TransLiteral Foundation

r renu dandekar

 • बालगीत - नको पाटी नको पुस्तक नक...
  निळ्या आभाळवाटांनी पंख पसरुन एकेकटयाने किंवा थव्यांनी उडणारे पक्षी पाहताना मुलांच्या मनात येते, ’आपणही असे पंख पसरुन वार्‍यावर स्वार व्हावे.’
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तारांगण

 • न. ( ल .) अकांडतांडव ; आदळाआपठ . 
 • न. १ नभोमंडळ ; नक्षत्रमंडळ . २ वेधशाला . ३ खेळ , मजा इ० पाहण्यासाठी केलेले उच्चासन , माळा , माचोळा . ४ घरच्या वरच्या मजल्याच्या खिडकीपुढे ( हवा खाण्यासाठी , मजा पाहण्यासाठी ) केलेला लहान सज्जा . ५ ( ल . ) ( सैन्य इ० कांची ) दाणादाण ; पांगापांग ; विकळितपणा ; वाताहत ; फांकाफांक . फौज मोडून तारांगण केले . - शारो २८ . ६ . ( कामे , धंदा इ० कांतील ) गोंधळ ; अव्यवस्था . ७ . ( सावकाराच्या तगाद्यामुळे कुळाची , अनाथ मुलाची ) तारंबळ ; त्रेधा ; घाबरगुंडी ; मनःक्षोभ . ८ ( गो . ) कौले घालण्यापूर्वी घरावर तयार केलेले लांकडी काम . [ तारा + अंगण ] ताराधीश - पु . चंद्र . तारापात - पु . उल्कापात . [ तारा + सं . पात = पडणे ] ताराबल , - न . विवक्षित असलेल्या नक्षत्र ग्रहांदिकाची अनुकूलता ; ज्योतिष शास्त्रदृष्ट्या मंगल अशी वेळ . तारामंडल , - न . १ नक्षत्रांनी युक्त असे गगनमंडल ; तारांगण अर्थ १ पहा ; नक्षत्रमंडळ . २ ( सोनारीचा धंदा ) स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक दागिना . दोन्ही फाशांत दोनदोन असे चार मणी लावलेली ठुशांची पेटी घेऊन तिच्याखाली एक मणी ओवून त्या तर्‍हेने एकाबाजूस सव्वीस व दुसर्‍या बाजूस सव्वीस अशा पेट्या घालतात व मध्यंतरी घागर्‍यांचे थर लाविलेले मंगळसूत्र घालून हे सर्व एकत्र पटवून हा दागिना तयार करितात . [ तारा + मंडल = वर्तुळ , समुदाय ] तारामैत्री - स्त्री . १ कुंडलीतील ग्रहांतील मित्रभाव . तिजशी माझे तारामैत्री मिळाल्याप्रमाणे सख्य जमले आहे . - कमं २ . ६५ . २ नुसत्या नजरानजरीने जमलेले सख्य , प्रेम . तारासमूह - पु . आकाशांत ढगाच्या किंवा धुक्याच्या ठिपक्यांप्रमाणे दिसणार्‍या अंधक तेजस्वी पदार्थांचा समुदाय ; तेजोमेघ . - ब्रूसकृत ज्योतिषशास्त्राची मूलतत्त्वे १७९ . [ तारा + समूह ] 
 • ना. आकाश मंडप , आकाश मंडळ , नभोमंडळ . 
RANDOM WORD

Did you know?

केस काढण्यासंबंधी विशेष माहिती द्यावी.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.