियभेदही नाही ॥ या कारणास्तव सद्रूप जो आत्मा यास सजातीयही सजातियभेदही नाही ॥ऐसें तरि सदा ऐसा जो आत्मा यास विजातीय विजातीय भेदही आहे म्हणून बोलसील तरि आहे किंवा नाहीं ऐसा विचार करूं ॥ आत्मा म्हणता कोण ॥ तरि आत्मा सद्रूप कीं ॥ तो सद्रूप आत्मा जो त्यास विजातीय कोणतें म्हटिलें तरि असत् ऐसा जो प्रपंच जो तो सद्रूप आत्मा जो यास सद्वितीयत्व जें त्यातें संपादुं शकेना ॥ कैसे संपादु शकेना तरि दृष्टांतपूर्वक करून बोलतों ॥ असद्रूप जो वंध्यापुत्र मातेस पुत्रवती ऐसी जैसे करू शकत नाही ॥ तैसेच असद्रूप जो प्रपंच तोही सद्रूप ऐसा जो आत्मा यास सद्वितीयत्व जे त्यातें संपादु शकेना ॥ याकारणास्तव सद्रूप जो आत्मा यास विजातीयही विजातीयभेदही नाही ॥ ऐसे तरि सच्चिदानंदेकरून आत्म्यास स्वगतही स्वगतभेद भासतो म्हणाल तरि भासत नाहीं ॥ नव्हेहो वृक्षास पत्र पुष्प फळादिक जे तेहीकरून प्राप्त जो स्वगत स्वगतभेद जो तो जैसा आहे तैसेंच आत्म्यासही सच्चिदानंद जे तेही करून स्वगत स्वगतभेदही आहे ऐसे बोलसिल तरि ॥ दृष्टांभूत जो वृक्ष याचा ठाइं पत्र पुष्प फलादिक जे तेहीकरून स्वगतही स्वगतभेदही प्रत्यक्ष करून भासतो ॥ त्या वृक्षास स्वगत स्वगतभेदही आहे दार्ष्टांतिक जो आत्मा तो तरि सच्चिदानंदस्वरूपआहे ॥ शब्दमात्रेंकरून भेद दिसला जरि त्या सच्चिदानंदेकरून प्रत्यक्ष भेद नाही ॥ म्हणून त्या सच्चिदानंदेंकरून आत्म्यास स्वगत स्वगतभेदही नाही ॥ नव्हेहो सच्चिदानंद जे तें शब्दमात्रभेदेकरून हस्त कर पाण शब्दाचेसारिखें पर्यायशब्द नव्हेत म्हणून शब्दभेदेंकरून अर्थभेद जो आहे यास्तव सच्चिदानंदास भेद आहे ॥ या कारणास्तव सच्चिदानंदेकरून आत्म्यास स्वगतही स्वगतभेदही आहे म्हणून बोलसील तरि सच्चिदानंद जे त्यास शब्दभेद अर्थभेद असिला जरी ॥ त्या सच्चिदानंदास भेद नाही ॥ ऐसे दृष्टांतपूर्वकरून बोलतो ॥ तो दृष्टांत कोणता म्हणाल तरि ॥ अग्निचेठाइं लोलितोष्णप्रकाश ती प्रकारिचे आहेत ॥ हे तीप्रकारिचे लोलितोष्णप्रकाश जे ते शब्देकरून भिन्नासारिखे देखिले जरी या शब्दास अर्थभेद भासला जरी ॥ हस्त कर पाणि शब्दासारिखें पर्यायशब्द न होऊन हे लोलितोष्णप्रकाश जे ते अग्निचे जैसें स्वरूप जाहाले ॥ तैसेच सच्चिदानंद जे तेही सद म्हणून चिद म्हणून आनंद म्हणून भिन्नासारिखें भासलें जरि या शब्दास अर्थभेदही आहे सारिखे भासले जरी हस्त कर पाणि शब्दासारिखे पर्यायशब्द न होउनही हे सच्चिदानंद जे तें आत्म्याचे स्वरूपच संदेह नाही सिद्ध ॥ दृष्टांतभूत जो अग्नि त्यांचें स्वरूप ऐसें लोहितोष्णप्रकाश जें त्यास एकासमयाचा ठाइं प्रत्येक्षेकरून प्रतिबंध जो तो देखिजेतो म्हणून त्यास धर्मत्व गुणत्व बोलिल्याने बोलूं ये ॥ दार्ष्टांतिक जो आत्मा याचेठाइं तरि या सच्चिदानंदास सर्वात्मना भेद जो तो बोलता नयें ॥ का बोलता नये म्हणाल तरि श्रुतिस विरोध येतो म्हणूनही आत्मा निरवएव म्हणूनही बोलता नये ॥ याकारणास्तव सच्चिदानंद जे ते अखंड ॥ अखंड म्हणून अद्वितीय ॥ ते कैसे म्हणाल तरि सद आपणच भासतें म्हणून तेच चिद जालें ॥ तें चिद्रूप जें सद तें अद्वितीय आहे ॥ म्हणून आनंद जालें ॥ याकरितां सच्चिदानंदास भेद नाही म्हणून आत्म्यास अद्वितियत्व सिद्ध ॥ नव्हेहो युक्ति युक्ति ऐसा अनुभव नसून या बोलिल्या गोष्टीच करून आत्मा अद्वितीय म्हणायाचे बुद्धीचेठाइं कैसे आरूढ होइल ॥ म्हणाल तरि विचार केलियानें बुत्धीचेठाइं आरूढ होईल ॥ ते कैसे म्हणाल तरि ॥ नाही ते वस्तु आहे म्हणून बोलतां नये ॥ ऐसियास सद आहे म्हणायाविषइं संदेह नाही ते सद भासतें की भासत नाही म्हणाल तरि ॥ न भासणार ऐसी वस्तु जे ते आहे म्हणायाच्या व्यवहारास विषय नव्हे ॥ म्हणून सद्रूपच भासतें म्हणून बोलावें ॥ ते भासताहे जें सद आणखी करून भासते किंवा आपणच भासते म्हणाल तरि आपणच भासते म्हणून बोलिल्यानें सदच चिद ऐसे सित्ध होतें ॥ नाहींतर अन्येंकरून भासते ऐसें बोलिल्यानें त्या सदास भासवणार जे अन्य ते सदंतर किंवा सद्विलक्षण म्हटिलें तरि ॥ सदंतर ऐसें बोलिल्यानें ते सदंतर जे तें आपण निकृष्ट होउन असुन त्या सदातें भासवितें ॥ किंवा समान होत्साते असुन सदातें भासविते ॥ किंवा येकेंकरून अतिशयातें पाउन त्या सदातें भासवितें ॥ किंवा येकेंकरून अतिशयातें पाउन त्या सदातें भासवितें ॥ किंवा आपणच भावरूप असुन त्या सदातें म्हणुन विचार करूं ॥ आत्मस्वरूप ऐसें सद जें त्यातें भासवीत होत्सातें आहे जें सदंतर जे तें त्याहुन निकृष्ट असायचा दिवा जो तेणे सुर्यातें भासविले पाहिजे ॥ तैसे भासवित नाहीं ॥ याकरितां ते सदंतर जे तें सदांहुनि निकृष्ट असुन त्या सदातें भासवितें म्हणून बोलता नये ॥ ऐसें जरि तं सदंतर जें तें सदासमान होउन असुन सदातें भासवितें म्हणून बोलिल्यानें दिव्या समान होत्सातें असा याचे दीपांतर जो तेणे त्या दिव्यातें भासविलें पाहिजे ॥ तैसें भासवित नाहीं ॥ म्हणुन सदंतर जे तें सदासमान होत्सातें असुन त्या सदातें भासवितें ऐसें बोलता नये ॥ ऐसे तरि तें सदंतर जे तें आपण येकाकरून प्रकाशातिशयातें पाउन त्या सदातें भासवितें म्हणून बोलुं तरि त्या सदंतरास प्रकाशातिशयातें संपादणार ऐसी जे वस्तु ते सद् किंवा असद् ऐसें बोलतां नये ॥ ते सद ऐसे बोलूं तरि ॥ ते सप्रकाश किंवा अप्रकाश ऐसें बोलता नये ॥ ऐसियास तें सप्रकाश ऐसें बोलूं तरि ॥ सप्रकाश ऐसें जें सद् तेचि जालें म्हणून सदास सप्रकाशत्वातेंही अद्वितीयत्वातेंही वेदांत्याहून अन्य जे तेहि अंगिकार केला नाही म्हणून ते आत्मस्वरूप सद जे त्यातें प्रकाशवणार जे सदंतर त्यास प्रकाशातिशयातें संपादनार सद जें त्यातें सप्रकाश म्हणून बोलतां नये ॥ अप्रकाश बोलूं तरि ॥ अप्रकाश ऐसी वस्तु जे तें आणिखी येका वस्तुस प्रकाशातिशयातें पावावयाचे देखिलें नाहीं म्हणून अप्रकाश ऐसेंही बोलता नये ॥ ऐसे तरि अन्यवस्तुकरून अतिशयातें पाउन तें सदंतर जें तें आत्मसत्तेस भासवितें म्हणून बोलिल्यानें अन्यवस्तु म्हणतां असद म्हणून तैसेंही बोलता नये ॥ ऐसे तरि आत्मस्वरूप ऐसें जें सद जे त्यास प्रकाशातिशयातें संपादनार ऐसे जे सदंतर जे त्यास प्रकाशातिशयाते संपादनार ऐसे सद जे तें आणिखी येक म्हणून बोलावें ॥ तैसें बोलिल्या त्या सदास प्रकाशातिशयातें संपादणार ऐसें सद आणिखी येक ॥ याप्रकारें अनवस्था दोषही ॥ सदास अप्रकाशत्वही येउन अद्वितियत्व बोलनार जे त्यास अपरिहार्य ऐसे कोदंड येउन पडिल्यासारिखें पडतें ॥ लोकाचेठाइंही एकास अतिशयातें संपादणार ऐसी वस्तु जे तें आपण अनतिशय होउन असायाचें ऐसें देखिलें नाहीं ॥ आणिखी कैसे म्हणाल तरि ते ते वस्तु आपण अतिशय होउन असुनच आणिखीं येका वस्तुस अतिशयातें संपादितें म्हणायाचें अग्न्यादिकाचेठाइं देखिलें आहे ॥ म्हणून पक्षत्रयही घडेना ऐसिया सदांतें भासावयाचें सदंतर जें तें आपणच सप्रकाश होत्साते असुन त्या सदातें भासवितें म्हणून बोलावें याप्रकारे बोलिल्यास प्रकाश ऐसें जें सदंतर तें चिद ऐसें सित्ध जालें ॥ अहो ऐसें जालें तरि ॥ लोकाचेठाईं आकाशासारिखें उपाधीविनाकरून सत्ता द्वारें जें तें बोलता नये म्हणून निरूपाधीक ऐसें जें सद तेंच अद्वितिय ऐसें श्रुत्यादिक जे तेहीकरून निरूपिले आहे म्हणून सप्रकाश ऐसें सदंतर जें तेणेंकरून आत्म सत्ता जे ते भासविजेते ऐसे बोलतां नये आणीक कैसें म्हणाल तरि आत्मस्वरूप ऐसें जें सद तेंच सप्रकाश आहे ॥ म्हणून तेंच चिद म्हणून सिद्ध जालें । या प्रकारें न बोलुन घटादिकाहुन विलक्षण ऐसें जें दीपादिक तेहीकरून घटादिकासारिखें सदाहुन विलक्षण ऐसें जे वस्तु तीनें करून सदा भासविजे तें ऐसें बोलुं तरि दृष्टांताचेठाइं घटादीकही दीपादिकही समानसत्ताक होत्साते आहेत म्हणून त्याघटादिकाहुन दीपादिक जे तेंहीकरून घटादिक जे ते भासुंये ॥ दार्ष्टांतिकाचेठाइं तरि सदास विलक्षण वस्तु असद म्हणून त्यास वस्तुत्व जें तें बोलता नये ॥ या कारणास्तव सद्विलक्षण ऐसें असद जें तेणेंकरून सदा भासविजेतें म्हणून बोलता नये ॥ लोकामध्ये आपवर्गकादिकाचेठाइं नाहीत ऐसें जे दीपादिक जे तेहीकरून हे भ्रांतिकरून भासणार ऐसें दीपानेंकत्व जे तेणेकरून हे घटादिक भासताहे म्हणून जैसें बोलता नये ॥ तैसे सदास विलक्षण ऐसें जे असद जे तेणेंकरूनही सद भासते म्हणून बोलता नये ॥ याकरिता लोकांचेठाइं सदातें भासवणार पदार्थ जो तो येकही नाही ॥ म्हणून समस्त पदार्थ जे तेही सदाचेठाइं आरोपीत आहेत म्हणूनही ॥ ते पदार्थ जे ते सदाते उपजीउन भासणें जें तेणेंकरून सद् सप्रकाशच ॥ ते सप्रकाश ऐसें जें सद् तेंच चिद चिदू्रप जें तें त्याहुन विलक्षण होउन असायाची वस्तु असद होउन आहे ते असद जे ते दुसरा पदार्थ होउं न शके याकरितां सद्रूप जे चिद तेच आनंद जाले ॥ लोकाचेठाइं दुसरी वस्तु ज्यास नाहीं ऐसी वस्तु जे तें आनंद होउन असायाचें देखिले आहे काय आहेच ॥ ते कैसे म्हणाल तरि सुषुप्तिचे ठाइं दुसरी वस्तु नाही म्हणून तेच आनंद जालें ॥ जागृतत्स्वप्नाचे ठाइं दुसरी वस्तु आहे म्हणून दुःखचि भासतें जागृतीचे ठाइंही येकांत राह्याचेसमइं दुसऱ्या वस्तुचे अनुसंधान नाही ॥ म्हणून त्यासमइं समस्तास आनंद भासतो ॥ येकांताचाठाइं असणार पुरुष जो तो दुसऱ्यावस्तुतें न स्मरून सुखरूप असिल्या जरी अवश्य करून दुसऱ्या वस्तुचें स्मरण करवणार ऐसें येक शब्दश्रवण तरीं येकरूपदर्शन तरी होत असतां त्याकाळिं भयरूप ऐसें जे दुःख जें तेच भासतें ॥ दुसरी वस्तु भासल्यानें भय आहे ॥ ऐसी श्रुति बोलते द्वितीयाद्वै भयं भवतीति श्रुतेः ऐसेयास सुषुप्तिचेठाइं दुसरी वस्तु भासत नाहीं म्हणून आनंद जाहाला ॥ त्या त्या सुषुप्तिही त्या त्या आनंदाचे ठाइं कल्पित आहेत म्हणून रज्वादिकाचेठाइं कल्पित जे सर्पादिक त्याचेपरि त्या त्या आनंदव्यतिरिक्तत्वे करून नाहीत ॥ याकारणास्तव आत्माच काळत्रइं आहे ॥ म्हणून सद ऐसें प्रकाश होत्सातें आहे म्हणून चिद ऐसें दुसरी वस्तु ज्यास नाही ऐसे म्हणून आनंद ऐसा बोलिजेतें ॥ याकरिता सद्रूप ऐसा आत्मा जो त्यास सदंतर नाही ॥ म्हणून सजातिय नाही ॥ सजातीय भेद नाही ॥ वितातीय तरि असत होउन आहे म्हणुन विजातियही विजातियभेदही नाही ॥ या बोलिल्या ज्या युक्ती ज्या तिहीकरून सदच चिदच आनंद सित्ध जालें ॥ म्हणून स्वगतही स्वगतभेदही नाही याकारणास्तव आत्म्यास सजातीय विजातिय स्वगतभेद नाही ॥ म्हणून आत्मा अद्वितिय ऐसी श्रुति बोलते । युक्ति अनुभवसिद्धच ॥ अद्वितीय आत्मा मी म्हणून मुमुक्षु जो तेणे जाणूये अहो आत्मा अद्वितिय ऐसें श्रुति जैसें आत्मा परिपूर्ण ऐसेंही श्रुति बोलते ॥ म्हणून आत्म्यास परिपूर्णत्व जे ते कैसे म्हणून विचार करितो ॥ आत्म्यास परिपूर्णत्व म्हणिजे व्यापकत्व किंवा अपरिछिन्न म्हटिलें तरि अपरिछिन्नत्वच परिपूर्णत्व ऐसें बोलावें ॥ तैसे काशास बोलावे ॥ विभूत्व किंवा व्यापकत्वच परिपूर्णत्व ऐसें बोलूं तरि स्वकार्यानुत्युतत्व कीं व्यापकत्व ते पृथ्व्यादिकासही आहे म्हणून व्यापकत्व जें परिपूर्णत्व ऐसें बोलतानये ॥ ऐसें तरि विभूत्व जें ते परिपूर्णत्व ऐसें बोलुं म्हणाल तरि ॥ सर्व मूर्त द्रव्य संयोगीत्व कीं विभुत्व तें आकाशादिकास आहे म्हणून विभूत्वही परिपूर्णत्व ऐसें बोलता नये ॥ याकारणास्तव अपरिछिन्नत्व जें तेच परिपूर्णत्व ऐसें बोलावें ॥ हें अपरिछिन्नत्व जे तें परिछिन्न ऐसें पृथ्व्याकाशादिकास नाहीं ॥ आत्म्यास तरि व्यापकत्व जे तें विभुत्व जे तेंही अपरिछिन्नत्व तेही हें तिन्ही आहेत कैसी आहेत म्हणाल तरि पृथ्व्यादिक जे त्यास स्वकार्यभूत ते एसें चतुर्विध भूतग्रामादिक जे त्याच्याठाइं अनुस्युतत्व जैसे आहे तैसे आत्म्यासही स्वकार्य ऐसा जो प्रपंच जो त्याचेठाइं अनस्युतत्व जे तें आहे म्हणून व्यापकत्व जें तें आहे ॥ आकाशादिक जे त्यास सर्वमूर्त्तद्रव्यसंयोगीत्व जैसे आहे ॥ तैसेंच आत्म्यासही सर्वमूर्तद्रव्यसंयोगीत्व जे ते आहे ॥ म्हणून विभुत्वही आहे ॥ ऐसें तरि व्यापक ऐसा जो तोच आत्मा विभू ऐसें बोलुं तरि ॥ याप्रकारें बोलिल्यानें आत्म्यास सद्वितीयत्व होतें ॥ म्हणून अपरिछिन्नत्वचि परिपूर्णत्व बोलावे ॥ ऐसें तरि ॥ पूर्वीं बोलिलें जें अद्वितियत्व तेंच अपरिछिन्नत्व म्हणून बोलित्यासारिखें जालें ॥ तें अद्वितीयत्वच अपरिछिन्नत्व जालें तरी ॥ अणखीं विशेषकरूनि विचार करीतों तें कैसे म्हणाल तरि त्रिविधपरिछेदशुन्यत्व जें तें अपरिछिन्नत्व ॥ ऐसे तरि आत्म्सास परिछेद ऐसें त्रिविध कोणते म्हणाल तरि देश काळ वस्तु ॥ हे देशकाळवस्तु ॥ हे देशकाळावस्तु जे ते तेहीकरून आत्म्यास परिछिन्नत्व जे ते प्रसक्त जाहलें काय म्हणाल तरि ॥ आनादिभ्रांतीकरून प्राप्त जालें ॥ कैसें प्राप्त जालें म्हणाल तरि ॥ या देशीं होती या देशाचेठाइं नो होतो म्हणून देशेकरूनही ॥ मी या संवत्सराचे ठाइं उत्पन्न जालों याउपरि आपण नाहींसा होतो म्हणून काळ जो तेणेंकरूनही ॥ हे वस्तु मी होय हे वस्तु मी नव्हे ऐसे वस्तुकरूनही ॥ आत्मा परिछिन्न होत्साता भासतो भ्रांती करून भासाव्याचें हें परिछिन्नत्व जे ते विचार केलिया नाहींसे होतें ॥ तें कैसे नाहीसे होते म्हणाल तरि बोलु ॥ आत्मा परिपूर्ण होत्साता आहे म्हणुन आत्म्यास देशेंकरून परिछिन्नत्व नाही ॥ आत्मा नित्य होत्साता आहे म्हणून काळेंकरून परिछिन्नत्व नाही ॥ आत्मा सर्वात्म्क होत्साता आहे म्हणून आत्म्यास वस्तुकरून परिछिन्नत्व नाही ॥ अहो आत्म्यास त्रिविधपरिछेदेंशुन्यत्व जे तें अपरिछिन्नत्व नाही ॥ अहो आत्म्यास त्रिविधपरिछेदेंशून्यत्व जे तें अपरिछिन्नत्व जें तें म्हणून काशास बोलावें ॥ देशेंकरून परिछेदराहित्यता जे तेच अपरिछिन्नत्व म्हणुन बोलूं तरि ॥ देशेंकरून परिछेदराहित्यता ते आकाशास आहे म्हणून त्यासही अपरिछिन्नत्व जे ते येइल ॥ आकाशाचें अपरिछिन्नत्व दुरिकरावयाकारणे काळ जो तेणेकरूनही आत्मा परिछेदरहित म्हणून अंगिकार करावा ॥ ऐसे तरि आकाशास काळ जो तेणेकरून परिछिन्नत्व आहे काय म्हणाल तरि ॥ तस्माद्वा एतस्मादात्मन परमार्थाचेठाइं निरवएव म्हणून संमते ऐसे आकाशादिक जे त्यास पृथिव्यादिक जे तेहीसी संग जो तो बोलतां देखिला नाही ॥ संग जो तो आहे म्हणुन बोलिले तरि ॥ जळादिकासि संग करून वस्त्रादिकास आरद्रादिक जैसें येतें तैसे आकाशादिकही पृथिव्यादिकाचे संगेंकरून त्या त्या पृथिव्यादिकाचे विकार दिसले पाहिजेत ॥ तैसें दिसायाचें देखिलें नाहीं ॥ याकारणास्तव तें आकाश्यादिक जें ते पृथ्व्यादिक जें तेहीसी मिळुन असिल्यासारिखेच भासलेजरी तें आकाशादिक जे त्यास पृथ्यादिकांसी जैसा संग नाही ॥ तैसेच आत्माहि भ्रांतीकरून या देहोंद्रियादिक प्रपंचासी मिळुन असनारासारिखें भासला जरी ॥ आत्मा असंगच ॥ व्यवहार काळाचेठाइं परमतातें अनुसरून आकाशादिकास निरएवत्व जे त्यातें अंगिकार करून याप्रकारे करून बोलिला परमार्थेकरून विचार करितां आकाशादि सर्व पदार्थ जे ते भ्रांतीकरून आत्म्याचे ठाइं आरोपीत आहेत ॥ म्हणुन आरोपीत ऐसे जे पदार्थ जे त्यास रज्वादिकाचे ठाइं भासणार ऐसें जे सर्पादिकासारिखे आधिष्ठान आत्म्सत्तास्वरूप होउन आहे ॥ म्हणून आत्मा काळत्रयाचाठाइंही अद्वितीयच या कारणास्तव असंगच या प्रकारें विचार करून असंग जो आत्मा तो मी म्हणून वेदांत सित्धांत ॥ आता आत्म्यास अकतृत्व कैसें म्हणून विचार करितों ॥ अहो आत्म्यास कर्तुत्व प्रसक्त जालें तरि की आत्म्यास अकर्तृत्व कैसें म्हणुन विचार करावा ॥ आत्म्यास कर्तृत्व प्रसक्त जालें काय म्हणाल तरि प्रसक्त जालें ॥ कैसें प्रसक्त जालें म्हणाल तरि देहेंद्रियाचे अध्यासेंकरून ॥ म्या स्नान केलें मी स्नान करावयास जातों म्या जप केला मी जप करावयास जातो म्या अग्निहोत्र केलें ॥ ऐसिया प्रकारेंकरून अनेककर्तृत्व जे तें अध्यासेंकरून आत्मनिष्ठ भासतें ॥ म्हणुन हे कर्तृत्व दुरि करावयाकारणें विचाराची प्रसक्ति जाहली ॥ लोकाचेठाइं कर्तृत्व म्हणता क्रियाश्रयत्व ते कर्तृत्व जे तें परिछिन्न होत्साता संगी होत्साता सावएव होत्साता विकारी होत्साता ऐसा जो पदार्थ त्यातें आश्रयुन असायाचें देखिलें आहे ॥ आत्मा तरि अपरिछिन्नत्व असंग निर्विकारी निरवएव ॥ ऐसा जो आत्मा जो त्यास कर्तृत्व जे ते बोलता नये ॥ यास्तव आत्मा अकर्त्ता म्हणुन बोलुं ये ॥ आत्म्याचें अद्वितियत्व ज्ञान जे तेणेंकरून अकर्तृत्व जे तें सित्ध ॥ सित्ध जालें जरी स्पष्टत्वेकरून जाणावें म्हणुन विशेषेकरून बोलिलें ॥ व्यवहाराचेठाइं स्नानादिक्रियाश्रयत्व जे ते देहादिकांसच पाहिले ॥ व्यापक ऐसें जे आकाशादिक जें याचें ठाइं देखिले नाही ॥ अपरिछिन्न ऐसा जो आत्मा जो त्यास नाही म्हणुन बोलावें काय ॥ भ्रांतीकरून प्राप्त देहेंद्रियादि अध्यास जो तेणेकरून आत्मा कर्त्ता सारिखा भासला जरी विचार करितां आत्मा अपरिछिन्न आहे म्हणून आत्मा अकर्त्ता नाही ॥ संदेह नाही ॥ तो अकर्त्ता ऐसा जो आत्मा मी म्हणोन मुमुक्षु जो तेणे जाणुये ॥ आतां आत्म्यास अभोक्तृत्व कैसे म्हणून विचार करितों ॥ आत्म्यास भोक्तृत्व प्रसक्त जाहालें तरि की अभोक्तृत्व कैसें म्हणून विचार करावा ॥ प्रसक्त जालें काय म्हणाल तरि ॥ प्रसक्त जालें ॥ कैसें प्रसक्त जाले म्हणाल तरि म्या भोजन केलें म्या अनेक भोग भोगिले ॥ ऐसें भ्रातीकरून आत्म्यास भोक्तृत्व भासतें ॥ विचार करितां आत्म्यास भोक्तृत्व नाहीं ॥ कैसें नाही म्हणाल तरि आत्मा अद्वितिय होत्साता आहे ॥ म्हणुन अद्वितिय ऐसा जो आत्मा याहुन अन्य येक वस्तु भोग्य नाही ॥ म्हणुन आत्म्यास भोक्तृत्व बोलतां नये याकारणास्तव आत्मा अभोक्ता संदेह नाहीं सित्ध ॥ अहो लोकाचेठाइ देवदत्तादिक जे ते आपणाहुन व्यतिरिक्त अन्नादिक जे त्यातें भक्षायाचें देखिले आहे ॥ ते देवदत्तादीक जे ते आपणास आपणच भोज्य होत्साते असायाचे कोठें देखिलें नाही ॥ भोज्यवस्तु नाही ते भोक्तृत्व कोठेही देखिले नाही याकारणास्तव अद्वितिय जो आत्मा यास अभोक्तृत्व सित्ध या प्रकारें विचार करून अद्वितिय अपरिछिन्न असंग अकर्ता अभोक्ता ऐसा जो आत्मा मी म्हणून जो जाणतो कृतार्थ ॥ तो च विद्वांस ॥ तोच समस्तास पूज्य ॥ तोच जीवन्मुक्त ॥ म्हणून वेदांतसिर्त्धात ॥ या अर्थाचेठाइं संशय नाही ॥

ज्ञानाज्ञानप्रकर्णचतुर्दशवर्णक समाप्तं ॥१४॥ श्री सांबसदाशिवगुरुनाथार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP