नक्षत्रस्वामी - श्रीनक्षत्रस्वामींची आरती

श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .


जय देव जय देव जय स्वामीराजा महामातृभक्ता ।

ओवाळिता तुम्हा सौख्य , शांति चित्ता ॥धृ॥

साध्वी माता अपुली वैधव्ये पिडली ।

पुत्र पुत्र करिता अति कष्टी झाली ॥

विधवा जाया , कैसा प्रसविल पुत्राला ? ।

अनन्यभावे जाई शरण मुनिवर सिद्धाला ॥

शनिवृक्षाखाली पडले , गिळले नक्षत्र ।

सिद्धकृपेने झाली माता , पावन तुम्ही पुत्र ॥२॥

झाली छळणा ज्ञानेशापरी , उपयनयना पोटी ।

उफाळलेली सरीता केली पार तयासाठी ॥

ब्रम्हनाळचे आनंदमूर्ति , नमुनि वदले उद्गार ।

अजन्मा तुम्ही , जन्मा आले करण्या उद्धार ॥३॥

आषाढ आणि अश्विन मासी येति बिडेश भेटाया ।

देवघर्‍यांच्या कुळास स्रामी तुम्हीच रक्षाया ।

स्वये घेतली तुम्ही समाधि प्रभुजवळी वास ।

नक्षत्रस्वामींची व्हावी सेवा ही अमुचि आंस ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP