-
न.
- तारा ; तारका .
- चंद्राच्या कक्षेत असलेल्या सत्तावीस तारकापुंजांपैकी प्रत्येक . ह्या सत्तावीस तारकापुंजांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - अश्विनी , भरणी , कृत्तिका , रोहिणी , मृग , आर्द्रा , पुनर्वसु , पुष्य , आश्लेषा , मघा , पूर्वा , उत्तरा , हस्त , चित्रा , स्वाती , विशाखा , अनुराधा , ज्येष्ठा , मूळ , पूर्वाषाढा , उत्तरषाढा ( २८ वे अभिजित ) श्रवण , धनिष्ठा , शततारका , पूर्वभाद्रपदा , उत्तरा भाद्रपदा , व रेवती .
- भूचक्राच्या सत्तावीस विभागांपैकी प्रत्येक ; तेरा अंश व वीस कला इतके अंतर ओलांडण्यास चंद्रास लागणारा काळ .
- ( गो . ) जन्मटिपण . [ सं . ]
- ( एखाद्याच्या ) तोंडावर नक्षत्र पडणे - ( सारखी ) बडबड , वटवट करण्याचा स्वभाव असणे . याच्या तोंडावर नक्षत्रच पडले आहे जसे ! हा मेला काय पाहिजे तसले अभद्र बडबडतो . - अतिपपीडाचरित .
- पायावर नक्षत्र पडणे - नेहमी भटकत राहणे ; फिरणे .
- हातावर नक्षत्र पडणे - चोरी करण्याची सवय असणे . सामाशब्द -
-
०गंडांत न. अश्विनी , मघा व मूळ या नक्षत्रांच्या आरंभीच्या दोन घटका अनुक्रमाने मिळून चार घटकांचे एक अशी तीन गंडांते होतात त्यापैकी प्रत्येक . ही जन्मकालास शुभाशुभ आहेत ती येणेप्रमाणेः - अश्विनी , मघा व मूळ यांच्या पूर्वार्धात जन्म झाल्यास पित्यास अनिष्ट व रेवती , आश्लेषा व ज्येष्ठा यांच्या उत्तरार्धात जन्म झाल्यास बालकास अनिष्ट होत . [ नक्षत्र + गंडांत ]
-
०दर्शन न.
- (संध्याकाळी ) नक्षत्र , तारे दिसूं लागणे .
- ( ल . ) नक्षत्रे दिसूं लागतात ती संध्याकाळची वेळ . [ नक्षत्र + दर्शन ]
-
०नाथपति पु. नक्षात्रांचा स्वामी ; चंद्र . [ नक्षत्र + नाथ , पति ]
Site Search
Input language: