मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह|

शेजारत्या

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


१.
चंदनाची ओवरी उदविलिं प्रकारीं । कनकाचा मंचक शेजे सुमनें वरी ॥१॥
ओंवाळूं आलिया शेजे आरती । निद्रा करीं बापा लक्ष्मीपती ॥२॥
संत सनकादिक यांतें आज्ञा दिजे । शुकादिक ज्ञानी यांचा नमस्कार घेजे ॥३॥
बाळा प्रौढा मुग्धा यातें आज्ञा दीजे । मज सेवका संन्निध पहुडविजे ॥४॥
विष्णुदास नामा राहिला द्वारां नेहटी । जयजयकार करित देतसे घिरटी ॥५॥
२.
पहुडा पहुडा जी कान्हा कमलदळलोचना । श्रमलेती शयना करा वेगीं ॥१॥
पहुडावें आतां दीनानाथा । सुखशयना करावें जी ॥ध्रु०॥
लक्ष्मीसहित देवा निद्रा करावी । सधिकेसहित देवा निद्रा करावी ॥२॥
जाईंजुईं मोगरा मालती । कोमाइल्या पुष्पजाती जी ॥३॥
ब्रम्हादिक उभे सनकादिक उभे । आज्ञा द्यावी त्यासी जावयासी ॥४॥
गोपाळ गेले निजमंदिरा । सेवा नाणवितो नामया जी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP