मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|

गज्जलाञ्जलि - मनीं होती असूया ती पळाली,...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


मनीं होती असूया ती पळाली,
बढाऊ पात्रतेची फोल झाली.

रगीच्या त्या ऊमेदी आज कोठे ?
अता ती हाव सत्तेची गळाली

भरे हेमन्त अत्नर्बाहय विश्वीं,
कशाचे हेलकावे ऐन्चखाली ?

कशाची अन कुणाची ऊब आता ?
हिवाळ्याचा जिव्हाळा ये कपाळीं.

प्रिये - छे ! शब्द हा, काढूं कसा मी ?
जयाचा ह्क्क हा, तो भाग्यशाली !

कुठे मी काजवा या भूतलींचा,
कुठे तारा स्थिरे जी अन्तरालीं ?

कुठे कोपींत मी माझ्या तृणाच्या,
कुटे तू त्या तुझ्या ऐने - महालीं ?

कुठे ऐकादशी माझी सदाची,
कुठे रात्रीं तुझी गाजे दिवाळी ?

कुठे जागाच मी राहूनि माझा
भरीं रात्रीं पहारा चोरचाली,

कुठे झोपेंत ऊश्काच्या नशेने
प्रभातींही परांच्या तू न्यहालीं ?

हिमें कैलास होवो शीर्ष माझें,
तुझ्या काश्मीर हो ऊत्फुल्ल गालीं !

दिसांमागूनि गेले दीस जाती,
वसन्ताशा अता ती अन्तकालीं !

११ फेब्रुवारी १९२२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP