• Register

दत्तकपुत्र घेण्याविषयी कांही धर्मशास्त्रीय निर्णय आहेत काय?

294 views
asked Apr 18, 2014 in Hindu - Traditions by TransLiteral (9,280 points)

1 Answer

0 votes
दत्तक पुत्र घेताना प्रथम सोदर म्हणजे सख्ख्या बंधूचा पुत्र हा मुख्य आहे तो घ्यावा. तसे नसेल तर आपल्या गोत्राचा सपिंड असेल तर तो अथवा सापत्नबंधूचा पुत्र घ्यावा. त्यांतलाही नसेल तर भिन्नगोत्रातला असून सपिंड असा मातुळकुळातला, किंवा पित्याच्या भगिनी इत्यादिकांच्या कुळातला असावा. बहिणीचा अथवा कन्येचा पुत्र दत्तक घेऊं नये. ब्राह्मण व्यतिरिक्त इतरांनी आपापल्या वर्णातीलच घ्यावा. कोणीही ज्येष्ठ ( वडील ) पुत्र घेऊ व देऊ नये. शूद्राने मात्र बहिणीचा अथवा कन्येचा पुत्र दत्तक घेतल्यास चालते. विधीपूर्व दतकविधान केल्याशिवाय पिंड देणे, द्रव्य घेणे वगैरे अधिकार प्राप्त होत नाहीत. एका पुरूषाच्या एकापेक्षा अनेक स्त्रिया असतील त्यांमध्यें एका स्त्रियेला पुत्र असेल तर त्या एका पुत्रानें त्या सर्व स्त्रिया पुत्रवती होतात, असे मनुवचन आहे. सवतीच्या पुत्राला सर्व अधिकार प्राप्त होतात. जर एकच पुत्र असेल तर तो पुत्र दत्तक देऊं नये अथवा घेणार्‍याने घेऊं नये. पती विद्यमान असतां पत्नीने पतिच्या आज्ञेनेच दत्तक पुत्र घ्यावा. विधवा स्त्रीनेही ` तूं दत्तक पुत्र घे ' असे पतिने सांगून नंतर मृत झाला असेल तर दत्तक  पुत्र घ्यावा. असपिंड व असगोत्र यांमध्ये दत्तक घेणे तो मौंजी झालेलाच घ्यावा. तर भिन्न गोत्रांनी मौंजी न झालेला घेतला तरी शास्त्रसंमत आहे.
संदर्भ - धर्मसिंधु ग्रंथ निर्णय
answered Apr 18, 2014 by TransLiteral (9,280 points)

Related questions

...