TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

नरहरि

: Folder : Page : Word/Phrase : Person
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कपाळ

  • न. १ डोक्याची कवटी ; डोक्यांचं हाड ; करटी . २ मडक्याचा अर्धा भाग ; खापर ; खापराचा तुकडा ; श्रौतकमींत ज्यावर पुरोडाश भाजतात असे खापराचें तुकडे . ८ , ११ , १२ , १३ असून त्यांचा एक गट असतो . ३ भिवया आणि डोक्याचे केंस यामधील भाग ; ललाट ; भाल . ४ नशीब ; प्रारब्ध ; ब्रह्मलिखित ( ब्रह्मदेव मनुष्याच्या कपाळावर त्याचें भाविष्य लिहून ठेवितो या समजुतीवरून ). ' किं एकदांचि फुटलें त्वत्पतिपंचककपाळ पापानें .' - मोसभा ६ . ४ . ' गडे , काय कपाळाला करूं । नाहीं घरांत एक लेंकरूं ॥ ' - प्रला . ५ ( कपाल ) चपटें , पातळ हाड ; खांद्याचा किंवा मांडीचा फरा . ६ भिक्षापात्र , ' कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर । ' - तुगा २०५० . ७ ( भुगोलशास्त्र ) कोणत्याहि याम्योत्तर वृत्ताच्यापुर्वेकडील किंवा पश्चिमेकडील अर्धे गोलार्ध . - उद्गा . १ नाहीं . खोटें . अशक्य हा अर्थ पटविण्यासाठीं ' माझें कपाळ ! तुझें कपाळ । ' इ० उद्गार काढतात . ' असें ऐकतां हासले द्वारपाळ । वदों लागले कृष्णजीचें कपाळ ! । ' - कचसु ६ . २ दुःखदर्शक उद्गार , हाय ! हाय ! ' काय सांगु कपाळ !' 
  • ०उठणें चढणें - डोकें दुखणें ; त्रास कटकट होणें ; पीडा होणें . ' भजन करितो सर्व काळ । उठते कपाळ आमचें ॥ ' उगा करिती कोल्हाळ । माझें उथणें कपाळ । ' - रामदास . 
  • ०काढणें वैभवास चढणें ; नशीब काढणें , ' तो चांगला कपाळ काढील असा मला रंग दिसत आहे .' 
  • ०खुलणें ( हिं ) दैव उदयास येणें . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

What are the names for Ekadashi (11th day in fortnight)?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site