TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

कृ ब निकुम्ब

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घांसणें

  • उ.क्रि. १ घर्षण करणें ; चोळणें ; जोरानें पुसणें ; साफ करणें ; घासटणें . २ खरडणें ; झाजरणें ; ओरबडणें . ३ रागें भरणें ; कानउघाडणी करणें ; खरडपट्टी काढणें ; खडसणें . ४ वादविवाद , चर्चा , भवति न भवति , काथ्याकूट करणें . ५ ( एखाद्यास व्यवहारांत ) फसविणें ; बुडनिणें ; बुचाडणें . ६ ( ल . ) पुन : पुन : ( एखाद्या अभ्यासाची ) आवृत्ति करणें ; घोकणें ; पाठ करणें ; घट्ट करणें . हा श्लोक दहादां घासला म्हणजे पाठ होईल . ७ पढवून तयार करणें ; पढविण ; मेहनतीनें अभ्यास करविणें . हीं पोरें घासलीं पाहिजेत , तेव्हां दोन अक्षरें येतील . ८ ( ज्ञान इ० कांस ) उजळा देणें ; गंज घालविणें ; आवृत्ति करून ( ज्ञान इ० ) तयार ठेवणें . - अक्रि . १ घासलें जाणें . २ ( ल . ) ( एखाद्याशीं ) भांडणें ; झगडणें ; चकमक होणें ; खेटणें ; बरकशी लावणें ; स्पर्धा करणें . ३ घासाघीस करणें ; आग्रह ; अट , हट्ट धरणें ; ओढून धरणें . [ सं . घर्षण ; प्रा ; घासण ; हिं . घसना ; गु . घसवुं ; सिं . घशों ; फ्रें . खोस ] घासून घेणें - १ ( निराशेनें , संतापानें , निष्फळ झालेल्या मत्सरानें ) हात चोळणें , चुरमळणें ; चडफडणें . तूं आपल्या घरीं घासून घेतलेंस म्हणून त्याचा केंसही वांकडा होणार नाहीं . २ सोसणें ; सहन करणें ( नुकसान , दु : ख ). म्ह० घासून घ्यावें पण हांसून घेऊं नये = वेळ पडल्यास वाटेल ते नुकसान सोसावें पण लोक आपणास हंसतील , ठपका देतील असें करूं नये . 
RANDOM WORD

Did you know?

Request for Anagha Ashtami Puja vrat Sagrasangit Puja
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site