हरिपाठ - अभंग ११

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


हरि नामोच्चारानें पापांचा क्षणांत क्षय.

हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥१॥

हरी नामजपानें अग्निरुपता

तृण अग्नीं मेळे समरस झालें । तैसें नामे केलें जपता हरी ॥२॥

हरि नामोच्चाराने भूतबाधेची पिछेहाट

हरि उच्चारणीं मंत्र हा अगाध । पळे भूतबाध भय याचें ॥३॥

ज्ञानेश्‍वरमहारांजांचा हरि हा सर्वसमर्थ असुन त्यांचे वर्णन करतानां उपनिषदें थकली

ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP