श्री परशुराम माहात्म्य - अध्याय १८

श्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीजानकीवल्लभाय नमः ॥

भीष्म ह्मणे युधिष्ठिरा पवित्र गंगेचिया तिरा विश्‍वामित्र महाधीरा तपश्चर्या आचरे ॥१॥

तो तपि या तेजस्वी जाण पुराणीं वर्णिती मुनिजन जेवीं आकाशींचा चंडकीर्ण तेवीं तपें भासतो ॥२॥

अगाध तयाची ख्याती दाही दिशा तपें तपती हें देखोनि अमरपती घोर चिंतीं बुझावला ॥३॥

तया हानी करावया इंद्र उपाय योजी तया सुरपती आणि तपीया अखंड वैर चालतसे ॥४॥

इंद्र जाणे अंतःकरणीं तपाची पूर्णता जालिया मुनी माझिया पदवी लागोनी घेईल हिरोनि तपोबळें ॥५॥

ह्मणोनि येतो देवेंद्र तप आचरतां विश्‍वामित्र तें टाळावया समग्र युक्ती योजिता जाहला ॥६॥

मग पाचारी दिव्य अप्सरा श्रृंगारुनि ते मनोहारा ह्मणे जाऊनि गंगातीरा विश्‍वामित्रा छळावें ॥७॥

लावूनि नेत्र कटाक्ष बाण वि‍श्‍वामित्राचा मनोहाराण तात्काळ पाटी विंधोन तपा क्षीण करावा ॥८॥

करुनि समस्त श्रृंगार स्वरुपें नटली परम सुंदर पावती जाली गंगातीर विश्‍वामित्र छळातें ॥९॥

तंव तो तपिया महाऋषी तप आचरे ते जोराशी अप्सरा निःशंक मानसीं नृत्य गायन करी तेथें ॥१०॥

ते सुलक्षणि का नारी तारुण्य दशा मनोहारी देखतां तपस्वी अंतरीं भोगू इच्छिती निर्धारें ॥११॥

यौवन गर्विता देवांगना सर्व लक्षणीं चंद्रानना विश्‍वामित्राचिया मना हरीती जाहली क्षणार्धे ॥१२॥

गौरजानूपयोधर मध्यें रेखाकृती सुंदर देखतां ऋषीचें अंतर कामानळें दग्धलें ॥१३॥

देखोनि तपातें तिळांजुळी पातला प्रमदेच्या जवळी देखतां पिंगट जटा मौळी भ्याली मनीं अप्सरा ॥१४॥

पुढें पळता हे गोरटी गाधी नंदन धांवेपाठी हस्तें सांवरी कांसोटी ह्मणे पाठी धांऊं नको ॥१५॥

परी नायके जटाधारी प्रवेशली गंगा भीतरीं विश्‍वामित्र अंतरीं माहाक्रोधें खळबळला ॥१६॥

अंग भोग आशामनीं धरुनि केलीत पाहानी तेही पळाली नितिंबिनी दोहों पक्षीं अंतरलों ॥१७॥

परम कपटी ही अप्सरा वेध लाविला माझिये अंतरा तरी तूं ये अवसरा शिळा होई जडत्वें ॥१८॥

अलोट शाप इंद्र शंकरा ऐकतां दुःखें ते अप्सरा जवळी येऊनि गाधी कुमरा विनय वचनें बोले ती ॥१९॥

गेली अत्यंत भिवोनी लोटांगण घातलें चरणीं शरणांगता रक्षी उःशाप देऊनी तंव ऋषी संतोषें वदे ॥२०॥

परब्रह्म साक्षांत लक्ष्मीवर भ्रुगुकुळीं जाला फरशुधर बाणीं भेदील सागर त्याचे चरण लागती ॥२१॥

तेव्हां होईल तू जगती मग ती रंभा पडली क्षिती, होऊनि शिळेचि अकृती निचेष्टित पडियेली ॥२२॥

देवेंद्रें मानिला मनीं लाभ विराला ऋषी कोपस्तंभ इंद्रा अपराधें गौतम क्षोभ जेवीं शिळा आहिल्या ॥२३॥

तेवीं घडलें रंभेतें ॥ शिळा रुपें पडली तेथें ऐसी कथा धर्मातें भीष्म देवें नेमिली ॥२४॥

शिळारुपें ती अप्सरा मानसीं चिंती परशुधरा दयावंता करुणा करा समुद्र तीरा कधीं येसी ॥२५॥

केव्हां घडेल आगमन मज कधीं लागती चरण मुक्त होईन शापापासून स्वर्गी मन कधीं घडे ॥२६॥

कीतीं काल ऐशापरी रंभामनीं चिंता करी पुढें क्षत्रीय परशुधारी मारुनि केले दुष्ट निर्बुज ॥२७॥

विश्‍वामित्राचा महाशाप वरी परशुरामाचा कोप ऊर्वशीचा उःशाप योग समीप आला ते काळीं ॥२८॥

ते शिळेसी ने हेट निपाया वोढी निर्मीली देवराया माहा आकांत जैसी माया वर्ते ब्रह्मांड मंडपीं ॥२९॥

थरथरा कांपे मेदिनी पर्वत खचती कडकडोनी परशुरामातें नयनीं कोणीं पाहों शकेना ॥३०॥

दिगज थरथरां कांपती नक्षत्रें खळखळा रिचवती आदिवाराह फणिपती सांवरीती कुंभीनी तें ॥३१॥

राम कोध पाहोनियां देवऋषी पावलेभया सृष्टी जाईल आतां लया ठाव कोठें नुरेची ॥३२॥

तेव्हां शत्रु शिव ऋषेश्‍वर यक्षगंधर्व किन्नर सित्ध चारण पादोदर भार्गवेश्‍वरा तें स्तविती ॥३३॥

नमो रामा भ्रुगुपती अनंत वेशा अनंतमूर्ती करुणाकरा सुखशांती नारायणा नमोस्तुते ॥३४॥

नमो परशुरामा वीरा भार्गव वंशा दिनकरा क्षत्रियांतका समरधीरा असुर संहारा नमोस्तुते ॥३५॥

इच्छित दाता तूंचि एक पीता शरणांगता तें रक्षिता अहंकारादि तम हरिता प्रताप सविता नमोस्तुते ॥३६॥

रामा ऐकावी विनंती आमुचिया काकूळती पावा वेंगा शीघ्रगती कृपामूर्ती जगदीशा ॥३७॥

दान दिधला ब्रह्मगोळ याचा होईल ब्रह्मघोळ भूतजातीं प्रळयकाळ वर्तेल आतां क्षणार्धें ॥३८॥

देवा तूं भक्त कैवारी वससी भक्तांचिये अंतरीं सर्वज्ञा तूं दया करी निवारी आतां क्रोधातें ॥३९॥

तूं व्यापिलें स्थिरचरा तरी क्षमा करी या सागरा रक्षऊनी विप्रसुरा शांत करा क्रोधातें ॥४०॥

या लोकपाळा मुनीजना मान देई भक्तवचना ऐकतां भार्गवाच्या मना करुणा आली सर्वांची ॥४१॥

क्रोधातें शांत करुन चहूंकडे पाहें विलोकून धनुष्या योजिला बाण कोठें सोडूं विचारी ॥४२॥

बाण धरिला न धरिला अवचित हातींचा सुटला शोषीत जाय समुद्र जला प्रलय वर्तला सर्वांतें ॥४३॥

बाणाचिया महामारीं आकांत भावे जळ भीतरीं व्याकूळ होऊनि शरीरीं तीर्थराज माघारला ॥४४॥

कडकडिती प्रळय चपळ तैशा निघती अग्नी ज्वाळा बाण वक्ष स्थळीं भेदिला पाळ पंजर दैत्याचे ॥४५॥

आतां पाळ पंजर दैत्य समुद्रीं विशाळ पर्वत तो सुरवरांचा निश्चित वैरी विख्यात पैं असे ॥४६॥

अग्निबाणाचा महालोट असुरांचा न चले थाट फोडूनि केला सपाट ठिकर्‍या पसरल्या दशदिशा ॥४७॥

दैत्य देहाची समाप्ती होतां प्रगटली दिव्यमूर्ती रामस्वरुपीं विश्रांती पावोनि स्तुती करीतसे ॥४८॥

जय जया आनादी पुरुषा एका स्वतंत्रा विश्‍वेशा उपाधी रहीता त्‍हृषीकेशा सर्व व्यापी नमोस्तुते ॥४९॥

सर्वत्र असे तुझी व्याप्ती परी सर्व स्थीत दुःखा धर्माची अप्राप्ती तो तूं दृश्य ज्ञानी जना प्रती भार्ववेशा तुज नमो नमो ॥५०॥

ऐसी स्तुती करितां मुक्ती लाधली सायुज्यता अग्नीबाण तत्वतां स्थीर जाहला सवेंची ॥५१॥

जल शोषिलें अग्निबाणें मर्यादा सांडिली सागरजीवनें तेथें द्वादश योजनें गणीत केली पुराणीं ॥५२॥

गंगातटीं शिळेवरी पश्चिम दिशेसी सागरीं द्वादश योजनें वसुंधरीं क्षेत्र परशुरामाचे ॥५३॥

एवं सागराचें महिमान हिरुन घेतां रेणुकानंदन आवरिलें सायकासन निर्वेध मन पैं केलें ॥५४॥

शापें अप्सरा शिळा जाली चरण स्पर्शे उद्धरिली रामापुढें उभी ठाकली स्तवन करी परोपरी ॥५५॥

सद्गद कंठ अश्रू नयनीं विनंती करी जोडल्या पाणी हे वैकुंठ पती मोक्षदानी तुझी करणी अगाध ॥५६॥

जय रेणुका गर्भ धारणा तुझिया कृपे नारायणा क्षत्रियांतक भक्त रक्षणा मुक्त जालें मी आजी ॥५७॥

लोहो परिसा भेटी होतां काळिमा नुरेचि तत्वतां तेवीं तुझे चरण स्पर्शतां दिव्य देहा पावलें ॥५८॥

ऐसी स्तुती करितां जाण तों पावलें दिव्य विमान देवांगना आरुढोन इंद्रभुवना पातली ॥५९॥

ब्रह्मादि देव ऋषेश्‍वर साष्टांगें नमिला फरशुधर विश्‍वेंक देवा तुह्मी अपार श्रुति शास्त्रां ॥६०॥

नमो देवा परशुधरा मायातीता सर्वेश्‍वरा चिन्मय रंभा शाप दुस्तरा हरता नमो नमस्ते ॥६१॥

साधु त्‍हृदयीं सर्वत्र अवलोकितां तुज पवित्र तुझी कथा अद्भुत विचित्र ऐकतां पावन जन होती ॥६२॥

एवं ऋषींची स्तुती ऐकतां तोषले भ्रुगुपती आनंद जाहला भक्तांप्रती पुढील प्रसंगीं चित्त द्यावें ॥६३॥

स्वस्ति श्री परशुराम चरित्र कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु अष्टादशोध्याय गोड हा ॥श्रीरमाकांतार्पणमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP