मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
कांहीं लाज नाहीं पोटीं...

रामजोशी - कांहीं लाज नाहीं पोटीं...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


कांहीं लाज नाहीं पोटीं । मनुष्यांची काय दाटी ॥ध्रु०॥

कृष्णा तुझी खोड खोटी । झोंबू नको सोड गाठीं ।

जेव्हां तेव्हां अडविशी गांठी साठी ।

लावू नको हात देहा माझ्या । मी तो मोठ्या विलाशाची भाजा ।

पृथ्वीचा भूप भोगी ज्याला (म्हणती महाराजा )

त्याने मला काल बागामध्यें दिला हार ताजा ।

साखरेच्या उंच बरवी पदकांची थोर गाठी ।

कांहीं नाहीं लाज पोटी ॥१॥

खाशालाही हौस मोठी मनाजोगी गांठविली ।

आपुलिया हातें माझ्या कंठामध्यें सांठविली ।

उगी नोहे मनाची हे मंदिराला पाठविली ।

हिच्यापुढें मोत्यांची म्या कंठी नाहीं आठवली ।

ऐशीलाही तोडायाला पाहसि हे कोण धाटी ।

काहीं नाहीं लाज पोटीं ॥२॥

आतां तरी सांगते झटूं नको हो अवयवाला ।

खाशाची ही प्यार साळू भीतें काय तुझ्या बाला ।

गांठीसाठी प्राण जातिल कुण्या झाडाचा तूं पाला ।

हिजहुन गोड वाटे वैजयंती काय माला ।

हिचा तुला लोभ झाला कविरायाचे साठी ।

काहीं नाहीं लाज पोटीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP