नववा स्कंध - अध्याय ५

’ श्रीमद्‍भागवतमहापुराणम्’ ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्‍भागवत महापुराणाचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप्त होतो.


श्रीशुक म्हणतात -

भगवंतांनी असे सांगितल्यावर सुदर्शन चक्राच्या तेजाने त्रस्त झालेले दुर्वास परत अंबरीषाकडे आले आणि अत्यंत दु :खी होऊन त्यांनी राजाचे पाय धरले . ॥१॥

दुर्वासाचे हे कृत्य पाहून आणि त्यांनी पाय धरल्याने लज्जित होऊन अत्यंत दयाकुल अंबरीषाने भगवंतांच्या त्या चक्राची स्तुती केली . ॥२॥

अंबरीष म्हणाला -

हे सुदर्शना ! तू अग्नी , भगवाय सूर्य , नक्षत्रमंडळाचा अधिपति चंद्र आहेस . जल , पृथ्वी , आकाश , वायू , पंचतन्मात्रा आणि सर्व इंद्रियेसुद्वा तूच आहेस . ॥३॥

भगवंतांना प्रिय , एक हजार दात असणार्‍या , हे सुदर्शना ! मी तुला नमस्कार करतो . सर्व अस्त्रांना नष्ट करणार्‍या आणि पृथ्वीचे रक्षण करणार्‍या चक्रा ! तू या ब्राह्यणाचे रक्षण कर . ॥४॥

तूच धर्म , मधुर आणि सत्य वाणी , सर्व यज्ञांचा अधिपती आणि स्वत : यज्ञसुद्वा आहेस . तू सर्व लोकांचा रक्षक तसाच सर्वलोकस्वरुपसुद्वा आहेस . परम पुरुष परमात्म्याचे श्रेष्ठ तेज तू आहेस . ॥५॥

हे सुनाभा , तू सर्व धर्माच्या मर्यादांचा रक्षणकर्ता आणि अधर्माचे आचरण करणार्‍या असुरांचे भस्म करणाता अग्नी आहेस . तू तिन्ही लोकांचा रक्षक , विशुद्व तेजोमय , मनोवेगासारखा गतिमान आणि अद्वभुत कर्मे करणारा आहेस . तुला नमस्कार असो . मी तुझी स्तुती करतो . ॥६॥

हे वेदवाणीच्या अधीश्वरा ! तुझ्या धर्ममय तेजाने अंधकाराचा नाश होतो आणि सूर्य इत्यादी महापुरुषांच्या प्रकाशाचे रक्षण होते . तुझा महिमा जाणणे कठीण आहे . लहान -मोठे असे हे सर्व कार्यकारणात्मक जग तुझेच स्वरुप आहे . ॥७॥

हे अजिंक्य सुदर्शन चक्रा ! ज्यावेळी निरंजन भगवान तुला सोडतात , तेव्हा तू दैत्य -दानवांच्या सेनेत प्रवेश करुन युद्वभूमीवर त्यांच्या भुजा , पोट , जांघा , पाय , मान इत्यादी अवयव कापीत अत्यंत शोभिवंत दिसतोस . ॥८॥

हे विश्वरक्षका ! सर्वाचे प्रहार सहन करणार्‍या तुला गदधारी भगवंतांनी दुष्टाच्या नाशासाठीच नेमले आहे . तू आमच्या कुलाच्या भाग्योदयासाठी दुर्वासांचे कल्याण कर . आमच्यावर तुझा हाच मोठा उपकार ठरेल . ॥९॥

मी जर काही दान केले असेल , यज्ञ केला असेल किंवा आपल्या धर्माचे उत्तम पालन केले असेल , जर आमच्या वंशातील लोक ब्राह्यंणांनाच आपले दैवत समजत असतील , तर दुर्वसाचा त्रास नाहीसा होवो . ॥१०॥

सर्व गुणांचे एकमेव आश्रय असणार्‍या भगवंतांना जर मी समस्त प्राण्यांच्या आत्म्याच्या रुपात पाहिले असेल आणि ते माझ्यावर प्रसन्न असतील , तर दुर्वसांचा सर्व त्रास दूर होवो . ॥११॥

श्रीशुक म्हणतात -

दुर्वासांचा सगळ्या बाजूंनी दाह करणार्‍या भगंवंताच्या सुदर्शन चक्राची राजाने अशी स्तुती केली , तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमुळे ते चक्र शांत झाले . ॥१२॥

जेव्हा दुर्वास चक्राच्या आगीपासून मुक्त झाले आणि त्यांचे चित्त स्वस्थ झाले , तेव्हा ते त्या राजाला उत्तम आशीर्वाद देत त्याची प्रशंसा करु लागले . ॥१३॥

दुर्वास म्हणाले -

धन्य आहे ! आज मी भगवंताच्या भक्तांचे महत्व पाहिले . राजन ! मी तुझा अपराध केलेला असूनही तू माझ्यासाठी शुभ कामनाच करीत आहेस . ॥१४॥

ज्यांनी भक्तवत्सल भगवान श्रीहरींच्या चरणकमलांना घट्ट मिठी मारली आहे , त्या साधुपुरुषांना कोणता अनुग्रह अवघड आहे ? आणि अशा महात्म्यांना कोणता अपराध विसरणे अशक्य आहे ? ॥१५॥

ज्यांच्या नामाच्या केवळ श्रवणाने जीव निर्मल होऊन जातो , त्या भगवंतांच्या दासांना कोणते कर्तव्य शिल्लक राहाते ? ॥१६॥

महाराज ! आपले ह्रदय करुणेने भरल्यामुळेच आपण माझ्यावर मोठेच उपकार केले . कारण आपण मी केलेले अपराध विसरुन माझ्या प्राणांचे रक्षण केलेत . ॥१७॥

राजा काही न खाता त्यांच्या परत येण्याची वाट पाहात होता . आता त्याने दुर्वासांचे चरण धरुन आणि त्यांना प्रसन्न करवून भोजन घातले . ॥१८॥

राजाने आदरपूर्वक आणलेले अतिथिला योग्य असे सर्व प्रकारचे भोजन करुन दुर्वस तृप्त झाले . आणि राजाला आदराने म्हणाले . "राजन ! आता आपणही भोजन करावे ." ॥१९॥

भगवंतांचे भक्त असणार्‍या आपले दर्शन , स्पर्श , संवाद आणि मनाला भगवंतांकडे प्रवृत्त करणार्‍या आतिथ्याने मी अत्यंत प्रसन्नआणि उपकृत झालो आहे . ॥२०॥

" स्वर्गातील देवागंणा बारंवार आपल्या या उज्ज्वल चरित्राचे गायन करतील . ही पृथ्वीसुद्वा आपल्या परम पुण्यमय कीर्तीचे संकीर्तन करीत राहील ." ॥२१॥

श्रीशुक म्हणतात -

दुर्वासांनी अतिशय संतुष्ट होऊन राजाच्या गुणांची प्रशंसा केली आणि त्यांनतर त्यांचा निरोप घेऊन फक्त निष्काम कर्माने प्राप्त होणार्‍या ब्रह्यलोकाकडे ते आकाशमार्गाने गेले . ॥२२॥

दुर्वास परत येईपर्यत एक वर्षाचा कालावधी लोटला . इतके दिवसपर्यत राजा त्यांच्या दर्शनाची इच्छा मनात धरुन फक्त पाणी पिऊनच राहिला . ॥२३॥

जेव्हा दुर्वास निघून गेले , तेव्हा त्यांनी भोजन करुन उरलेले अत्यंत पवित्र अन्न स्वत : खाल्ले . आपल्यामुळे दुर्वासांना दु :ख भोगावे लागले आणि नंतर आपणच केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांची सुटका झाली . या दोन्ही गोष्टी स्वत :मुळे होऊनही त्यांनी तो भगवंतांचाच महिमा मानला . ॥२४॥

अशा अनेक गुणांनी संपन्न राजा आपल्या सर्व कर्माच्या द्वारा परब्रह्य परमार्मा श्रीभगवंतांविषयी भक्ती वाढवीत होता . त्यामुळे त्याला ब्रह्यलोकापर्यतचे सर्व भोग नरकासमान वाटत होते . ॥२५॥

त्यानंतर अंबरीषाने आपल्यासारखेच गुण असलेल्या पुत्रांवर राज्याचा भार सोपविला आणि तो स्वत : वनात निघून गेला . तेथे त्याने धैर्याने आत्मस्वरुप भगवंतांमध्ये आपले मन लावून गुणांच्या प्रवाहरुप संसारातून तो मुक्त झाला . ॥२६॥

महाराज अंवरीषाचे हे परम पवित्र आख्यान जो वाचतो आणि त्याचे स्मरण करतो , तो भगवंतांचा भक्त होतो . ॥२७॥

अध्याय पाचवा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP