TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

नववा स्कंध - अध्याय ४

’ श्रीमद्‍भागवतमहापुराणम्’ ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्‍भागवत महापुराणाचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप्त होतो.


अध्याय ४

श्रीशुक म्हणतात -

नभाचा पुत्र नाभाग दीर्घकालपर्यत ब्रह्यचार्यव्रताचे पालन करुन जेव्हा परत आला , तेव्हा त्याच्या मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती न देता फक्त पिताच दिला . ॥१॥

त्याने आपल्या भावाला विचारले , "बंधूंनो ! आपण मला संपत्तीपैकी काय दिले आहे ? " तेव्हा त्यांनी उत्तर दिले की , आम्ही तुझ्या हिश्श्यापोटी वडीलच तुला देत आहोत . " तो आपल्या वडिलांना जाऊन म्हणाला - "तात ! माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्यालाच दिले आहे ." वडिल म्हणाले , "मुला ! तू त्यांचे म्हणणे ऐकू नकोच ." ॥२॥

अंगिरस -गोत्राचे हे मोठे बुद्विमान ब्राह्यण यावेळी एक मोठा यज्ञ करीत आहेत . परंतु माझ्या विद्वान पुत्रा ! त्यांना प्रत्येकसहाव्या दिवशीच्या कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाहीत . ॥३॥

तू त्या महात्मांच्याकडे जाऊन त्यांना दोन वैश्वदेवसूक्ते सांग . ते जेव्हा स्वर्गात जाऊ लागतील , तेव्हा यज्ञातून उरलेले आपले सारे धन तुला देऊन टाकतील . " म्हणून आता तू त्यांच्याकडे जा ." आपल्या पित्याच्या आज्ञेवरुन त्याने तसे केले . त्या अंगिरसगोत्राच्या ब्राह्यणांनीसुद्वा यज्ञातील उरलेले धन त्याला दिले आणि ते स्वर्गात निघून गेले . ॥४॥५॥

नाभाग ते धन घेऊ लागला , तेव्हा उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला . तो म्हणाला - " या यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिले आहे , ते सर्व धन माझे आहे ," ॥६॥

नाभाग म्हणाला , " ऋषींनी हे धन मला दिले आहे , म्हणून माझेच आहे . " यावर तो पुरुष म्हणाला , " आपल्या वादाबद्दल तुझ्या वडिलांनाच विचारलेले बरे !" तेव्हा नाभागाने जाऊन वडिंलाना ते विचारले . ॥७॥

वडिल म्हणाले , " दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषीनीं हा निर्णय केला आहे की , यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील , तो सर्व रुददेवाचा भाग आहे . म्हणून ते धन महादेवानाच मिळाले पाहिजे ." ॥८॥

नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करुन म्हटले , "प्रभो ! यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत , असे माझ्या वडिलांनी सांगितले . ब्रह्यन ! मी मस्तक लववून आपली क्षमा मागतो ." ॥९॥

॥तेव्हा भगवान रुद्र म्हणाले॥ , "तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तूसुद्वा खरे बोललास . तू वेदांचा अर्थ जाणतोसच . आता मी तुला सनातन ब्रह्यतत्वाचे ज्ञान देतो . ॥१०॥

येथे यज्ञात उरलेला माझा जो भाग आहे , हे धनसुद्वा मी तुला देतो . त्याचा तू स्वीकार कर ." एवढे बोलून सत्यप्रेमी भगनार रुद्र अंतर्धान पावले . ॥११॥

जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्रचित्ताने या आख्यानाचे स्मरण करतो , तो प्रतिभांवत , वेदांचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरुपालासुद्वा जाणणारा होतो . ॥१२॥

नाभगाला अंबरीष नावाचा पुत्र झाला . तो भंगवंतांचा मोठा भक्त आणि पुण्यवान होता . सर्वत्र अकुंठित असा ब्रह्यशापसुद्वा अंबरीषाला स्पर्श करु शकला नाही . ॥१३॥

राजाने विचारले -

भगवन ! परमज्ञानी राजर्षी अंबरीषाचे चरित्र मी ऐकू इच्छितो . ब्राह्यणाने रागावून त्याला अटळ शाप दिला होता , परंतु त्या शापाने त्याचे काहीही अनिष्ट का झाले नाही ? ॥१४॥

श्रीशुक म्हणाले -

भाग्यवान अंबरीषाला प्तप्तद्वीप युक्त पृथ्वी , न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले होते . मनुष्यांना या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या , तरी तो त्यांन स्वप्नाप्रमाणे मानीत असे . कारण हे वैभव नाशंवत असून त्यामुळे मनुष्य घोर नरकात जातो , हे तो जाणत होता . ॥१५॥१६॥

भगवान श्रीकृष्णांवर आणि त्यांच्या भक्तांवर त्याचे अतिशय प्रेम होते . ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सर्व विश्व मातीच्या ढिगाप्रमाणे (तुच्छ ) वाटू लागते . ॥१७॥

त्याने आपले मन श्रीकृष्णांच्या चरणारविंदांमध्ये , वाणी भगद्वुणानुवर्णनामध्ये , हात हरिमंदिराच्या सेवाकार्यामध्ये आणि कान अच्युतांच्या कथा -श्रवणामध्ये गुंतवून ठेवले होते . ॥१८॥

त्याचे नेत्र मुकुंदमूर्ती तसेच मंदिरांच्या दर्शनाकडे , अंगप्रत्यंग भगद्वक्तांच्या शरीर -स्पर्शामध्ये , नाक त्यांच्या चरणकमलांवर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधामध्ये आणि जिभेला भगबंतांना अर्पण केलेल्या प्रसदसेवनात संलग्न केले होते . ॥१९॥

त्याचे पाय भगवंतांची तीर्थक्षेत्रे इत्यादीची पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णच्यां चरणकमलांना वंदन करण्यात मग्न असे . अंबरीषाने पुष्पमाळा , चंदन इत्यादी भोग -सामग्री भगबंतांच्या सेवेसाठी समर्पित केली होती . ती स्वत :ला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे , तर त्याद्वारे भगवंतांच्या भक्तामध्येच आढळणारे प्रेम स्वत :मध्ये निर्माण व्हावे म्हणून . ॥२०॥

अशा प्रकारे , भगबंताना सर्वात्मा तसेच सर्वस्वरुप समजून , त्याने आपली सर्व कर्मे त्या यज्ञपुरुष , इंद्रियातीत भगबंतांना समर्पित केली होती आणि भगवद्वक्त ब्राह्यणांच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचे पालन करीत होता . ॥२१॥

त्याने "धन्व " नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वसिष्ठ , असित , गौतम इत्यादी आचार्याकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरुप सर्व अंगांसह दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ करुन यज्ञाधिपती भगवंताची आराधना केली होती . ॥२२॥

त्याच्या यज्ञांमध्ये देवांसह जेव्हा सद्स्य आणि ऋत्विज बसत असत , तेव्हा त्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नसे . त्यामुळे सुंदर वस्त्रे आणि तशीच रुपे असल्याने ते देवांसारखे दिसत असत . ॥२३॥

त्याची प्रजा महात्मांनी गायिलेल्या भगबंताच्या उत्तम चरित्राचे मोठ्या प्रेमाने कधी श्रवण करी तर कधी त्यांचे गायन करी . त्यापुढे ती प्रिय अशा स्वर्गाची सुद्वा इच्छा करीत नसे . ॥२४॥

श्रीहरीचें नेहमी आपल्या ह्रदयात दर्शन घेणार्‍या त्या प्रजेला सिद्वांनासुद्वा दुर्लभ अशी भोग -सामग्री आनंदीत करु शकत नव्हती . तिला होणार्‍या आत्मानंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होत्या . ॥२५॥

अशा प्रकारे तो राजा तपश्चर्येने युक्त असा भक्तियोग आणि प्रजापालनरुप स्वधर्म यांनी भगवंतांना प्रसन्न करु लागला आणि हळू -ह्ळू त्याने सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग केला . ॥२६॥

घर , स्त्री , पुत्र , बांधव , मोठमोठे हत्ती , रथ , घोडे तसेच पायदळ , अक्षय रत्ने , अलंकार , आयुधे इत्यादी वस्तू आणि न संपणारे खनिजे हे सर्व नाशिवंत आहे , असा त्याचा निश्वय होता . ॥२७॥

त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रूंना भयभीत करणारे आणि भगवद्वक्तांचे रक्षण करणारे सुदर्शन -चक्र दिले होते . ॥२८॥

एकदा त्याने आपल्यासारख्याच असणार्‍या पत्नीसह भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी एक वर्षापर्यत द्वादशीव्रत करण्याचा नियम केला . ॥२९॥

व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्याने तीन रात्री उपवास केला आणि एक दिवस यमुना नदेत स्नान करुन मधुवनामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा केली ॥ ३०॥

त्याने महाभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला आणि अंत :करणापासून तन्मय होऊन वस्त्रे , अलंकार , चंदन , पुष्पमाला , अर्ध्य इत्यादीनीं त्यांचे पूजन केले . नंतर श्रेष्ठ ब्राह्यण पूर्णकाम असल्याने त्यांना पूजेची इच्छा नव्हती , तरीसुद्वा राजाने भक्तिभावाने त्यांचे पूजन केले . त्यांना प्रथम स्वादिष्ट आणि अत्यंत उत्तम भोजन देऊन त्यांच्या घरी साठ

कोटी गाई पाठविल्या .त्या गाईची शिंगे सोन्याने आणि खूर चांदीने मढविलेले होते . सुंदर वस्त्रे त्यांना घातली होती . त्या गाई गरीब , तरुण , दिसावयास सुंदर , वासरे असलेल्या आणि पुष्कळ दूध देणार्‍या होत्या . ॥३१॥३४॥

ब्राह्यणांना सर्व देऊन झाल्यावर राजाने त्यांची आज्ञा घेऊन व्रताचे पारणे करण्याची तयारी केली . त्याच वेळी शापानुग्रहसमर्थ दुर्वासमुनी त्यांच्याकडे अतिथी म्हणून आले .॥३५॥

त्यांना पाहाताच राजा उठून उभा राहिला . नंतर त्यांना आसन देऊन त्यांची पूजा केली . तसेच त्यांच्या चरणांना वंदन करुन त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली . ॥३६॥

दुर्वास -मुनींनी अंबरीषाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यानंतर आवश्यक कर्मे करण्यासाठी म्हणून ते नदीवर गेले . ते परब्रह्याचे ध्यान करीत यमुनेच्या पवित्र पाण्यात स्नान करु लागले . ॥३७॥

इकडे द्वादशी फक्त अर्धी घटका शिल्लक राहिली . धर्मज्ञ अंबरीषांनी धर्म -संकटात पडल्याकारणाने ब्राह्यणांबरोबर पारण्यासंबंधी विचार -विनिमय केला . ॥३८॥

तो म्हणाला , "ब्राह्यणाने भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणे आणि द्वादशी असेपर्यत पारणे न करणे हे दोन्हीही दोष आहेत . म्हणून जे केल्याने माझे कल्याण होईल आणि मला पापही लागणार नाही , असे मला केले पाहिजे . ॥३९॥

पाणी पिणे म्हणजे भोजन करणे आणि न करणेही होय . म्हणून ब्राह्यण हो ! फक्त पाणी पिऊनच मी व्रताची पारणा करतो ." ॥४०॥

असा निश्चय करुन मनोमन भगवंताचे चिंतन करीत अंबरीष पाणी प्याला आणि हे परीक्षिता ! तो दुर्वासमुनीच्यां येण्याची वाट पाहात राहिला . ॥४१॥

आवश्यक नित्यकर्मे पार पाडून दुर्वासमुनी यमुनेवरुन परत आले . राजाने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले , तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानानेराजाने पारणे केले आहे , हे ओळखले . ॥४२॥

त्यावेळी दुर्वासमुनीनां भूक लागली होती . रागाने ते थरथर कापू लागले . त्यांनी भुवया चढवल्या . तोंड वेडेवाकडे करीत हात जोडून उभे असलेल्या राजाला दरडावून ते म्हणाले . ॥४३॥

" राज्यमदाने उन्मत्त होऊन स्वत : ला सत्ताधारी मानून धर्म सोडून वागणार्‍या याचा नीचपणा तर पाहा ! हा कसला विष्णुभक्त ! ॥४४॥

मी याचा अतिथी म्हणून आलो . याने मला भोजनाचे निमंत्रणही दिले , परंतु मला न वाढताच हा जेवला ! तत्काळ मी तुला त्याचे फळ दाखवितो !" ॥४५॥

असे म्हणत म्हणतच क्रोधाने भडकून त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अंबरीषांना मारण्यासाठी तिच्यातून एक कृत्या उत्पन्न केली .ती प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे धगधगत होती . ॥४६॥

आगीप्रमाणे धगधगणारी ती हातात तलवार घेऊन राजार तुटून पडली . त्यावेळी तिच्या पायांच्या आदळआपटीने पृथ्वी थरथर कापत होती , परंतु अंबरीष मात्र तिला पाहून एक केसभरही ढळला नाही . ॥४७॥

परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच नेमलेल्या सुदर्शनचक्राने क्रोधाने फूक्तारणार्‍या सापाला आग जशी जाळून टाकते , त्याचप्रमाणे त्या कृत्येला जाळून टाकले . ॥४८॥

दुर्वासांनी आपला प्रयत्न फुकट गेला असून ते चक्र आपल्याकडे येत आहे , असे पाहिले , तेव्हा ते भयभीत होऊन प्राण वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले . ॥४९॥

उंचच उंच भडकणार्‍या ज्वाळा असणार्‍या वणव्याने जसा सापाचा पाठलाग करावा , त्याचप्रमाणे भगबंताचे चक्र त्यांच्यामागे लागले , ते चक्र आपल्या पाठोपाठ येत आहे असे जेव्हा दुर्वासांनी पाहिले , तेव्हा मेरुपर्वताच्या गुहेत दडण्यासाठी ते तिकडे धावू लागले . ॥५०॥

दुर्वासमुनी दिशा , आकाश , पृथ्वी , सप्त पाताळे , समुद्र , लोकपालांनी सुरक्षित केलेले लोक , इतकेच काय स्वर्गापर्यत गेले . परंतु जेथे जेथे ते गेले , तेथे तेथे ते असह्य सुदर्शन चक्र आपला पाठलाग करीत असल्याचे त्यांना दिसले . ॥५१॥

जेव्हा स्वत :चे रक्षण करणारा कोणीच त्यांना मिळाला नाही , तेव्हा तर ते अधिकच घाबरले , आपला त्राता शोधत ते ब्रह्यदेवाकडे गेले आणि म्हणाले , हे स्वयंभू ब्रह्यदेवा , भगबंतांच्या या तेजोमय चक्रापासून माझे रक्षण करा . ॥५२॥

ब्रह्यदेव म्हणाले -

दोन परार्धाच्या कालखंडानंतर कालस्वरुप भगवान आपली ही सृष्टि -लीला संपवतील आणि तेव्हाच हे विश्व जाळून टाकण्याची इच्छा करतील , त्यावेळी त्यांच्या भुवयांच्या इशार्‍यानेच सार्‍या विश्वासह माझा हा लोक नाहीसा होऊनजाईल ॥५३॥

मी , भगवान शंकर , दक्ष , भृगू इत्यादी प्रजापती , भूतेश्वर , देवेश्वर इत्यादी सर्वजण आम्ही त्यांनी बनविलेल्या नियंमानी बद्व आहोत . तसेच त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून आम्ही जगाचे हित करतो . त्यांच्या भक्ताचा द्रोह करणार्‍याला वाचविण्यास आम्ही असमर्थ आहोत . ॥५४॥

ब्रह्यदेवांनी जेव्हा दुर्वासांना अशा प्रकारे निराश केले , तेव्हा भगवंतांच्या चक्राने त्रस्त होऊन ते कैलासनिवासी भगवान शंकरांना शरण गेले . ॥५५॥

श्रीमहादेव म्हणाले -

ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रह्यदेवासारखे जीव आणि त्यांचे उपाधिभूत कोश तसेच या ब्रह्यांडाप्रमाणेच अनेक ब्रह्यांडे , योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आल्यावर नाहीशी होतात , त्या प्रभूच्यां संबंधात काहीही करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही . ॥५६॥

मी , सनत्कुमार , नारद , भगवान ब्रह्यदेव , कपिलदेव , अपांतरतम , देवल , धर्म , आसुरी तसेच मरीची इत्यादी अन्य सर्वज्ञ सिद्वेश्वर -असे आम्ही सर्वजण भगवंतांची माया जाणू शकत नाही . कारण आम्ही त्याच मायेच्या चक्रात सापडलो आहोत . ॥५७॥५८॥

हे चक्र त्या विश्वेश्वराचे शस्त्र आहे . आम्हांला याचा प्रतिकार करता येणार नाही . आपण त्यांनाच शरण जावे . ते भगवंतच तुमचे कल्याण करतील . ॥५९॥

तेथून सुद्वा निराश होऊन दुर्वास भगवंताच्या परमधाम वैकुंठात गेले , जेथे लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसग निवास करतात ॥६०॥

भगंवंताच्या चक्राच्या आगीने होरपळलेले दुर्वास थरथर कापत भगवंतांच्या चरणांवर पडले . ते म्हणाले , " हे अच्युत ! हे अनंता ! संतांना प्रिय असणार्‍या प्रभो ! विश्वाचे जीवनदाता ! मी अपराधी आहे . आपण माझे रक्षण करावे ." ॥६१॥

आपला परम प्रभाव न जाणल्याकारणानेच मी आपल्या प्रिय भक्ताचा अपराध केला आहे . प्रभो ! आपण मला त्यापासून वाचवा ! आपल्या नावाचा उच्चार करण्याने नरकातील जीवसुद्वा मुक्त होतो . ॥६२॥

श्रीभगवंत म्हणाले -

हे ब्राह्यणा , मी सर्वथैव भक्तांच्या अधीन आहे . मला जराही स्वतंत्रता नाही , माझ्या सज्जन भक्तांनी माझे ह्रदय आपल्या ताब्यात ठेवले आहे . मला भक्तच प्रिय आहेत . ॥६३॥

ब्रह्यन ! माझ्या भक्तांचा एकमेव आश्रय मीच आहे . म्हणून माझ्या साधुस्वभावी भक्तांना सोडून मी मला स्वत :लाही इच्छित नाही की माझ्या अर्धागिनी लक्ष्मीलाही इच्छित नाही . ॥६४॥

जे भक्त स्त्री , पुत्र , गृह , आप्तेष्ट , प्राण , धन , इहलोक आणि परलोक , हे सर्व सोडून फक्त मलाच शरण आले आहेत , त्यांना सोडण्याचा विचार तरी मी कसा करु ? ॥६५॥

ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पातिव्रत्याने सदाचारी पतीला वश करुन घेते , त्याचप्रमाणे माझ्यामध्ये आपले मन गुंतवलेले समदर्शी साधू भक्तीने मला वश करुन घेतात . ॥६६॥

माझे अनन्य भक्त माझ्या सेवेनेच स्वत ;ला कृतकृत्य मानतात . माझ्या सेवेच्या फलस्वरुप जेव्हा त्यांना सालोक्य -सारुप्य इत्यादी मुक्ति प्राप्त होतात , तेव्हा ते त्यांचासुद्वा स्वीकार करु इच्छित नाहीत . तर मग कालगतीनुसार नष्ट होणार्‍या वस्तूचीं काय किंमत ? ॥६७॥

भक्त हे माझे ह्रदय आहेत आणि त्या भक्ताचें ह्रदय मी आहे . ते माझ्याव्यतिरिक्त काहीच जाणत नाहीत आणि मी त्यांच्या -व्यतिरिक्त काहीच जाणत नाही . ॥६८॥

दुर्वासा , ऐक . मी तुला एक उपाय सांगतो . ज्याचे अनिष्ट केल्याने तुझ्यावर हे संकट आले आहे , त्याच्याकडेच तू जा . निरपराध साधूंचे अनिष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे अनिष्ट करणार्‍यानेच अमंगल होते . ॥६९॥

तपश्चर्या आणि विद्या ही ब्राह्यणांचे कल्याण करणारी साधने आहेत . परंतु जर ब्राह्यण उद्दाम आणि अन्यायी झाला तर तीच दोन्ही साधने उलटे फळ देऊ लागतात . ॥७०॥

ब्राह्यणा ! तुझे कल्याण असो . नाभागनंदन परम भाग्यशाली राजा अंबरीषाकडे जा आणि त्याची क्षमा माग , तरच तुला शांती मिळेल . ॥७१॥

अध्याय चौथा समाप्त

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:16.8030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सूतक,सूतकी

 • See सुतक & सुतकी. 
RANDOM WORD

Did you know?

Gotra. Vats & vatsayan are same ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.