TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|मारुती स्तोत्रे|
भीमरूपी महारुद्रा वज्र हन...

मारुती स्तोत्र - भीमरूपी महारुद्रा वज्र हन...

भीमरूपी मारुती स्तोत्र - Bheemarupi Maruti Stotra
Maruti Stotra.

मारुती स्तोत्र
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती .
वनारि अंजनीसूता रामदूता प्रभंजना .. १..
महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें .
सौख्यकारी  दुःखहारी धूर्त वैष्णव गायका .. २..
दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा .
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना .. ३..
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना .
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका .. ४..
ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें .
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें .. ५..
ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती .
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रकुटी तठिल्या बळें .. ६..
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं .
सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा .. ७..
ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू .
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी .. ८..
कोटिच्या कोटि उड्डणें झेपावे उत्तरेकडे .
मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें .. ९..
आणिला मागुती नेला आला गेला मनोगती .
मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे .. १०..
अणूपासोनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे .
तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें .. ११..
ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके .
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे .. १२..
आरक्‍त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा .
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा .. १३..
धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही .
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां .. १४..
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही .
नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें .. १५..
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली .
दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकलागुणें .. १६..
रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू .
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती .. १७..
.. इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम श्री मारुतिस्तोत्रम्‌ संपूर्णम्‌ ..
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:20:57.5930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

dose equipment

  • मात्रा सामग्री 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site