गुरूची आरती - मौजेची आरती मौजेचा देव । ...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


मौजेची आरती मौजेचा देव ।

मौजेचेही भक्त करिती उत्सव मौजेचा येथें धरुनी दृढ भाव ॥

मौज तेथे प्रगटे श्रीसद्‌गुरुराव ॥ १ ॥

जय देव जय देव जय मौजरुपा ।

नाना मौजा करिसी केशवगुरुकृपा ॥ धृ. ॥

मौजेची आरती मौजेचे घृत ।

पंचप्राण उजळुनि लावियली ज्योत । जिकडे पहावे तिकडे मौज भरीत ।

सर्वांघटी भरला तो मौजनाथ ॥ २ ॥

मौजेची आरती मौजेचें गान ।

मौजेचें येथें जहालें कीर्तन ॥

मौजेवाचुनि न दिसे आणिक शिवदीन ।

मौज पहातां येथें भासे विघ्न ॥ ३ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP