चतुःश्लोकी भागवत - श्लोक १८

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


॥ श्लोक ॥
ननाम पादांबुजमस्य विश्वसृग्यत्पारमहंस्येन पथाऽधिगम्यते ॥ तं प्रीयमाणं समुपस्थितं तदा प्रजाविसर्गे निजशासनार्हणम् ॥१८॥

॥ टीका ॥
जीं परहंस प्रांजळें ॥ योगवैराग्यज्ञानबळें ॥ पाविजेती हरीचीं पादयुगुळें ॥ ती चरणकमळें वंदिली भावे ॥७७॥
जे वेदविवेकव्यूत्पत्तीं ॥ जाणॊनी सद्भावें भक्ति करिती ॥ ते भगवच्चरण पावती ॥ ते प्रजापती वंदिता झाला ॥७८॥
हरिचरणद्वंद्वयुगुळें ॥ वंदितांची भावबळें ॥ निर्द्वंद्व करिती तात्काळें ॥ तीं चरणकमळें वंदिलीं ॥७९॥
हरिचरणपदद्वंद्व ॥ वंदितां करी निर्द्वद्व ॥ यालागीं स्रष्टां स्वानंद ॥ भगवत्पद स्वयें वंदी ॥८०॥
भावें वंदितां हरिचरण ॥ जगाचा स्रष्टा झाला आपण ॥ नकरवे ह्मने सृष्टिसर्जन ॥ त्या जगाचें दर्शन विधाना देखे ॥८१॥
नरचिंता भूतभौतिककोटी ॥ स्रष्टा देखे सकळ सृष्टी ॥ यालागीं विश्वदृक्दृष्टी ॥ ब्रह्म्याची नामाटी सत्यत्वा आली ॥८२॥
करितां हरिचरणीं नमन ॥ विश्वद्रष्टा झाला आपण ॥ विश्वदृक् नामाभिधान ॥ ब्रह्म्यासी जाण याहेतूं ॥८३॥
ब्रह्मा सद्भावें आपण ॥ साष्टांग घाली लोटांगण ॥ तो भाव देखोनी नारायण ॥ स्वानंदें पूर्ण संतुष्टला ॥८४॥
येऊनी ब्रह्मयाजवळी ॥ कृपें अवलोकीं वनमाळी ॥ संतुष्ट होउनी त्याकाळीं ॥ ह्मणे याची झाली परिपक्कदशा ॥२८५॥
एवं करावया सृष्टिसर्जन ॥ स्रष्ट्यासी स्वाधिकारीं पूर्ण ॥ स्थापावया श्रीनारायण ॥ आइका निजाश्वासन बोले तें ॥८६॥


References : N/A
Last Updated : July 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP