TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

जग

ना.  अखिल सृष्टी , जगत् ‌ , त्रिभुवन , त्रैलोक्य , दुनिया , भूलोक , लोक , विश्व , संसार , सृष्टी .
 स्त्री. एक मोठी ३ - ४ फुट व्यासाची २ फुट खोल बांबूची परडी . ' यल्लमाची मूर्ती पुजारी सौदत्तीस घेऊन जात . हिला जगाची यल्लमा म्हणता .' - शिंआत्म ११ .
 न. १ स्थावरजंगमरूप अखिल सृष्टि ; विश्व ; पृथ्वी ; दुनिया . २ ब्रह्मांड ; माणसांचें वसतिस्थान ; मनुष्यजात ; लोक . [ सं . जगत ] ( वाप्र . ) जगांतून उठणें - १ लोकाचा विरुध्द वागणें . २ ( वैधव्यामुळें , आपत्तीमुळें ) सर्वस्वी बुडणें . जगाबाहेरील , निराळी चाल - लोकविलक्षण चाल . जगामुलखानें सोडलेला - जातीवेगळा टाकलेला ; सार्‍या गांवाची ओवाळणी ; सार्‍या दुनियेची खरवड . म्ह० आपण भला तर जग भलें आपण मेला जग बुडालें . सामाशब्द -
०गोळ  पु. ( काव्य ) पृथ्वीरूपी गोल . जैसा महाप्रलयीं जगगोळ । जाहाला उदकाभ्रें ब्रह्मगोळ ।
०चालक वि.  ( काव्य ) जगाचें भरणपोषण करणारा ( ईश्वर ). जगच्छेट - जगतछेट पहा . जगजाहीर - वि . सर्व लोकांना माहित असलेला ; प्रसिध्द असलेला .
०जीवन  न. जगज्जीवत पहा .
०जुग  न. ( महानु . ) मोठी आपत्ति , जगावर आकाश कोसळणें . औचित्तें जगजुग पडिले सनकादिकावरी ।
०जूट  पु. सुव्यवस्था .
०जेठी  पु. ( काव्य ) १ जगामधील मोठा ( ईश्वर ). २ जगांतील बलवान पुरुष , मल्ल . आम्ही जगजेठी असतां । - एरुस्व ६ . ३५ . - ज्जनक - पु . जग उत्पन्न करणारा . जगतकारण पहा . - ज्जीवन - न . जगाचें जीवन ; जीव सृष्टीचें जगण्याचें साधन ( पाऊसपाणी , अन्न इ० ). २ सजीव प्राण्यांचें अस्तित्व - वि . जगाचें धारण - पोषण करणारा ( ईश्वर ).
०झंप वि.  ( महानु ) जगाला झोडणारा . उघटेआं देवां जगझंपु । - शिशु १५४ .
०झोडी  स्त्री. बटीक ; दासी . लाज धरीं भांडे । जगझोडी रांडे । - तुगा . २६० .
०डंबर  न. १ अवडंबर ; अवाढव्य पण निरर्थक थाटमाट , धामधूम , आव ( विद्या , पैसा यांचा ). ( क्रि० घालणें . २ अफाट जगास आश्चर्यानें म्हणतात ; विश्वविस्तार ; एखादी अवाढव्य , विस्तीर्ण वस्तु . तो हा जगडंबरु । - ज्ञा १५ . ४७ . [ सं . जगत + अंबर ] - डवाळ , डव्याळ - वि . प्रचंड ; अवाढव्य ( इमारत , शरीर , अरण्य ); प्रमाणरहित , बोजड ( पदार्थ ). [ सं . जगत + व्याल ]
०ढाल   ढाळ - पु . ध्वज ; झेंडा . [ सं . जगत + ढाल ] जगत - न . जग अर्थ १ , २ , पहा . जगती - स्त्री . १ जग अर्थ १ , २ पहा . किं पळता सरली अवघी जगती । २ ( महानु . ) मठ . पूर्वाभिमुखजगती असे । - ऋ १०६ . जगतीतल - न . पृथ्वीतल ; पृथ्वीचा पृष्ठभाग . जगत्कर्ता - पु . ब्रह्मदेवाचें एक नांव . जगज्जनक पहा . - त्कारण - न . जगाला उत्पन्न करणारी शक्ति ; हा शब्द निरनिराळे पंथ , ईश्वर , माया , प्रधान , परमाणु , या निरनिराळया शब्दांना लावतात . जगतत्रय - न . स्वर्ग , मृत्यु , पाताळ . जगत्पति प्रभु - पु . जगाचा धनी , नियंता , ईश्वर किंवा राजा . जगत्पालक पाळक - वि . जगाचें पालन करणारा . जगतप्रसिध्द - वि . जगजाहीर पहा . जगत्प्राण - पु . हवा ; वायु . जगध्दंधु - पु . विश्वबंधु ; सर्व सृष्टीवर प्रेम करणारा . जगत्शेट - पु . १ फार श्रीमंत . २ ( ल . ) निर्धन पुरुष . जगत्शेटीचा नातू - वि . निर्धन मनुष्य . जगतस्त्रष्टा - जगज्जनक पहा . जगतस्वामी - पु . जगाचा धनी . जगतक्षय - जगाचा नाश . जगदंत - पु . जगाचा नाश शेवट , अखेर . [ जगत + अंत ]
०दंबा   दंबिका - स्त्री . पार्वती ; देवी ; जगाची माता . विन्मुख जाहली जगदंबा । - एरुस्व ५ . ७३ . [ जगत + अंबा ]
०दळ   दाळ - वि . १ जगाला भरडणारा . दापीतेआं देवांचा जगदळा । - शिशु १५५ . २ ( बायकी ) जगाशीं भांडणारा .
०दात्मा   जगदीश दीश्वर - पु . ईश्वर ; ब्रह्म . [ जगत + आत्मा , ईश , ईश्वर ]
०दाभास  पु. विश्वसादृश्य ; जडरूप माया ; बाह्य सृष्टि . [ जगत + आभास ]
०दुध्दार  पु. १ जगाचा उध्दार , मुक्ति . २ - वि . जगाचा उध्दार करणारा . [ जगत + उध्दार ] - दगुरु - पु . १ ईश्वर . २ श्रीशंकराचार्यांची पदवी . ३ थिऑसफी पंथांतील गुरुस्थानी मानलेली श्रेष्ठ विभूति . - दभूषण - न . जगाचा अलंकार ; ईश्वर . - द्वंद्य - वि . सर्व जगास पूज्य . - द्विनाश - जगतक्षय पहा . - द्विलक्षण - वि . १ सर्व जगाहून निराळा ; विलक्षण . २ वाह्यात ; चमत्कारिक ; तर्‍हेवाईक . जगधाम , जगन्निवास - वि . ( काव्य . ) सगळें जग व्यापून राहणारा ; परमेश्वर ; सर्व जग हें ज्याचें घराअहे असा .
०नाड  स्त्री. जगदळ - दाळ पहा .
०न्नाथ  पु. १ जगाचा स्वामी . २ पुरी येथील श्रीविष्णूची मूर्ति . म्ह० आपला हात अन जगन्नाथ = स्वत : स पूर्ण स्वातंत्र्य असणें . [ जगत + नाथ ]
०न्नायक  पु. जगाचा स्वामी , पालनकर्ता ; ईश्वर . [ जगत + नायक ]
०न्निंद्य वि.  सर्व जग ज्याची निंदा करतें असा .
०न्नियंता वि.  जगाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारा . - न्मंगल - वि . जगाचें कल्याण करणारा . माळा हे कमळा विचारुनि गळा घाली जगन्मंगला । - न्माता - स्त्री . १ जगाची आई ; जगदंबा . २ ( ल . ) मार्तृतुल्य स्त्री . - न्मित्र - पु . जगतबंधु पहा . आवडतें मूल , सुस्वभावी माणूस . - न्मोहना - स्त्री . जगाला भुलविणारी स्त्री .
०प्रसिध्द   जगजाहीर पहा .
०बोळ  पु. १ ( महानु . ) जगाला पारखा होणें . त्यागा जगबोळ जाहाला । - भाए ९१ . २ कडू कातबोळ . नारदा होतुसें जगबोळाचें मानू । - भाए ६३ .
०भांड वि.  जगदळ पहा .
०मित्र   मैत्र - वि . सर्व जगाशीं मैत्री करणारा .
०लीला  स्त्री. १ जगाची रीत ; सर्वसामान्य लोकांची वागणूक , पध्दति , समजूत वगैरे . जगलीला अशीच , बर्‍याला वाईट वाईटाला बरें म्हणावें . २ आधिभौतिक मोह , माया ; खोटया जगाचा खर्‍या जगाप्रमाणें भास .
जगांतून उठणें
लोकाचाराविरूद्ध वागणें
शिष्‍टाचाराविरूद्ध वर्तन करणें
स्‍वैर वर्तन करणें
मर्यादेबाहेर वागणें.
वैधव्य किंवा एखाद्या भयंकर आपत्तीमुळे सर्वस्‍वी बुडणें
कोठेहि थारा नाही असे होणें. ‘आई काय सांगूं? तुझी वेणी जगातून उठल्‍यासारखी झाली !’ -रंगराव.
  The universe. The world. Mankind.

Related Words

आप डुबा, तो जग डुबा   आपण आपल्यास वानी, पण जग देतें गार्‍हाणीं   आपण चांगले तर जग चांगले   आपण बरो जाल्यारि जग बरें   आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें   आपण भला तो जग भला   आपण मेले आणि (नी) जग बुडाले   आपण सुखी जाल्यार जग सुखी   आपणावरून जग ओळखावें   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   आप बुरा तो जग बुरा   आप भला तो जग भला   आप मेले जग बुडाले   आप मेला जग बुडाला   आपलें आपल्याला वाणी, जग देतें गार्‍हाणीं   आपले नाते, जग हांसे   आपल्यावरून जग ओळखावें   आप सुखी तर जग सुखी   कपडा पेने जग भुलता, खाना खाये मन खुलता   केल्‍याविण कांहींच नाहीं, जग देतें ग्‍वाही   कोण जाणे खरें खोटें, जग चाले उफराटें   घोवानं म्‍हटली रांड आनि जग म्‍हणतां सांड   चांगले जग, हेंच जगाचे कल्‍याण   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   जग लोक खाती, पसरकारा तोंडां माती   (जिचे) मोठे कुले, तिला जग भुले   जिचे मोठे कुले, तिला जन (जग) भुले   जों जवळ ओयरा, तों जग सोयरा   जों जवळ ओवरा, तों जग सोयरा   दुद नासल्यारि दुदगाळि पाडि, आपण नासल्यारि जग पाडि   द्रव्य ज्याच्या संग्रहीं, त्याला सगळें जग वश होई   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   दिसतें तसें नसतें. म्हणून जग (मनुष्य) फसतें   निरिच्छ प्राणी, जग तृण मानी   बेडकाला डबकें, त्याला जग पारखें   ब्रह्म सत्य जग मिथ्या   मति नाशिल्याक गति ना, गति नाशिल्याक जग ना   माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही   मी भला वाणी, जग देतें गार्‍हाणीं   मोठे कुल्‍ले, जग भुले   वस्त्राआड जग-जन नागवें   शेतकरी सुखी तर जग सुखी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

हरिमंत (आंगिरस)

 • n. एक वैदिक सूक्तद्रष्टा [ऋ. ९.७२] 
RANDOM WORD

Did you know?

What is the Sati Practice?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.