मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
मूल तुझा अति अनिवार य...

रामजोशी - मूल तुझा अति अनिवार य...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


मूल तुझा अति अनिवार यशोदे ॥ध्रु०॥

चावट निशिदिनीं घरघर फ़िरतो ॥

रात्र न म्हणे दिवा मुलगिस धरतो ॥

गोरस जळो परिं भलतेच करितो ॥

आम्ही पर युवती हा कुच कसे चुरतो ।

नग्न जळीं उभ्या वसनचि हरितो ॥

अधिंच अहिर - जात उणीगे ॥

त्यात तुझा बाळ गुणी गे ॥

यासम नसे शिरजोर कुणी गे ॥

हा झाला नगरांत धनी गे ॥

गोष्ट घडो सहसा न उणी गे ॥

खेळकरी सदनीं न वसोदे ॥ मूल तुझा ॥१॥

म्हणशील चिमणा गे बाळ आपुला ॥

चैन पडों नदे घडिभर वपुला ॥

मातविलें तुवा या कंस-रिपुला ॥

रजत न म्हणो याला हा बाई शिंपुला ॥

काय वदों याच्या खोडी हा चेवला ॥

रीत तुझ्या नगरांत अशी गे ॥

राहिल ती राहणार कशी गे ॥

बोलेल हा बहु गोड तुशीं गे ॥

धन्य तुझी सकळात कुशी गे ॥

ज्यांत असा निपजे बनशी गे ॥

गोड तुझें तुजलागिं दिसोंदे ॥ मूल तुझा ॥२॥

गोकुळ नगरी हा सारिच विटवी ॥

सांडुनि दहिदुध खाऊनि लुटवी ॥

कुंजवनीं आल्या गरतिस फ़टवी ॥

निजल्या मुलिला चिमटुन उठवी ॥

यास न शिशुपणी लागली सटवी ॥

यांत कशी पड्णार पुरी गे ॥

सोशिल हे झट कां दुसरी गे ॥

काय अशी नित्य धुम बरी गे ॥

धीट मला म्हणतो नवरी गे ॥

आम्ही लटक्या बाई तूंच खरी गे ॥

सांग तुशीं कविराय रुसो दे ॥ मूल तुझा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP