मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
राधिकारमण गोविंदा नको ...

रामजोशी - राधिकारमण गोविंदा नको ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


राधिकारमण गोविंदा नको येऊं तिंदा माझ्या गेहीं ॥ध्रु०॥

भोगाया मिळाली रांड तुला ती दांड चेटकी दासी ।

छी म्हणता येशिल चोरा फ़जितखोरा दारापाशी ।

मत्पती हा मोठा बाट करुं नको थाट मारला जाशी ॥

गरतिच्या भोंवत्या घिरट्या घालिसी किती ।

सवतीच्या घरीं जा चाकर होई श्रीपती ।

मी चंद्रावळ नांवाची आहे हो सती ।

कां करिशी यशाचा तोटा होसिल खोटा मानवदेहीं ।

राधिकारमण गोविंदा ॥१॥

घेउनियां हातीं फ़णी घालिशी वेणी रांडेपाठी ।

तिजवरतें वारिसी चामर दिससी पामरसा रतिसाठीं ।

अबरुच नाहीं तुज चाड किती रे द्वाड तुझी हो धाटी ।

ती राधा तसि मी नोहे व्यभिचारिणी ।

पापाची होईन कां मी अधिकारिणी ।

मजवांचुन अबला कोणती कुलतारिणी ।

ती असेल तुझी कुणी प्यारी, करी जाया रीति जसा देही ।

राधिकारमण गोविंदा ॥२॥

मी सांगुन चुकते तुला नव्हे तूं भला गवळ्याच्या पोरा ।

सोडुन दे माझी वाट चालेना हट तुझा नाहीं जोरा ।

जातीनें काळें आंग हुडिकसिल रंग गोपीचा गोरा ।

गोकुळांत सगळ्या ठिवलिस अबरु भली ।

इतक्यावर ऐसी हालऊं नको जिभली ।

कविराय म्हणविसील जनांत कर्मे मनांत टाकुनी देही ।

राधिकारमण गोविंदा नको येऊं तिंदा माझ्या गेहीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP