Dictionaries | References क कुर्हाडीचा दांडा गोतास काळ Script: Devanagari Meaning कुर्हाडीचा दांडा गोतास काळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुर्हाडीचा दांडा हा लाकडाचा केलेला असतो व त्या कुर्हाडीने लाकूडतोड्या सर्व लाकडे तोडून टाकतो. यावरून एखादा मनुष्य स्वजनांस घातक झाल्यास त्याबद्दल ही म्हण योजतात.कुर्हाडीचा दांडा लाकडाचा केलेला असतो पण तोच आपल्या जातभाईंना-लाकडांना कापण्यास, फोडण्यास तयार होतो. (ल.) निमकहरामघग्बुडव्याकुलशत्रु. ‘‘त्या शूराच्या (धनाजीच्या) पोटी हा मंगलनिधि चंद्रसेन उत्पन्न झाला आणि स्वराज्याशी निमकहरामीपणा करून ‘कुर्हाडी०’ झाला.’’-बाजी० ‘‘जो बाटतो तो ‘कुर्हाडीचा०’ असे होऊन आपल्या जातीबांधवांना पाहिजे तसे बोलतो, नांवे ठेवितो, व त्यांची वर्मेकर्मे बाहेर काढतो.’’-आजोच १७२. तु०-नष्टनय कसा झाला दितिसुतचंदनवनांत हा बाळ। कंटकतरु, व्हायाला तच्छेदक विष्णुपरशुला नाळ।। -मो मंत्रभागवत ७.४५.कुर्हाड पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP