मार्गशीर्ष शु. द्वितीया

Margashirsha shudha Dvitiya


१ अतियोगव्रत :

एक तिथिव्रत. हे केवळ स्त्रियांसाठी आहे. मार्ग. शु. द्वितीयेपासून प्रारंभ. तृतीयेस तांदळाच्या पिठाच्या शिवगौरीच्या प्रतिमा बनवून त्यांची पूजा व पायस-भोजन असा याचा विधी आहे. व्रतावधी एक वर्ष. प्रत्येक महिन्यात या तिथीस वेगवेगळ्या नावांनी व पुष्पांनी पूजा करतात.

 

२ पितृपूजन :

मार्गशीर्ष शु. द्वितीयेला पितृपूजन करून व्रत केल्याने पितृगण संतुष्ट होतात आणि न केल्याने ते दुःखी होतात.

N/A

N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP