Dictionaries | References

मेण

   
Script: Devanagari

मेण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाचे पसून म्होंवाच्या मुसांचें मालें तयार जाता असो चिकचिकीत मोव पदार्थ   Ex. शीला मेणा पसून खूब सोबीत बावल्यो करता
ATTRIBUTES:
मोव गुळगुळीत
HOLO COMPONENT OBJECT:
मेणाचो कागद
HOLO STUFF OBJECT:
मेणवात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমম
bdमुसथा
benমোম
gujમીણ
hinमोम
kanಮೇಣ
kasموم
malമെഴുക്
marमेण
oriମହୁଫେଣା
panਮੋਮ
sanसिक्थम्
tamமெழுகுவர்த்தி
telమైనము
urdموم

मेण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
mēṇa n Wax. 2 fig. Softly and nicely boiled rice, split pulse &c. मेण काढणें g. of o. To beat soundly. मेण स्वस्थ होणें g. of s. To get fat and sleek. मेण होणें To soften down into gentleness or mildness.
Phrase implying the impossibility of great potentates, warriors, scholars, or other great ones, or of conflicting dispositions or geniuses, dwelling together in peace and concord. Ex. तुकयाची प्रतिष्ठा वाढतां तेथें ॥ त्याचे मनीं द्वेष उपजत ॥ म्हणे एका मेणांत दोन सुऱ्या निश्चित्त ॥ समावति कैशा परी ॥. 2 Used also to intimate the necessary ill performance or management of a business in the hands of two persons.

मेण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Wax. A scabbard.
मेण काढणें   Beat soundly.
एका मेण्यांत दोन सुऱ्या   A phrase implying the impossibility of great geniuses dwelling together in concord.

मेण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तेलकट, चिकट, मऊ, द्यावा तो आकार घेणारा, अपारदर्शक, भिजायला अटकाव करणारा नैसर्गिक वा कृत्रिमरीत्या बनवला जाणारा एक पदार्थ   Ex. मेणापासून बाहुल्या किंवा मेणबत्त्या बनवतात
ATTRIBUTES:
गुळगुळीत मऊ
HOLO COMPONENT OBJECT:
मेणकागद
HOLO STUFF OBJECT:
मेणबत्ती
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমম
bdमुसथा
benমোম
gujમીણ
hinमोम
kanಮೇಣ
kasموم
kokमेण
malമെഴുക്
oriମହୁଫେଣା
panਮੋਮ
sanसिक्थम्
tamமெழுகுவர்த்தி
telమైనము
urdموم

मेण     

 न. 
  1. मधाच्या पोळ्यांतून निघणारा चिकट , घट्ट , चरबीसारखा पदार्थ ; मधूच्छिष्ट .
  2. म्यान ; कोष ; तरवारीचें घर . मेण शिकल केली . - ऐपो ४३० . [ फा . मियान ] ( वाप्र .)
  3. जनावराच्या शरीरांतून किंवा वनस्पतीपासून काढण्यांत येणारा वरील सारखा पदार्थ ; तेलाची बेरी .
  4. ( कु . ) मासे मारण्याकरितां केलेलें विषारी औषध .

०करणें   
  1. म्यानांत तरवार घालणें ; कोषित करणें .
  2. ( ल . ) झाकणें ; वस्त्रादिकांनीं आच्छादित करणें . मेण कर आरसा , सख्यांनो , गुलाल भांगीं नका भरुं । - प्रला १३६ .

एका मेणांत दोन सुर्‍या सामावणें , एका मेणांत दोन सुर्‍या राहणें   
  1. कोणतेहि दोन मोठे राजे , विद्वान , प्रतिष्ठित पुरुष , परस्पर विरोधी स्वभाव व बुद्धि असलेलीं माणसें , प्रतिस्पर्धी हीं भांडण न करतां शांततेनें एकत्र राहूं शकत नाहींत अशा अर्थीं वापरतात तुकयाची प्रतिष्ठा वाढतां तेथें । त्याचे मनीं द्वेष उपजत । म्हणे एका मेणांत दोन सुर्‍या निश्चित । समावती कैशा परी ।
  2. एक काम दोघांकडे असल्यानें त्या कामाची होणारी दुर्दशा , अव्यवस्था या अर्थी .

वि .    ( ल . ) मऊ व चांगला शिजलेला पदार्थ ( तांदूळ डाळ , इ० ). [ फा . मोम ] ( वाप्र . )
०काढणें   ( ल . ) खूप चोपणें , झोडणें , मारणें .
०घालणें   ( कु . ) मासे धरण्यासाठीं त्रिफळे , गेळफळ , निवळकांडें इ० कुटून पाण्यांत घालणें .
०स्वस्त   - ( मनुष्य ) लठ्ठ व गुलगुलीत होणें .
होणें   
  1. ( मनुष्य ) लठ्ठ व गुलगुलीत होणें .
  2. नरमावून सौम्य , शांत होणें .
  3. शिजून मेणाप्रमाणें होणें ( भात , डाळ इ० ).

मेणाची चोटली कढयता    ओढून चंद्रबळ आणणें . 
मेणवणें , मेणावणें , विणें   मेण , तेलाच्या तळची बेरी , तेलांत भिजविलेली चिंध्यांची राख इ० नीं सूप , टोपलीं इ० मढविणें ; त्यांस लेप देणें .
( ल . ) गोंडस , लठ्ठ बनणें . सामाशब्द .
०कट  न.  ( समई , तेलातुपाचें भांडें यांस चिकटून असणारी ) तेलाची घाण , मळ , चिकटा , बेरी
०कट वि.  घाण तेलानें , तुपानें माखलेला ; मेणचट ; तेलकट ; ओशट ( वास ). [ मेण + कट ]
मेणकटणें , मेणकुटणें अ.क्रि.   मेणकट लागणें ; घाण तेलातुपानें माखलें जाणें ( भांडें ).
०कापड  न. मेण लावलेलें एक प्रकारचें कापड .
मेण कुटला वि.   अतिशय शिजविल्यानें मऊ व मेणासारखा झालेला ( भात ). [ मेण ]
०कुटलें  न. जास्त शिजविल्यानें बिघडलेला भात .
०गटी, ०गट  स्त्री. जास्त शिजविलेल्या भाताचा मऊपणा व मेणचटपणा . [ मेणगट ]
०गुट होणें अ.क्रि.  एकजीव होणें ; मिसळणें .
०गोळी  स्त्री. 
  1. मेणाची गोळी .
  2. ( ल . ) मऊ , नरम , सौम्य मनुष्य .

०घुणा, ण्या वि.   सौम्य , शांत , गंभीर मुद्रेचा पण मनाचा कुढा , लबाड मनुष्य ; न बोलणारा , आंतल्या गांठीचा इसम .
०चट वि.  
  1. मेणगट ; कण्या न पडलेलें ( तूप ).
  2. मऊ व मेणासारखा शिजलेला ( भात ).
  3. गिच्च व पचपचीत ( शिजविण्यांत बिघडलेलें अन्न ).
  4. मंद ; ढील ; गयाळ ; सुस्त ; निर्जीव ; उत्साह , धैर्य , पाणी नसणारा .
  5. कृपण ; कंजूष ( मेणचाटणारा ).

०चोट,चोट्या वि.  
  1. नपुंसक ; निर्बल ; नामर्द .
  2. जड ; रेंगाळणारा ; मेंग्या मारवाडी .
  3. भोळसट ; भोळानाथ .

०तेल  न. ( गो . ) तेलांत शिजविलेलें मेण ; ( स्त्रिया कुंकु लावतांना हें मेणतेल कपाळास लावून त्यावर पिंजर लावतात ).
०बत्ती  स्त्री. मेणानें मढविलेली वात ; मेणाचा दिवा . [ फा . मोम , मूम + बत्ती ]
०बाजार  पु. दररोज दुकानासाठीं पालें द्यावयाचीं व तीं रात्रीं काढावयाचीं अशीं दुकानें असलेला बाजार ; जुना बाजार . हा मुख्य रस्त्यांत नेहमीच्या दुकानाशीं समांतर ओळींत भरवितात . आयते तयार केलेले कपडे व जुनेपाने जिन्नस यांत विक्रीस मांडतात .
०बाजारी  पु. 
  1. मेणबाजारांतील दुकानदार , माल विकणारा .
  2. ( ल . ) पत नसलेला , बेअब्रूचा माणूस .

०बावली  स्त्री. 
  1. ( ल . ) लहान , सुबक , नेटकी व चपल स्त्री .
  2. गरीब , दुसर्‍याच्या तंत्रानें चालणारी नवरी , बायको .

०वला वि.  ( प्र . ) मेणोला ; मेणा पहा .
०वात  स्त्री. मेणबत्ती पहा .
मेणाचा वि.  
  1. मऊ ; अशक्त ; कमकुवत .
  2. नरम ; निर्जीव .
  3. अयोग्य ; अक्षम .
  4. धिक्कार , तिरस्कार दाखविण्याकरितां नेहमीं योजतात . उदा० तूं कोण मेणाचा मला सांगायला ?

मेणी  स्त्री. 
  1. तेलकट काजळ ; मस ; घाण .
  2. केसांच्या वळलेल्या जटा .
  3. ( ठाणें ) काकडीची एक जात . - कृषि ४८२

मेणाळ  स्त्री. ( जरतारी धंदा ) मेण असलेली , मेणयुक्त तार .
मेणी मोडशी  स्त्री. जुनाट , फार दिवसांची मोडशी . [ मेण्या + मोडशी ] .
मेणें  न. 
  1. ( कों . ) जिच्या चिकानें मासे आंधळे होऊन सहज सांपडतात अशी नदी इ० च्या प्रवाहांत टाकतात ती एक वनस्पति ; कांड्याहुरा .
  2. माशांना मारण्याकरितां , गुंगी आणण्याकरितां नदींत टाकलेटा चिकचिकीत द्रव्याचा पदार्थ .

मेणे डोळे  पु.अव.  डोळे आले असतां त्यांतून अतिशय पू वाहणारे , फार बरबरणारे डोळे ; बरबरीत , पुवाचे डोळे ; शेणे डोळे ; याच्या उलट काटे डोळे.
मेण्या वि.  
  1. मऊ ; दुबळा ; नामर्द ; गरीब .
  2. मंद ; धारिष्ट नसलेला ; निर्जीव . [ मेण ]

मेण्यामारवाडी  पु.  दिसण्यांत भोळा पण कावेबाज इसम ; सौम्य मुद्रेचा पण शठ मनुष्य .
मेण्या साप  पु. 
  1. सापाची एक जात .
  2. ( ल . ) गुप्तपणें आकस धरुन नाश करणारा मनुष्य .

मेणें वावर  न.  ( रब्बीच्या पेरणीकरितां ) नांगरुन , खत घालून , राखून ठेवलेलें वावर . 
मेणोला , मेणोल वि.   मेणा पहा .
मेणा , ण्या वि.  मेण , तेलाचा - तुपाचा गाळ , जाळलेल्या चिंध्या , शेण्यांची राख इ० कांच्या मिश्रणानें लेपलेला ( हारा , टोपलें , सूप , पाटी , इ० ). [ मेण ]

मेण     

म्यान पहा.

Related Words

मेण   मेण करणें   मोम   beeswax   موم   मुसथा   মোম   মম   सिक्थम्   મીણ   ਮੋਮ   మైనము   ಮೇಣ   मेण काढणें   मेण घालणें   मेण स्वस्थ होणें   मेण होणें   होडांसांगाति व्यारु नाका, हुनासांगाति मेण नाका   ମହୁଫେଣା   மெழுகுவர்த்தி   മെഴുക്   beewax   bees wax   wax pattern   wax vent   diptych codex   modelling wax   japan wax   ceresine wax   bay bettery wax   ester wax   paraffin wax   wax based granulations   wax gland   wax paper   wax pocket   self emulsifying wax   ggafting wax   bleached beeswax   मेणवली   मेणोली   मेणकागद   lanolin   paraffin   wax   णकारांती   ceriferous   वितळवणे   वितळावप   मांझा   मेणकापड   तातणे   लांस   मांजा   शिक्य   मांज्या   तेव   orderly   लुंकण   लुकड   लुकण   सांचो   म्यान   बस्त   रोगण   might   सिक्थ   शिकील   शिक्कल   लोळा   रोगन   भोई   जळ   टिकली   शिकल   खडू   coat   मोह   hand   विषम   घन   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   نَزدیٖک   نَزدیٖکُک   نزدیٖکی   نَزدیٖکی   نزدیٖکی رِشتہٕ دار   نٔزلہٕ   نزلہ بند   نٔزلہٕ بَنٛد   نَژان   نَژر   نژُن   نَژُن   نَژناوُن   نَژنَاوُن   نَژُن پھیرُن   نَژُن گٮ۪وُن   نَژَن واجِنۍ   نَژن وول   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP