मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|भीमरूपी स्तोत्रे| भीमरूपी स्तोत्रे भीमरूपी महारुद्रा । वज्रह... जनीं ते अंजनी माता । जन्म... कोपला रुद्र जे काळीं । ते... अंजनीसुत प्रचंड । वज्रपुच... हनुमंता रामदूता । वायुपुत... कपि विर उठला तो केग अद्भ... रुद्र हा समुद्र देखतांक्ष... भुवनदहनकाळीं काळ विक्राल ... लघूशी परी मूर्ति हे हाटका... चपळ ठाण विराजतसे बरें । प... नमन गा तुज हे भिमराया । न... भिम भयानक तो शिक लावी । भ... बळें सर्व संहारिलें रावणा... भीमरूपी स्तोत्र - भुवनदहनकाळीं काळ विक्राल ... श्री समर्थ रामदास्वामींनी रचलेली ' भीमरूपी स्तोत्रे ' पठन केल्यास मारूतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. Tags : hanumanmarutiramdassamarthaमारूतीरामदाससमर्थहनुमान भीमरूपी स्तोत्र - ७ Translation - भाषांतर भुवनदहनकाळीं काळ विक्राल जैसा । सकळ गिळित ऊभा भासला भीम तैसा ।दुपट कपिंत झोके झोंकिली मेदिनी हे । तळवट धरि धाकें धोकिली जाउं पाहे ॥१॥गिरिवरुनि उडाला तो गिरि गुप्त झाला । घसरत दश गांवें भूमिकेमाजिं गेला ।उडती झडझडाटें वृक्ष हे नेटपाटें । पडति कडकडाटे अंगवातें धुधाटें ॥२॥थरथरित थरारी वज्र लांगल जेव्हां । गरगरित गरारी सप्त पाताळ तेव्हां ।फणिवर कमठाचे पृष्ठिशीं आंग घाली । तगटित पवनाची झेंप लंकेसि गेली ॥३॥थरकत धरणी हे हाणतां वज्रपुच्छें । रगडित रणरंगीं राक्षसें तृण तुच्छें ।सहज रिपुदळाचा थोर संहार केला । अवघड गडलंका शीघ्र जाळून आला ॥४॥सहज करतळें जो मेरुमंदार पाडी । दशवदन रिपू हे कोण कीती बराडी ।अगणित गणवेना शक्ति काळासि हारी । पवनतनुज पाहा पूर्ण रुद्रावतारी ॥५॥॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥७॥ N/A References : N/A Last Updated : September 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP