मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|

एकादशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`


ब्राह्म  ण  स्त्री करंजपुरीं । हो अंबाख्या सुंदरी ।
प्राक्संस्कारें प्रदोश करी । तिला वरी माधव विप्र ॥१॥
झाली  दृ  ढधी गर्मिणी । बोले तत्वज्ञान जनीं ।
शोभली ती संस्कारानीं । शुभलग्नीं प्रसवली ॥२॥
तो  प  ढे  बाळ ओंकार । पिता करी तत्संस्कार ।
होती सर्व हृष्टतर । अवतार हा म्हणती ॥३॥
करू  न  नामकर्मा । नाम घेती नृहरि शर्मा ।
पिता वेंची धन धर्मा । चित्र नर्मा दावी बाळ ॥४॥
न इ  च्छि  शिशु बोलाया । तया मूक मानूनियां ।
ते करिती बहु उपाया । शिशु तयां दावी खुणा ॥५॥
मूक  त्वा  टांकी तेव्हां । बांधाल मुंजी जेव्हां ।
असें म्हणूनी करी तेव्हां । बाल लोहाचें सुवर्ण ॥६॥
बोल  त  याचा मानून । करिती व्रतबंधन ।
मातेपाशीं भिक्षा दान । मागे तीन वेद पढे ॥७॥
जैं प्रा  त:   काल येतां । अंध:कार जाय अस्ता ।
तेवीं बाळें वेद पढतां । मर्त्यताधी लोपली ॥८॥
सर्वां  प  रम हर्ष झाला । बटू प्रार्थी मातेला ।
स्वीकारूं संन्यासाला । होती तुला पुत्र पुत्री ॥९॥
माता  दं  भोलीपातसे । ऐकतांची पडतसे ।
सांवरोनी बोलतसे । क्रम असे संन्यासासी ॥१०॥
वेदां  त  ब्रह्मंचर्यादि । क्रम असे नच आधीं ।
अन्यथा पडे मधीं । पुत्र सुधी ऐक म्हणे ॥११॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० स० नृसिंहावतारो नाम एकादशो० ॥११॥ग्रं० सं०॥१३३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP