१) जाम्यदग्न्य द्वादशी :
 वैशाख शु. द्वादशीला जामदग्न्य द्वादशी असे नाव आहे. त्या दिवशी परशुरामाच्या सुवर्णमूर्तीची पूजा करावी, असे सांगितले आहे. फल- पराक्रमी पुत्राची प्राप्ती.
२) मधुसूदन पूजा :
वैशाख शु. द्वादशीला भगवान मधुसूदनाची पूजा करावी व व्रत करावे. त्यामुळे अग्नीष्टोम केल्याचे फळ मिळते. जर या दिवशी बुध व मंगळ सिंह राशीत व सूर्य मेष राशीत असातील , तसेच हस्तनक्षत्र व व्यतिपातयोग असतील तर या सुयोगावर अन्न, वस्त्र, सुवर्ण , गाय व भूमी दान देण्यामुळे सर्व प्रकारची पापे दूर होऊन देवत्व, इंद्रत्व, नृपतित्व आणि आरोग्य यांची प्राप्ती होते.

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP