विवेकसार - त्रयोदश वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


॥अज्ञानप्रकरणम्॥

॥ श्रीमंगळमूर्तयेनमः ॥

यदज्ञानप्रभावेन दृश्यते सकलं जगत् ॥

यत्ज्ञानाच्छेयमान्पोति तस्मै ज्ञानात्मने नमः ॥

ज्या आत्म्याचे अज्ञानेकरून समस्त प्राणिही जन्ममरणदुःखपरंपरा पावताहेत ॥ त्या अज्ञानाचे स्वरूप निरूपितो ॥ अज्ञान म्हणिजे कोणते म्हणाल तरी आपणास आपण न जाणुन असणे अज्ञान ॥ कोणीही आपणास आपण जाणत नाहीत म्हणुन बोलु ये काय म्हणाल ॥ तरी बोलु ये ॥ आपणास आपण तरी काय म्हणुन जाणताहेत म्हणाल तरी ॥ मी मनुष्य मी स्त्री मी पुरुष ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र मी ब्रह्मचारी मी वानप्रस्थ मी सन्यासी ॥ मी तेलंगा मी मुरकी नाडीचा मी वेगी नाडीचा मी कुनाड मी महाराष्ट्र मी खानदेसीचा मी शास्त्री मी पंडित मी पुराणीक भागवत वैष्णव शैव मी राम मी कृष्ण मी नारायण मी याचा पिता मी याचा पुत्र आपणहुन याप्रकारे जाणताहेत ॥ नव्हेहो पहिलें कोणी आपण आपणास जाणत नाहीत म्हणुन बोलिलेत आता आपणास आपण जाणतेत म्हणुन बोलताहा ॥ पूर्वी बोलिल्यास आता बोलिल्यास विरोध की म्हणाल तरी विरोध नव्हे ॥ कैसा नव्हे म्हणाल तरि आपण मनुष्य नव्हे म्हणुन आपणास मनुष्य म्हणुन जाटिले ते जाणने नव्हे ॥ आपण स्त्री नव्हे म्हणुन स्त्री म्हणुन जाणणे जाणने नव्हे ॥ आपण ब्राह्मण नव्हे आपणास ब्राह्मण म्हणुन जाणने जाणने नव्हे ॥ म्हणुन कोणीही आपणास जाणत नाही म्हणुन बोलुये ॥ नव्हे हो मनुष्य जो आपण तो आपणास मनुष्य म्हणूनच जाणतो ॥ बैल म्हणुन जाणत नाही की ॥ स्त्री होत्साती आपणास स्त्री म्हणूनच जाणते की ॥ पुरुष म्हणुन जाणत नाही की ॥ पुरुष होत्साता जो आपण आपणास पुरुष म्हणूनच जाणतो की ॥ पिशाच म्हणून जाणत नाही की ॥ ब्राह्मण होत्साता जो तो आपणास ब्राह्मण म्हणुनच जाणतो शुद्र म्हणुन जाणत नाहीकी ॥ याप्रकारे समस्त जे तेही आपणास आपण यथार्थत्वेकरून जाणत असता कोणीही आपणास आपण जाणत नाहीत म्हणुन कैसे बोलावे तरि बोलूये ॥ ते कैसे बोलुये म्हणाल तरी आपण मनुष्यच जाला जरि गेल्या जन्माचेठाइं मनुष्यच होत्साता राहिला पाहिजे येणार जन्माचेठाइंही मनुष्य होत्साताच असिले पाहिजे ॥ गेल्या जन्माचेठाइं आपण

देवक्षकिन्नरकिंपुरुषगंधर्वमनुष्य स्थावरजंगम पिशाच्य बैल हेल्या कुतरे कोल्हे इतक्यामध्ये आपण कोण म्हणून जाणिजेत नाही म्हणून ॥ आपणास मनुष्यत्वच स्वतसिद्ध जाले तरि पुढे देवादिक शरीरे जे ते यावी म्हणून या जन्माचे ठाइं कोणही ही योगोपासनादिक क्रिया ज्या त्याते न करिताच असिले पाहिजेत ॥ करीत तरी आहेत म्हणून आपणास मनुष्य ऐसे जाणने जाणने नव्हे ॥ याचप्रकारे ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्रादिक जे त्याते आपण म्हणुन जाणने ते जाणने नव्हे ॥ म्हणुन ऐसें जाणूये ॥ नव्हेहो अवघेही याप्रकारेच जाणताहेत काय म्हणाल तरी कित्तेक पारलौकीक जे ते आपणास जीव म्हणुन जाणताहेत ॥ त्या जीवाचे स्वरूप कोणते म्हणुन पुसिले तरि ॥ आणखी पुढें बोलूं न शकते म्हणुन हेही जाणत नाहीत ॥ कैसे जाणत नाहीत म्हणाल तरी मनुष्य नव्हे जो आपण तो आपणाते मनुष्य म्हणुन जाणनार जो तो जैसा जाणता नव्हे ॥ तैसाच जीव नव्हे जो आपण त्या आपणाते जीव म्हणुन जाणने ऐसा जाणनार जो तो जाणता नव्हे ॥ ऐसे जरी जाले शास्त्रज्ञ जे ते आपणाते आपण जाणत नाही काय म्हणाल तरी ॥ तेही जाणत नाहीत ॥ नव्हेहो शास्त्रज्ञ जे ते आत्मस्वरूप याप्रकारीचे म्हणून निश्र्चय करून असता कैसे न जाणेत म्हणुन बोलावे तरी ॥ शास्त्रज्ञामध्ये चर्वाक जो तो अनात्मस्वरूप जे स्थूळदेह जो तोच आत्मा म्हणुन जाणितले म्हणुन तो शास्त्रज्ञ जरी आत्म्याते जाणता नव्हे ॥ आणिखीही प्राणोपासक कित्तेक शास्त्रज्ञ जे ते अनात्मस्वरूप प्राण जो त्याते आत्मा म्हणुन जाणताहेत ॥ म्हणुन तेही शास्त्रज्ञ जाले जरी आत्म्याते जाणत नाहीत ॥ आणिखी कित्तेक शास्त्रज्ञ जे ते आनात्म स्वरूप जे देहेंद्रिये त्याते आत्मा म्हणुन जाणताहेत ॥ म्हणुन तेही शास्त्रज्ञ जाले जरी आत्म्याते जाणत नाहीत ॥ आणखी कित्तेक मनोपासक जे ते अनात्मभूत जे मन त्यास आत्मा म्हणुन जाटिले म्हणुन तेही शास्त्रज्ञ जाले जरी आत्म्याते जाणत नाहीत ॥ आणि बौधामध्ये कित्तेक शास्त्रज्ञ जे ते अनात्मस्वरूप क्षणीक ऐसी जे बुद्धि जे तीते आत्मा म्हणुन जाटिले म्हणून तेही शास्त्रज्ञ जाले तरी आत्म्याते जाणत नाहीत ॥ आणिखी बौध्धामध्ये शास्त्रज्ञ म्हणुन नाम ठेउन घेउन असणार कित्तेक मूर्ख जे ते शशविषाणादिक ऐसे जे शुन्य जे त्याते आत्मा म्हणुन जाणताहेत म्हणुन तेही शास्त्रज्ञ जाले जरी तरी आत्म्याते जाणत नाहीत ॥ ऐसे तरि शास्त्रज्ञ मीमांसक जे तेही शैव जे तेही रामानुज जे तेही आत्म्याते जाणत नाहीत काय म्हणाल तरि जाणत नाहीत ॥ कैसे म्हणाल तरी ॥ ममांसादिक जे ते परिपूर्ण जो आत्मा त्यातें अणु परिमाण म्हणुन जाणताहेत म्हणून तेही शास्त्रज्ञ जाले तरी आत्म्याते जाणत नाहीत ॥ ऐसेतरि शास्त्रज्ञ जे तार्किकादि जे ते आत्मा जो त्यास विभुत्व जे त्याते अंगिकार केला आहे की ॥ ते आत्म्याते जाणत नाहीत काय म्हणाल तरि जाणत नाहीत कैसे जाणत नाहीत म्हणून म्हणाल तरि बोलूं ॥ ते तार्किकादिक जे ते आत्मा जो त्यास विभुत्व जे ते अंगिकार केला जरी ॥ आत्मा जो त्यास नानात्व जे त्याते अंगिकार केला आहे म्हणून ही आत्मा जो त्यास जडत्व जे त्याते अंगिकार करून तो जड आत्मा त्यास चित्त्गुण ऐस अंगिकार केला आहे म्हणूनही ॥ निर्गुणभूत जो आत्मा त्यास इच्छादिगुण जे त्याते अंगिकार केला आहे म्हणूनही दृक् जो आत्मा त्यास दृश्यत्व अंगिकार केला आहे म्हणून ही हे शास्त्रज्ञ जाले जरी आत्म्याते जाटिले नाही ॥ ऐसे तरी सांख्ययोग जे ते आत्म्याते जाणत नाहीत ऐसे तरि सांख्ययोग जे जे आत्म्याते जाणत नाहीत काय म्हणाल तरी जाणत नाहीत कैसे जाणत नाहीत म्हणाल तरी सांख्ययोग जे ते आत्मा जो त्यास विभुत्व जे त्यातेही सच्चिदानंदरूप जे त्यातेही असंगत्व जे त्यातेही अंगिकार केलाही जरी ॥ आत्म्यास नानात्व जे त्यातेही अंगिकार केला आहे म्हणूनही ॥ जगास सत्यत्व अंगिकार केला आहे म्हणुनही जीवेश्वराचा भेद जो त्याते अंगिकार केला आहे म्हणूनही तेही शास्त्रज्ञ जाले जरी आत्म्याते जाणत नाहीत ॥ ऐसे तरि इतके शास्त्रज्ञ जे ते न जाणतील तरी न जाणोत ॥ वेदांतशास्त्रज्ञ जे ते आत्म्यास जाणत नाही काय म्हणाल तरि बोलतो ॥ वेदांतशास्त्रज्ञ जे ते त्यामध्ये अमुमुक्षु म्हणुन मुमुक्षु म्हणुन दोप्रकारिचे ॥ या दोप्रकारिच्यामध्ये अमुमुक्षु जे ते चौप्रकारिचे आहेत ॥ ते चौप्रकारिचे कोणते म्हणाल तरी ॥ प्रयोजनानिमित्य पढले तेकित्तेक ॥ प्रसिद्धि निमित्य पडले ते कित्तेक पढले ते कित्तेक ॥ इतरमत्त प्रविष्ट होत्साते वेदांतशास्त्राचे मर्म जाणुन दूषण द्यावे म्हणून पढले ते कित्तेक ॥ हे चौंप्रकारिचे तेही वेदांतशास्त्रज्ञ जाले जरी तरी आत्म्याते जाटिले नाही ॥ तरि हे चौप्रकारिचे यास फळ कोणते म्हणाल तरी ॥ हे चौप्रकारिचे यामध्येही वेदांताते दूषावे म्हणुन पढले जे त्यास नरक आणि तिर्यगादिकयोनिप्राप्ति फळ ॥ उरल्या तिघासही स्वर्गादिकलोकप्राप्तिफळ ॥ आता मुमुक्षु होत्साते जे पढले ते दोप्रकारिचे आहेत ॥ ते कोणते म्हणाल तरी ॥ प्रतिबंधसहित पढले ते कित्तेक ॥ प्रतिबंधरहित होत्साते पढले ते कित्तेक ॥ या दोहीप्रकारिच्यामध्ये प्रतिबंधसहित वेदांतशास्त्र पडले जे ते कालांतराचेठाई प्रतिबंध गेल्यानंतर आत्मस्वरूप जे त्याते जाणून मुक्त होताहेत ॥ प्रतिबंधरहित होत्साते वेदांतशास्त्राते पढले जे ते तरि सद्यः आत्मस्वरूप जे त्याते जाणून मुक्त होत आहेत ॥ नव्हेहो पूर्वी कोणीही आपणाआपणाते जाणत नाहीत म्हणून बोलून ॥ आता प्रतिबंधरहित वेदांती जे ते आत्म्याते जाणताहेत म्हणुन बोलता ॥ पूर्वि बोलिल्यास आता बोलिल्यास विरोध जो तो भासतो म्हणसिल तरी विरोध नाही ॥ आत्मानंचेद्विनीयादयमस्मीतिपूरूषः ॥ किमिच्छन्कस्य कामायशरीरमनुसंज्वरेत् ॥श्रुतेः ॥

अयमहमस्मि इति यदि कश्र्चित् अपरोक्षतया जानीयात् ॥ तऱ्हीकस्य पुत्रादेः कामाय शरीरमनुतप्येत् ॥ तरि बोलु प्रतिबंध रहीत होत्साते पढुन आत्मा जो त्याते जाणनार जे ते आत्मस्वरूप जाणतात ॥ कोणीही आत्मा जो त्याते जाणत नाहीत म्हणुन बोलिल्याचा विरोध नाही ॥ पूर्वि आपण आपणाते जाणत नाही म्हणुन बोलून मग आत्मा जो त्याते नाही जाणत म्हणुन बोललेत हे विरोध नव्हे काय म्हणाल तरि ॥ आपणच आत्मा जाहाला म्हणुन कोणीही आपण आपणाते जाणत नाहीत म्हणुन बोलिल्यासही विरोध नाही ॥ ऐसे तरि आपणास न जाणने रूप ऐसे जे अज्ञान जे ते काशाकरून जाइल म्हणाल तरि आत्मज्ञान जे तेणेकरून जाइल ॥ आणिखी काशाकरूनही न जाय ॥ नव्हेहो आत्मज्ञान जे तेणेकरून जाइल म्हणुन काशास बोलावे ॥ कर्मेंकरूनही जाइल म्हणून बोलु म्हणाल तरि तैसे बोलता नये ॥ ते कैसे म्हणता नये म्हणाल तरी कर्म जे ते अज्ञानाचे विरोधि नव्हे ॥ म्हणुन कर्म जे ते अज्ञानाते दुर करू न शके ते कैसे म्हणाल तरी दृष्टांतपूर्वक निरूपितो ॥ तो दृष्टांत कोणता म्हणाल तरि घट जो तो घटांतराचा विरोधि नव्हे म्हणुन घट जो त्याते घटांतर जैसा दुर करु न शके तैसेच कर्म जे ते अज्ञानाचे विरोधि नव्हे म्हणुन कर्म जे ते अज्ञानास दुर करु शकेना ॥ इतुकेच नव्हे आणिखीही कर्म जे ते अज्ञानाची वृद्धि करिते कैसे म्हणाल तरि ॥ अमावाश्येचे रात्रीचेठाइ मेघावरण आले जे ते ते अमावाश्येच्या अंधःकारासि विरोधि नव्हे म्हणुन त्या अंधःकाराते जैसे दुरि करु शकेना ॥ आणिखि त्या अंधकाराते वृद्धि करिते तैसे कर्म जे तेही अज्ञानाते दुर करू न शके ॥ अज्ञानाची वृद्धि करिते कैसे करिते म्हणाल तरि ॥ स्पष्टत्वेकरू निरूपितो ॥ त्या अमावाश्येच्या अंधःकाराचेठाइं मार्गधरणार जो पुरुष जो त्यास मनुष्य सामोरे आले जरी ब्राह्मण शुद्र म्हणुन न कळुन पुरुष म्हणुन सामान्यमात्र दिसतो ॥ आणिखी येखादा पशु सामोरा आला तरि वृषभ की गाय म्हणुन न कळता पशु म्हणुन सामान्यमात्र दिसतो त्या समयाचाठाइं मेघ येउनि अवरला जरी तो मेघ अंधःकारास वृद्धि करून सामान्यता भासले जे मनुष्यादिक त्यास सर्वात्मना दिसेना ऐसे जैसा करितो तैसे कर्म जे ते अज्ञानाते वृद्धीते पावउन आत्मा जो त्याते सर्वात्मना दिसेना ऐसे करितें ॥ नव्हेही दृष्टांताचेठाइं मेघाचरण येउन अंधकारास वृद्धिते पावउन मनुष्यादिक जे त्याते सर्वात्मना दिसेना ऐसे केले प्रत्यक्ष देखिले आहे द्रष्टांतिकाचेठाइं तरी कर्म जे ते अज्ञानाते वृद्धिते पावउन नित्यलब्ध आत्मा जो त्याते कैसे दिसेना ॥ ऐसे करील म्हणाल तरि करीलच ते कैसे म्हणाल तरि मेघेकरून आवरिला ऐसा जो निबिडांधःकार त्याचेठाइं मणि पुस्तक शालिग्राम रुद्राक्ष आदिकरून पदार्थ हाती लब्ध जाले असताहि हा मणी काचमणि किंवा चोखटमणि म्हणुन ॥ हा शालिग्राम सिताराम किंवा लक्षिमनारायण ॥ हा रुद्राक्ष जो तो षण्मुख किंवा पंचमुख अथवा भद्रास म्हणुन कळेना ऐसे तो अंधःकार जैसे करितो ॥ तैसे कर्मकरून वृद्धिते पावले ऐसे जे अज्ञान जे ते आत्म्याते दिसेना ऐसे करिजेत आहे ॥ ऐसे जरि जाले या अंधःकाराचेठाइ हातिं प्राप्त जाले मणि पुस्तकादिक याचें यथार्थज्ञान केव्हाहो येते म्हणाल तरि सूर्योदय झाल्यानंतर तो अंधःकारमात्र नाशाते पावला असता त्या हातीं लब्ध जाले मणिपुस्तकादिक याचे यथार्थज्ञान येत आहे ॥ तैसे दार्ष्टांतिकाचेठाइंही कर्मेंकरून वृद्धिते पावले ऐसे आत्मावरक अज्ञान जे ते ब्रह्मात्मज्ञानेकरून नाशून जात असता त्यानंतर आत्मा यथार्थच भासतो ॥ अहो दृष्टांताचेठाइं सूर्योदयेकरून निवृत्त जाले ते काय ॥ राहिले ते काय ॥ म्हणुन शंका येत असता ॥ सूर्योदयेकरून मणिपुस्तकादिकाचे स्वरूप कळेना ऐसे केले तो अंधःकार नासुनि गेला ॥ असत् आहे जें मेघावरण ते काय करितें म्हणाल तरि बोलूं ॥ कोणास सुख देते कोणास दुःख देते ते ॥ सुख कोणास दुःख कोणास देते ॥ म्हणाल तरी धान्य वाळु चालणार यास स्नान

करणारियास वातशरीरेज त्यास दुःख देते ॥ ऐसेच दार्ष्टांतिकाचे ठाइ ॥ जाव्याचे काय राहाव्याचे काय म्हणाल तरी बोलू ॥ ज्ञानेकरून अज्ञान नासून जाते ॥ अज्ञानकार्य देहोंद्रियादिक जे ते राहाताहेत तरी आहे जे देहेंद्रियादिक ज्ञान्यास काय करिताहेत म्हणाल तरि ॥ सुख दुःख देत होत्साते राहताहेत ॥ आहो दृष्टांताचेठाइं मेघावरण अंधःकाराचे कार्य नव्हे म्हणुन तो अंधकार गेल्यानंतर मेघावरण असूर्ये ॥ दाष्टातिकाचेठाई देहोंद्रियादिक जे ते अज्ञानाचे कार्य म्हणुन कारण नाशाते पावले असता कार्य जे देहोंद्रियादिक ते कैसे राहातिल म्हणाल तरि राहातीलच ॥ ते कैसे म्हणाल तरी दृष्टांतपूर्वक निरूपितो । कोरफड देशपरत्वे आणि धूम आणि इषुवेग हे दृष्टांत ते कैसे म्हणाल तरी कोरफड समूल नाशाते पावले असताही ते कोरफड जैसे राहते धूमास कारण अग्नि नाशाते पावला असताही ते धूम जैसा राहतो इषुवेगास कारण आकर्षणसंयुक्तज्या इषुसंयोगे नाशाते पावले असताही तो इषुवेग जैसा आहे तैसेच दार्ष्टांतिकाचेठाइंही देहेंद्रियादिक असू येते ॥ ऐसे तरि देहेंद्रियादि याचा नाश केव्हा म्हणसिल तरी दृष्टांताच्याठाइं मेघावर्णाच्या नाशाते जैसा नियम नाही तैसें प्रारब्ध जें तें जेव्हा नाशाते पावते तेव्हांच देहेंद्रियादिकाचा नाश होतो ॥ नव्हेहो दृष्टांताचेठाइं मेघावरण जे ते अंधःकाराचे वृद्धिते पावावया प्रत्यक्षेंकरून देखिले ॥ दृष्टांतिकाचेठाइं तरि कर्म जे ते अज्ञानाते वृद्धिते पावावयाचे देखिले नाही ॥ कैसे घडले म्हणाल तरी ॥ त्रिविधकरणरेंकरून केली जे कर्में ते अकर्ता आत्मा जो त्याते कर्ता ऐश्याते अभोक्ता जो आत्मा त्यातें भोक्ता ऐशाते सुखदुःख नाही ऐसा जो आत्मा त्याते सुखीदुःखी ऐशाते करिते ॥ म्हणुन ऐसे करावयाचे अज्ञानाचे वृद्धि म्हणुन अज्ञानास वृद्धि करावयाचे कर्मं जे अज्ञान जे त्याते दुर करू शकेना ॥ ऐसे तरि हे अज्ञान जे ते काशाकरून जाइल म्हणाल तरी आत्मज्ञानेकरून जाइल आणखी काशाकरून जाइना ॥ ऐसे तरि आत्मज्ञान जे ते काशाकरून येते म्हणाल तरि विचारेकरूनच येते ॥ नव्हेहो विचारेकरून ज्ञान येते म्हणुन काशास बोलावे ॥ कर्मेंकरून ज्ञान येऊंये ते कैसे म्हणाल तरि दृष्टांतपूर्वक सांगतो अग्नि जो तो आपण क्षुधेते दुर करू शकेना तरी क्षुधा जे तिची वृद्धीच केली जरी तांदुळ जे याते अन्नाकारेकरून परिणामाते पाउन जैसे क्षुधेते दुरि करितो ॥ तैसे दार्ष्टांतिकाचेठाइं कर्म जे ते अज्ञान जे त्याते दुरी करू शकेना जरी अज्ञानाची वृद्धिच केली जरी चित्तवृत्ति जे ते अज्ञान जे त्याते दुरि करणार ऐसे ज्ञानाकारेकरून परिणामाते पाउन अज्ञानाते दुरि करिते म्हणुन बोलु ॥ तरि तैसे बोलता नये नव्हेहो दृष्टांताचे ठाइं अग्नि जो तो तांदुळ जो त्याते अन्नाकारेकरून परिणामाते पावउन क्षुधेते दुरि करितो म्हणायाचे प्रत्यक्षेकरून देखिले म्हणून दृष्टांताचे ठाइं हा अर्थ घडे ॥ दार्ष्टांतिकाचेठाइं हा अर्थ घडेना ॥ कैसे घडेना म्हणाल तरि ज्ञान म्हणतां चित्त वृत्तिनें अकर्ताद्याकारेंकरून परिणमातें पावणें कीं ॥ कर्म तरी चित्तवृत्तिते कर्ताद्याकारेंकरून परिणमातें पावतें ॥ म्हणुन अज्ञानातें दूरि करूं शकेना ॥ याप्रकारे कर्म जें तेणेंकरून ज्ञान नव्हे ॥ आणखीं काशाकरून हाईल म्हणाल तरि विचारें करून होईल॥ कोण्याविचारेकरून होईल म्हणाल तरि ॥ आत्मानात्म विचारेंकरून होईल ॥ ऐसे जरि आत्मज्ञान जें तें विचारेंकरून होईल आणखीं काशाहीकरून न होय ॥ याविषयीं दृष्टांत आहे काय म्हणाल तरि आहे तो बोलुं ॥ अर्थेंसी मिळून आहे ऐसी जे गायत्री ते पुरुषास प्राप्त असतांही गायत्रीचा अर्थ तो विचारला नाहीं म्हणून कळला नाही ॥ गायत्रीचा अर्थ कळला पाहिजे म्हणून सेतुस्तान केलें जरी गंगासागर संगमाचेठाइं सहस्रवर्षें अघमर्षण स्नान केले जरी शंभरसहस्र ब्राह्मणभोजन केले जरी ॥ षोडश महादानें केली जरी ॥ सप्तकोटि महामंत्राचा शतवर्षे जप केला जरी ॥ लक्ष गायत्री जप केला तरी ॥ गायत्रीचा अर्थ जाणिजेत नाहीं ॥ ऐसें तरी गायत्रीचा अर्थ जो तो काशाकरून जाणिजेतो म्हणाल तरि ॥ गायत्रीच्या अर्थातें जाणनार जे त्यांतें समीप जाऊन गायत्रीचा अर्थ कैसा म्हणुन पुसिल्यानें ते गायत्रीचा अर्थ जो तो याप्रकारें म्हणून सांगतां मनामध्ये विचार करून त्या गायत्रीचा अर्थ जो त्यातें जैसा जाणतो ॥ तैस्याचप्रकारें दार्ष्टांतिकाचेठाइं मृत्तिकास्नानादिक केले जरी तरी ज्ञान होऊं शकेना ॥ आत्मानात्म विचारेकरून आत्मज्ञान यावें या अर्थाचेठाईं अनुभव जो तो आहे तो बोलतो ॥ तो कैसा म्हणाल तरि ॥ कर्मसाधनद्वारा बोलतों ॥ कर्म म्हणिजे कोणतें म्हणाल तरि ॥ स्नानसंध्यावेद जप औपासन स्वाध्याय देवतार्चन अतिथीपूजन वैश्वदेव तीर्थाटण हें आदिकरून कीं कर्म बोलिजेत आहे ॥ हें जें कर्म जे यातें आम्ही तरि करीतच आलों ॥ येणेंकरून आत्म्याचें स्वरूप जें तें आम्हांस कळले नाही याकरिता कर्म जें तें त्यातें करिते असतांही तेणेंकरून कोणासही आत्मज्ञान होऊं न शके ॥ विचारें करून आत्मज्ञान जें तें व्हावें ॥ आणखीं विचारेंकरून आत्मज्ञान जें तें व्हावे म्हणाल याविषयी सर्वानुभवसिद्धि दृष्टांतर जे त्यातें बोलतों ॥ तो कोणता म्हणाल तरि ॥एक पुरुष जो तो आजि तिथी वार नक्षत्र योग करण जें तें कोणतें म्हणून पुसत असतां विचारिलें जरी ॥ आजि हे तिथी वार हे नक्षत्र हा योगकरण म्हणुन सांगतो ॥ विचारिलें नाहीं तरि म्यां विचारिलें नाहीं म्हणुन सांगतो ॥ विचारिले आहे तरि म्यां विचारिलें म्हणुन सांगतो ॥ परंतु म्यां स्नानसंध्यावंदनादिक जें त्यातें केलें नाहीं म्हणून मज कळलें नाहीं ऐसे बोलत नाहीं ॥ आणखी देवालइं देवास अभिषेक पूजा नैवेद्य काय म्हणून पुसिल्यानें विचारिलें जरी जाले नाही जालें ऐसें बोलतो ॥ विचारिलें नाही तरि मजला ठाऊक नाहीं ऐसें बोलतो ॥ परंतु संध्यावंदनादि अग्निष्टोमादिक कर्म केले नाही म्हणून मजला ठाउकें नाही ऐसें बोलत नाही ॥ या प्रकारें लोकामध्यें समस्त प्राणी जे तेंही करून जे वस्तू विचारिजेत आहे त्या वस्तूचे यथार्थज्ञान त्यास होत आहे ॥ कर्मादिकेंकरून त्या वस्तूचें ज्ञान होत नाहीं ॥ तैसेच दार्ष्टांतिकाचे ठांइं आत्मज्ञान समस्त प्राणी जे यांस विचारेंकरून व्हावे ॥ कर्मोपासानादिकेंकरून घडेना काय म्हणाल तरि हा अर्थ सिद्ध ॥ तमेतमात्मानं वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिषंति ॥ यज्ञेन दानेन तपसा नाशकेनचेति ॥ श्रुतौ ॥कर्मे करून ज्ञान घडेना ॥ ऐसें बोलता नये ॥ बोलिलें जरी श्रुतीस व्यर्थता येत आहे म्हणसील तरी व्यर्थता न ये सारिखें बोलूं ॥ तें कैसें म्हणाल तरि ॥ कमैंक देश जे ते ज्ञानास परंपरा साधन ॥ परंतु नानाविध कर्में जें तें ज्ञानास साधन नव्हेत ॥ म्हणून श्रुती विरोध नाहीं ऐसे जरी जालें ॥ कर्म किती प्रकारचे म्हणाल तरि ॥ लौकिक म्हणुन वैदिक म्हणुन दोप्रकारिचें ॥ या दोहींमध्येंही अर्धे जें तें लौकिक ॥ तें लौकिक कर्म जीवनास निमित्त जालें ॥ म्हणुन यास्तव ज्ञान होउं शकत नाहीं ॥ उरले अर्धे जें वैदिक कर्म जें तें पांचा प्रकारिचे ॥ या पांचामध्येही काम्यकर्मे करूनही ज्ञान होत नाही ॥ स्वार्गादिक होत आहेत ॥ निषिद्ध कर्मेंकरून कालसूत्रादि नरक होत आहेत ॥ प्रायश्र्चित्त कर्मं जें तें पुरुषास कर्माचें ठांइं अधिकारित्व संपादितें ॥ प्रत्यवाय जो तो त्यातें दूर करिते ॥ हे तिन्हीं कर्में ज्ञानास साधन नव्हेसे जाली उरली नित्यनैमित्तिक कर्में हें दोन्हीही सात्विक राजस तामस म्हणुन तीं प्रकारिची आहेत ॥ या तिहींमध्ये राजस तामस दोन्हि कर्में जें ते सुख दुःखें जें त्याते देत आहेत ॥ त्याहीकरून ज्ञान होऊं शकेना ॥ उरलें जें सात्विक कर्म जे तें तरी चित्तशुद्धिद्वारा ज्ञानास परंपरा साधन म्हणून बोलिजेतें ॥ कैसे म्हणाल तरी ॥ हें जें नित्य नैमित्तिक - रूप सात्विक कर्म जे तेणेकरून चित्तशुद्धि होऊन चित्तशुद्धिद्वारा नित्यानित्यवस्तूविवेक होऊन ॥ नित्यानित्यवस्तु - विवेकद्वारा इहामुत्रार्थफलभोगविराग होतो ॥ इहामुत्रार्थफलभोगविरागद्वारा मुमुक्षुत्व येऊन मोक्षेच्छद्वारा सद्रुरुलाभ होऊन सद्रुरुलाभद्वारा श्रवण प्राप्त होऊन श्रवणद्वारा मनन प्राप्त होऊन ॥ मननद्वारा निदिध्यासन प्राप्त होऊन । निदिध्यासनद्वारा ज्ञान प्राप्त होते याप्रकारेंकरून कर्मैकदेश जे ते ज्ञानास परंपरा साधन ॥ विचार तरी साक्षात् साधन ॥ येविषइं दृष्टांतांतर आहे काय म्हणाल तरि ॥ क्षुधार्थी जो त्यास क्षुधा दूरी करावयाचे ठांइं पक्व ऐसे जें अन्न जें तं जैसें साक्षात् साधन ॥ नांगरून बीज पेरणे इत्यादिक जैसे परंपरा साधन ॥ या अर्थाचे ठांइं संशय नाहीं सिद्ध ॥ याप्रकारे अज्ञानाचें स्वरूपही आत्मस्वरूपही वरच्याप्रकारे विचार करून तो आत्मा मी म्हणून जाणतो तो जीवन्मुक्त ॥ तोच विद्वांस ॥ तोच योगी ॥ तोच सच्चिदानंदस्वरूपब्रह्म जें तें म्हणून शास्त्रसिद्धांत ॥

॥ इति श्री मननग्रंथे वेदांतसारे अज्ञानप्रकरणं नाम त्रयोदशवर्णकं समाप्तम् ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP