मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
पहा विचारुनि सारासार व...

रामजोशी - पहा विचारुनि सारासार व...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


पहा विचारुनि सारासार वचन मनांत धरा न धरा ।

काम कोप हे मारा मग तुम्ही साधन अन्य करा न करा ॥ध्रु०॥

नासशिल संसार अशाचा मोह मनीं धरिला लटका ।

काळ सदा सर्वत्र हिंडतो निर्दय बांधुनिया पटका ।

किती हय गज खर पक्षि सर्प कपि सारमेय योनींत भटका ।

मास पक्ष संवत्सर माने काळ म्हणे भरली घटका ॥पहा०॥१॥

पदीं लागतो सत्य सांगतो निश्चय मोडुनियां काडी ।

एकांती कृत पापपुण्य परि सर्व तव करितील चाडी ।

आत्मभावना अधिंच करावी संसृतिची झाडाझाडी ।

समजा मनि मग कसा लागतो ज्ञानदीप जळतां दाढी ॥पहा०॥२॥

विधिहरिहर पुरुषोत्तम ईश्वर सुरेश्वर नरमानव फ़सवी ।

सारे जाणती तरती इतरां नेऊनिया नरकीं बसवी ।

टाकुनि भार्या सदगुरुपायां भजतां मोक्षपदीं ठसवी ।

जनिं गंगाधरसा स्मर जिंकुनी दुर्लभतर नर यश वसवी ।

पहा विचारुनि सारासारा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP